Skip to main content

मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास

लेखक शरद यांनी शनिवार, 24/08/2013 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न. इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्‍या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्‍या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक. हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्‍या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती. या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्‍याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही. या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे. दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्‍यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते. आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता. आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्‍या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले. शरद

वाचने 58921
प्रतिक्रिया 201

प्रतिक्रिया

मोहम्म्द पैगंबरांच्या मृत्यूपूर्वी भारतात केरळमधे इस्लाम राज्धर्म म्हणून युद्ध न करता स्वीकारला गेला.

In reply to by मुक्त विहारि

यात नवीन काय आहे? केरळातला राजा तिकडे गेला. त्याने पैगंबरांच्या मुलीशी विवाह केला. येताना तो वाटेत मेला. पण त्याची बायको भारतात आली आणि तिने त्या नवर्‍याच्या राज्यात म्हंजे केरळात मशीद उभारली ती मशीद जगातील दुसरी मशीद मानली जाते. आता, ही दुसरी मशीद, मग पहिली कोणती? तर जगातील पहिली मशीद म्हणजे खुद्द पैगंबरांचे घर! म्हणजे एका अर्थाने, भारतातील ती केरळातील जामा मशीद ही जगातील पहिलीच मशीद मानता येते.

In reply to by उद्दाम

माहिती,मग त्यातुन एक सिद्ध झाले की ईस्लाम मध्ये सुद्धा स्त्रियाना सुद्धा पुरुषा ईतकेच स्थान आहे किवा होते,मग प्रार्थनाग्रुहात (मशजीद) प्रार्थना करण्याचा हक्क मात्र फक्त पुरुषाना हे नन्तर झाले असावेका?

In reply to by उद्दाम

"पैगंबरांचे" असे अनेकवचन/आदरार्थी मुद्दाम केले आहे की चुकून झाले? देवांच्या नावाचे अनेकवचन बघण्यात येत नाही. उदा. रामाचे धनुष्य. रामांचे धनुष्य कोणी म्हणत नाही. इत्यादी

In reply to by रामपुरी

भावना दुखवू नयेत असा हेतू असावा...

In reply to by arunjoshi123

जो केरली राजा अरबस्तानात मोहम्म्द पैगंबरान्ला भेटायला गेला तो परत्ताना अचानक वाटेतच मेला, कसा कोन जाने. त्यचे थदगे येमेनमदे आहे. त्याला तिते घेउन जाणार्या मुस्लमान धर्मच्या व्यापार्यानि परत येउन राजाच्या रिलेर्टिवाना साम्गितले की राजाने मुस्ल्मान धर्म घेत्ला होता. अशे ते राजघराने मुसलमान जाले.

नावे वेगळी असली तरी शेवटी सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात. इस्लाम काय ख्रिश्चन काय ? सर्वच धर्म दया क्षमा शांतीचा संदेश देतात. सगळ्याच धर्मांची शिकवण मानवता हीच आहे. ईस्लामचा अर्थ शांतता असा आहे. असे असताना कोण जिंकले कोण हरले हा प्रश्न का पडावा ?

कै च्या कै लेखन! भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे)

In reply to by ऋषिकेश

भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे) >>> ऋ , तु काय करतोयस इथे ? इतिहासाच्या धाग्यात ? इतिहास पेटवितो माहीत आहे ना !! ;) असो ...या निमीत्ताने शरद पुन्हा बोर्डावर दिसले यातच समाधान !! विषय नेहमीच डोक्यात जातो ...हा नव्हे हो ..इतिहास हा ...त्यामुळे नो कमेंटंस कोण जिंकले किंवा कोण हारले या वादात न पडणारा.

In reply to by सुहास..

पण हे वाक्य अनेकदा ऐकत असतो कि हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे. म्हणजे नक्कि काय आहे ? हिंदुत्व जर जिवनपध्दति आहे तर ती "धर्म" म्हणून जे काहि असते (स्व अथवा पर) त्याचे अस्तित्व नाकारते काय ?

उध्रुत करुन सान्गाल का? तेव्हडेच आमच्या सारख्या अल्पमती माणसाला कळले तर बरे होइल.

ते दुसर्‍याच परिच्छेदातील पहिले वाक्य इ स २००० ते इस ६०० बदलून इसपूर्व २००० ते इसपूर्व ६०० करा बघू.

शीर्षकातच अभ्यास असल्यामुळे एक अभ्यासू उत्तर देण्याचा हा प्रयत्न. हिंदू अथवा मुस्लिम ही शेवटी दोन एकसारखीच माणसे, बदलते ती परिस्थिती असं मानून हे लिहितो आहे. (अवांतर: या विषयावर एक सुंदर पुस्तक आहे. मिळाले तर जरूर वाचा. Guns, Germs, and Steel by Jared Diamond.) भारताच्या आक्रमकांविषयी बोलायचं झालं तर लढाईतल्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे नवे डावपेच आणि नवीन हत्यारांचा वापर. नकाशाकडे नजर टाकली तर दिसतं की अगदी तुर्कस्तान पासून भारतापर्यंत पसरला आहे तो प्रदेश बहुतेक रुक्ष. या प्रदेशात पाणी एकंदरीने कमी त्यामुळे शेतीचे प्रमाण कमी. भटक्या टोळ्या जास्ती, अन्न पिकवण्यापेक्षा हिसकावून घेणे जास्त फायदेशीर. म्हणून आपापसात भांडणे फार. लढाई आणि नवीन हत्यारांचा वापर या परिस्थितीत जास्त. बाबरनामा या बाबराच्या आत्मचरित्रात याची भरपूर उदाहरणे सापडतात. याउलट परिस्थिती होती भारतात. गंगेयमुनेच्या दुआबात सुपीक जमीन भरपूर आणि नगरे समृद्ध. दोन उदाहरणे पाहूया. अल्लाउद्दिन खिलजी. त्याने देवगिरी विरुद्ध काय डावपेच वापरले? पाहिलं म्हणजे गती आणि गुप्तता. त्याला अत्यंत वेगाने दिल्लीपासून देवगिरीपर्यंत येणे शक्य झाले कारण त्याच्याकडे असलेले अरबी घोडे. हत्ती अथवा पायी हे अंतर इतक्या कमी वेळात जाणे शक्य नव्हते. (बाजीरावाने काही शतकांनंतर उलट दिल्लीवर अशीच चपळ धडक मारून दाखवली ती पुन्हा घोडदळाच्या भरवशावरच) यामुळे त्याला अचानक रामदेवराव यादवाची बचावाची सिद्धता नसताना देवगिरी गाठता आली. आणि त्याच्या सामर्थ्याविषयी अफवांनी त्याला मदतच झाली. दुसरं म्हणजे त्याने उगाच देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवून आपले घोडेस्वार वाया घालवले नाहीत. त्यापेक्षा त्याने धान्य पाणी रोखून धरले. त्याला चपळ घोड्यांची या कमी मदतच झाली. रामदेवराय यादव अथवा त्याचे सरदार वैयक्तिक शौर्यात कमी पडले नाहीत, त्यांची चूक झाली ती गाफील राहण्यात, शत्रूवर नजर न ठेवण्यात. आणि भांडणे फक्त हिंदूमधेच नव्हती, मुघल पक्षात तुर्की, इराणी, अफगाण, दख्खनी असे अनेक पक्ष होते आणि वेळप्रसंगी ते दुसर्याचा जीवही घेण्यास कमी करीत नसत अशी कित्येक उदाहरणे इतिहासात आहेत. दुसरं उदाहरण बाबराचं. त्याने इब्राहिमखान लोदीवर जो विजय मिळवला तो तोफखाना आणि बंदुकांच्या जोरावर. इब्राहिमखानाकडे कित्येक पट सैन्य होते, अनेक हत्ती होते, पण तोफांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. बाबराने तोफा मिळवल्या त्या मध्यपूर्वेत. मंगोल साम्राज्यात तोफांची दारू चीनमधून युरोपपर्यंत पोहोचली. तिथे तिच्यावर अनेक प्रयोग होऊन युरोपियन लोकांनी त्यात प्रभुत्व मिळवले पण ते नंतर. पंधराव्या शतकात बाबाराकडे त्या काळातल्या आधुनिक तोफा आणि दारू होती. अगदी शिवकालातही तोफांचे गोलंदाज मुस्लिम असत आणि दारुगोळा युरोपियन लोकांकडून विकत घेतला जात असे. घोडदळाबाबत मात्र वेगळेच चित्र दिसते. मराठ्यांनी घोडे विकत घेऊन आणि स्वतः त्यांची पैदास करून कित्येक हजारांचे सैन्य बनवले. बऱ्हाणपूरपासून गुजरातेपर्यंत आणि विजापूरच्या वेशीपासून माळव्यापर्यंत औरंगझेब बादशाह जिवंत असताना मराठी घोड्यांनी दौड मारली होती. तेंव्हा कोणताही फायदा अथवा डावपेच हा एका पक्षाकडे कायम राहू शकत नाही, परिस्थितीनुसार दोन्ही पक्ष त्याचा वापर करून यशस्वी होऊ शकतात.

In reply to by मनो

अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच भारताच्या इतिहासातील खरी सोनेरी पाने दोनच .. मोघलकाळ आणि इंग्रजकाळ .. उरलेला नुस्ताच पोकळ यज्ञ-जाळ .. असे मला वाटू लागलेले आहे. --- सोनेरी उद्दाम

In reply to by उद्दाम

गुप्तकाळ आणि मौर्यकाळ व अन्य काळाबद्दल काही माहिती आहे की तिथेही पोकळ शब्दजञ्जाळ आहे फक्त?

>>> पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो ज्या देशात मुस्लिम अल्पसंख्य असतात व इतर धर्माचे नागरिक जास्त असतात, त्या देशात मुस्लिम एकमेकांचे भाऊ असतात व मुस्लिमांमधील सर्व पंथ एकत्र येऊन आपल्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून वेगळा देश मागण्याच्या मागे लागतात व त्यासाठी थेट युद्ध सुरू करतात. (उदा. भारतातले काश्मिर, रशियातील चेचन्या, पूर्वीच्या युगोस्लावियातील बोस्निया, फिलिपाईन्स, चीन मधील उग्यार प्रांत इ. अमेरिकेत सुद्धा टेक्सस हे मुस्लिम राज्य म्हणून जाहीर करावे यासाठी काही वर्षांपूर्वी लुईस फराक्खान नावाच्या बाटग्याने लाँग मार्च काढला होता). या सर्व देशात इतर धर्मियांचे प्राबल्य असल्याने तिथे फुटिरतेची चळवळ सुरू आहे. ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य असतात तिथे ते आपापसात लढतात. सुन्नी विरूद्ध शिया (पाकिस्तान, इराक, इराण इ.), सुन्नी विरुद्ध अहमदी (पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध बहाई (सौदी अरेबिया, पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध हाजिरा (अफगाणिस्तान) इ. याची उदाहरणे आहेत. या सर्व देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत. मुस्लिमात सुन्नी बहुसंख्य असल्याने इतर पंथांविरूद्ध ते लढत असतात. एकंदरीत मुस्लिमांना सशस्त्र झगडा आवडतो. मग तो स्वधर्मियांविरूद्ध असेल किंवा इतरधर्मियांविरूद्ध.

In reply to by श्रीगुरुजी

या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना !

>>> या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना ! साधे उदाहरण म्हणजे पाकिस्तान. १९४७ साली पाकिस्तानात २२ टक्के हिंदू होते. ख्रिश्चन व शीखही ही बर्‍यापैकी होते. मुस्लिम ७० टक्क्यांच्या आसपास होते. त्यामुळे त्यांचे पहिले लक्ष गैरमुस्लिम होते. २०१३ पर्यंत हिंदूंचे प्रमाण २ टक्क्यांहून कमी झाले आहे. एकूण मुस्लिमांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे गैरमुस्लिमांविरूद्धचा लढा यशस्वीरित्या संपत आलेला आहे. १९८० च्या दशकात प्रथम अहमदींना मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करून अमुस्लिम ठरविले गेले आणि आता गेल्या काही वर्षांपासून सुन्नी मुस्लिम शियांना संपविण्याच्या मागे लागले आहेत. शियांच्या मशिदीबाहेर आत्मघातकी बॉम्बहल्ले करणे, शियांच्या मिरवणुकीवर हल्ले चढविणे इ. सुरू आहे. म्हणजे प्रथम हिंदूंना संपविले, नंतर अहमदींना आणि आता शियांच्या ते मागे आहेत. म्हणजे प्रथम गैरमुस्लिम, नंतर मुस्लिमातला अल्पसंख्य गट आणि आता मुस्लिमातला प्रतिस्पर्धी पंथ असा क्रम आहे. उद्या शिया पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिले नाहीत तर उरलेले सुन्नी मुस्लिम आपापसात लढतील.

In reply to by श्रीगुरुजी

+१ टू श्रीगुरुजी...! या परस्पर झगड्याची सोय एका हदिसमधे (हदिस-प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या उक्ती) आलेली आहे! हदिस'ना कुराणाच्या खालोखाल मान्यता असते. जेंव्हा प्रेषित निर्वतले..पैगंबरवासी झाले,त्यानंतर लगेच उत्तराधिकारी नेमण्याविषयी वाद सुरु झाले. सकिफा नावाच्या स्थळी हा वादविवाद सुरु झाला. मदिनेच्या लोकांना पुढचा उत्तराधिकारी आपल्या कुळगटापैकी हवा होता. हे कानी पडताच . अबू बेकर व उमर तेथे गेले.आणी उताराधिकारीत्व/खिलाफत/खलिफापद हे कुरैशांच्या (प्रेषितांच्या वंशापैकी व्यक्तिचेच) असेल असे मदिनेच्या लोकांना युक्तिवादाने पटवू लागले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या दोन हदिसचा आधार घेतला.. त्या अश्या- १)प्रेषित म्हणाले-"सर्व लोक हे कुरैशांचे अज्ञाधारक आहेत." (हदिस क्रमांक-२५-१००९.१०) २)प्रेषित म्हणाले-"खिलाफत(राज्यसत्ता) ही नेहमीच कुरैशांच्या ताब्यात राहिल,जरी त्यांची दोन माणसेही(पॄथ्वीवर) जिवंत राहिली तरी.(ती त्यांच्याकडेच राहिल)" (हदिस क्रमांक-७१३९,४०) नंतर मदिनेच्या मुस्लिमांमधे इस्लाममधे येण्यापूर्वी ज्या तिन टोळ्या होत्या,त्यातल्या वैरभावनेचा मुत्सद्दीपणानी वापर केला,आणी अबू बेकर यांच्याशी सर्वांना एकनिष्ठतेची(खलिफापद मान्य करण्याची) शपथ घेण्यास भाग पाडले. इकडे प्रेषितांचे जावई अली हे (बिचारे) त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात गुंतून(थांबून) राहिले. त्यांना आपण स्वतः खलिफा होऊ,व लोक त्याला मान्यता देतील असे अधीपासूनच वाटत होते.पण वरिल प्रकार समजल्यावर ते अत्यंत नाराज झाले.अलींना मान्यता देणारा/मानणारा पंथ (हाच पुढिल शिया पंथ गणला गेला),जो आजही खिलाफत साठी अलिच योग्य होते,हे दाखवण्यासाठी असेच आधार/पुरावे काढून दाखवत असतो. हा कुरेशांअतर्गत असलेल्या दोन प्रमुख टोळ्या हाशिमी व उम्मय्यी कुळगटातला वाद होता. शेवटी त्यावेळी हा वाद कसाबसा मिट्वून अलिंनी अबू बेकर प्रती शपथ घेतली,आणी स्वतःची खलिफा होण्याची इच्छा..मुस्ल्लिमांमधे फूट पडू नये,म्हणून पहिल्या तिनही खलिफा निवडीवेळे पर्यंत दाबून ठेवली,तिसरे खलिफा उस्मान यांची हत्या झाल्यावर, अलींना आता आपण खलिफा होणार याची जवळपास खात्रीच वाटत होती...
पण...
तोपर्यंत मुस्लिम साम्राज्याचा जवळजवळ चौपट विस्तार झालेला होता,बळजबरीने म्हणा किंवा युद्धलूट मिळण्याच्या आकर्षणाने म्हणा लाख्खो लोक इस्लाम'मधे आलेले होते. पण त्याच्यात कथित ऐक्याचा पाइक असलेला इस्लाम आलेलाच नव्हता,त्यामुळे अत्ता पाकिस्तानात जी अवस्था आहे,तीच तिथे निर्माण झालेली होती. प्रचंड वाढलेलं राज्य .. तिथे प्रशासनाच्या व नवमुस्लिमांच्या लावण्याच्या सोइ/कर-अकारणी अश्या प्रशासनाच्या अनंत भानगडी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे गैरमुस्लिमांविरुद्धचा जिहाद थंडावला होता. म्हणून मग "बाहेर"च्या मारामारीत तात्पुरता हरवलेला अंतर्गत कलह/वैमनस्य प्रचंड उफाळून आला,त्यात वर म्हटल्याप्रमाणे कुफा,बसरा अश्या नव्या प्रांतातल्या मुस्लिम झालेल्या प्रजेला खलिफा आपल्या'तला असावा,असे वाटू लागले...आणी (अव्यहार्य)धर्मवचनांचा जोर ओसरून ज्याची लाठी बळकट त्या'चा राजसत्तेवर अधिकार पहिला.. हा त्यांच्या जुन्या टोळीयुगाचा नियम वर्चस्व गाजवू लागला... शेवटी अली(हाशिमी-कुळगट) आणी मुविया(उम्मय्यी-कुळगट) यांच्यात आमने/सामने युद्ध सुरु झालं. दोघेहीजण आपण इस्लाम'नुसार बरोबर आहोत.राज्यपदासाठी योग्य आहोत,असे दावे धर्माच्या आधारे काढून दाखवू लागले. आम-मुस्लिम जनता भांबावली,आणी मग ती'ही ज्याचं सैन्य आपल्या प्रदेशात घाबरवायला/शपथ घेववायला येइल..त्याच्याशी शपथ घेऊ लागली..आज अली तर उद्या मुविया असा अक्षरशः कपडे बदलल्या सारखा खेळ सुरु झाला. (इस्लामी इतिहास/वर्तमानातल्या..या परिस्थितिवर नरहर कुरुंदकरांनी मुस्लिमांना असे आवाहन केले होते, की- "कुणीतरी एक चुकला होता(इस्लामनुसार..अयोग्य होता..) असे तुंम्ही मान्य करायला हवे!" ) शेवटी दोघांमध्ये लढाया डावपेच इतके विकोपाला गेले/कंताळवाणे झाले की त्यांना हजारो मुस्लिमांचा बळी देऊन खिलाफत दोन विभागात वाटण्याची इस्लाम बाह्य तड-जोड स्विकारावी लागली! इस्लामी राज्य दोन ठिकाणी विभागले गेले. पुढे विशुद्ध इस्लामचा पुरस्कार करणार्‍या एका कड्व्या धर्मनिष्ठ गटाच्या (खारिजिंच्या) या दोघांन्नाही अधीपासून असलेल्या विरोधाच्या पडसादामुळे मुविया जखमी होऊन वाचला..आणी अली मारले गेले! नंतर धूर्त..मुत्सद्दी अश्या मुवियानी सगळी खिलाफत बळकावली.. या सर्व घटनांकडे पाहिल्यावर मला एकच वाटते.. एखादी व्यवस्था धर्मातून/धर्माबाहेरून कशिही कुठूनही आलेली असो,त्या व्यवस्थेतच जर बेइमानी असेल,तर त्यातल्या बेइमानांचेच नेहमी फावणार! इस्लाममधे तेच झाले आहे... आणी कदाचित यापुढेही होत राहिल... जाता जाता-- बाकी ह्या खारिजिंविषयी थोडे सांगायला हवे... खारिजी हा इस्लाममधील विशुद्ध इस्लामचा प्राणपणानी पुरस्कार करणारा/आचरणारा, असा सर्वसामान्य मुस्लिमांमधला एक गट होता.. ते "सर्व मुस्लिम हे परस्परांचे बंधू आहेत" या कुराणातल्या वचनाचा आधार घेऊन असे प्रतिपादत असत ,की खलिफा हा त्यापदाला योग्य गुणधर्म असलेला असा अख्या मुस्लिम समुदायातला कुणीही होऊ शकतो! हा इस्लाममधला खास तत्वनिष्ठांचा(आणी त्यामुळेच व्यवहारात कायम अपयशी राहिलेला) गट..! त्यांना बिचार्‍यांना हे समजणेच शक्य नव्हते की धर्मात वाइटाबरोबर जे काही थोडंफार चांगलं आलेलं असतं त्याला कधिही पाळायचं नसतं..तर वाइटाच्या रक्षणासाठी त्या कथित चांगल्याचे फलक हाती घेऊन त्याचा वापर जाहिरात करण्यासाठी करायचा असतो! यांच्याबाबत एक कथा सांगितली जाते... धर्मवचनांचा काटेकोरपणे.. टोकाला जाऊन अर्थ काढून त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी (अर्थातच पहिली स्वतःवर..) करणार्‍यांपैकी हे लोक होते.. "एका खारिजीला कळले,की त्यानी जो झाडाखाली पडलेला खजूर खाल्ला,तो दुसर्‍याच्या बागेतला होता.झाले... लगेच त्याने "चोरी करणार्‍याचे हात तोडावे" या इस्लामी न्यायशास्त्राच्या आधारे स्वतःचा खजूर उचललेला हात कापला...! खरेखोटे कसेही असो..! पण हे खारिजी होते मात्र अव्वल! त्यांना स्वतःच्या (इहलौकिक) जीवनाबद्दल काहिही आस्था नसायची,आपले सर्व जीवन हे कुराणानी सांगितल्या प्रमाणे इहलोकावर अल्लाचे राज्य आणण्यासाठी ते खर्चून टाकीत असत! लढायांमधे सुद्धा
स्वर्ग...स्वर्ग
...अल-जन्नत..अल जन्नत.. अश्या घोषणा देत प्राणपणानी लढणारी ही लोकं! यांचे देह हे खरच धर्माचं साधन होते! त्यामुळे असं वाटतं... की...
ज्या धर्मांसाठी लढायचं,ते धर्म "कसे" आहेत? हे पाहायची विवेकबुद्धी यांच्याजवळ असती तर...?
यावर मला पुन्हा एकदा कुरुंदकरांच्या लेखनातील काही वाक्य अठवतात... "चांगली माणसं आणी वाइट व्यवस्था" "वाईट माणसं आणी चांगली व्यवस्था" यापैकी आपण कश्याची निवड करणार ??????

In reply to by अत्रुप्त आत्मा

+१११. एकंदरीत मुस्लिमांचा सर्व इतिहास व वर्तमान हा युद्ध, लढाया इ. शीच जोडलेला आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

जे सत्याचे प्रतिपादन दुराग्रहाने करतात त्यांची श्रद्धा सत्यावर नसते. ती स्वत:च्या अहंकारावर असते.
- व.पु.

काथ्याकूट टाकून पुन्हा तिथे न फिरकणे असा शरदरावांचा पूर्वेतिहास नाही. तेव्हा, बहुधा कार्यबाहुल्यामुळे त्यांना फुरसद मिळाली नसावी, असे मानण्यास वाव आहे. त्यांना वेळ मिळावा आणि आतापावेतो झालेल्या चर्चेवर त्यांनी त्यांचे मत मांडावे, असे वाटते.

In reply to by सुनील

घड्याळपक्षात भांडणे सुरू आहेत. त्यामुळे शरदराव बिझी आहेत.

माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्‍याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे. महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही. आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ? मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता. धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या. हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे. जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता. मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो. आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?) शरद माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्‍याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे. महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही. आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ? मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता. धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या. हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे. जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता. मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो. आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?) शरद

In reply to by शरद

शरद यांच्या लिखाणातील सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदू हारले आणि मुस्लिम जिंकले ही वस्तुस्थिती मान्य केली आहे आणि आपल्यासमोर ठेवली आहे. प्रश्न समजून घेतला नाही तर त्यावर उपायही शोधता येणार नाही.

एक लिंक मिळाली, इथे देशासाठी काही करण्याची चढाओढ लागलेली दिसते. आजच्या काळात हे दुर्मिळ होत चाललय.

In reply to by आशु जोग

कसली लिंक देताय राव. खाली जाऊन पहा जरा किती विष ओकलय ते. हे लोक विषारीच हे आता तरी मान्य करायला प्रत्यवाय नसावा. यांना कुणी सांगितलं होतं का आर एस एस बरोबर भारतात रहायला! जायचं ना त्या पाकिस्तानात!!

नाही. ह्यात दिलेली मुस्लिमांच्या जिंकण्याची कारणे अजिबात पटली नाहीत. विचार करणे, दुसर्याबद्दल सहानुभूती असणे , पाप पुण्याची चढ असणे, समजूतदार पणा असणे हे गुण मुसाल्मानांच्यात अजिबात नाहीत. एक मुसलमान दुसर्या मुसलमानाला भाऊ मानतो कि नाही हे माहित नाही. पण जे इस्लाम ला मनात नाहीत त्यांना मारून, झोडून, कापून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे, हिंदुन्सार्ख्याच दुसर्या धर्माच्या स्त्रियांचे जबरदस्तीने मुस्लिम पुरुषांबरोबर निकाह लावून द्यायचे. हिसकावून घेणे, क्रूरतेचा कळस गाठणे, मरा किवा मारा ह्या वृत्तीने ते जिंकले आहेत. हिंदू, पारशी हे मुळातच मवाळ. ते तितका कडवा प्रतिकार करू शकले नाहीत. आणि अनेक मुस्लिम राजांना हरवल्यावर तो राजा शरण आला कि त्याला सोडून देणे हेच हिंदूंना किती वेळा नद्लय.

In reply to by उद्दाम

शक्य नाही पण त्या बद्दलचे एक उदाहरण आठवले ते सान्गतो,ही चुक छत्रपति शिवाजीमहाराजान्च्या सेनापतिने केली होती,एका मुस्लीम सरदाराला माफ केले होते,(वेडात मराठे वीर दौडले सात्),असो ही माहिती ऐकिव आहे,चु भु दे घे.

In reply to by उद्दाम

पृथ्वीराज चौहान ने महंमद घोरीला चोवीस वेळा सोडून दिले. पंचविसाव्या वेळेला जेंव्हा महंमद घोरी जिंकला तेंव्हा त्याने पृथ्वीराज चौहानचे शिरकाण केले.

In reply to by सुबोध खरे

पृथ्वीराज आणि घोरी यांच्यात दोनच लढाया झाल्या. १९९१ - घोरी हरला, त्याला पृथीराजाने जिवंत सोडले. १९९२ -- घोरीने पुन्हा हल्ला केला त्यात तो जिंकला. बाकीच्या २२ लढाया कुठल्या?

In reply to by म्हैस

नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात. हो ना? मग मुसलमानाना का शिव्या घालत बसलाय? नामस्मरण करा आणि जे घडले / घडते त्यातच आनंद मानून रहा.

आता यापुढे काय काळजी घ्यावी म्हणजे सौदी धर्माला रोखता येइल, हिंदू धर्म वाढवता येइल.

In reply to by आशु जोग

तुम्ही कोणाकडुन उत्तराची अपेक्षा करत आहात ?

धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली तेथील परिस्थितीचा,वातावरणाचा त्या त्या धर्माच्या आचार-विचार-नियम या सर्व गोष्टींवर प्रभाव पडलेला दिसतो. हिंदू धर्म हिंदू धर्माचा उगम सिंधू नदीच्या अत्यंत सुपीक अशा त्रिभुज प्रदेशात झाला,पाण्याची मुबलक उपलब्धता,समशीतोष्ण हवामान या मुळेच धर्माचरणाचे नीती-नियम या गोष्टींचा विचार करून बनवले गेले. उदा. रोजच्या रोज स्नानसंध्या झालीच पाहिजे,त्याशिवाय देवदर्शन करता येणार नाही. शेती आधारित जीवनपद्धती असे,त्यात पशुशक्तीचे महत्व अनन्य साधारण,त्यामुळेच गोमांस भक्षण करणे निषिद्ध झाले. अशा प्रकारचे नियम बनले अशी अनेक उदाहरणे आहेत. इस्लाम धर्म या धर्माचा उगम सध्याच्या सौदी अरेबिया आणि आसपासच्या परिसरात झाला. वाळवंटातील अत्यंत विषम हवामान,मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी निसर्गाशी पदोपदी लढा द्यावा लागणार, या गोष्टींचा विचार करूनच त्या धर्माचे नीती-नियम तयार केले गेले. उदा. वाळवंटात रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. प्रचंड थंडीत उब मिळविण्यासाठी ते जमिनीवर एखादा माणूस झोपला असेल तर त्याच्या जवळ जाणार, झोपेत त्या माणसाचा धक्का लागला तर प्राण वाचविण्यासाठी दंश आणि त्यातूनच मृत्यू ठरलेला. म्हणूनच इस्लाम मध्ये जमिनीवर झोपणे निषिद्ध आहे. . हिम्मतराव बाविस्कारांनी कोकणात काम करताना त्यांचा या बाबतचा अनुभव सांगितला आहे. त्यांना विंचू दंशांच्या रुग्णांमध्ये मुस्लिम धर्मियांचे प्रमाण अत्यंत कमी आढळले . त्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांना हे कारण आढळले कि गरिबातला गरीब मुसलमान पण जमिनीपासून उंच असणाऱ्या चौपाई वर झोपतो. म्हणून विंचू दंशाच्या घटना कमी असतात . गोमांस,बकर्याचे मांस भक्षण करणे. वाळवंटात अन्नाचे दुर्भिक्ष्य असते. जे मिळेल ते अन्न ग्रहण करणे आवश्यक असे. म्हणूनच धर्माने मांस भक्षण करणे धर्माचरणाशी जोडले. डुक्कराचे मांस निषिद्ध कारण डुक्कर हा प्राणी प्रामुख्याने खरकटे मानवी आरोग्यास अपायकारक अन्न खाणारा. अनुयायांमध्ये रोगराई पसरून संख्या कमी होऊ नये म्हणून डुक्कराचे मांस निषिद्ध. जुम्मे के जुम्मे नहाना कारण वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य,माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्प्राप्य तिथे अंघोळ कुठे करणार ? म्हणून फक्त(साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या)मशिदीतील नमाजा आधी स्वच्छ अंघोळ वगैरे करून नमाज पढने हे धर्माचरण ठरवले गेले. दाढी- महंमद आणि त्यांच्या अनुयायांना धर्म टिकविण्यासाठी आणि नंतर प्रसारार्थ अनेक लढाया खडतर प्रवास करावा लागला. वाळवंटात दिवसा अनेक वेळा सुमारे ५५-६० कि मी वेगाने वारे वाहतात,त्या वाऱ्या मध्ये वाळवंटातील वाळू मिसळली तर घोड्यावर व पायी प्रवास करणाऱ्या माणसाच्या चेहरा ओरबाडून काढू शकते. हे कमी करण्यासाठीच दाढी वाढविणे आणि डोक्यावर काहीतरी आच्छादन असणे हे धर्माचरणाशी जोडले गेले. खिल्ली उडविण्याचा हेतू नाही, पण मागे एका लेखात वाचले होते कि हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो. हे आक्रमक भारतात आल्यावर इतर ठिकाणी न मिळणारे स्वच्छ आणि मुबलक पाणी,(त्यामुळे मिळालेली अंघोळ) सुंदर हवामान यामुळे त्यांचा कट्टर पणा कमी झाला. आणि ते याच परिसरात स्थायिक झाले. हा दाखला अनेक जणांना पटणार नाही पण अनभव घेण्यासाठी दोन दिवस अंघोळ न करून बघा, आपल्या नकळतच आपण चीडचिडे बनतो.

In reply to by lakhu risbud

हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो. :) हिंदु धर्मातील काही लोकान्ना आंघोळीलाच काय प्यायलाही पाणी मिळत नव्हते. मग त्यांचं काय झालं? मांस खाणं हे हिंदु धर्मात नाही, असे कुणी सांगितलं? वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे. आमची परमपूज्य कुलदेवी रोज एक बकरे की काहीतरी खाते म्हणे. :)

In reply to by उद्दाम

विनोदी वाटले तरी हे पण एक महत्वाचे कारण आहे असे मला वाटते. उद्दाम शेट जरा चष्मा (काढून) का घालून ? नीट बघा कि राव गोमांस भक्षण निषिद्ध म्हंटले आहे. आणि हे नियम धर्माचा उगम ज्या ठिकाणी झाला त्या अनुषंगाने आणि त्या कालानुरूप तयार केले गेले असे मी म्हंटले आहे. हिंदू धर्माचे काही अनुयायी ज्या भूभागात राहत होते त्या ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य होऊ शकत नाही का ? जरा सारासार बुद्धी वापर ना राव,झापडबंद विचार का करता ?

In reply to by lakhu risbud

म्हणजे गोमांस खाल्ल्याने आक्रमकता येते असे आपणास सुचवायचे आहे का? कोणताही मांसाहार खाणारा आक्रमक होत असेल तर तसे हिंदूही कशा ना कशाचे मांस खातच असतात. आता तरीही तुम्ही म्हणताय की हिंदु आक्रमक नसतात. म्हणजे मग ते गोमांस खात नाहीत म्हणून आक्रमक नसतात, असा तुमच्या एकंदर कीर्तनाचा निष्कर्श निघेल, हे आपल्या लक्षात आलय का?

In reply to by उद्दाम

उगाच शब्दांचा कीस का पडत बसलाय राव ? तो शेवरीचा कापूस असतो ना लहानपणी आमाला लई मज यायची उडवायला शेवरया फोडायच्या आणि कापूस हवेत उडवायचा. फकस्त बघायला भारी वाटतय पार त्यातून काय बी मिळत न्हायी.. सगळ्या घरादारावर ती बोन्डं पडलेली असायची,दम्याचा तरास होऊ नये म्हून नंतर मोठ्यांचा मार मिळायचा तुमच बी तसच चाललंय बघा,नुस्त्या प्रतिसादाच्या शेवऱ्या उडवायच्या. तो एक जुना आय डी व्हता बघा पंगा शेट त्यांची आठवन येउन ऱ्हायली तुमचं लिकान वाचून. म्हंजी कॅपासिटी हाये,पंर ती असल्या शेवऱ्या उडवण्याच्या कामाला वापरायची.

@उद्दाम . तुम्हाला का मिरच्या झोंबल्या मुसलमानांना शिव्या घातल्या तर? तुमच्यासारखे हिंदू हे १ मुख्य कारण आहे हिंदूंच्या पराभवाचं. इतिहास आणि वर्तमान दोन्ही जाणून घ्या जरा. आज मुसलमान हिंदुस्थानातच किती डोईजड झालेत हे दिसत नाहीये का तुम्हाला? तिकडे बांगलादेश, पाकिस्तान मध्ये हिंदुंवर कर अत्याचार केले जातात हे जरा बघा. गेल्याच वर्षी बांगलादेश मध्ये ४७ हिंदू आणि २२ बौद्ध मंदिरा पाडली गेली . हि बातमी वाचली नवती का तुम्ही? परवाच आणखी १ बातमी वाचली. 'मदरशांचे अनुदान वाढवण्याची. ' यासीन भटकळ ने स्पष्ट सांगितलं , benglore मधल्या मदरशामध्ये त्याचा ब्रेन storming होवून हिंदुन्विरूढ त्याला भडकावण्यात आलं. आणि नामस्मरणाच्या विषयावर काहीही बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? ती माझी स्वाक्षरी आहे. तुम्ही मुसलमानांना अनजारात, गोंजारत बसण्यात आनंद माना न.

In reply to by म्हैस

म्हैस दीदी हिंदू वर या देशात शतकं ना शतक अन्याय झाले आहेत. तुमच्या मध्यम वर्गीय कोशा बाहेर आलात तर कळेल गाव कुसाबाहेर किती हिंदू राहले आणि त्याना पिढ्यान पिढ्या काय काय सोसावे लागले ते

In reply to by पिंपातला उंदीर

उद्गिरकर साहेब, टोला चुकिच्या ठिकाणी हाणलात,जे म्हैस यानी सान्गीतले ते त्यानाच परत काय सान्गताय ?

In reply to by म्हैस

आणि तुमचा प्रतिसाद आणि ती नामस्मरणाची स्वाक्षरी यात काही गॅप नसल्याने मला तो एकच म्याटर वाटला. :) स्वाक्षरी करताना जरा गॅप / चार डॉट्स वगैरे टाका म्हंजे लोकांचं कन्फुजन न्हाई होणार. -----

हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो. लाईच विनोदी बुवा तुम्ही

मुस्लिम भारतात 'निर्विवादपणे' न जिंकल्याचा एक तोटा तरी स्पष्ट आहे- भारताला खूप खनिज तेल आयात करावे लागते. अन्यथा अल्ला तिथे तेल या समीकरणामुळे भारतासमोर ओढवलेले ट्रेड डिफिसिट्चे प्रकरण उद्भवले नसते.

ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं झाली त्या वेळी आर्यावर्तात धर्माचा पगडा जबरदस्त होता. माझ्या office मधल्या २ मुस्लिम सहकार्यान सोबत झालेल्या चर्चेतून आणि काही पुस्तकांतून मिळालेली इस्लाम च्या शिकवणी बद्दल ची माहिती अशी: १. मनुष्य हा प्राणी जीव साखळी मध्ये सगळ्यात वरचा असल्यामुळे बाकीचे जीव हे त्याच्या सुखासाठी असतात. मनुष्याच्या सुखासाठी त्यांना त्रास झाला तर काही हरकत नसते. त्यामुळे उपवासाला सुधा मांस खाण्याची पद्धत आहे. हिंदूंमध्ये मात्र हत्या हे पाप मानलं गेलाय. अर्थात मांस भक्षण हिंदूंमध्ये सुधा चालत आलंय. पण आपल्या आनंदासाठी इतरांना क्रूरपणे वागवण हा प्रकार पुष्कळच कमी. २. इस्लाम मध्ये काफिरांचा (इस्लाम ला न मान्नार्याचा ) शिरचेद करण हा धर्माभिमान मानलं गेला आहे. मनुष्याची विनाकारण हत्या हे हिंदूंमध्ये सगळ्यात मोठं पाप मानलं गेलंय. ३. इस्लाम मध्ये पुनर्जन्म, कर्मभोग ह्या गोष्टी मनात नाहीत. एकदाच एक 'कयामत का दिन आयेगा और अल्ला सबको उनके करमो का फल देगा' असं त्यांच्यात मानण्यात आलंय. या उलट हिंदुन्च्यात 'जशी कर्म तशी फलं' हा विचार असल्यामुळे हिंदू बरेच सौम्य. ४. मेल्यावर माणसाला जिथे पुरलं जातं तिथेच त्याचा आत्मा त्या मृत शरीराला बांधून राहतो. त्या आत्म्याला फार दुखी कष्टी व्हावा लागत, असं इस्लाम चं म्हणणं हे. त्यामुळे जिवंत असेपर्यंत खा, प्या , मजा करा. इतरांच्या वेदनांची आणि दुखाची काळजी करू नका. हा विचार त्यांच्यात आहे. या उलट मेल्यावर आत्मा शरीरापासून मुक्त होतो आणि त्याचा पुढचा प्रवास हा जिवंतपणी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांवर अवलंबून असतो असं हिंदू धर्म मानतो. हिंदूंचा सौम्य पण आपण आज सुधा बघत आहोत. पाकड्यांनी कितीही खोड्या काढल्या तरी आपण निषेध खलिते पाठवण्या पलीकडे काहीही करत नाही. या उलट मुस्लिम आहेत. गेल्या महिन्यामध्ये गणपतीची वर्गणी मागायला आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिमांकडून मारहाण झाल्याची. इस्लाम राष्टांमध्ये अल्पसंख्यांक बहुसंख्यान्कांकडे नजर रोखून सुधा बघू शकत नाहीत. इथे मात्र हिंदू स्त्रियांवर मुस्लिमांकडून बलात्कार केले जात आहेत. मशीदीवर नुसता गुलाल पडला म्हणून दंगली होतात. भारताच्या राज्य घटनेचे कायदे त्यांना लागू होत नाहीत. देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.

In reply to by म्हैस

देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित. भारतात गल्लोगल्ली सुंता केंद्रे निघाली नाही तर नशीब!!

वाल्मिकी रामायण कोणी वाचलं आहे का ? त्यात खरच "वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे का?". मी खात्री करून घेईन आणि मग प्रतिक्रिया देईन. माझ्या माहितीप्रमाणे ते वनवासात असल्यामुळे फक्त फळे आणि कंदमुळे खात होते.

In reply to by म्हैस

या लिंक्स बघा. अयोध्याकांड, अध्याय ९६ वा. श्लोक क्र. १-२. http://www.valmikiramayan.net/utf8/ayodhya/sarga96/ayodhya_96_frame.htm अरण्यकांड, अध्याय ४४ वा. श्लोक क्र. २७. http://www.valmikiramayan.net/utf8/aranya/sarga44/aranya_44_frame.htm अजून बरेच उल्लेख सापडतील. ही लिंक उदाहरणादाखल पाहणे. http://hindtoday.com/Blogs/ViewBlogsV2.aspx?HTAdvtId=1488&HTAdvtPlaceCo… यात दिलेले उल्लेख क्रॉस-चेक करायचे असतील तर रामायण अख्खे नेटवर ट्रान्स्लेटेड मिळेल. ती लिंक इथे. http://www.valmikiramayan.net/ सातही कांडे आहेत. कांड, अध्याय क्र. आणि श्लोक क्र. वरच्या लिंकमधले पाहून आरामात चेकवता येईल. हरीण मारून खाल्ल्याचे कितीतरी उल्लेख आहेत.

In reply to by बॅटमॅन

=)) अजून बघ अयोध्याकांड सर्ग ५२ श्लोक ८९ सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च । यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता || अरण्यकांड सर्ग ४७ श्लोक २२-२३ विचराम द्विजश्रेष्ठ वनं गम्भीरमोजसा । समाश्वस मुहुर्तं तु शक्यं वस्तुमिह त्वया ||२२|| आगमिष्यति मे भर्ता वन्यमादाय पुष्कलम् । रुरून् गोधान् वराहांश्च हत्वाऽऽदायामिषं बहु ॥ २३ ॥