मस्त आहे धागा!
माझी आतेआजी अस्सल कोकणी म्हणी वापरायची, काही म्हणी लिहायलाही ऑकवर्ड वाटेल! मनाने जितकी प्रेमळ, तितकीच तिची जीभ कोकणी वळणाची होती, आणि ती वापरत असलेल्या म्हणी जरा अति अस्स्ल! त्यातल्या त्यात सोज्वळ म्हण आठवली की लिहिते! :D
तिचे एक नेहमीचे वाक्य होते, एखाद्याच्या चांगल्या दिवसांत सगळेच कसे सहाय्यकारी होतात अन् वाईट दिवसांत कोणीच आसपास फिरकत देखील नाही, हे सांगताना ती म्हणत असे, "रंगलेल्या ओठांचे मुके घेऊक राजापासून खोतापर्यंत सगळेच धावतत.." ही म्हण नव्हे, पण असेच आठवले म्हणून लिहिले..
"घरची करते देवा देवा, अन बाहेरचीला चोळी शिवा"
ही म्हण क्लासच आहे. कोकणातलीच आहे. आमच्या सिंधुदुर्गात हमखास वापरतात... :)
दादा गातो अन् *वडा ऐकतो!
कामे थकली सारी अन् अडकित्त्यात सुपारी! :)
(सर्व कामे तशीच टाकून नुसतं पायावर पाय टाकून बसणार्याकरता ही म्हण आमच्या देवगडात वापरतात!) :)
आपला,
तात्या देवगडकर.
माझ्या आजोबांच्या तोंडातील काही म्हणी.
१. उठत नाही तर ओढून किती लांब करायचे.(अर्थ: एखाद्याला मनातूनच काम करायची ईच्छा नसेल तर त्याला किती भरीस पाडायचे)
२. खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही)
पुण्याचे पेशवे
अरे माझ्या आवडीची म्हण आहे!
म्हणजे, खा-खा खायचं नि मैल्याच्या टाक्या भरायच्या. म्हणजे थोडक्यात, खायला काळ नि भुईला भार. निरुद्योगी लोकांबद्दल ती वापरतात.
उपयोग काय अशा निरर्थक आयुष्याचा?
नाही अभिजित,
खग्रास म्हणजे संपूर्ण. (ख= आकाश, ग्रास = ग्रासणे. आकाशालाही ग्रासून टाकणारे. म्हणजेच 'संपूर्ण' कुठलाही अंश न उरणारे)
म्हणजे अन्न खाऊन संपूर्ण संपविले आणि हगून त्याचा सत्यानाश केला. अर्थात अंगी लागले नाही. म्हणजे एखादी गोष्ट नुसतीच संपविली पण ते संपविणे सत्कारणी लागले नाही.
स्पष्टीकरण मी केलं नाही. पण अर्थ तोच होता ना? खा-खा खायचं आणि त्याचा उपयोग काही करायचा नाही, हाच मथितार्थ आहे ना!
पण तुम्ही अधिक योग्य स्पष्ट केलं. धन्यवाद!
ह्या काही आज्जीच्या आठवलेल्या म्हणी -
प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो...
चाय थय न्याय
केला तुला, झाला माका
बारीक नळी, चेपून भरी (खादाड माणसाच्या आहाराचं वर्णन )
फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव
जोवेरी पैसा तोवेरी बैसा
दमास मान आणि शक्तीस भोजन
स्वगतः हुश्श! आठवल्या साध्या म्हणी!!
आदिती,
मी प्रयत्न करते.
प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो...
ह्या म्हणीचा नेमका अर्थ आता आठवत नाही; पण, प्रीतीचो मोगो म्हणजे आवडती व्यक्ती, तिच्याशी घसट वाढवायला काहीतरी निमित्त (कढी मागायच निमित्त करुन ये) असं काहीतरी असाव...
चाय थय न्याय
चाय म्हणजे चहा. जिथे, ज्याच्याकडून चहा मिळेल, त्याच्या बाजूने न्याय दिला जाईल - ज्या व्यक्तीकडून फायदा, तिला झुकत माप.
फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव
=))
ही आणखी एक म्हण
आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्याचे बघायचे वाकुन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
एका गोवेकरीण आज्जीकडून ऐकलेली कोकणी म्हण...
मीठ लाया माका खाया......आता ह्याचा अर्थ विसरलो.
अजून एक खास म्हण ऐकलेय गावाकडली....
लाखाशिवाय बात नाही आणि भजाशिवाय खात नाही....ही म्हण बढाईखोर माणसासाठी वापरतात.
आगासली ती मागासली अन पाठसून इली ती गर्वार रवली
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
खडुस लोकांनी काढलेल्या म्हणी वाटतायत. :-) म्हणजे बहुसंख्य म्हणी ह्या फक्त दुसर्याची "काढायची" / नावेच ठेवायची म्हणून केल्यासारख्या वाटत आहेत.
असो मजा येते आहे.
यातल्या किती म्हणी "विशिष्ट भागातील लोकांनीच" बनवल्या असतील बरे :?
ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाहि पण गुण लागला..
पुणेरि म्हण : वाण नाहि पण घाण लागली
करुन करुन भागली अन देवपुजेला लागली...
लाज नाही मना अन कोणी काहि म्हणा...
लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः कोरडा पाषाण..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..
ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब!
बाकीच्या छान आहेत.
`उंटाच्या **चा मुका घेणं' ही म्हण कम वाक्प्रचार मला भयंकर आवडतो.
`बाजारात तुरी नि भट भटणीला मारी' ही पण भारी आहे.
`**णाखाली आरी नि चांभार पोरं मारी' ही म्हण पण तशीच आहे, पण तिचा अर्थ खूपच वेगळा आहे.
जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी.
ही म्हण जबरा आहे. मला पण आवडायची, आवडते.
आलं मनाला तर ग्येलं शेनाला, नाय तर टोपलं टाकुन बसलं उनाला.
वावरात न्हाइ झाड अन म्हने येरंडाला आलाय पाड.
या म्हणी पहिल्यांदाच ऐकल्या. भन्नाट आहेत!
"बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..
ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब!"
हे जाहिरातितील वाक्य आहे, पण आमचे काहि मित्र ते म्हणीसारखे वापरतात, अर्थ तुम्ही समजुन घ्या...
छान धागा...
यापुर्वी एक असाच धागा इथे पहायला मिळेल
आयडिया केली आणि *डीत गेली
ह्त्यार भारी तर गिर्हाइक दारी
ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
* आपल्या गावात बळी अन दुसर्याच्या गावात गाढवं वळी.
* खाली मुंडी अन पाताळ धुन्डी
* अर्थ करी अनर्थ
* घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा
* जेणु काम तेणु थाय, बिजा करे सो गोता खाय
प्रतिक्रिया
ढुंगणाखाल
मस्त आहे
मु. पो.
:)
अशाच काही म्हणी
खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही)
नाही.
`खग्रास'चं
चींधी
कढी
आमच्या वाडीत
अव गणा
घरचं झालं
चोरून
ह्या काही
अर्थ?
आदिती,मी
चाय थय
"चाय थय
फिरुन गेलो
ह्या घ्या आणखी . . . .!
माझी शिवामूठ घ्या.
अजून काही
सध्या दोन ......
अजून एक
अजून
म्हण
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी
रिकामा
आणखी एक सुतार
आगासली ती
तदमाताय
आणखी काही
स्वतःचं
ढवळ्याशेज
चनं
काही म्हणी....
तिन तिगाडा
हाताला
बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..
बीडकडल्या म्हणी:-
जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी.
"बायको
छान
मुकाट आपल काम करा की राव!
अशीच एक
हगणार्यानं न्हाई तर बगनार्यानं लाजावं
आणिक ५
आमचं इंन्व्हेंशन
* आपल्या गावात बळी अन दुसर्याच्या गावात गाढवं वळी.