गणपतीची आरती
गणपतीची आरती
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
गंगाधर मुटे
................................................
गेयता आणि मधुरता आहे. छान
+१
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!
चांगली जमलीय की!
गणपती बाप्पा मोरया!
चालीतली आरती
सुंदर चाल दिल्याबद्दल खूप खूप
मस्तच!
क्या बात है
सुरेख..
आरती अवडली... (आणी मिळाली
.
गणपती बप्पा मोरया !!!