✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कायदेशीर दहशदवाद

न
नित्य नुतन यांनी
Fri, 08/23/2013 - 16:11  ·  लेख
लेख
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism) परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ... पैसे, हुंडा या गोष्टीना कल्पनेतही थारा नव्हता ... मग असे झालेच कसे..???? पण खरी स्टोरी ऐकली आणि प्रचंड संताप झाला ... नवर्या मुलीला साखरपुड्यानंतर साक्षात्कार झाला कि तिचं आता दुसरयाच मुलावर प्रेम बसले आहे .. आणि तरीही वडिलांच्या इज्जतीसाठी तिने पहिल्याच मुलाशी लग्न केले कारण साखरपुडा मोडायचा नव्हता ... पण तिचे ते प्रेम प्रकरण लग्नानंतर चालूच राहिले .. हे जेव्हा सासरच्यांच्या लक्षात आले तेव्हा पुढचा धोका ओळखून मुलीच्या बापाने आधीच मुलीच्या सासरच्यांवर हुंडाबळीच्या खोट्या केसेस टाकल्या आणि इतकेच नाही तर 3० लाख दिलेत तरच केसेस काढू अशी धमकी पण दिली ... आता याला काय म्हणावे ... चोर तो चोर वर शिरजोर... भारतातले हुंडा विरोधी कायदे हे असे exploit होतात कारण ते पूर्णता स्त्रियांच्या बाजूने झुकते माप देतात .. ज्यांना खरी गरज आहे त्यांना असा कायदा आहे.. हे ही माहित नसते... आणि उच्च शिक्षित मुली व त्यांचे पालक या कायद्यांचा असा गैरवापर करतात...आदरणीय सुप्रीम कोर्टाने पण अश्या गैरवापरांची दखल घेऊन या कायद्याला Legal Terrorism असे म्हटले आहे ... जी निष्पाप कुटुंबे अश्या खोट्या केसेना बळी पडून स्वताची जिवाभावाची माणसे गमावतात त्यांना कोणीच वाली नसतो.. परवाच दिल्ली कोर्टात अशाच एका तरुणाने कोर्टाच्या इमारतीतून उडी मारून जीव दिल्याचे ऐकले ... काही महिन्यांपूर्वी बेंगळूर मध्ये हि एका संगणक तज्ञाने अशाच कारणासाठी आत्महत्या केली ... सुरुवातीला वाटले कि अशी माणसे केस लढून आपले निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. पण भावाच्या मित्राकडून कळले कि हा कायदा इतका मानवताविरोधी आहे .. .कि मुलीच्या सासरच्यांना घरातुन हाकलून अख्खं घर सुद्धा मुलीला देता येण्याची तरतूद यात आहे ... शिवाय केस चालू असे पर्यंत मुलीला खर्चापोटी दर महिना २० - २५ हजार पर्यंत सुद्धा पोटगी देण्याची आज्ञा कोर्ट करु शकते..म्हणजे गुन्हा सिद्ध होण्या आधीच अटक आणि अवास्तव खर्चाच्या ओझ्याने सासरची मंडळी पाणी मागू लागतात... खरच खूपच अविश्वसनीय आणि विदारक सत्य आहे हे .. त्या मुळे आज काल अशा हुंडा बळीच्या बातम्या ऐकल्या की संशयाची सुई प्रथम स्त्री कडेच जाउ लागली आहे ...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32912 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

.

आशु जोग
Fri, 08/23/2013 - 16:24 नवीन
इतका कडक कायदा आहे म्हणजे कायद्याच्या रक्षकांना तडजोड शुल्क म्हणून खायला चान्स असणार.
  • Log in or register to post comments

हे जर सत्य असेल तर अशा केसेस

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/23/2013 - 16:40 नवीन
हे जर सत्य असेल तर अशा केसेस मधे स्त्री संघटनांनी पुढे येउन स्त्रियांना उपयुक्त असलेल्या कायद्याचे बळ वाढवले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Legal Terrorism

नित्य नुतन
Fri, 08/23/2013 - 19:14 नवीन
उलट स्त्री संघटनाच अशा कायद्यांना पाठबळ देतात ... कारण स्त्री स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनातूनच तर अशा स्त्री संघटनांनी हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडले होते.. दुसरी गोष्ट म्हणजे अशा स्त्री संघटनांमध्ये बहुतांश स्त्रिया स्वत: वकील आहेत .. तेव्हा पोलिस आणि वकील यांच्या तुंबड्या भरणाऱ्या कायद्यांना ते कशाला विरोध करतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझ्या एका नातेवाईकाच्या

यसवायजी
Fri, 08/23/2013 - 16:51 नवीन
माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत अशीच केस झाली. मधुचंद्राच्या पहिल्या रात्री मुलीने सांगीतले की तीला लग्नात इंटरेस्ट नाही. (मग कशाला केलं लग्न?) घटस्फोट!!. मुलीकडच्यांनी (वकीलाने) १ कोटी मागितले. बिचारा जागेवरच हर्ट-अटॅक येऊन कोसळला. (लग्नाआधीच घाबरलेला)
  • Log in or register to post comments

संतापजनक!!

स्पंदना
Fri, 08/23/2013 - 17:57 नवीन
संतापजनक!! अश्याने खरोखरच्या पिडीता कायद्याला मुकतील. लाज कशी वाटत नाही अस वागायला माणसांना?
  • Log in or register to post comments

सत्यवचन

प्रसाद गोडबोले
Fri, 08/23/2013 - 18:06 नवीन
भारतातला कायदा, हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट, अत्यंत बायसड आहे असे बर्‍यच जणांकडुन आधीही ऐकले आहे ... हिंदुंनी पर्सनल लॉ बोर्ड काढण्याचा विचार केला पाहिजे . जेणे करुन असले कायदे फाट्यावर मारता येतील ....
  • Log in or register to post comments

घट्स्पोट घेणे मागने

अनिरुद्ध प
Fri, 08/23/2013 - 19:30 नवीन
हा धन्दा झाला आहे,माझ्या मित्राच्या भावाचे लग्न झाले आणि सात दिवसात मुलगी माहेरी निघुन गेली,आणि घट्स्पोटा साठी अर्ज केला,मग मान्डीवली करुन घटस्पोट मन्जुर झाला,त्याचे काही लाखच नुकसान झाले,नन्तर बाहेरुन असे कळले की त्या मुलीचे नन्तर काही वर्षात तीन घटस्पोट झाले.अशी माझ्या अजुन काही मित्रान्ची उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments

ह..

उपास
Fri, 08/23/2013 - 20:14 नवीन
कॉलिंग युयुत्सु!
  • Log in or register to post comments

दुर्दैवी आहे हे सगळे.

मराठीप्रेमी
Sat, 08/24/2013 - 02:46 नवीन
दुर्दैवी आहे हे सगळे. सर्वसामान्यपणे गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपी हा गुन्हेगार होत नाही, पण या कायद्याप्रमाणे हे उलट दिसतय.
  • Log in or register to post comments

बापरे!! घरच्यांच्या दबावामुळे

शिल्पा ब
Sat, 08/24/2013 - 03:26 नवीन
बापरे!! घरच्यांच्या दबावामुळे नको असलं तरी लग्न करून मग असं काहीतरी होतं . हा अरेंज म्यारेज प्रकार बंद व्हायला हव. नको तिथे "संस्कृती"चं स्तोम कशासाठी? स्वतःचं अन दुसर्याच सुद्धा मानसिक संतुलन घालवायचा प्रकार. I feel bad for the guy.
  • Log in or register to post comments

अजून एक प्रश्न म्हणजे : जर

शिल्पा ब
Sat, 08/24/2013 - 04:07 नवीन
अजून एक प्रश्न म्हणजे : जर नवरा सरळ घटस्फोटासाठी तयार असेल तर पोलिस वगैरे कशासाठी? का फक्त पैसे उकळायचा धंदा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अगदी अगदी शिल्पा तै ... पैसे

नित्य नुतन
Sat, 08/24/2013 - 11:23 नवीन
अगदी अगदी शिल्पा तै ... पैसे उकळण्यासाठीच हे सगळे चालु आहे... भारतात स्त्रियांसाठी केलेले कायदे इतके आंधळे आहेत की एक दिवसाचं लग्न आणि ५० वर्षांचे लग्न या दोन्हीसाठी सारखेच नियम आहेत.. कलम ४९८अ हे कधी कधी माकडाच्या हातातले कोलीत बनते. आकडेवारी नुसार या कलमान्तर्गत ९८ % केसेस ह्या फेक आणि फ़क्त पैसे उकळण्यासाठीच नोंदवाल्या जातात ... http://www.498a.org/ या पत्त्यावर याची अधिक महिती मिळेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

नवरा सरळ घटस्फोटाला नेहमीच

उद्दाम
Wed, 09/04/2013 - 15:39 नवीन
नवरा सरळ घटस्फोटाला नेहमीच तयार असतो, बायकोच तयार नसते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लै भारी पॉइंट काढला आहे!

संजय क्षीरसागर
Wed, 09/04/2013 - 15:57 नवीन
स्त्रीवर्गाचं अजून इकडे लक्ष गेलेलं दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

शिल्पा तै, आहो या घटनेतील

नित्य नुतन
Sun, 08/25/2013 - 00:02 नवीन
शिल्पा तै, आहो या घटनेतील लग्न अरेंज म्यारेज नव्हे... हा चक्क प्रेमविवाह आहे ... आणि तो ही आंतरजातीय आणि आंतरराज्यीय ....आता बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शिल्पा ताई प्रेमविवाह हा

खबो जाप
Sun, 08/25/2013 - 12:22 नवीन
शिल्पा ताई प्रेमविवाह हा सुद्धा अरेंज म्यारेज चाच प्रकार आहे ; ह्यामध्ये १०० पैकी ७० - ७५ वेळा मुलगा किव्हा मुलगी घर्च्याच्या विचार न करत त्यांच्यावर दबाव टाकून स्वतः स्वताचे लग्न अरेंज करतात, स्वतालाच विश्वास नसणाऱ्या प्रेमाला सर्वस्व मानून लग्न करायला भाग पडतात नंतर त्यांना कळते की घरचे म्हणत होते तेच बरोबर होते; मग आपल्या जोडीदारावर राग काढायला किव्हा धडा शिकवायला हे असले प्रकार ज्यास्त घडत आहेत. मी असे म्हणत नाही कि घरच्यांनी ठरवलेली सगळीच लग्ने १००% यशस्वी होतात, पण नक्कीच त्यात संस्कृती मुल्य ज्यास्त असते. त्यामुळे संस्कृती च्या नावाने ओरड करणे मला काही पटत नाही. उद्या बहुसंख्य लोक मराठी बोलत नाहीत म्हणून "मराठी किव्हा मराठी संस्कृती"चं कशासाठी? म्हणणे बरोबर नाही ना … अरे जिथे कुणालाच माहित नाही अशा ठिकाणी जावून चोरून केलेल्या लग्नाला आजच्या युस अन्ड थ्रो जमान्यात किती महत्व दिले जायील, की दोन्ही घरच्या संमतीन १० लोकांच्या साक्षिन केलेल्या लग्नाला महत्व मिलेल. आंतरजातीय आंतरराज्यीय विवाह जरूर व्हावेत पण त्यापूर्वी आपले किव्हा आपल्याला आवडणार्या च्या घरचे किती अनकूल आहेत ह्याचा विचार करायला नको का ? आणखी कायद्या बद्दल - हा कायदाच नाती मोडायला निघाला आहे,मुलीना जर खरच त्रास होत असेल तर न्याय मिळालाच पाहिजे तिला पूर्ण अधिकार आहे घटस्फोट मागण्याचा, पण जरा काय झाल कि एकत्र बसून उपाय शोधण्या पेक्षा मला घटस्फोट पाहिजे तुला तुरुंगाची हवा दाखवते वगेरे प्रकार होत आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनातूनच निर्माण झालेल्या स्त्री संघटनाच (सगळ्याच नव्हे) मुलीना पहिला सल्ला तू हो पुढ आम्ही बघतोच असाच देतात दुसरा मुद्दा मालमत्ता वाटण्याचा - मुलगी हि मालमत्तेतील बरोबरीची हिस्सेदार असते हे बरोबरच आहे, पण होते असे जेव्हा एखादा गरीब भाऊ कर्ज काढून पैसे जमवून बहिणीचे लग्न करून देतो आणि बहिण कायद्याने अर्धा हिस्सा मागायला येते तेव्हा भावाने काय कराव, भावू म्हणतो ठीक आहे अर्धा हिस्सा घे आणि माझे परत तोंड बघू नकोस. आणखी पहिलाच आपल्या नवर्याला आई वडिलांना सोडून वेगळे राहायला भाग पाडणाऱ्या मुलीना काय अधिकार आहे त्याच्या आई वडिलाच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा ? काही मुद्दे राहिले असतील तर त्यावर परत बोलू …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

खपो जाब यांच्या प्रत्येक

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/30/2013 - 10:02 नवीन
खपो जाब यांच्या प्रत्येक मुद्याशी सहमत. यात अजूनही एक प्रकार येतो तो म्हणजे आंतरजातीय, आंतरराज्यीय बरोबरच आंतरधर्मीय विवाह. यात बहुतेक वेळा मुलांच्या हट्टापायी मुले लग्नं करतात पण संस्कारांच्या, वर्तणु़कीच्या फरकामुळे (कंपॅटीबिलिटी) मुलींचे घरात पटत नाही मग त्या मुलाला वेगळे काढू पाहतात, मुलांना ते मान्य असतंच असं नाही मग पुढे सुरुवात होते या अशा प्रकाराना. मग खपो जाब यांनी म्हटल्याप्रमाणे सूडबुद्धीतूनही खटले दाखल केले जातात. वेगवेगळे विवाह कायदे असल्याने आंतरधर्मीय विवाहात नेमके किती नुकसान होते हे माहीत नाही पण ते आंतरजातीय, राज्यीय विवाहात मात्र होते. वरील विधान सरकटीकरण केल्यासारखे वाटत असले तरी बहुतेक आंतरजातीय, राज्यीय, धर्मीय विवाहात झालेल्या घटस्फोटात पुढे आलेली कारणे मी पाहीलेल्या घटनात अशी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

अगदी संतापजनक घटना आहे.

दत्ता काळे
Sat, 08/24/2013 - 13:41 नवीन
पूर्वी मुलीची चौकशी तिच्या आसपास राहणार्‍यांकडे करून होत असे. अ‍ॅरेंज काय अन् लव्ह मॅरेज काय .. लव्ह मॅरेजमध्ये संबधित मुलगी किंवा मुलगा उठवळंच (हा असांसदीय शब्द वाटेल पण तसा नाहीये ) असेल तर काय करणार? घटना घडल्या कि जबाबदारी वैयक्तिक होऊन जाते, एवढंच. माझ्या एका मित्राच्या मित्राचे लव्ह मॅरेज झाले. त्याला नंतर मुलगीही झाली. काही वर्षानी त्याची बायको तिच्या नोकरीतल्या बॉसबरोबर निघून गेली. तो मित्र दिसला कि वाईट वाटते. तो आपल्या मुलीला शाळेत सोडताना, आणताना अधूनमधून दिसतो.
  • Log in or register to post comments

WTF

टवाळ कार्टा
Sat, 08/24/2013 - 14:40 नवीन
WTF
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Sun, 08/25/2013 - 12:43 नवीन
भारतात सामाजिक विषमता खूप आहे. त्यामुळे सरसकट देशात एकच कायदा करायचा झाल्यास त्याचा गैरवापर होणं सहाजिकच आहे. जो पर्यंत सामाजिक विषमता कमी होत नाही किंवा या 'कायदेशीर दहशतवादाचा' बळी पडलेल्या पुरुषांची संख्या, पुरुषप्रधान संस्कृतीत बळी पडलेल्या स्त्रियांच्या ५०% एव्हडी होत नाही तो पर्यंत हे असंच चालणार.
  • Log in or register to post comments

मला वाटते... कायदा वाईट नसतो

मनीषा
Sun, 08/25/2013 - 21:16 नवीन
मला वाटते... कायदा वाईट नसतो तर त्याचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणारे लोक वाईट असतात. जर या कायद्याअंतर्गत एखाद्या स्त्री ने तक्रार दाखल केली, तर लगेच तिच्या सासरच्यांना दोषी न समजता, तटस्थपणे आणि निरपेक्ष बुद्धीने सर्वकष चौकशी करून, मगच जर कायदेशी कारवाई केली तर या कायद्याचा होणारा दुरूपयोग टळेल आणि ज्या स्त्रीया खरोखरच संकटात आहेत त्यांना न्याय देखिल मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

दुर्दैवी प्रकार

पैसा
Sun, 08/25/2013 - 21:55 नवीन
हुंडाबळींना संरक्षण म्हणून हा कायदा केला पण त्याचा असा दुसर्‍याला त्रास देण्यासाठी वापर व्हायला लागला तर नंतर खर्‍या हुंडाबळींना न्याय मिळणे दुरापास्त होईल. एकूण आता बर्‍याच लोकांना मेहनतीशिवाय सुलभतेने पैसा पाहिजे आहे असं वाटतं. त्यासाठी कोणताही विधिनिषेध बाळगायची गरज वाटत नाही. स्वतःच्या आईवडिलांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी नको असताना लग्न करणारी ही मुलगी दुसर्‍याच्या प्रतिष्ठेचा मात्र बेदरकारपणे बळी देते हे टोकाच्या स्वार्थीपणाचे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

खरंच पैसा ताई ... घोर कलियुग

नित्य नुतन
Mon, 08/26/2013 - 12:31 नवीन
खरंच पैसा ताई ... घोर कलियुग चालू आहे याची साक्षच पटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

अनिरुद्ध प
Mon, 08/26/2013 - 13:36 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कायदा गरजेमुळेच आला आहे

सासवड्कर
Sun, 08/25/2013 - 21:56 नवीन
स्त्री पुरुष समानता असे आपण म्हटले तरी अजूनही लग्न खर्च बहुतेकदा वधू पक्षच करतो . वर पक्षाचा कमी जास्त वरचष्मा असतो . मुळीच लग्ना नंतर सासरी जतत. मुलींनी लग्ना नंतर आपल्या आईवडिलांना सोडून जायचे आणि नवऱ्याच्या आईवडिलांची करायची हि कल्पना इतकी घट्ट बसली आहे कि मुलीचे सासरी येणे हीच एक मोठी तडजोड आहे हे अनेकजण लक्षातच घेत नाहीत . महाराष्ट्रात अजून सुध्दा हुंडा बळीचे प्रकार चालू आहेत . अशा घटनांमध्ये घटना सासरी घडलेली असल्याने मुलीला पुरावे मिळणे अवघड जाते . सासरच्या काही चांगल्या वागणाऱ्या व्यक्ती असल्या तरी त्या आपल्याच घरातल्या लोकांच्या विरोधात कोर्टात साक्ष देत नाहीत .त्यामुळे कायदे बनवण्यात आले आहेत. एखाद्या वेळेस त्याचा गैर वापर सुध्दा होत असेल . वर दिलेल्या घटनेत तर कायद्या पेक्षा पोलिसांचीच चूक जास्त वाटते .
  • Log in or register to post comments

बरोबर आहे सासवडकर सर ..

नित्य नुतन
Mon, 08/26/2013 - 12:28 नवीन
बरोबर आहे सासवडकर सर .. सरकारने कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते.. पण अशा प्रसंगातही पोलिस पैसे उकळण्यासाठी मुलाच्या कुटुंबास वेठीला धरतात .. इतकेच नव्हे तर वरील प्रसंगात मुलीच्या वडिलांनी पोलिसांना काही हजार रु देऊन ... २००० किमी दूर राहत असलेल्या मुलाच्या कुटुंबाला arrest करण्यासाठी पाठवले... (आंतरराज्यीय विवाह)... आणि तुम्ही म्हणता तसे एखाद्या वेळी गैरवापर असता तर ठीक होते पण आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत.. हा कायदा संपूर्णपणे मुलीच्या बाजूने असूनही या कायद्यामध्ये conviction rate फक्त २% आहे ... आता बोला .. आणि IT क्षेत्रातील तरुणी या मध्ये आघाडीवर आहेत ... स्वतः लाखांमध्ये package घेत असूनही पोटगी साठी खोटे पुरावे सादर करायला सुद्धा घाबरत नाहीत ... कारण या कायद्यानुसार जरी तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले तरीही मुलीला कुठलीही शिक्षा होत नाही .. कारण तशी तरतूदच या कायद्यात नाही .... आणि महिला संघटना अशी तरतूद करण्याच्या विरोधात आहेत..कारण अशी तरतूद केल्यास महिला तक्रार करण्यास घाबरतील असा शोध त्यांना लागला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सासवड्कर

मुळीच लग्ना नंतर सासरी जतत.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 08/30/2013 - 10:06 नवीन
मुळीच लग्ना नंतर सासरी जतत. मुलींनी लग्ना नंतर आपल्या आईवडिलांना सोडून जायचे आणि नवऱ्याच्या आईवडिलांची करायची हि कल्पना इतकी घट्ट बसली आहे कि मुलीचे सासरी येणे हीच एक मोठी तडजोड आहे हे अनेकजण लक्षातच घेत नाहीत . तडजोड? लग्नं ही मुलींची शारीरीक आणि भावनिक गरज नसते का? मग तडजोड करायची नसेल तर घरजावई होण्यास तयार नवरा बघावा. आणि अनेक ठीकाणी लग्नानंतर मुलगा-मुलगी वेगळे घर घेऊन राहतात तिथे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सासवड्कर

प्रत्येक हिंदू पुरुषाने आधी

उद्दाम
Mon, 08/26/2013 - 12:24 नवीन
प्रत्येक हिंदू पुरुषाने आधी मुसलमान व्हावे आणि मगच लग्न करावे, अशा अनुमानाला पोहोचलेला ( बायकोने पोहोचवलेला ) -----उद्दाम खान
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Mon, 08/26/2013 - 13:05 नवीन
रोचक मत. या अनुमानापर्यंत कसे आलात हे कळू शकेल काय? - मुद्दाम घुसेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

आण्णा, बाई किंवा बाईकडचे लोक

उद्दाम
Sun, 09/01/2013 - 11:46 नवीन
आण्णा, बाई किंवा बाईकडचे लोक भिकारचोट असले की भले भले लोक गारद झाले आहेत. थोरल्या म्हाराजांना 'सोयरा' करणारीनेच विष घातले, असे ऐकून आहे. खरे आहे का ते? आणि धाकल्या म्हाराजांबद्दल तर काय सांगायचं? खुद्द सख्ख्या मेव्हण्यानेच त्याना औरंगजेबाच्या ताब्यात दिले. हे तरी नक्कीच खरे आहे ना? त्यामुळं पुरुषानं १०० रुपये खर्च करुन स्ट्याम्प पेपर करुन मुकाटपणे धर्म बदलावा आणि मग लग्न करावं. बाई / माहेरचे वरचढ होऊ पहातात म्हटले की एका फटक्यात तिला घालवून दुसरीला आणण्याची आपली सोय बघावी. ---- गेली अनेक वर्षे रिकाम्या अंथरुणात एकटाच झोपणारा आणि १०० रु खर्च न केल्याबद्दल हळहळणारा... उद्दामराव एकलिंगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

थोरल्या महाराजांचा मृत्यू

बॅटमॅन
Wed, 09/04/2013 - 14:57 नवीन
थोरल्या महाराजांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला नव्हता. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

मग नेमका कशाने झाला?

उद्दाम
Wed, 09/04/2013 - 15:37 नवीन
मग नेमका कशाने झाला? गुढगी रोगाने का? -- अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी सर्वांना विचारुनही गुढगी रोग म्हणजे काय हे न समजलेला. उद्दाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मेहेंदळ्यांच्या शिवचरित्रात

बॅटमॅन
Wed, 09/04/2013 - 15:57 नवीन
मेहेंदळ्यांच्या शिवचरित्रात पाहून सांगतो काय लिहिले आहे ते. विषप्रयोग नाही इतके कन्फर्म. तदुपरि गुढगी रोग म्हंजे माहिती नाही. काही ठिकाणी विशिष्ट ताप, अतिसार, इ. च्या झटक्यात गेले असेही उल्लेख आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

थोरल्या म्हाराजांना 'सोयरा'

मालोजीराव
Wed, 09/04/2013 - 15:25 नवीन
थोरल्या म्हाराजांना 'सोयरा' करणारीनेच विष घातले, असे ऐकून आहे
चुकीचं ऐकून आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

अजून एक

कपिलमुनी
गुरुवार, 08/29/2013 - 13:03 नवीन
आमच्या ओळखीमधल्या एका मुलीचे लग्नानंतर अफेयर होते .. त्या प्रियकराने हिला फसवल आणि पळून जायला नकार दिला .. हिने आत्महत्या केली ...आता सासरचे सर्व जण आत मधे आहेत ..हुंडा बळी म्हणून ..पेपर ..न्यूज मधे बातमी आली ...स्त्री मुक्ती वाल्यांचा मोर्चा झाला .. चर्वित चर्वण झाले .. आणि कायदा आंधळा स्त्रीयांच्या बाजूने !!
  • Log in or register to post comments

अरे बापरे बाप ... आतापर्यंत

नित्य नुतन
गुरुवार, 08/29/2013 - 13:22 नवीन
अरे बापरे बाप ... आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या हुंडाबळींवर कडी ... विश्वासच बसत नाही पोलिस, स्त्री मुक्ती वाल्यांना प्रचंड ज्ञानार्जनाची आवश्यकता आहे .. त्या मुलीच्या सासरकडील माणसांचे देव रक्षण करो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कायदा...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/29/2013 - 13:19 नवीन
माझ्या एका मित्राचे त्याच्या पत्नीशी वाद होते. परिस्थिती पराकोटीला पोहोचली तेंव्हा तो घटस्फोटासाठी त्याच्या वकिल मित्राकडे गेला. वकिलाने त्याला चहा वगैरे पा़जून शांत केले आणि समजवून सांगितले बायकोने ठरविले तर तू रस्त्यावर येशील. सर्व कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. तेंव्हा घटस्फोटाचा विचार सोड.
  • Log in or register to post comments

अशीच केस, पण मुलाचा जोरात

सौंदाळा
गुरुवार, 08/29/2013 - 13:34 नवीन
अशीच केस, पण मुलाचा जोरात चालणारा बिझनेस होता. वकीलाने दिलेल्या सल्ल्यानुसार मुलाने बिझनेस कागदोपत्री आई, भाऊ वगैरेंच्या नावावर केला आणि स्वतः बेकार झाला (ऑन पेपर) आणि बायकोला पोटगी देण्यास असर्थता दर्शविली. (या घट्स्फोटात कोण बरोबर कोण चुक हे मला माहीत नाही पण दोन्ही बाजुचे लोक घटस्फोटासाठी काय गेमा खेळु शकतात हे सांगायचे होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जशास तसे.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/29/2013 - 15:14 नवीन
माझ्याही ओळखीत, एकाने बायकोला घटस्फोट देण्याआधी गुपचुप आपली सगळी मालमत्ता, रोकड भावाच्या नांवावर हस्तांतरीत केली. घटस्फोट झाला. बायको आणि दोन मुलींच्या चरितार्थासाठी बर्‍यापैकी रक्कम द्यावी लागली. पण, समस्या अशी झाली की नंतर भावाने मालमत्ता आणि रोकड परत करण्यास चक्क नकार दिला. आता भावाच्या नांवाने खडे फोडीत बसला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आयला...

ब़जरबट्टू
गुरुवार, 09/05/2013 - 11:59 नवीन
=)) =) =)) धिंगाणाच नुसता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अशी केस ऐकली आहे. मित्राच्या

सौंदाळा
गुरुवार, 08/29/2013 - 13:29 नवीन
अशी केस ऐकली आहे. मित्राच्या गावात झालेला प्रकार. बिचार रोज पोलिस्स्टेशनला जेवणाचे डबे घेऊन जायचा मुलाकडच्या लोकांसाठी. अजुन एक तिडीक जाणारा प्रकार म्हणजे 'लग्नाचे अमिष दाखावुन बलात्कार'. स्वखुशीने (मग भलेही अमिष दाखवुन असेल, भुलथापांना बळी पडुन असेल) सज्ञान मुलीने लग्नाआधी शारीरिक संबध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न झाले नाही (मुलानेच प्रतारणा केली, गैरफायदा घेतला असे समजु) तर आधी स्वखुशीने ठेवलेला शारीरिक संबंध नंतर बलात्कार होतो का? कायदा काय सांगतो?
  • Log in or register to post comments

मला असं वाचल्या सारखं वाटतय

पिलीयन रायडर
गुरुवार, 08/29/2013 - 13:44 नवीन
मला असं वाचल्या सारखं वाटतय की काही दिवसांपुर्वी अशा केस मध्ये शाररिक संबंधाना बलात्कार मानु नये असा निकाल दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

लग्नाचे आमिष दाखवून शरीर

निनाद मुक्काम …
Fri, 08/30/2013 - 07:01 नवीन
लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध हा बलात्कार मानू नये असा व अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीर संबंध ठेवले तर तो बलात्कार समजू नये असे दोन महत्त्वाचे निर्णय कोर्टाने अलीकडे दिले कॉलेज मधील जोडपी पळून गेल्यावर मुलीकडचे अनेकदा ती अल्पवयीन असल्यावर त्या मुलावर अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करतात व जरी मुलीने आमचे एकमेकावर प्रेम आहे असे सांगितले तरी मुलाची रवानगी तुरुंगात व्हायची आता ह्या प्रकाराला आळा बसेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीर संबंध ठेवले तर

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 09:45 नवीन
तो बलात्कार समजू नये असा कोणत्या कोर्टानं आणि केव्हा निर्णय दिलाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

याबाबत फार उलटसुलट निकाल आणि घटना वाचायला मिळतात

गवि
Fri, 08/30/2013 - 13:16 नवीन
याबाबत फार उलटसुलट निकाल आणि घटना वाचायला मिळतात. अल्पवयीन, शरीरसंबंध, लग्न, परस्परसंमती, जबरदस्ती आणि सहभागी पार्ट्यांचा धर्म या सर्व मिश्रणातून एकापेक्षा एक बुचकळ्यात टाकणारे निकाल / बातम्या वाचलेल्या आठवतात. त्यातल्या नमुन्यादाखल काही. जरुर वाचा. पुरेसा गोंधळ होण्याची खात्री.: लेटेस्टः लिंकः http://articles.economictimes.indiatimes.com/2013-08-26/news/41455571_1_minor-girl-15-year-old-girl-18-years काही अंश चोप्य पस्ते: टायटलः Consensual sex with minor not crime, Delhi court says
The court made these observations while acquitting a 22-year-old youth of charges of kidnapping and raping a 15-year-old girl whom he later married. The youth, a native of West Bengal, was acquitted of the charges as the court held that the minor, on her own will, accompanied him and obstacles should not be put in their happy married life. Rejecting the plea of the police and Delhi Commission for Women that POCSO Act prohibits minors from having any kind sexual relationship, additional sessions judge Dharmesh Sharma said, "I am afraid if that interpretation is allowed, it would mean that the human body of every individual under 18 years is the property of the state and no individual below 18 years can be allowed to have pleasures associated with one's body."
त्या आधी २००८ मधे: लिंकः http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Minors-marriage-valid-rules-HC/articleshow/15806846.cms टायटलः Minor's marriage valid, rules HC काही भागः
In a landmark judgement, the Bombay High Court on Wednesday approved of the marriage of a 17-year-old girl who married her lover out of her own free will. “If the couple is willing to stay with each other and the girl is eager to live with her husband, she cannot be forced to stay at a remand home or cannot be sent back to her parents,” the Division Bench comprising Justice Bilal Nazki and Justice A P Bhangale said, while handing over the custody of the girl to her husband.
त्यानंतर एक २०१० मधले पहा: लिंकः http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Consensual-sex-with-minor-termed-rape-even-in-case-of-marriage-HC/articleshow/15984106.cms टायटलः Consensual sex with minor termed rape even in case of marriage: HC काही मजकूरः
Justice D G Karnik, who was hearing the case, told defence lawyer R S Kavle that Section 376 of the Indian Penal Code was very clear and categorically stated that sex with a minor is construed as rape. Advocate Kavle pleaded that Shah had legally married the minor under the Muslim Personal Law and even had a nikahnama. He added that the minor had gone on her own accord with Shah and that he did not force her to elope with him. “I accept all the statements forwarded by you. But how do I help you? Even if there is marriage but the girl is below 16, it amounts to rape,” Justice Karnik observed. To everybody’s surprise, Justice Karnik, however, granted bail on a bond of Rs 15,000.
आणि एका २०१० च्याच केसमधे पहा: लिंकः http://m.mumbaimirror.com/index.aspx?Page=article&sectname=News%20-%20City&sectid=2&contentid=2010032320100323022455889a6159c6c टायटलः HC to ask minor if she was forced to marry काही मजकूरः
The Bombay High Court on Monday decided to interview the 15-year-old Muslim girl whose marriage was stalled by the Ghatkopar police in December last year after it received a complaint saying the girl was a minor and her marriage was in violation of the Child Marriage Prohibition Act. The High Court has also issued notice to the Additional Solicitor General in order to decide the legality of the petition filed by the girl’s mother, Zakia Begum, in which she had contended that Muslims in India were entitled to marry on attaining puberty as per his or her choice, and that freedom was integral part of their fundamental rights. The judges observed that this was an important issue that challenged certain provisions of the Constitution, and the Union of India should be made a party in this matter.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गवि, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार

संजय क्षीरसागर
Fri, 08/30/2013 - 16:19 नवीन
यावर एक ज्योक आहे: एका विवाहिताकडे एक सुरेख मुलगी आकर्षित होते. तिचा अल्लडपणा पाहून, नेमक्या नको त्या वेळी, तो विचारतो `बाय द वे', हाऊ ओल्ड आर यू?' `वाय? आएम थर्टीन' ती बिन्धास्त सांगते. तो परत कपडे घालतो. ती बघतच राहते. आणि विचारते : `आर यू स्युपरस्टिशियस ऑर व्हॉट?' ___________________ आपल्याकडे बालविवाहाला बंदी आहे. आणि समाजसंकेतानुसार शरीरसंबंध हा सज्ञान लोकांचा व्यवहार आहे. या दोन बेसिक गोष्टींवरून अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध बेकायदा ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरोबर संक्षी..

चिगो
Fri, 08/30/2013 - 20:02 नवीन
 आणि समाजसंकेतानुसार शरीरसंबंध हा सज्ञान लोकांचा व्यवहार आहे. या दोन बेसिक गोष्टींवरून अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध बेकायदा ठरतो.
बरोबर, संक्षी.. पण 'समाजसंकेत' आणि मुलामुलींचे ' सज्ञान' व्हायचे वयदेखील बदलायला लागले असतांना कायद्यालापण बदलायला नको का? ;-) इथे गारोहिल्समध्ये वयात आलेली मुलगा मुलगी संबंध ठेवतात, आणि सगळं जुळत असेल तर लग्नपण करतात.. आईबापांच्या लग्नात पोरांनी सामिल असणं, हे काही धक्कादायक वगैरे नाही इथे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तिकडे कसं आहे चिगो, लग्नाचा आणि धमाल करण्याचा

संजय क्षीरसागर
Mon, 09/02/2013 - 14:35 नवीन
अर्थाअर्थी संबंध नाही. इकडे तशी धमाल चालू झालीये पण अजून चौफेर पसरलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अरेच्चा..

चिगो
गुरुवार, 09/05/2013 - 16:36 नवीन
अहो, निस्ती धमालच नाही हो, लग्नेही होतात कायदेशीर वयाच्या आधी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काय बोलतोयंस?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/05/2013 - 19:20 नवीन
मला वाटलं ते वर्च्युल जगातच आपल्या पुढे आहेत पण अ‍ॅक्च्युल जगात सुद्धा त्यांनी मजल मारलीये? अरे आपण बालविवाह बंद केले ते त्यांनी चालू केले. म्हणजे ते मागे आहेत आपल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा