✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोनार्क - २

क
किलमाऊस्की यांनी
Mon, 09/30/2013 - 01:12  ·  लेख
लेख
मोनार्क - १ https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट(Dr. Fred Urquhart). खिडकीत तासनतास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला. फुलांवर बसून मध चाखण्यात गुंग असलेली फुलपाखरं,भुंगे काचेच्या बरणीने हळूच झडप घालून तो पकडत असे. किट्कांनी भरलेली बरणी घरी आणून निरिक्षण करीत बसणं हा फ्रेडीचा नवा उद्योग. बरेचदा फ्रेडीची ही शिकार बंद बरणीत एक-दोन दिवसात गुदमरुन मरुन जात. असे मृत किट्क मग फ्रेडीच्या कलेक्शन बॉक्समधे संग्रह करण्यासाठी जात असत. शाळेजवळच्या दलदलीभोवती फिरणारे विविध प्रकारचे किटक बघत बसणं फ्रेडीला आवडत असे. शाळा आणि किटकसंग्रह याव्यतिरिक्त फ्रेडीची आवडती जागा म्हणजे गावतलं सार्वजनिक वाचनालय. साधारण आठ वर्षाचा होईपर्यंत फ्रेडीने या वाचनालयतल्या लहान मुलांच्या विभागातील निसर्ग व विज्ञानावरील सर्व पुस्तकांचा फडशा पाडला होता. निसर्गाविषयीची त्याची आवड व वाचनाचा अवाका पाहून ग्रंथपाल मिस मॅकिनटोश यांनी फ्रेडीला मोठ्यांच्या विभागातली पुस्तक वाचायची परवानगी दिली. परवानगी मिळताच फ्रेडीने निवडलेलं पहिलं वहिलं पुस्तक होतं, चार्ल्स डार्विन यांचं, "Origin of the Species". https://lh6.googleusercontent.com/-QyiL4zYOdDo/UkDAI1btcwI/AAAAAAAABfA/0lUdYwRHgg4/w250-h300-no/urquhart.jpg डॉ. फ्रेड ऊर्कहट(Dr. Fred Urquhart) पुढे महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडल्यावर, किटकांविषयी शास्त्रीय माहिती फ्रेडला मिळत गेली. त्यातच त्याची आवड व उत्सुकता पाहून जीवशास्त्र शिकवणारे प्राध्यापक श्री. टायलर यांनी फ्रेडीला जीवशास्त्रची प्रयोगशाळा खुली करुन दिली. या प्रयोगशाळेत बंद बाट्लीत ठेवलेले अनेक प्रकारचे पक्षी, किटक त्यांची शास्त्रीय माहीती फ्रेडसाठी मोठा खजिना होता. संगीताची आवड असल्याने फ्रेड भुंग्यांची गुणगुण, रातकिड्यांची किरकिर यात संगीत शोधत असे. याच आवडीचा उपयोग करुन त्याने पुढे Morphology and Ecology of the Orthoptera या विषयात १९४० साली त्याने डॉक्टरेट मिळवली याच प्रयोगशाळेत एक विभाग फुलपाखरांसाठी ठेवलेला होता. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलपाखरांमधे नारींगी-काळया पंखांच्या फुलपाखरांकडे फ्रेड्चं विशेष लक्ष आर्कषून घेतलं. हिच ती फुलपाखरं फ्रेड लहान असतांना उन्हाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संख्यने आसपास उडतांना पहात असे. आणि हिवाळा होताच आश्चर्यकारकरित्या ती गायब होत असतं. हिवाळ्यात ही फुलपाखरं जातात तरी कुठे ? हा छोट्या फ्रेडीला नेहमीच पडणारा प्रश्न! फ्रेडला बुचकळ्यात टाकाणारी ही फुलपाखरं होती - मोनार्क. https://lh4.googleusercontent.com/-wckWM7pdQTw/UkDWFcNvRjI/AAAAAAAABfk/zq1toJWUR14/w325-h217-no/monarch.bmp मोनार्क मोनार्क बटरफ्लाय अथवा मोनार्क या नावाने ओळखली जाणारी ही उष्णकटीबंध प्रदेशात लाखो वर्षांपासून अस्तित्वात असणारी फुलपाखराची एक जात. उत्तर अमेरिकेत सुरवातीच्या काळातल्या स्थायिक होणार्‍या बरेचसे लोक (इ.स.१६५०-१७०२) इंग्लंड व हॉलंड या देशातून स्थलांतर करुन आले होते. अमेरीका खंडात पाहिलेली ही सुंदर आणि शानदार फुलपाखरांची ही जात या लोकांना नविन होती. तुलनेने मोठाले पंख, गडद नारींगी-काळा रंग, त्यावर अधून मधून दिसणारे पांढरे ठिपके पाहून या फुलपाखरांना त्यांनी आपला लोकप्रिय राजा 'King of Orange विल्यम दुसरा' याच्या नावावरुन 'मोनार्क' असं राजेशाही नाव दिलं. मोनार्क या शब्दाचं मुळ Monarkhes या ग्रीक शब्दात आहे. Monos म्हणजे एकटा + arkhein म्हणजे राज्य करणे. हाच शब्द पुढे लॅटीन मधे Monarcha व इंग्रजीत Monarch असा वापरला जातो. मोनार्क जातीच्या फुलपाखाराच वैज्ञानिक नाव Danaus. Danaus हा ग्रीक देवता झ्युसचा नातू. असं म्हणतात Danaus च्या मुली आपला सक्तीने केला जात असलेला विवाह टाळण्यासाठी आपली जन्मभूमी सोडून पळून गेल्या. मोनार्क या नावाच्या बरोबरीने King Billy butterfly तसंच मिल्कविड बटरफ्लाय असंही या फुलपाखरांना संबोधलं जातं. https://lh3.googleusercontent.com/-TUjA-xJcx0Q/UkDWFLsL6mI/AAAAAAAABfg/zOwVh4aijc8/w194-h246-no/king.bmp King of Orange विल्यम दुसरा अमेरिकेत टेक्सास ते न्यू इंग्लंड, फ्लोरिडा ते मिनेसोटा तसंच दक्षिण कॅनडात उन्हाळ्याच्या दिवसात सर्रास दिसणारी ही फुलपाखरं फक्त मिल्कविडच्या पानांवर आपली गुजराण करतात. साधारण अर्धा ग्रॅम वजनाची, चार पंख व सहा पाय असलेल्या या फुलपाखरांत नर हे माद्यांपेक्षा गडद रंगाचे असतात. इतर फुलपाखरांच्या जातींप्रमाणे मोनार्कही जन्मापासून अंड(३-४ दिवस), अळी (१०-१४ दिवस), कोष(१०-१४ दिवस) आणि प्रौढावस्था अशा चार अवस्थेतून जातात. सर्वात महत्त्वाची अवस्था अर्थातच अळी. या काळात मूळ आकारमानापेक्षा अळी २००० पट वाढते. https://lh4.googleusercontent.com/-Ty7XSbc25zA/UkDW9HKVNSI/AAAAAAAABf4/A-7XWIFs910/w300-h303-no/malefemale.bmp उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने उत्तर अमेरीकेत आढळणारे मोनार्क हिवाळ्याची चाहूल लागताच मात्र आश्चर्यकारकरित्या गायब होतात. फुलपाखरांच्या इतर अनेक जातींप्रमाणे मोनार्कही हिवाळ्याच्या दिवसात उष्ण प्रदेशात स्थलांतर करतात. परंतु एकदा स्थलांतर केल्यावर फिरुन परतणारी मोनार्क ही एकमेव जात. पण मग हिवाळा सुरु होताच हे नाजूकसे जीव जातात तरी नक्की कुठे? संपूर्ण हिवाळा त्यांचं वास्तव्य कुठे असतं? लहानपणासून सतावणार्‍या या प्रश्नांची उकल करण्यात डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी एक- दोन नव्हे तर आपल्या आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात खर्ची केली. हि कथा आहे या छोट्या प्रवाशांच्या सर्वात लांबच्या प्रवासाची. (क्रमशः) संदर्भ : (१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies (२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009) (३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart (लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.) https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png

Book traversal links for मोनार्क - २

  • ‹ मोनार्क - १
  • Up
  • मोनार्क - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8276 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

वाह! सुंदरच.

प्यारे१
Mon, 09/30/2013 - 01:20 नवीन
वाह! सुंदरच. नेहमीप्रमाणं अभ्यासपूर्ण मालिका.
  • Log in or register to post comments

अंह!

स्पंदना
Mon, 09/30/2013 - 05:43 नवीन
मोनार्क या शब्दाची उत्पत्ती उकल आवडली. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

अहाहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/30/2013 - 06:45 नवीन
सूंदर....! पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पु भा प्र.

मुक्त विहारि
Mon, 09/30/2013 - 09:20 नवीन
पु भा प्र
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Mon, 09/30/2013 - 09:23 नवीन
अगदी पकड घेणारे लिखाण! बाकी एवढासा कीटक असे स्थलांतर कधी करायला लागला हे वाचणे इंटरेस्टिंग असेल.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर लिहिले आहे, पुढच्या

जॅक डनियल्स
Mon, 09/30/2013 - 09:44 नवीन
खूप सुंदर लिहिले आहे, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. smarter everyday या तूनळी च्या चान्येल वर "फुलपाखराचा जन्म " हा व्हिडीओ पहिला होता, त्याची आठवण झाली. टाईम ल्याप्स वापरून त्यांनी फुलपाखराचा जन्म ते मृत्यू असे चित्रित केले आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन आणि छान माहिती.

मदनबाण
Mon, 09/30/2013 - 10:16 नवीन
सुरेख लेखन आणि छान माहिती. :)
  • Log in or register to post comments

मस्तच.. पुभाप्र..

कोमल
Mon, 09/30/2013 - 10:17 नवीन
मस्तच.. पुभाप्र..
  • Log in or register to post comments

सुंदर ! मोनार्कबरोबर पुढची

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/30/2013 - 11:47 नवीन
सुंदर ! मोनार्कबरोबर पुढची माहितीपूर्ण सहल करायला खूपच मजा येणार आहे ! पुढचे भाग लवकर लवकर टाका.
  • Log in or register to post comments

मोनार्कची व्युत्पत्ती माहिती

बॅटमॅन
Mon, 09/30/2013 - 18:14 नवीन
मोनार्कची व्युत्पत्ती माहिती होती पण त्या फुलपाखराला मोनार्क नाव कुणामुळे दिले ते आजच कळाले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात!!!

राघवेंद्र
Mon, 09/30/2013 - 20:03 नवीन
छान विष्य आणि सुन्दर मांडणी.
  • Log in or register to post comments

मस्त... धिर धरवत नाही, आता गाभ्यालाच हात घाला.

अग्निकोल्हा
Mon, 09/30/2013 - 23:24 नवीन
अवांतर :-
हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला. फुलांवर बसून मध चाखण्यात गुंग असलेली फुलपाखरं,भुंगे काचेच्या बरणीने हळूच झडप घालून तो पकडत असे. किट्कांनी भरलेली बरणी घरी आणून निरिक्षण करीत बसणं हा फ्रेडीचा नवा उद्योग. बरेचदा फ्रेडीची ही शिकार बंद बरणीत एक-दोन दिवसात गुदमरुन मरुन जात.
:) मी लहानपणी मुंग्या पकडायचा असा उद्योग करत होतो, त्यांना रिकाम्या केलेल्या पेप्सिकोलाच्या पारदर्शक पिशव्यात भरत असे व त्यांच्यात काळ्या अन लाल अशा प्रकारात विभागणी करुन माझ्या कडिल विवीध उपकरणांचा (?) वापर/जोडणी करुन त्यांचे छोटे शहर बसवायचा प्रयत्न करत असे, त्यात त्यांच्या पोटापाण्याची सोयही करत असे, व त्यांना माझ्या नजरेत एकदम सहज सोपं असलेले आयुष्य जगायची शिस्त लागावी यासाठि पराकोटीचा* प्रयत्न करत असे, यात दिवसही निघुन जाइ अन संध्याकाळी मी हाताशपणे यांना सुधारता येणे शक्य नाही म्हणून त्यांना तसेच पिशव्यासकट फेकुन देउन टिव्ही बघायला निघुन जात असे. अन हे आता मला आठवल्या आठवल्या या सगळ्या प्रकारातुन सर्वात पहिले तात्पर्य हे लक्षात आले कि "गोष्टी सोप्या करणे" कसे खुळचटपणाचे असु शकते.
  • Log in or register to post comments

हेहेहे....

किलमाऊस्की
Tue, 10/01/2013 - 21:43 नवीन
:-D आम्ही लहानपणी पावसाळ्यात मीठ टाकून गॅलरीतले गांडूळ मारायचो ते आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ही टिपलेली मोनार्क आहेत काय

मदनबाण
Tue, 10/01/2013 - 16:07 नवीन
ही टिपलेली मोनार्क आहेत काय ? फुलपाखरु भाग १ फुलपाखरु भाग २
  • Log in or register to post comments

वॉव!! मस्तच..

किलमाऊस्की
Tue, 10/01/2013 - 21:44 नवीन
ठाण्यात टिपलीत काय? यातली काही मोनार्क आहेत. जी नारींगी-काळी दिसतायत ती.
  • Log in or register to post comments

ठाण्यात टिपलीत काय?

मदनबाण
गुरुवार, 10/03/2013 - 08:54 नवीन
ठाण्यात टिपलीत काय? व्हयं जी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किलमाऊस्की

ग्रेट.

अर्धवटराव
Wed, 10/02/2013 - 00:43 नवीन
इवल्याश्या जिवाचा अफाट प्रवास वाचायला मिळणार. ते ही एक्सलंट लेखनशैलीत. पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

मस्त माहिती. पुभाप्र

हरिप्रिया_
Wed, 10/02/2013 - 13:32 नवीन
मस्त माहिती. पुभाप्र
  • Log in or register to post comments

वाचतोय

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/02/2013 - 20:05 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद !

किलमाऊस्की
गुरुवार, 10/03/2013 - 08:12 नवीन
या मालिकेतील पुढील भाग - मोनार्क - ३
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा