असणे नसणे
जगण्यात उगिच सजते असणे
अक्षरांत झिंगवते नसणे
असणे नसणे ओसांडे मन
हसण्यात सदा किण किण श्रावण
आभास सदा पथदूर कुठे
शोधासा कठिण पडते कोडे
मेघावळ पिंजुन एकांती
धड धड करते काळिज वेडे
आकाश; खोल पोकळ वासा
आवेग; न ठावे थांग जसा
पवनासाहि ना कळलेले हे
वाहतो सवे निशिगंध कसा
………………… अज्ञात
पावना के पवना?
"पवना" च हवे. पण पला इथे
केल्या गेल्या आहे.
हे कस झालं मला माहित नाही.
नेहमीसारखी
असाही प्रतिसाद मिळाला तरी
+१
+१ मिका
अक्षरांत शिंगवते
अक्षरांत शिंगवतेहे समजण्याची वाट पाहते आहे.हो,
खरं तर ते "झिंगवते" असं आहे
दुरुस्ती केली
"शोधासा" ऐवजी "शोधास" असे