Skip to main content

`म्हणी' मॅटर्स!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/09/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी. उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं. वाघ विहिरीत पडला, की माकड सुद्धा त्याला वाकुल्या दाखवतं, असा त्याचा अर्थ. किती समर्पक आहे ना म्हण? आपण अगदी रोजच्या व्यवहारात, समाजात हीच विदारक स्थिती पाहत असतो. 2. "ज्यासाठी लुगडं, ते सगळं उघडं' अशी पण एक म्हण आहे. म्हणजे जो उद्देश आहे, तो साध्य न होता बाकीच फापटपसारा मांडला जाणे. 3. "दिवस गेला रेटारेटी नि चांदण्यात कापूस काती' ही म्हणही अनेकदा ऐकलेली. म्हणजे दिवस फुकट गेला आणि कापूस कातायला रात्रीचा मुहूर्त लागला. अर्थात, जेव्हा हातात वेळ असतो, तेव्हा काम करायचं नाही आणि मग धावपळ करायची. आपलंही बरेचदा असंच होतं ना? तुम्हाला माहित आहेत अशा काही चपखल, मार्मिक म्हणी? पण वेगळ्या हव्यात हं! अगदी "आग रामेश्‍वरी नि बंब सोमेश्‍वरी' एवढ्या सुपरिचित नकोत. -----------------

वाचने 32625
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

१. भित्या पाठी ब्रम्ह राक्षस २. हातच्या काकणाला आरसा कशाला ३. आयजीच्या जीवावर बायजी उधार ४. काखेत कळसा गावाला वळसा ५. बैल गेला झोपा केला ६. नावाजलेला गुरव आणि देवळातच *गला ७. नको नको आनि पायलीचं चाखो ८. आपलीच मांडी चोरटी नि दुस-याला म्हणते कार्टी ९. भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा १०. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ११. भिका-याला ओकारी

घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा स॑लग्न म्हणः 'पेट मे॑ नहि॑ दाना पर हगनेका दीवाना !' आमच्या माणदेशातली फेमस म्हणः 'वाळूत मुतल॑ फेस ना पाणी'

बहीणाबाईंच्या काही म्हणी... शिदोळाले आला राग, मले म्हणा फन्या नाग (शिदोळ -- गांडूळ ) कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस

निर्लज्जाच्या ढुंगणावर घातला पाला, तर तो म्हणतोय "गार लागतंय, आणखीन घाला" जबरदस्त =))

नमस्कार, १) असतील शिते तर नाचतील भूते. २) आले मी नांदायला, मडके नाही रांधायला. ३) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

आयजीच्या जीवावर बायजी उधार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार --दुस~याच्या वस्तूवर मालकी हक्क दाखवणे. " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "

१) चार आण्याची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला. २) काम ना धाम अन अंगाला घाम ३) जावयाचं पोर हरामखोर Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

आपापाचा माल गपापा भरवश्याच्या म्हशीला टोणगा ना मामु से नकटा मामु कभीभी अच्चा,

१.फ्री तिथ मी २. फुकट तिथ आपट - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

म्हणायची.. हल्याच्या *डीला फोड झाला आणि चाटून चाटून मोठा केला.. - नाटक्या..

In reply to by नाटक्या

गुजराथीतही अशीच म्हण आहे. 'शेठनी गांडमां फुली थयी, ने पंपाळीने मोटी थयी.'

पाहुणा गेला अन चहा केला म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता काय द्या नी बोला भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी घरोघरी फॅशनेबल पोरी मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे रिकामा मंत्री फीतींना कात्र्या लावी निवडणूक सरो आणि मतदार मरो कशात काय आणि खड्ड्यात पाय वृषाली

उघड्या जवळ नागडं गेलं अन थंडीन काकडून मेलं " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "

धू म्हटल की धुवयाच खाली काय लोम्बत ते नाही विचारायच ! खिशात नाही आणा अणि म्हणे मला बाजीराव म्हणा ! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!