searchingforlaugh उर्फ "आन्याची फाटकि पासोडी " इतका अप्रतिम मराठी ब्लॉग दुसरा असल्यास सुचवा ही विनंती.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो
मी तसा मराठी ब्लॉग च्या दुनीयेत नवीन च आहे. माझ्या आतापर्यंत च्या शोधात मला इतका सुंदर ब्लॉग दुसरा सापडला नाही."searchingforlaugh.blogspot.in" हा ब्लॉग आपण जरुर वाचा. आणी या सारखेच इतर काही सुंदर इतर ब्लॉग तुम्हाला माहीत असतील तर मला जरुर कळवा.
या ब्लॉग बद्द्ल मला जे आवडले ते असे की
१- या मध्ये मी कधीही बघीतलि नव्हति इतकी सुंदर व्यंगचित्रे, अतिशय दुर्मीळ अशी छायाचित्रे आहेत.जी अतिशय महान कलाकरांची आहेत.
२- या मधील विषयांचे वैविध्य अफाट आहे जसे मर्ढेकर ते साल्वादोर दाली ते तत्वज्ञान ते मस्तानी ,मस्तक गरगरुन जाइल असा विषयांचा आवाका आहे.
३- हा तसा मराठी/इंग्रजी असा द्विभाषीक ब्लॉग आहे. पण एका अस्सल मराठी माणसाचा आहे.आणी वैश्विक भान असणार्या मराठी माणसाचा आहे.
४-या ची निव्वळ सांखिकीय माहीती बघीतली तर हे एका माणसाचे ( मराठी) काम आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
एकुण ८ वर्षे अव्याहतपणे हा ब्लॉग सुरु आहे आणी एक हजार (१,०००) हुन अधीक पोस्ट आजपर्यंत झालेल्या आहेत.
५-आणी एव्हढी संख्या आहे तर दर्जा खालावला असेल अस वाटत तर अजीबात नाही उलट वाढत चाललेला आहे.
६-या वरचा जमा झालेला एवज हा एक अप्रतिम असा ठेवा आहे असे माझे मत आहे.
७-आणि मला असे मनापासुन वाट्ते की इतरांनी सुधा याचा आनंद लूटावा आणी अनिरुध कुलकणीं चा हा ब्लॉग लोकांना माहीत व्हावा.
८- श्री कुलकर्णि कधीही या ब्लॉग चा फारसा स्वताहुन प्रचार करीत नाही या बाबत ते दुसर्या एका कुलकर्णि g.a.kulkarni
सारखे आहेत.
९- या च्या जुन्या पोस्ट जरुर जरुर बघाव्यात. नुस्त्या एखादया पोस्ट वरुन अंदाज अजिबात येणार नाही.
१०- या ब्लॉग बद्द्ल एक सुंदर लेख लोकसत्ता मध्ये पुर्वि आला होता तो जरुर येथे वाचा
http://www.loksatta.com/sampadkiya-news/blogspot-searchingforlaugh-26372
११- या कुलकर्णी यांनी काही सुंदर नोंदी देखील विकीपिडिया वर केलेल्या आहेत जसे की म. वा. धोंड ,वसंत सरवटे यांची कला इत्यादी
आणी शेवटी परत एकदा विनंती की असे या दर्जा चे काही इतर सुंदर ब्लॉग माहीत असल्यास जरुर जरुर कळवीणॅ.
मला मराठी लीहीणे जमत नाही पण माझा आनंद तुमच्या बरोब्रर शेअर करता यावा म्हणुन फकत हा खटाटोप केला काही चुकल्यास अगोदर च क्षमा मागुन घेतो .
प्रतिक्रिया
मीही या ब्लॉगचा ५ वर फिरणारा
आनंद झाला
आपण उल्लेखलेल्या ब्लॉगवर
आतिवास यांना
रेघ हा जरा "शिष्ठ" ब्लॉग आहे
What's 'Marathi'?
मस्त
सुमित यांना
चांगला ब्लॉग
यप्प.... अगदी अगदी :)
ज्योति कामत
ज्योती-जी- प्लीज माफ करा...
It's ok!
थन्क्स...मी निष्चित प्रयत्न