मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी? माज्याच की!)
येत्येच की म्यां जाऊन
तंवर नीट र्हावा
गप्पागोष्टी कराल तवा
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वो वाट
चाल तर व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आनभव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
आमी जल्माच्या मैतरनी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
आन् न्हेमीच मनात जपीन
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
परतताना नगाधिराजाला
साकडं मग मी घालंल
*
येऊ दे की रं मला
वर्साला दर येकदा तरी
काळजात साठवीन तुला
मन व्हईल समाधानी
*
तर, भ्येटूच आपन लौकर
ती खात्री हायेच मला
आले की उलगडीन
निसर्गाअंगीच्या कळा
*
आता घेत्ये रजा
मागून येक मागनं
यारी दोस्ती इसरु नगा
आपुलकीचं लेनं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3409
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय
आमुच्या गावा :)
In reply to काय by मिसळलेला काव्यप्रेमी
लै ब्येस... म्हंजी आक्शी
लै झ्याक!
आवा चालली.....
+१
In reply to आवा चालली..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to आवा चालली..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+३
In reply to +२ by स्पा
+४
In reply to +२ by स्पा
सोताला सोडून या त्या हिमालयात
हॅप्पी जर्नी.
मनाच्या एका कोपर्यात साठवा
ह्याप्पी जर्णी !
लय ह्यच फोटु त्यच फोटु नग करु
अहाहा....
In reply to लय ह्यच फोटु त्यच फोटु नग करु by स्पंदना
तुझामाझा एक गाव - :)
In reply to लय ह्यच फोटु त्यच फोटु नग करु by स्पंदना
तुला दंडवत! तुला दंडवत! तुला दंडवत!
छान ..!
हायला!! हिमालयात?
अर्रे! :)
अरे? वापिस भे आ गये आप?
In reply to अर्रे! :) by यशोधरा