✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

ध
धर्मराजमुटके यांनी
Tue, 08/20/2013 - 09:48  ·  लेख
लेख
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52213 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

अत्यंत शरमेची आणि दुखःदायक

यशोधरा
Tue, 08/20/2013 - 09:54 नवीन
अत्यंत शरमेची आणि दुखःदायक आणि तितकीच संतापजनक घटना आहे. >>महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे >> +१ ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.
  • Log in or register to post comments

सहा महिने झाले म्हणून

शशिकांत ओक
Mon, 02/24/2014 - 01:06 नवीन
मारेकऱ्यांचा पत्ता? एक प्रतिक्रिया सहा महिने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

स्पा
Tue, 08/20/2013 - 09:57 नवीन
:(
  • Log in or register to post comments

अत्यंत वाईट बातमी !

मदनबाण
Tue, 08/20/2013 - 09:57 नवीन
अत्यंत वाईट बातमी ! :( ‘कालनिर्णयकार`जयंत साळगावकर यांचं देखील आज निधन झाले आहे. :(
  • Log in or register to post comments

'अंनिस" कार श्री. नरेन्द्र

मृगनयनी
Tue, 08/20/2013 - 11:56 नवीन
'अंनिस" कार श्री. नरेन्द्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली... 'कालनिर्णय' कार श्री. जयन्त सांळगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली... एक -महान ज्योतिष-अभ्यासक जयन्त साळगांवकर आणि दुसरे महान ज्योतिष विरोधक- नरेन्द्र दाभोळकर... यांचा दुर्दैवी मृत्यू एकाच दिवशी व्हावा.. हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!! .... ~*~*~*~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

काहिही

दादा कोंडके
Tue, 08/20/2013 - 12:12 नवीन
हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!!
डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि साळगावकरांचा नैसर्गिक मृत्यु झाला आहे. ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ज्योतिषवाल्या आणि बापू

मृगनयनी
Tue, 08/20/2013 - 12:24 नवीन
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या. कृपया.. धाग्याचे गाम्भीर्य पाळावे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

+१११

अनिरुद्ध प
Tue, 08/20/2013 - 13:22 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+१

पिशी अबोली
Tue, 08/20/2013 - 14:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ज्योतिषवाल्या आणि बापू

प्रसाद१९७१
Tue, 08/20/2013 - 14:57 नवीन
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ज्योतिषवाल्या आणि बापू

जॅक डनियल्स
Tue, 08/20/2013 - 22:38 नवीन
ज्योतिषवाल्या आणि बापू-अम्मावाल्या मंडळींना खरोखरच डॉ दाभोळकरांना आदरांजली वाहायची असेल तर त्यांच्या गुरूंचे फोटो आणि स्वतःच्या पत्रिका जाळून टाकाव्या.
आणि ती राख पण फेकून द्यावी -अंगारा म्हणून वापरू नये. राख म्हणजे सिलिका-आलुमिना-लोह -काल्शीयम -अमोर्फस पदार्थांचे मिश्रण असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

संतो, कर्म कि गती न्यारी

सुबोध खरे
Tue, 08/20/2013 - 23:38 नवीन
संतो, कर्म कि गती न्यारी मूरख को तुम राज दियत हो पंडित फिरत भिखारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

संतो, कर्म कि गती न्यारी

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 13:15 नवीन
संतो, कर्म कि गती न्यारी मूरख को तुम राज दियत हो पंडित फिरत भिखारी
:) :) सहमत आणि धन्यवाद सुबोध'जी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्रद्धांजली.

प्रभाकर पेठकर
Tue, 08/20/2013 - 10:03 नवीन
दोनही मृतात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

+१

भावना कल्लोळ
Tue, 08/20/2013 - 14:12 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धक्कादायक, संतापजनक, असहिष्णू

पिंपातला उंदीर
Tue, 08/20/2013 - 10:05 नवीन
धक्कादायक, संतापजनक, असहिष्णू, भ्याड
  • Log in or register to post comments

दोनही मृतात्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली.

सुबोध खरे
Tue, 08/20/2013 - 10:05 नवीन
महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रचेतस
Tue, 08/20/2013 - 10:05 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

बाप रे

सौंदाळा
Tue, 08/20/2013 - 10:07 नवीन
आता बदल घडवणारी समाजसेवा करताना विचार करायला लागेल. काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम :( हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडुन कडक शिक्षा व्हावी. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली. अंधश्रद्धेविरुद्धचा लढा पोरका झाला.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात आज जे काही

शिवोऽहम्
Tue, 08/20/2013 - 10:09 नवीन
:( महाराष्ट्रात आज जे काही चालल्रे आहे, विचारांचा प्रतिवाद लाठ्या-काठ्या किंवा गोळ्यांनी देण्याचा जो पायंडा पडतो आहे त्याबद्दल काय बोलायचं? राजा कालस्य कारणम् हेच खरंय.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

उपाशी बोका
Tue, 08/20/2013 - 10:14 नवीन
एकदम धक्कादायक बातमी.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्राचे दोन दिग्गज

अमोल केळकर
Tue, 08/20/2013 - 10:15 नवीन
महाराष्ट्राचे दोन दिग्गज व्यक्तीमत्व श्री जयंत साळगावकर आणि डॉ नरेंद्र दाभोळकर या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली. ज्या भ्याड पध्दतीने डॉ नरेंद्र दाभोळकरांवर पुण्यात हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध
  • Log in or register to post comments

दुर्दैवी घटना!

नानबा
Tue, 08/20/2013 - 10:22 नवीन
दुर्दैवी घटना! डॉ. दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि गुन्हेगार लवकर पकडले जातील एवढीच (माफक) अपेक्षा.
  • Log in or register to post comments

बापरे!

दादा कोंडके
Tue, 08/20/2013 - 10:35 नवीन
डॉ दाभोळकरांना आदरांजली. खूनी पकडले जातील कदाचित पण खरे गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताच नाही.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रध्दांजली!

पांथस्थ
Tue, 08/20/2013 - 11:08 नवीन
खूनी पकडले जातील कदाचित पण खरे गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताच नाही.
पुर्ण पणे सहमत! कर्ते करविते बाजुलाच राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

वाईट वाईट वाईट!

हुप्प्या
Tue, 08/20/2013 - 10:43 नवीन
एका बुद्धीमान, बुद्धीवादी विचारवंताची अशी हत्या होणे लाजिरवाणे आहे. ह्या माणसाचे स्वच्छ, तर्कशुद्ध विचार ऐकणे हा एक आनन्ददायक अनुभव होता. त्यांच्या ध्येयवादी अन्धश्रद्धाविरोधी चळवळीबद्दल मला आदर आहे. बाबा आमटे, पु.ल. देशपांडे ह्यांच्या पंक्तीतला हा माणूस. माझ्या महाराष्ट्रात असे काही होते आहे हे अजूनही खरे वाटत नाही. हे एक दु:स्वप्न असावे अशी आशा. माझी ह्या थोर माणसाला श्रद्धांजली. असे शेकडो, हजारो दाभोळकर पुन्हा निर्माण होवोत. आणि ह्या निंद्य कृत्यामागे असणार्‍या सगळ्यांना फाशी होवो.
  • Log in or register to post comments

काय बोलणार .....

चौकटराजा
Tue, 08/20/2013 - 10:43 नवीन
म्हाराष्ट्र गाडगे बाबांचा आहे, फुल्यांचा आहे, आंबेडकरांचा आहे, तुकोबांचा आहे, शाहू महाराजांचा आहे, ज्ञानदेवांचा आहे मग अशा महान परंपरा असलेल्या म्हाराष्ट्रात लोकाना अशी अवदसा का आठवते ? की वरील सगळी थोर मंडळी फक्त पुतळे उभारण्यासाठी आपण वापरीत आहोत ?
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/20/2013 - 10:46 नवीन
दाभोळकरांसारख्या व्यक्तीमत्वाचा अशा प्रकारे झालेला अंत मनाला क्लेश देउन गेला. पाशवी आणि विकृत मनोवृतीचे लोकच अशा प्रकारचे कृत्य करु शकतात. या हत्येचा निषेध करण्यापलिकडे आपण काहीच करु शकत नाही याचा खेद होतो आहे. दाभोळकरांना भावपुर्ण श्रध्दांजली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

दोघांनाही भावपूर्ण

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/20/2013 - 11:03 नवीन
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. विचार जुळत / आवडत नाहीत म्हणून अशी ह्त्या करणे हे भ्याडपणाचे आणि समाजाच्या प्रकृतीबद्दलच्या चिंतेचे कारण आहे !
  • Log in or register to post comments

`हत्या व्यक्तीची होऊ शकते, विचारांची नाही'

संजय क्षीरसागर
Tue, 08/20/2013 - 11:06 नवीन
हे अज्ञानी लोकांना कळेल तो सुदिन Image removed. दाभोळकर अत्यंत महत्त्वाचं काम करत होते. ते कार्य पुढे जावं यासाठी त्यांनी कार्यकर्ते निर्माण केलेत. घटना केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाच्या मानसिकतेला लज्जास्पद ठरावी अशी आहे. मृत्यू तर सर्वांनाच आहे. दाभोळकरांचा मृत्यू त्यांच्या कार्याला झळाळी देवो आणि `हत्या करावी' इतका हा प्रभावी विचार काय होता? याचा जनमानसाला विचार करायला प्रवृत्त करो, या आशेनं विनम्र श्रद्धांजली वाहतो.
  • Log in or register to post comments

+१

अवतार
Tue, 08/20/2013 - 11:35 नवीन
जी व्यवस्था टिकवण्यासाठी शस्त्रांचा वापर करून दडपशाही करावी लागते ती व्यवस्था नष्ट होण्याची सुरुवात झालेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमत.

शिवोऽहम्
Tue, 08/20/2013 - 12:19 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

निशस्त्र आणि बुद्धिवादी

मालोजीराव
Tue, 08/20/2013 - 11:07 नवीन
निशस्त्र आणि बुद्धिवादी व्यक्तीवर केलेला भ्याड हल्ला…जे कोण याच्या मागे असेल त्याची बौद्धिक पातळी किती खालची असेल याचा अंदाज येतो
  • Log in or register to post comments

हे खरंच घडतंय?

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/20/2013 - 11:10 नवीन
हे खरंच घडतंय?
  • Log in or register to post comments

विचाराचा प्रतिवाद..

लाल टोपी
Tue, 08/20/2013 - 11:21 नवीन
विचाराचा प्रतिवाद विचाराने केला गेला पाहिजे विरोधी आवाज अशा प्रकारे चिरडून टाकाणा-या प्रवृत्त्ती आजकाल बोकाळ्त आहेत. ऋषीतुल्य डॉ.दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा करावा तेवढा विरोध कमी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

अतिशय शरमेची बाब

मृत्युन्जय
Tue, 08/20/2013 - 11:28 नवीन
अतिशय शरमेची बाब महाराष्ट्रासाठी. हल्ला आणि हत्या कोणी केली असेल सर्वांनाच माहिती असेल पण बोलणार कोणीच नाही हे अजुन एक दुर्दैव. बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्‍या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. किडे पडुन मरतील त्यांचे मारेकरी आणि त्यांचे कर्ते करविते एवढाच शाप देउ शकतो.
  • Log in or register to post comments

अतीशय सुन्न करणारी घटना!!!!

खटपट्या
Tue, 08/20/2013 - 11:30 नवीन
अतीशय सुन्न करणारी घटना!!!! काही सूचत नाहीये.....
  • Log in or register to post comments

फारच वाईट..

गवि
Tue, 08/20/2013 - 11:40 नवीन
फारच वाईट.. नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं. पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे. पण तरीही इतका काळ कोणत्याही भीतीखेरीज सर्वत्र संचार करणार्‍या व्यक्तीचा असा अंत होण्याने कोणत्याही चळवळीच्या कार्यकर्त्यांमधे दहशतीचं वातावरण तयार झालं तर ते जास्त दुर्दैवी ठरेल. पोलीस तरी कोणाकोणाला संरक्षण देणार?
  • Log in or register to post comments

सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला

धर्मराजमुटके
Tue, 08/20/2013 - 12:43 नवीन
गवि, तुमचं म्हणणं पटतयं पण महाराष्ट्रात अशा घटना दखल घेण्याजोगत्या प्रमाणात वाढत आहे. बुद्धीजीवी वर्ग अशा प्रकारच्या घटनांचा विरोध यशस्वीपणे करु शकत नाही. आपण करत आहोत तो केवळ वांझोटा विरोध आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ सरकारच नव्हे तर सामान्य जनता काय करु शकेल या शक्यतेचा विचार या करायची वेळ आली आहे. विशेषतः पुणे जे विचारवंतांसाठी आणि विद्येसाठी नावाजलेले आहे तिथे अशा घटना घडणे जास्त दु:ख देऊन जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हम्म...

दादा कोंडके
Tue, 08/20/2013 - 14:02 नवीन
नेमकी काय उद्देशाने हत्या झाली असावी हे समजायला वेळ लागेल. केवळ वैचारिक विरोधातून झाली असेल हे मानायला कठीण वाटतं.
मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?
पण कोणीतरी मारेकरी घातले म्हणजे सगळा महाराष्ट्र प्रतिगामी झाला किंवा त्यांच्या विचारांचा पराभव झाला असे नव्हे.
एखाद्या गोष्टीची एक समाज म्हणून जबाबदारी घेणार आहोत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मग काय चोरीच्या उद्देशाने

गवि
Tue, 08/20/2013 - 14:19 नवीन
मग काय चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असेल काय?
नव्हे. वैचारिक विरोधामुळे (तात्विक कारणाने) हत्या झाली असावी हे पटत नाही याचा अर्थ एकदम चोरीचा उद्देश असं का वाटावं. उलट यामधे असा अर्थ होता की या अंधश्रद्धा-आधारित व्यवसायांचं जाळं इतकं पसरलं असावं आणि त्यातलं अर्थकारण इतकं मोठं आणि कदाचित संघटितही असावं की अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार. यात दहशत बसवण्याचाही उद्देश असू शकतो. त्यामुळे आणखीनच मानसिक हानी होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

.

दादा कोंडके
Tue, 08/20/2013 - 14:35 नवीन
हम्म.
अंनिससारख्या संस्थांच्या कार्य आणि मागण्यांमुळे कुठेतरी त्यातले आर्थिक आदि हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव त्या क्षेत्राला होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असणार.
एव्हडा थेट संबंध लाउन भर दिवसा डोक्यात गोळ्या घालायला ते अंडरवर्ल्ड मधल्या कुठल्या ग्यांग मध्ये काम करत नव्हते. त्यामुळे हत्या निसंशय वैचारिक विरोधातूनच झाली आहे. आता तो खून कुण्या अम्मा-बापूच्या लोकांनी केलाय, कुण्या जोतिषाने केलाय की कुण्या वारकर्‍यानं ते पोलिस शोधून काढणार नाहितच. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पोलीस शोध लावतील की नाही

बॅटमॅन
Tue, 08/20/2013 - 14:40 नवीन
पोलीस शोध लावतील की नाही-बहुतेक नाहीच-हा भाग अलाहिदा. पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ह्या खूनाचा शोध नक्कीच लागणार

प्रसाद१९७१
Tue, 08/20/2013 - 14:53 नवीन
ह्या खूनाचा शोध नक्कीच लागणार नाही. एखाद्या पाकिटमाराला पकडून न्यायालयात उभे करतील जास्तित जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

क्लिंटन
Tue, 08/20/2013 - 22:39 नवीन
पण वैचारिक विरोध असेल तर इतकी वर्षे काही नाही आणि आत्ताच काय झालं एकदम? आर्थिक हितसंबंध आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयक हेच कारण सयुक्तिक वाटते.
+१. दाभोळकरांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हांगाश्शी...

वाटाड्या...
Tue, 08/20/2013 - 22:29 नवीन
आता कसं बोल्ला गविभाऊ... हे सगळं एका अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. कोणाच्या विचारांनी लोकांना बदलायचं असतं तर हा बापु नी तो बुवा/अम्मा/राम कडं लोक कशाला जातील. जो कोणी ही अर्थव्यवस्था बदलायला जाईल तोच रसातळाला जाईल ह्याची समाजानी पुर्ण सोय केलेली असते. सध्या त्या पुट्ट्पुर्थीची अवस्था बघायला गेलात तर कळेल. मुख्य माणुस नाही म्हण्ल्यावर अर्थव्यवस्था कोलमडली पण ते नैसर्गीक कारण आहे. मुख्य माणुस असतानां जा बरं, मग कळेल काय खरं आहे ते. उगाच नाही त्या अर्थव्यवस्थेचे सो कॉल्ड सैनीक हल्ला करत. कुठे तुकोबांचा/नाथमहारांजाचा वारसासमाज नी कसलं काय? रामदासकाकांनी एका लेखात सांगीतल्याप्रमाणे हे होतच राहणार आणि समाज पुढे जातच राहणार. फक्त मागच्या पिढीतील फ्रॉडस्टरपेक्षा पुढच्या पिढीतला फ्रॉडस्टर अर्थव्यवस्थेची आणि पर्यायाने ती टिकवण्याची पुढची पायरी गाठणार हेच अंतीम सत्य. आत्मा मृत होत नाही. शरीर मॄत होत असतं, म्हणुन मॄतात्म्यास म्हणणार नाही पण सुटलेल्या आत्म्यांस सदगती लाभो एवढेच.. - वाट्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे बघा...

दादा कोंडके
गुरुवार, 08/22/2013 - 18:48 नवीन
मा. मुखमंत्रीच म्हणतायत.
दाभोलकरांवर कोणत्याही राजकीय पक्षांनी हल्ला केला नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, हा वैचारिक मतभेदाचा विषय आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते नक्कीच राजकीय पक्ष नाहीत. जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मांडले जाऊ नये आणि ते मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच दाभोलकरांचा आवाज कायमचा बंद केला. अशा प्रकारचे हल्ले करणाऱया संघटनांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

पिशी अबोली
Tue, 08/20/2013 - 14:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आज सकाळीच बातमी समजली आणि

कोमल
Tue, 08/20/2013 - 11:45 नवीन
आज सकाळीच बातमी समजली आणि हादरलेच.. ऑफिसातल्या सहकर्मचार्‍याने विचारलं, "काय झालं?" मी, "अरे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली." तो, "सो सॉरी, नात्यातले होते का?" मी अजूनच सुन्न.. :(
  • Log in or register to post comments

कोमल,

यशोधरा
Tue, 08/20/2013 - 11:55 नवीन
आमच्याकडे तीच परिस्थिती आहे ऑफिसमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा