मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

श्रीगुरुजी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू) त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला. गांगुलीच्या संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, युवराज, कपिल देव, रविंद्र जडेजा, अनिल कुंबळे, श्रीनाथ, झहीर खान, द्रविड (१२ वा खेळाडू) आश्चर्य म्हणजे कपिलने आपल्या संघात स्वतःचा किंवा १९८३ चा विश्वचषक जिंकणार्‍या संघातील एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही. गांगुलीने स्वतःच्या संघात स्वतःचा व कपिलचा समावेश केलेला आहे. हे दोन्ही संघ मला फारसा पटलेले नाही. माझ्या मते अझरूद्दीन किंवा गांगुली सर्वोत्तम संघात येऊ शकत नाहीत. गांगुलीचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले नव्हते. त्याचे रनिंग बिटवीन द विकेट्स देखील खराब होते. अझरूद्दीनचे क्षेत्ररक्षण जबरदस्त असले तरी त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी करणारे अनेक खेळाडू आहेत. द्रविड देखील एकदिवसीय संघात योग्य वाटत नाही. कपिलच्या संघातील सर्वजण २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात खेळत होते. काही जण अजूनही संघात आहेत. विशेषतः २००४ नंतर खेळणार्‍या फलंदाजांना सर्व नवीन नियमांचा फायदा मिळून फलंदाजीत जास्त धावा व त्यासुद्धा वेगाने करता आल्या. १९८३ मधील खेळाडूंना नोबॉलवरची फ्री हिट, २० षटकांचा पॉवर प्ले व त्यामुळे क्षेत्ररक्षकांवर असलेली बंधने, नोबॉलवरील एक्स्ट्रॉ धाव इ. फलंदाजाला अनुकूल असलेले नियम अस्तित्वात नव्हते. तरीसुद्धा श्रीकांत, कपिल इ. फलंदाज तुफान वेगाने हाणामारी करत असत. त्यामुळेच १९८३ मधील एकही खेळाडू या संघात नसावा याचे आश्चर्य वाटते. माझ्या दृष्टीने भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघ असा असावा. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), के श्रीकांत, सचिन, सेहवाग, मोहिंदर अमरनाथ, कोहली, युवराज सिंग, कपिल देव, झहीर खान, हरभजन, श्रीनाथ

वाचने 6680 वाचनखूण प्रतिक्रिया 44

शैलेश नरेन्द्र 18/08/2013 - 11:53
रविद्र जदेजा सध्या चान्गलि अश्तपैलु कामगिरि करतो आहे

आदूबाळ 18/08/2013 - 12:12
सर्वोत्तम संघात धोनी कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून निवडला जाऊ शकतो. पण त्याला सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणणं जरा जास्तच होतंय. तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. सय्यद किरमाणी किंवा नयन मोंगिया यांची निवड होऊ शकते.

श्रीगुरुजी 18/08/2013 - 14:05
>>> तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. भारताला मिळालेला गेल्या १५-२० वर्षांतला तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. लेगसाईडला पडलेल्या चेंडूवर फलंदाजाला क्षणार्धात यष्टीचित करण्याचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. किरमाणी हा त्याच्याइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा काहीसा सरक यष्टीरक्षक असला तरी यष्टीरक्षणाच्या बरोबरीने तडाखेबंद फलंदाजी, मॅच फिनिशर व शांत डोक्याचा कर्णधार या गुणांमुळे तो किरमाणीपेक्षा खूपच सरस ठरतो.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 19/08/2013 - 12:53
>> पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. आपल्या ज्ञानाचा प्रत्यय आला ..निर्वाण प्राप्त झाले आहे

In reply to by श्रीगुरुजी

किसन शिंदे 19/08/2013 - 20:55
सय्यद किरमाणीची किपींग पाहिली नाहीये, पण काही जुन्या विडीओत पाहता तो चांगली किपींग करायचा. मला वाटतं त्याच्यानंतर नयन मोंगियाच सर्वोत्तम विकेट किपर आहे. आणि त्याखालोखाल धोन्या. कुंबळेचा उसळलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला थोडासा चुकून जेव्हा त्याच्या हातात विसावायचा तेव्हा त्याचा ठरलेला शब्द, आई ग्गं!! नंतर नंतर तो एवढा पाठ झाला की असा चेंडू हुकल्यानंतर मोंगियाच्या आधी आम्हीच आई ग्गं म्हणून ओरडत असू. :)

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 20/08/2013 - 03:36
गुरूजी, तो समीर दिघे :) चेन्नई ला २००१ मधे निर्णायक वेळी चांगले खेळून हरभजन च्या मदतीने भारताला मालिका जिंकून देण्यात हातभार लावला होता त्याने. तुम्हाला बहुधा लक्षात असेलच. दादा ने ही मग शब्द पाळला व त्याला पुढे दोन सिरीज प्राधान्य दिले होते. बाकी 'दादा' हा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूंपैकी समजला जातो. तो जेव्हा खेळायचा तेव्हा कोणाच्याही संघात बसेल असाच होता. स्लिप किंवा थर्ड मॅन ला उभे राहून कप्तानगिरीच मुख्य करायची असल्याने त्याची फिल्डिंग लपून जात असे. मात्र आउटफील्ड कॅचिंग त्याचे एकदम रिलायेबल होते.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:27
बरोब्बर. तो समीर दिघे. नावात जरा घोटाळा झाला. २००१ च्या ऑस्ट्रेलियाविरीद्धच्या हरभजन फेम मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसर्‍या कसोटीत ५ व्या दिवशी भारत विजयासाठी १६० च्या आसपास माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ८ बाद १४० च्या आसपास होती. त्यावेळी समीर दिघेने ३-४ चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. तो एकमेव डाव सोडला तर समीर दिघेची कामगिरी व यष्टीरक्षण यथातथाच होते.

प्रसाद गोडबोले 18/08/2013 - 15:48
गांगुली संघात असलाच पाहिजे ...कारण तो आउट झाल्यावर बंगाली लोकांचे चेहरे आणि एक्स्पेशन्स पाहण्यासारखे असतात ;) =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 19/08/2013 - 14:53
हॅ हॅ हॅ अगदी अगदी =)) गांग्याच्या क्षमतेबद्दल दुमत नै पण हे बोंगबोंधू आवरेन्द्र होतात एकदम तेव्हा =))

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगुरुजी 18/08/2013 - 21:00
गावसकर हा कसोटी क्रिकेटच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण तो एकदिवसीय क्रिकेटसाठी फारसा उपयुक्त नाही.

नानबा 19/08/2013 - 11:45
सार्वकालीन सर्वोत्तम १२ भारतीय खेळाडू म्हणतात आणि मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी, रवि शास्त्री, सुनिल गावस्कर, असे खेळाडू वगळून जडेजा आणि कोहलीला घ्यावं?? मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू)

श्रीगुरुजी 19/08/2013 - 12:34
>>> मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू) युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! बेदी आणि गावसकर एकदिवसीय संघात अजिबात योग्य वाटत नाहीत. रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता. आपल्या अत्यंत संथ व रटाळ फलंदाजीने व सामान्य गोलंदाजीने त्याने अनेक सामने घालविलेले आहेत. तो केवळ स्वतःसाठी खेळणारा स्वार्थी खेळाडू होता. कितीही चेंडू वाया गेले तरी चालतील, कितीही कमी धावा झाल्या तरी चालतील पण मी विकेट घालविणार नाही अशा मनोभूमिकेतून तो खेळत होता. १९९२ विश्वचषकात त्यांच्या संथ खेळीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरल्यानंतर भारतीय प्रेक्षकांचा संताप अनावर होऊन शेवटी त्यांच्या दडपणामुळे त्याला संघातून वगळावे लागले होते. १९९३ मध्ये त्याच्या कसोटीतल्या संथ खेळामुळेच (सामना जिंकायचा असताना त्याने २०० मिनिटे खेळून नाबाद २३ धावा केल्या होत्या) त्याची कायमस्वरूपी हकालपट्टी झाली होती. असा खेळाडू भारताच्या कोणत्याही काळातील कोणत्याही संघात असू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा 19/08/2013 - 13:56
रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता.
हा शास्त्र्या जेवढा भारी समालोचक आहे तेवढाच भिकार खेळाडू होता :D

कपिलमुनी 19/08/2013 - 13:00
>>युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! >>अजिबात योग्य वाटत नाहीत. >>अत्यंत भिकार खेळाडू होता >>कोणत्याही संघात असू शकत नाही कपिल ला वाटले त्याने घेतले ...त्याच्यावर टीका करणारा धागा काढण्यापेक्षा , आणि हा कशाला , तो घ्यायला पहिजे होता ..असा लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वत:ची सार्वकालिक टीम का नाही जाहीर करत ..त्यावर आपण चर्चा करू

स्पा 19/08/2013 - 14:40
आमचा बी एक संघ सद्गोपन रमेश , आकाश चोपडा, अशिश कपूर ,दीप दासगुप्ता ,रवि शास्त्री ,विक्रम राठोड ,सबा कर्रिम, दोड्डा गणेश ,सलील अंकोला, देवाशिष मोहंती , मुनाफ पटेल, श्रीसंत (१२वा )

In reply to by स्पा

बॅटमॅन 19/08/2013 - 14:52
संघातील खेळाडू आणि आपली स्वाक्षरी हे पाहता निर्वाणच मिळणार की हो एकदम =)) =)) बाकी त्या यादीत अ‍ॅबे कुरुविलाचे नाव नसल्याबद्दल जोर्दार णिषेढ!

In reply to by स्पा

आदूबाळ 19/08/2013 - 15:15
सद्गोपन रमेश ऐवजी देवांग गांधी या (अहिंसक) फलंदाजाची भर्ती व्हावी ही णम्र विणंती. इतर काही प्रस्ताव: गगन खोडा अ‍ॅबी कुरुविला अमेय खुरासिया हरविंदर सिंग (जु)

In reply to by घाटावरचे भट

चावटमेला 20/08/2013 - 13:10
आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय हो पाप केलंय?
जे ब्बात!! गेले दोन दिवस ह्य गोलंदाजाच्या कर्दनकाळाचे नाव आठवत होतो. काही केल्या आठवतच नव्हते ;)

चावटमेला 19/08/2013 - 15:34
डेविड जॉन्सन टीनू योहानन विजय भारद्वाज टी कुमारन निखिल चोप्रा जेकब मार्टिन एम एस के प्रसाद अजय शर्मा रॉबिन सिंग (ज्यु) जे पी यादव निलेश कुलकर्णी

In reply to by चावटमेला

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 19/08/2013 - 18:30
आमच्या पुण्याच्या ऋषिकेशराव कानिटकरसाहेब यांना विसरलात वाटतं.. आघाडीच्या फलंदाजांमधे आमचा आवडता वुर्केरी रमण नसल्यामुळे अंमळ निराशा झाली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

फारएन्ड 20/08/2013 - 03:43
कानिटकर व वरचे नग यांत थोडा फरक आहे. हे बाकीचे लोक रणजी, दुलीप मधेही फारसे चालले नाहीत. ऋषिकेश कानिटकर ने तळागाळातील राजस्थान च्या रणजी संघास सलग दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. आकाश चोप्राची यावर दोन पुस्तके आहेत, त्यातील एक मी वाचले आहे. नक्कीच वाचनीय आहे. माझ्या मते तो (वन डे) संघात निवडला जाण्याएवढा चांगला नसेल कदाचित (पण १९९८ च्या ढाका फायनल मधे शेवटच्या ओव्हरला चौकार मारून भारताला ३१६ चेस करतान जिंकून देणे एवढी कामगिरी आहे त्याच्या खात्यात. किमान त्याने तरी तो वरच्या लोकांपेक्षा वेगळा आहे), पण या वाईट संघात असण्याएवढाही वाईट नव्हता. तो प्रामुख्याने अझर व सचिन च्या कप्तानपदाच्या वेळेस खेळला. गांगुली च्या वेळेस असता तर त्याला सलग काही सामने त्याने नक्कीच देऊन पूण संधी दिली असती (जशी विनोद कांबळी, दिनेश मोंगिया ई. ना त्याने दिली)

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:33
तो सामना अजून आठवतो. पाकड्यांनी ४८ षटकात ३१२ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ६.५० हून अधिक धावगती हवी होती. सचिन व गांगुलीने जबरदस्त सलामी दिली. सचिन २६ चेंडूत ४१ धावा करून बाद झाल्यावर अचानक रॉबिन सिंग ३ र्‍या क्रमांकावर आला. त्याने ८३ चेंडूत ८२ धावा केल्या व दुसरीकडे गांगुलीने १२५ धावा केल्या. एक वेळ भारताची धावसंख्या १४ षटकात १ बाद १२५ इतकी जबरदस्त होती. नंतर रॉबिन सिंग बाद झाल्यावर डाव कोसळायला सुरूवात झाली. अझरूद्दिन शून्यावर गेला. शेवटी ९ बाद झाले होते व शेवटच्या ३ चेंडूत ४ धावा हव्या असताना कानिटकरने गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या डोक्यावरून चौकार मारून भारताला सामना जिंकून दिला. त्याने नाबाद १७ धावा केल्या. शेवटची ५-६ षटके भारत अक्षरश: अंधारात खेळला. सूर्यास्तानंतर संधिप्रकाशात चेंडू नीट दिसत नव्हता. सामना अंधुक प्रकाशामुळे थांबविण्याचा पंच विचार करत होते. तसे झाले असते तर सरस धावगतीच्या जोरावर पाकडे जिंकले असते. पण विजयाची चाहूल लागलेल्या भारताने सामना चालू ठेवण्याचा आग्रह धरला व अक्षरशः जवळपास अंधार पडलेला असताना शेवटची ३-४ षटके खेळून सामना जिंकला.

श्रीगुरुजी 19/08/2013 - 20:39
अरेरे! इथे सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघाऐवजी सर्वकालीन सर्वात टुकार संघाविषयी प्रतिसाद येताहेत. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघ निवडणे तुलनेने सोपे आहे. पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.
श्री गुरुजी होऊन जौद्या मग :)

In reply to by स्पा

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:36
सर्वाधिक टुकार ११ खेळाडू निवडायचे तर ज्यांनी किमान २५-३० कसोटी व ५०-६० एकदिवसीय सामने खेळले आहेत अशाच नगांचा विचार करावा लागेल. १-२ सामने खेळून गेलेल्यांचा विचार करणे योग्य नाही. या दृष्टीने टुकार संघाचा कर्णधार म्हणून मला रवि शास्त्री योग्य वाटतो. बैलासारखी गोलंदाजी टाकणारा इशांत शर्मासुद्धा या संघात फिट बसेल. अजून ९ नावे शोधावी लागतील.
सुनील वॉल्सन कोणाला आठवतो आहे का..?? १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू. पण हा बिचारा विश्वचषकात एकही मॅच खेळला नाही व नंतर कोणत्याही मालिकेत याची निवड झाली नाही - त्यामुळे एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळता करीयर संपलेल्या या खेळाडूला आपले म्हणा. ;-)

आदिजोशी 20/08/2013 - 14:50
१. धम्या २. डाण्या ३. आंद्या ४. अभ्या ५. टारबा ६. बिका ७. किसनदेव ८. झेलेअण्णा ९. पराशेठ १० अबब आणि ११. आम्ही स्वतः ह्यातला प्रत्येकजण ऑलराउंडर असल्याने बॅटिंग, बोलिंग, विकेटकिपिंग आणी वेळ पडल्यास अंपायरींगही करू शकतो. पुन्हा, इथे प्रत्येकाचा स्वतःचा झेंडा असल्याने प्रत्येकजण कर्णधार म्हणूनच वावरेल. एका संघात ११ खेळाडुंचे ११ मायक्रो संघ अशी भन्नाट टीम असल्यावर कोणाची बिशाद आहे आम्हाला हरवायची?

In reply to by किसन शिंदे

स्पा 21/08/2013 - 11:35
संजय क्षीरसागर (कप्तान) चेसुगु लीलाधर अतृप्त आत्मा स्पा (यष्टीरक्षक) गणेशा प्रकाश १११ पैसा (३३% आरक्षण अंतर्गत) लीमौ (३३% आरक्षण अंतर्गत) अपर्णा अक्षय (३३% आरक्षण अंतर्गत) इंटरनेट स्नेही ब्याटम्यान (१२ वा )

In reply to by स्पा

कपिलमुनी 21/08/2013 - 12:29
हे स्वयंभू आहेत .. ते स्वतच बॉल टाकतात , स्वतः मारतात ..स्वतः कॅच झेलतात .. आणि नेहमी(च) जिंकतात

In reply to by स्पा

पैसा 24/08/2013 - 17:19
आम्ही ३३% मधे काय! हम जहाँ खडे हय लाईन वहीं से शुरू होती हय. करू का तुला रिटायर्ड हर्ट??