Skip to main content

निरोप

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 12/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी? माज्याच की!) येत्येच की म्यां जाऊन तंवर नीट र्‍हावा गप्पागोष्टी कराल तवा माजीबी याद काडा * दूरची हाय वो वाट चाल तर व्हनार इक्ती कुडी अक्षी गळनार मन भिर्र पाखरावानी! * आनभव जगायेगळे पदरी मीबी बांदीन सूर्य बगीन, चंद्र बगीन आभाळ माथा धरीन * आसंल कदी चांदनी सोबतीला येकुलती वाटंल तिला बगून आमी जल्माच्या मैतरनी! * गोळा करीन आटवनी आन् गठुडं त्येंचं बांदीन आन् न्हेमीच मनात जपीन मपली शिरीमंतीची लेनी * वाट चालता चालता दिस सरुन जात्याल मुक्कामाला सोबतीनं अल्लाद आनून सोडत्याल * जसा सरंल प्रवास समदं रितं रितं वाटंल धा दिशांमदून कसा बांध मनाचा फुटंल * पुन्ना कधी, केव्हा, कुटं बगायाला ह्ये गावंल? परतताना नगाधिराजाला साकडं मग मी घालंल * येऊ दे की रं मला वर्साला दर येकदा तरी काळजात साठवीन तुला मन व्हईल समाधानी * तर, भ्येटूच आपन लौकर ती खात्री हायेच मला आले की उलगडीन निसर्गाअंगीच्या कळा * आता घेत्ये रजा मागून येक मागनं यारी दोस्ती इसरु नगा आपुलकीचं लेनं
लेखनविषय:

वाचने 3409
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

काय वो हे? जौन जौन कुटं जानार तुमी आसं?
गोळा करीन आटवनी आन् गठुडं त्येंचं बांदीन आन् न्हेमीच मनात जपीन मपली शिरीमंतीची लेनी

परत आल्यावं त्ये गठुडं त्यवडं उघडून दावा मंजी झालं. येवा निचिंतीनं!!

निचितीनं जावा....इकडची काय काळजी करु नका. इथं काय घडलं बिघडलं ते आम्ही तपशीलवार इथं लिहू बघा. हिमालयातून आल्यावर तेवढं वृत्तांत खंग्री लिहा. प्रवासासाठी शुभेच्छा....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by स्पा

+३

In reply to by स्पा

+४

हॅप्पी जर्नी. फोटोसकट वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

लय हौस फोटुची तू नग करु सये आधी भरावी नदर मग काळीज ही बये कुणी उघडावी सांग फडताळीची ही पोथी काळजाच्या नदरेची आठवण लय मोठी र्‍हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव र्‍हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव.

In reply to by स्पंदना

र्हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव र्हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव. छान.......!

आपल्या प्रवासास शुभेच्छा !!

धन्यवाद! :) आत्ताच परत आले काही वेळापूर्वी! अगदी सुरेख झाला ट्रेक. जीव सुखावला... करु आता गप्पा बैजवार. :)