Skip to main content

गणपतीची आरती

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 12/09/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्विकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तुच बाप,माय तुची, आम्ही तुझी लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥ गंगाधर मुटे ................................................
लेखनविषय:

वाचने 4463
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

गेयता आणि मधुरता आहे. छान आहे. >> एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा >> मस्त!!

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

आरतीचे शब्द खूप छान आहेत. ते मी माझ्या परीने चालीत म्ह्टली आहे. जरूर ऐका.

एलिफंट गॉडची प्रेज करणारी पोएम आवडली नाही.