Skip to main content

(गेम)

लेखक धन्या यांनी बुधवार, 02/10/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेम गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! गेम झाली तर माणूस गेला नाही झाली तर माणूस वाचला गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एक टपकला की दुसरा दुसरा टपकला की तिसरा गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! लपायला अजिबात जंगल नाय सावली आहे ती वड पिंपळाची गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते! एकडे आहे मंद मोर ज्याला सापडत नाही लांडोर ! गेम म्हणजे गेम असते! जगासाठी सेम असते!
लेखनविषय:

वाचने 9239
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

हे नक्की काय आहे? धन्या यांचे खाते बंद करावे अशी विनंती नंतर येणार आहे काय?
काव्यरस: aai baba gulub jyoti kavita kavita shradhdhanjali kvitaa Sangeeta काणकोण कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड गोवा चौरागढ नागद्वार भूछत्री
यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.

In reply to by पैसा

यात आई, बाबा, चौरा याबरोबरच ५ मुलींची नावे आणि नागद्वार, काणकोण, गोवा, कोडाईक्नॉल याव्यतिरिक्त भूछत्र यांचा उल्लेख आहे याची नोंद घेतल्या गेली आहे.
काव्यरस च्या "मल्टीसिलेक्ट लिस्टबॉक्स"मध्ये एव्हढे सारे "लिस्ट आयटम्स" पाहून माझ्यातला वेब डेव्हलपरला "किडे करण्याची" उबळ आली आणि हे सारे काव्यरस "सिलेक्ट" केले. :)

=)) माताय,कवितेपेक्षाही काव्यरस तूफान आहेत. बाकी लांडोरी मिळण्यासाठी त्या मोराला पिसारा फुलवून नाच म्हणावे.

In reply to by प्रचेतस

हीहीहीहीही. वल्ली, अशा मंद मोराचा मंद फुलणारा पिसारा बघायला सध्याच्या सुपरफास्ट लांडोर्‍यांना येळ आहे का? तु फुलीव, मी झुलीवते म्हणत्यात. ;)

In reply to by अभ्या..

=)) =)) आमचा एक 'मोरे' आडनावाचा मित्र होता त्याला सर्वजण 'गोड गोजीरी लाज लाजिरी लांडोर होणार नवरी' असे चिडवायचे.

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन! एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली. दुर्दैवानं संपादक देखील ह्या अशा प्रवृत्तींना भरीस घालताना दिसतात. क्रुपया माझे खाते बंद करावे ही णम्र विनंती. - धाराच्या जाहिरातीतल्या 'सब घुस्सा करते है मै घर छोड के जा रहा हू' म्हणणार्‍या बारक्याचा पंखा.

In reply to by प्यारे१

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी टाकलेलं विडंबन!
कंपू? ते काय असतं?
एक मिपाकर म्हणून आत्यंतिक शरम वाटली.
आम्ही तर ऐकलं होतं की तुम्ही "सार्‍याच्या पलिकडे गेला आहात" म्हणून.

In reply to by धन्या

>>>>ऐकलं होतं हेच चुकतं. दुसर्‍याच्या सांगीवांगी गोष्टींवर विश्वास ठेवता. एकदा आश्रमात या, वर्गणी द्या. अनुभव हीच खात्री. सार्‍याच्या पलिकडं जाणं नि शरम ह्याचा संगम करुन 'बेशरम' नावाचा शिनुमामा आमचे शिष्य रणबीर कपूर ह्यांनी काढला आहे. फुकट मिळाल्यास लाभ घ्यवा. @ पैसाताई, वाक्य इज केप्ट फॉर रेकॉर्ड. धन्यवाद! ;)

आता मिपाची " कंपू " ही गरज झालीय काय ? या विषयावर आजचा सवाल मधी रात्री दहा वाजता . सादरकर्ते नि३. भाग घेणारे अस्सल कलाकार.... धन्या , संक्षी, महिलांचे प्रतिनिधी पूजाबै पॉवर , व मोरांचे प्रतिनिधी....(अनेक आहेत) बाकी @धन्या ,कवितेतला मोर तुमच्या साईडला रहातो काय ? अरे रे पण मोर खादाड असल्याचे ऐकिवात नाही.

कडक वि'टं'बन(ा)