भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू)
त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला. गांगुलीच्या संघात खालील खेळाडू आहेत.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, युवराज, कपिल देव, रविंद्र जडेजा, अनिल कुंबळे, श्रीनाथ, झहीर खान, द्रविड (१२ वा खेळाडू)
आश्चर्य म्हणजे कपिलने आपल्या संघात स्वतःचा किंवा १९८३ चा विश्वचषक जिंकणार्या संघातील एकाही खेळाडूचा समावेश केलेला नाही. गांगुलीने स्वतःच्या संघात स्वतःचा व कपिलचा समावेश केलेला आहे.
हे दोन्ही संघ मला फारसा पटलेले नाही. माझ्या मते अझरूद्दीन किंवा गांगुली सर्वोत्तम संघात येऊ शकत नाहीत. गांगुलीचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले नव्हते. त्याचे रनिंग बिटवीन द विकेट्स देखील खराब होते. अझरूद्दीनचे क्षेत्ररक्षण जबरदस्त असले तरी त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी करणारे अनेक खेळाडू आहेत. द्रविड देखील एकदिवसीय संघात योग्य वाटत नाही.
कपिलच्या संघातील सर्वजण २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात खेळत होते. काही जण अजूनही संघात आहेत. विशेषतः २००४ नंतर खेळणार्या फलंदाजांना सर्व नवीन नियमांचा फायदा मिळून फलंदाजीत जास्त धावा व त्यासुद्धा वेगाने करता आल्या. १९८३ मधील खेळाडूंना नोबॉलवरची फ्री हिट, २० षटकांचा पॉवर प्ले व त्यामुळे क्षेत्ररक्षकांवर असलेली बंधने, नोबॉलवरील एक्स्ट्रॉ धाव इ. फलंदाजाला अनुकूल असलेले नियम अस्तित्वात नव्हते. तरीसुद्धा श्रीकांत, कपिल इ. फलंदाज तुफान वेगाने हाणामारी करत असत. त्यामुळेच १९८३ मधील एकही खेळाडू या संघात नसावा याचे आश्चर्य वाटते.
माझ्या दृष्टीने भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघ असा असावा.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), के श्रीकांत, सचिन, सेहवाग, मोहिंदर अमरनाथ, कोहली, युवराज सिंग, कपिल देव, झहीर खान, हरभजन, श्रीनाथ
वाचने
6681
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओके - श्रीस्पा
त्या दोघांच ठिक आहे ...पण आपण
रविद्र जदेजा
सर्वोत्तम संघात धोनी कर्णधार
सहमत
In reply to सर्वोत्तम संघात धोनी कर्णधार by आदूबाळ
>>> तो "उत्तम" यष्टिरक्षक
कळले
In reply to >>> तो "उत्तम" यष्टिरक्षक by श्रीगुरुजी
सय्यद किरमाणीची किपींग पाहिली
In reply to >>> तो "उत्तम" यष्टिरक्षक by श्रीगुरुजी
गुरूजी
In reply to >>> तो "उत्तम" यष्टिरक्षक by श्रीगुरुजी
बरोब्बर. तो समीर दिघे. नावात
In reply to गुरूजी by फारएन्ड
नाही राव
हॅ हॅ हॅ अगदी अगदी
In reply to नाही राव by प्रसाद गोडबोले
लिटील मास्टर का नाही ?
गावसकर हा कसोटी क्रिकेटच्या
In reply to लिटील मास्टर का नाही ? by धर्मराजमुटके
दोन्ही संघ अमान्य..
>>> मला अभिप्रेत सार्वकालीन
+१ गुरुजि
In reply to >>> मला अभिप्रेत सार्वकालीन by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
आमचा बी एक संघ
संघातील खेळाडू आणि आपली
In reply to आमचा बी एक संघ by स्पा
सद्गोपन रमेश ऐवजी देवांग
In reply to आमचा बी एक संघ by स्पा
आदरणीय स्पा साहेब,
In reply to आमचा बी एक संघ by स्पा
आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय
In reply to आदरणीय स्पा साहेब, by नानबा
आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय
In reply to आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय by घाटावरचे भट
थोडा आमचाही हातभार
आमच्या पुण्याच्या ऋषिकेशराव
In reply to थोडा आमचाही हातभार by चावटमेला
कानिटकर
In reply to आमच्या पुण्याच्या ऋषिकेशराव by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तो सामना अजून आठवतो.
In reply to कानिटकर by फारएन्ड
अजुन काहि
In reply to थोडा आमचाही हातभार by चावटमेला
आणि रणदेब बोस (१२ वा)
(No subject)
In reply to आणि रणदेब बोस (१२ वा) by चावटमेला
अरेरे! इथे सर्वकालीन
पण सर्वाधिक टुकार असलेले ११
In reply to अरेरे! इथे सर्वकालीन by श्रीगुरुजी
हे फार अवघड काम आहे.
In reply to पण सर्वाधिक टुकार असलेले ११ by स्पा
सर्वाधिक टुकार ११ खेळाडू
In reply to पण सर्वाधिक टुकार असलेले ११ by स्पा
सुनील वॉल्सन कोणाला आठवतो आहे
आमचा संघ
आणि १२ वा कोणा रे अॅड्या?
In reply to आमचा संघ by आदिजोशी
मग आम्चा पण
In reply to आणि १२ वा कोणा रे अॅड्या? by किसन शिंदे
चेसुगु
In reply to मग आम्चा पण by स्पा
अरेच्या
In reply to मग आम्चा पण by स्पा
ए मेल्या
In reply to मग आम्चा पण by स्पा
हेच म्हणतो.
In reply to आणि १२ वा कोणा रे अॅड्या? by किसन शिंदे
संजय बांगर आठवतोय का हो