Skip to main content

मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 25/08/2013 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्‍या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्‍या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला. या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि. आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले. कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्‍याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे. तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत. चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्‍या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्‍याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्‍या कॅमरा मन ला सलाम. पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे. चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22400
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

Yuri Bezmenov, a Russian born, KGB trained subverter tells about the influence of the Soviet Union on Western media and describes the stages of communist takeovers. This interview was conducted by G. Edward Griffin in 1984. ह्या इसमाची पूर्ण मुलाखत येथे उपलब्ध आहेत. भारताविषयी ममत्व असलेल्या व भारतात के जी बी साठी काम केले असल्याने के जी बी च्या भारतात कारवाया , व अमेरिकेविरुद्ध कारवाया ह्यांच्या विषयी विस्तृत माहिती देतो , भारतीय विचारवंत , कॉम्रेड जे रशियात दौऱ्यावर यायचे त्यांना के जी बी पोलिटिकल prostitute का म्हणायचे. ह्यावर प्रकाश पाडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद, कुठून शोधता तुम्ही असे कंटेंट्स ? पाताळयंत्रीपणा म्हणजे काय याचा रशियाहून दुसरा नमुना शोधूनही सापडणार नाही असाच विचार ही मुलाखत पाहून आला. आपणच नाही तर अगदी अमेरीकन्सही रशियाच्या हातातले बाहूले आहेत की काय असा विचार आल्याशिवाय राहत नाही. मात्र रशियाच्या विघटनानंतर परिस्थीती बदलली असेल अशी भाबडी आशा आहे.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके रशिया ने त्यांच्या कह्यातील देशांना जेवढे आपल्या जाळ्यात ओढले किंवा अमेरिकेला ओढण्याचा प्रयत्न केला तेवढाच प्रयत्न अमेरिकेने सुद्धा केला , कोल्ड वॉर ह्यालाच तर म्हणतात. मात्र अमेरिकेची जगभर पसरलेली प्रसारमाध्यम व हॉलीवूड ला रशियाकडे तोड नव्हते. के जी बी संपली मात्र सी आय ए ला मोकळे रान मिळाले. आज भारतात सी आय ए चे कितीतरी हस्तक प्रसार माध्यमे ते राजकीय नेत्यांच्या स्वरुपात असतील , ही क्लिप १९८४ मध्ये ह्या हेराने अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीची आहे , ह्या क्लिप मधील त्यांचे सर्वात महत्त्वाचे विधान म्हणजे जगातील कोणतीही ग्रास रूट चळवळ ही उस्फूर्त नसते , तर एक नियोजनबद्ध कारवाई असते. सध्या अरब लीग मध्ये झालेली चळवळ असो किंवा आमच्या जर्मनीत झालेली सोलर एनर्जी ची असो त्यामागे अनेकांचे हात होते म्हणूनच जर्मनी मधील ह्या आंदोलनावर लेख लिहितांना शेवटी मी अशी एक चळवळ लवकरच भारतात होईल असे लिहिले होते व एका वर्षाच्या नंतर लोकपाल ची चळवळ उभी राहिली . पण आपले राजकारणी त्याला पुरून उरले.

निनाद अप्रतिम प्रतिसाद ! आजच मद्रास कॅफे बघीतला . असे सिनेमे भारतामध्ये फार कमी बनले आहेत. तुमच्या सविस्तर प्रतिसादात इन्सायडर स्टोरी म्हणजे काय असते ..
.जगातील कोणतीही ग्रास रूट चळवळ ही उस्फूर्त नसते , तर एक नियोजनबद्ध कारवाई असते.
ते कळले. आज या युगात हे सर्व सामान्य नागरीकाला हे समजावयाला हवेच. आज खुद्द अमेरीकेत नागरीक सिरीयन युद्धाला विरोध करतात ते हे त्यानां आता कळते म्हणुनच .

In reply to by अशोक पतिल

अशोक पाटील आता कुठे भारतात अश्या पद्धतीचे सिनेमे बनविण्यात सुरवात झाली आहे , आता भारताच्या छोट्या पडद्यावर इतिहास घडवणारी भव्य मालिका २४ ही मालिका येत आहे . अमेरिकेत एका दिवसात घडणाऱ्या दहशतवादी घटना त्यामागील दहशतवादी संघटना ,ह्या संघटनेच्या नावाखाली आपला स्वार्थ साधणारे अमेरिकन राजकारणी अश्या गोष्टींचा उहापोह करणारी काल्पनिक मालिका अमेरिकेतच नाही तर जगभरात लोकप्रिय झाली तिचे हक्क अनिल कपूर ज्याने ह्या अमेरिकन मालिकेत काम केले होते त्याने व कलर्स ने विकत घेतले आहे. व आता ह्या किंवा पुढच्या महिन्यात भारतात हि मालिका सुरु होईल. हिचे आठवड्यात एका तासाचे भाग म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असतील ,

In reply to by निनाद मुक्काम …

२४ नेहमीच अतिरंजीत वाटली, अमेरिकेच्या आंटि टेररिस्ट स्कॉडचे लोक (एकमेकांसोबतही) इतके विक्षिप्त वागतात हे पाहुन तुफान विनोदी या द्रुष्टीकोनातुनच ही मालिका बघितल्या आहे. ज्यॅक बाउर म्हणजे जणू बिगर दॅन वन म्यान आर्मी. अगागा! :D अवांतर :- तसही भारतिय निर्मीतिमुल्ये बघता हिला कितपत न्याय मिळेल ही उत्सुकता आहेच.

In reply to by अग्निकोल्हा

अग्निकोल्हा पूर्णपणे सहमत ! "प्रत्येक" गोष्टीचा शेवट गोड दाखवला की त्यातील सत्य निघून जाते.

छोट्या पडद्यावर इतिहास ह्या अर्थी लिहिले की सासू सुनांच्या मालिकेत हि मल्टी स्टारर मालिका जिचे हक्क तब्बल दीडशे कोटी देऊन घेतले आहेत. व सध्याचा स्टार दिग्दर्शक अभिनय देव हा हि मालिका दिग्दर्शित करणार आहे , आपल्याकडे अजून सिनेमाचे बजेट अपवाद वगळता १०० करोडच्या वरती जात नाही , आता भारतीय मालिका म्हटले म्हणजे ते ओरीजनल २४ ला कितीसा न्याय देऊ शकतो हा प्रश्न आहे पण सध्याच्या छोट्या पडद्यावर ज्या मालिका आहेत त्यांच्या तुलनेत ही बरीच उजवी असेल आणि राहिला प्रश्न अमेरिकन २४ चा तर त्यात ती मालिका असल्याने अतिरंजित असणे स्वाभाविक आहे , पण ह्या मालिकेचे कौतुक म्हणजे आपल्याच प्रशासनात आणि समाजात पैसा व सत्ता , ह्यांचा वापर अमेरिकन नेते , अध्यक्ष , व्यापारी करून अमेरिकन जनतेला दहशतवादाच्या बागुलबुवा दाखवून आपले उखळ कसे पांढरे करतात. एका सिझन मध्ये त्यांनी असे दाखवले आहे की अमेरिकेतील लॉबी ला मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करायचा असतो. म्हणून ते अमेरिकेत त्या राष्ट्रांच्या एका निरपराध मुस्लिम माणसाच्या घरात तो दहशतवादी असल्याचे पुरावे जमवून त्याच्या भावाला ओलिस धरून त्या माणसाला बाँब ने भरलेली पिशवी देऊन भूयारी रेल्वेत बसवतात. निदान त्या मालिकेच्या धाडसाचे कौतुक करायला हवे , अमेरिकन जनतेला असे दाखवून हि मालिका यशस्वी करून दाखवली.

एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्‍यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्‍याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
AC office मध्ये बसणार्यांना पाकिस्तानी दहशतवाद नष्ट व्हावासा वाटणं हा गुन्हा आहे का? अण्णा चे लोक श्रीलंकेसाठी तामिळी दहशतवादी होते. परंतु त्यांच्या ह्या वागण्याला श्रीलंका जबाबदार नाही का? श्रीलंकेत तामिलींवर जे अमानुष अत्याचार होत होते त्याच काय? भारताच्या शांती सेनेचं काम काय होत? तामिलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न का केले नाहीत? श्रीलंकेतल्या दहशतवादाची अखेर करण्यामध्ये भारताने एवढी शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच देशातला पाकिस्तानी दहशतवाद संपवण्यावर लक्ष द्यावं हि AC office मध्ये बसणाऱ्या लोकांची अपेक्षा रास्त नाहीये का?