सैतानाचा आरसा - शतशब्दकथा
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो.
पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती.
माझ्या नजरेत विखार होता.
तिला मी रोज पहायचो.
आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता.
रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती.
एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली.
ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली.
तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो,
तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली.
गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि
चवताळून त्या दिशेने झेप टाकली.
तिने धाडकन गेट बंद केले.
थरथरत्या हाताने
एक मोठा दगड माझा दिशेने भिरकावत जोरात ओरडली
हाऽऽऽऽड
वाचने
7131
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
कुत्र्याची आत्मकथा आहे काय? सुरुवात वाचून एका गुऩ्हेगाराची आत्मकथा वाटली होती! :D
In reply to कलाटणी by पैसा
कलाटणी आवडली.
अच्छा, अच्छा, म्हणजे कुत्र्याने लिहिलंय तर! म्हणूनच शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात वाटतं!
In reply to ok by तिमा
शुध्द लेखनाच्या चुकांचे खापर कुत्र्यावर फोडुन तिमांनी कुत्र्याचा जो घोर अपमान केला आहे त्या बद्दल त्यांचा तिव्र निशेध.
या शतशब्दकथेचा एकूण अंदाज आला होता.... पण तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला "अडखळलो".. यामुळे खात्री होत नव्हती..
In reply to छान आहे. by मनिम्याऊ
मनिम्याऊ ला येणार च भुभु चा अंदाज लवकर....!
बाकी ही स्पर्धेसाठी नसलेली श श क आवडलीच्च.
जमलीय कथा.
पण शीर्षकाचा संबंध समजला नाही.
In reply to हा हा ! by सस्नेह
to kutra hota ki balaatkaaree, he tumachyaa manaane tharwaa.
In reply to mirror is ur mind. by आनंदी गोपाळ
पण मग सैतानच का?
In reply to हां by पैसा
शेवट वाचे पर्यंत तुमच्या मनातल्या सैतानाने काय बरं विचार केला?
In reply to mirror is ur mind. by आनंदी गोपाळ
आयला खरंच की!
ह्या लघुकथेची सगळी गंमत ह्यातच आहे.
तुमच्या मनात जे आहे त्याप्रमाणेच तुम्हाला दिसणरः एकतर बलात्कारी मनुष्य किंवा पिसाळलेला कुत्रा! म्हणून तर म्हटलंय सैतानाचा आरसा!
पैजारबुवा आवडली ही डबल कलाटणी!
मस्त एकदम माऊली.
लैच भारी.
अरे हाऽऽऽड!
मस्तच!
लैच भारी.
जबराट कथा, पैजारबुवा.. आणि, अर्थाअर्थी काही संबंध नसलेलं एवढं समर्पक शिर्षक क्वचितच असतं.. आने दो अौर..
महिना बघता समयोचित !!
झकास
झकास कथा.
थरथरत्या हाताने
एक मोठा दगड माझा दिशेने भिरकावत जोरात ओरडली
हाऽऽऽऽड
नरकाच्या म्हणजे सैतानाच्या निवासस्थानाच्या दरवाज्यावर सर्बेरस नावाचा कुत्रा पहारा देत असतो. म्हणजे कुत्रा आणि सैतान यांचा संबंध आहे. शिवाय मागे लागलेल्या कुत्र्याचे विचकलेले दात आणि एकंदरीत अभिनिवेश हा सैतानीच असतो. बाकी कथा सुपर्ब!
(श्वानप्रेमी पण इंजेक्शनला घाबरणारा) बोकोबा.
मस्त
शिर्षक आणी त्यामागील सन्दर्भ कळल्यावर अजुनच आवडली आहे ही कथा...
कलाटणी