✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

स
संजय क्षीरसागर यांनी
Sat, 08/10/2013 - 00:05  ·  लेख
लेख
महाराज अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज) फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता! ____________________________________ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ. मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो. ______________________________ पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे. आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो. त्यामुळे : चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी । हा आपला अनुभव होत नाही. आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही. _______________________ ट्राय टू अंडरस्टँड धिस, एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अ‍ॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं. थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक! ________________________ झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो. साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं. असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे. _________________________________ देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी तेणे समाधान मज जोडले ॐ मयी । त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल. ___________________________ अनंगपण फिटले मायाछंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी । असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल. ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्‍या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल. तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे. तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'. जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल. __________________________ पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी । हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही. ________________________________ ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी । हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता) असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय. तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय. __________________________ या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे. 'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.

Book traversal links for रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

  • ‹ रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म

प्रतिक्रिया द्या
37823 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

आणि हो...

होकाका
Sun, 08/11/2013 - 01:12 नवीन
आणि हो, बुद्धीचा कमालीचा न्यूनगंड कसा दिसतो? आणि तो कसा घालवतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

???

क्लिंटन
Sun, 08/11/2013 - 20:30 नवीन
ही असली भाषा आली म्हणजे विचार थकून विकार भडकल्याचे लक्षण आहे हे नक्की. इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे, वैचारिक उंचीवर भाष्य करणे असे प्रकार आले म्हणजे मुद्दे संपले आहेत आणि त्यामुळे चीडचीड होत आहे हे समोर दिसतच आहे. असल्या प्रकारांना फाट्यावर मारणेच उत्तम. आणि असे फाट्यावर मारले तरी 'माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद कोणी करू शकलेले नाही आणि वादविवादात मला कोणी हरवू शकलेले नाही' असे म्हणून कॉलर ताठ केली जाईलच. पण अशी कॉलर ताठ करणे म्हणजे मूर्खाच्या तोंडी कुठे लागा म्हणून इतर लोक गप्प बसत आहेत हे लक्षात न आल्याचेही लक्षण आहे हे सूज्ञांना वेगळे सांगायलाच नको. असो. पण या लेखमालेतून अनलिमिटेड मनोरंजन होत आहे (विशेषतः प्रतिसादांमधून) तेव्हा याबद्दल लेखकाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. असेच मनोरंजन या लेखमालेच्या उरलेल्या भागांमधून होईल ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही पूर्ण प्रतिसाद न वाचता सर्व सदस्यांची दिशाभूल करतायं

संजय क्षीरसागर
Sun, 08/11/2013 - 21:09 नवीन
सतत विडंबनं आणि विषयाशी असंबंधित प्रतिसाद देण्यामागच्या सदस्याच्या मानसिकतेबद्दल ते लिहीले आहे. मजा म्हणजे तुम्ही जेंव्हा या साइटवर संन्यास घेण्याची भाषा करत होता तेंव्हा आपली काहीही ओळख नसतांना तुम्ही मला इथेच नाही तर माझ्या व्यक्तिगत मेलवर निरोप पाठवला होता. तुमचे इश्यु सॉर्ट करण्यासाठी मी स्वतः सं.मं.ला विनंती करून तुमच्यासाठी रदबदली केली होती. सं.मं.नं मला उत्तर देऊन (आणि आभार मानून) तुमच्या प्रकरणात विषेश लक्ष घातलं होतं. तो सर्व पत्रव्यवहार अजूनही इथे उपलब्ध आहे. थोडक्यात, तुम्ही जे काही चालवलंय (मागच्या लेखावर ही हाच प्रकार केला होता पण मी दुर्लक्ष केलं) ते वस्तुस्थितीशी संपूर्ण विसंगत आहे. लोकांना चांगल्या गोष्टींचं विस्मरण होतं यासारखं दुर्दैव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

बरं बुवा. तुम्हीच बरोबर.

क्लिंटन
Sun, 08/11/2013 - 21:19 नवीन
बरं बुवा. तुम्हीच बरोबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गिरीश, आज ही तुला मी व्यक्तिशः ओळखत नाही

संजय क्षीरसागर
Sun, 08/11/2013 - 21:38 नवीन
माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. पण इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. अँड धीस वॉज द सेकंड टाईम. सूज्ञ माणसाकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. तो पुन्हा `तुम्हीच बरोबर' असा प्रतिसाद देईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

?

क्लिंटन
Sun, 08/11/2013 - 21:52 नवीन
माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहितो आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे जाहिर करत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे जाहिर करू शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बा क्लिंटना,

यशोधरा
Mon, 08/12/2013 - 06:25 नवीन
इथे टीपी करण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिही की! किती दिवसांत काहीच वाचले नाही तुझ्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

हाय रे दैवा!!!

कवितानागेश
Mon, 08/12/2013 - 07:29 नवीन
हाय रे दैवा!!! :( कुणी कुणाचं नाही इथे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पुन्हापुन्हा तेचते लिहून काय उपयोग आहे, श्रीयुत क्लिंटन?

संजय क्षीरसागर
Mon, 08/12/2013 - 07:34 नवीन
जर एखादा सदस्य सतत विडंबन करत सुटला आणि लेखनविषयाशी संपूर्ण असंबद्ध प्रतिसाद देत असेल तर त्या मागे काय मानसिकता आहे हे सांगणं हा त्या उपहासाचा आणि विडंबनांचा प्रतिवाद आहे. तुम्ही प्रतिसाद देण्यापूर्वी या (आणि इतर) लेखावरच्या प्रतिसादांचा अनुक्रम पाहिला असता तर इतकी साधी गोष्ट लक्षात येऊ शकली असती. त्याऐवजी आपल्यासारख्या विचारी व्यक्तीनं मी `इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार वारंवार करतो' वगैरे सरसकटीकरण केलं याचं आश्चर्य वाटलं. आश्चर्य एवढ्यासाठी की निदान आपण (उपरोल्लिखित) मदतीची आठवण ठेवली असती तर तो निष्कर्श काढण्यापूर्वी स्वतःच्या मनाशी विचार केला असता. म्हणजे माझे लेखनविषय आपल्याला कळत नाही हे आपण अत्यंत जोरदारपणे जाहिर केलं आहे, त्यामुळे आपल्या लेखी त्यातून काही मूल्यवर्धन होत नाही. पण काहीही कारण नसतांना, एखाद्या अनोळखी व्यक्तीला केवळ त्याच्या आर्जवातला प्रामाणिकपणा बघून, संकेतस्थळावर अशी व्यक्ती असावी या हेतूनं मदत करणं ही देखिल मूल्यवर्धनाची एक बाजू असू शकते हे कळणं अवघड नसावं असो इतकी किमान अपेक्षा करण्यात देखिल माझीच चूक असेल, पण `इतरांच्या बुध्दीची कुवत काढून मी संकेतस्थळाचं मूल्यवर्धन करतो' हे म्हणण्या इतकी बेईमानी निदान मी तरी करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

रुणुझुणु

राजा सोव्नी
Sat, 08/10/2013 - 19:35 नवीन
बाकी काहीही असो चित्र फारच झकास
  • Log in or register to post comments

अक्षरदेखील सुवाच्य आहे

राजेश घासकडवी
Sat, 08/10/2013 - 21:00 नवीन
या लेखातलं चांगलं काय हे शोधण्याचा प्रयत्न आवडला. अक्षरदेखील वळणदार आणि सुवाच्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा सोव्नी

स्वच्छता आणि टापटिपीचे दोन

आदूबाळ
Sat, 08/10/2013 - 21:07 नवीन
स्वच्छता आणि टापटिपीचे दोन मार्क?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सुवाच्य हा शब्द शुद्ध

बॅटमॅन
Sat, 08/10/2013 - 21:12 नवीन
सुवाच्य हा शब्द शुद्ध लिहिण्याचा अर्धा मार्क जास्ती. "तुम्हावर केला मी मार्क बहाल". समस्यापूर्तीचा प्रश्न. सोडवल्यास १० मार्क जास्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हे पहा

राजेश घासकडवी
Sat, 08/10/2013 - 21:28 नवीन
मी सोडून देतो म्हणून माझा उपहास करत राहू नका. मी प्रामाणिकपणे या लेखातून नीरक्षीरविवेकबुद्धीने चांगलं ते निवडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही चेष्टा मांडलेली आहे. तुमच्या गहाण ठेवलेल्या बुद्धीला नवीन विचार पेलणं शक्य नाही हे उघड आहे. वैचारिक उंची गाठता येत नाही म्हणून विदूषकी चेष्टा करणं थांबवा पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो बुद्धाच्या वेळीही झेन

बॅटमॅन
Sat, 08/10/2013 - 21:38 नवीन
अहो बुद्धाच्या वेळीही झेन कोअन्स कळत नव्हती लोकांना, अजूनही कळत नाहीत. माझी झेन/मर्सिडीज कोअन्स तुम्हाला कळत नाहीएत. अन ही विदूषकी चेष्टा नव्हे. विदूषक माझा शत्रू आहे हे तुम्हा विचारवंतांना माझी स्वाक्षरी पाहूनही कळेना, हद्द आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ते कोअन्स नसून क्ॐस आहे

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 12:20 नवीन
ते कोअन्स नसून क्ॐस आहे इतकंही तुम्हाला ठाऊक नाही. ऐकिव शब्दांशी लेखनातले शब्द जुळत नाहीत म्हणून लोकांचा गैरसमज होतो. असे चुकीचे शब्द क् चं ओंकारमय होणं दर्शवत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष बुद्धाने लिहिले असतील तरी ते ॐकारासह लिहायला हवेत. विदूषक तुमचा शत्रू असेल, पण विदूषकी हा वेगळा शब्द आहे. एवढंही तुम्हाला कळत नाही म्हणजे तुमची मानसिकता लक्षात येते. तुम्हाला लादेन ही ध्यानप्रक्रिया करून बघण्याचा सल्ला देतो. तूर्तास एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लादेन या ध्यानप्रक्रियेतल्या

बॅटमॅन
Sun, 08/11/2013 - 20:30 नवीन
लादेन या ध्यानप्रक्रियेतल्या गुरूंचे शब्द पाहतो आहोतच, धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लादेन ध्यानप्रकाराविषयी मी

राजेश घासकडवी
Sun, 08/11/2013 - 22:07 नवीन
लादेन ध्यानप्रकाराविषयी मी चार शब्द लिहिले आहेत ते वाचावे. म्हणजे तुम्हाला किती कळत नाही याचा तरी अंदाज येईल कदाचित. http://www.misalpav.com/node/25355
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

उपहासात्मक प्रतिसाद आणि

कवितानागेश
Sun, 08/11/2013 - 01:22 नवीन
उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता - =)) हॅ हॅ हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

अरेच्चा!

होकाका
Mon, 08/12/2013 - 00:37 नवीन
इथे हॅ हॅ हॅ हॅ हॅ मध्ये पाच वेगवेगळ्या लिन्का होत्या हे कळलेच नव्हते आधी: http://www.misalpav.com/node/21377 http://www.misalpav.com/node/23678 http://www.misalpav.com/node/22325 http://www.misalpav.com/node/21861 http://www.misalpav.com/node/21341 सावकाश वाचेन आता लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

याला म्हणतात दांडगा अभ्यास !!

बाळ सप्रे
Mon, 08/12/2013 - 14:12 नवीन
याला म्हणतात दांडगा अभ्यास !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पूर्णपणे...

निराकार गाढव
Sun, 08/11/2013 - 07:21 नवीन
हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

पैजारबुवा भाग मिल्खा भाग"

मदनबाण
Sun, 08/11/2013 - 11:08 नवीन
पैजारबुवा भाग मिल्खा भाग" बरोबरच खालचा व्हिडीयो देखील नक्की पहा ! { इतरांनी देखील पाहण्याचे कष्ट घेतल्यास माझी हरकत नाही. } मेजर जनरल जी.डी.बक्शी :-
  • Log in or register to post comments

प्रत्येकाने बघावाच असा हा व्हिडियो

चित्रगुप्त
Sun, 08/11/2013 - 16:33 नवीन
प्रत्येकाने बघावाच असा हा अत्यंत ओजस्वी व्हिडियो दिल्याबद्दल मदनबाण यांचे अनेक आभार. या धाग्यावर चक्कर मारण्याचे सार्थक हा व्हिडियो बघून झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद काका ! मला माहित होते

मदनबाण
Mon, 08/12/2013 - 19:40 नवीन
धन्यवाद काका ! मला माहित होते की या धाग्याचे टिआरपी मुल्य अधिक आहे, त्याचाच फायदा मी उचलला ! उद्देशच एकच सगळ्यां पर्यंत या व्हिडीयोतला संदेश पोहचावा. ज्या काश्मिर मधल्या ५ वर्षातील ३ पोस्टींग बद्धल त्यांनी सांगितले आहे त्या किस्तवाड { Kishtwar } मधेच सध्या दंगल चालु आहे ! देशातल्या अर्थव्यवस्थेचे ३-१३ तर वाजलेच आहेत शिवाय राजकिय अराजकता पराकोटीची झाली आहे. जनरलनी सांगितल्या प्रमाणेच आपला तमाशा झाला आहे ! राजकिय गँगरीन आपल्याला संपवायला लागला आहे. पाकडे आपल्याला ठार मारत आहेत... त्यांची खेळी मस्त चालु आहे. आपल्या मिडीयाला देखील ते लिलया खेळवायला शिकले आहेत... त्याचे उत्तम उदाहरण देतो, ते म्हणजे आत्ता ५ जवानांना ठार मारल्या नंतर सर्व मिडीया पाकड्यांवर आगपाखड करु लागले,यातुन त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी एक हाडुक टाकले ! कुठले हाडुक ? कोणी टाकले? तर शहरयार खान { Shahryar Khan } यांनी ते हाडुक टाकले... काय तर दाउद इब्राहिम पाकिस्तानात होता म्हणे ! आता तो म्हणे युएइ मधे असु शकतो ! झालं ते हाडुक टाकुन मोकळे झाले आणि आपले मिडीयावाले लगेच हे हाडुक चघळायला तुटुन पडले ! अरे ५ जवानांना ठार मारले ना पाकड्यांनी ? मग या माध्यमांनी सरकारला धारेवर धरुन हैराण करायला नको ? पण ह्यांना नविन हाडुक चघळायला मिळाल्यावर ५ जवानांच्या हत्येला ते क्षणार्धात विसरले देखील ! ही अवस्था आहे आपल्या मिडीयाची. त्याज्या बातमी नुसार पाक सैन्याच्या गोळीबारात जखमी झालेला अजुन एक शहिद झाला आहे. :( अजुन एक... अजुन एक... अजुन एक... आपण सर्वांनी फक्त मोजत बसायच ! मी आता अजुन एक व्हिडीया आता इथे देतो... पूर्व रॉ प्रमुख आरएसएन सिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद बाणराव,

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/14/2013 - 09:45 नवीन
बाणराव, दोन्ही व्हिडीओ पाहिले. त्यातले बरेच काही समजले. काहि ठिकाणी थोडा अडखळलो उदा. हेमंत करकरेंच्या उल्लेखाच्या वेळी. (अर्थात या विषयातले माझे वाचन फार तोकडे आहे) पण तुमचा हे सगळे दाखवण्या मागचा जो उद्देश होता तो नक्की सफल झाला. अजुन एक विनंती ह्या विषयासाठी वेगळा धागा काढला तर तो अधिक जणांपर्यंत पोचेल. (अस्वस्थ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माऊली

प्रसाद गोडबोले
Sun, 08/11/2013 - 13:16 नवीन
ह्याच ज्ञानेश्वर माऊलींनी हतिपाठामध्ये " हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी " असे म्हणुन नामस्मरणाचा महिमा गायिला आहे . मागे एका लेखात आपण
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे.
असेही म्हणाला आहात (संदर्भ : http://www.misalpav.com/node/24998) थोडक्यात ज्ञानेश्वर माऊली काही ठिकाणी योग्य आणि काही ठिकाणी व्यर्थ बोलतात असे आपले मत आहे काय ? ह्यावर जरासा प्रकाश पाडावा . (अवांतर : हा प्रश्न गिरीजा तांबे ह्यांनी विचारला आहे कि प्रसाद गोडबोले ह्यांनी की मुहम्मद अब्दुल्ला ह्यांनी की शेल्डन कुपर ह्यांने उत्तरावर परिणाम पडु नये अशी अपेक्षा आहे . अवांतर २: वरील आणि ह्या अवांतराला उत्तर देण्याचे टाळल्यास धागा अवांतरात जाण्याचे टाळता येईल .)
  • Log in or register to post comments

काही प्रतिसाद मात्र उल्लेखनीय आहेत!

संजय क्षीरसागर
Sun, 08/11/2013 - 16:27 नवीन
काही लोकांची स्वतःची संकेतस्थळं वगैरे आहेत अशी माहिती आहे (अ‍ॅट एनी गीवन टाईम, साधारण दोन किंवा तीन सदस्य उपस्थित असणारी). त्यांचा तिथे वेळ जात नाही म्हणून इथे येतात हे उघड आहे. येई नात का, पण आल्यावर प्रतिसादातून `फेसबुकी ज्योक' मारणं यात काय फुशारकी वाटते? एकच कारण असावं, हे असले उद्योग तिथे केले तर `एक सदस्यिय संकेतस्थळ' म्हणून गौरव होण्याची शक्यताच जास्त, म्हणून इथे हौस भागवत असावेत. स्वतःला गाढव म्हणवणारा एक आयडी, फक्त माझ्या लेखांवर गोंधळ घालायला निर्माण झाला (का केला?) आहे. आता स्वतःला गाढव म्हणणं यासारखा स्वतःचा अपमान नाही हे गाढवाला कसं कळणार? पण माणसाला तरी ते कळायला हवं! अर्थात इतक्या निम्न बुद्धीचं प्रदर्शन केल्यावर गाढव हा `आकार' आहे हे लक्षात येणं अवघडच. त्यामुळे स्वतःला गाढव आणि (त्यात पुन्हा निराकार!) म्हणून गाढव कितीही नाचलं तरी मराठीत त्याला गर्दभलीलाच म्हणतात.
  • Log in or register to post comments

अहो कोण तुम्ही? स्वतःच्या

बॅटमॅन
Sun, 08/11/2013 - 20:33 नवीन
अहो कोण तुम्ही? स्वतःच्या एकूणच आवाक्याबद्दल इतके गैरसमज असतात तुमचे,मिपाकरांना या फुटकळ लेखांवर टिप्पणी करून पांडित्याची हौस आहे असं का वाटतं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (पाच)

नि ३
Mon, 08/12/2013 - 00:28 नवीन
कधी येणार? संजयजी मि आतुरतेने वाट बघतोय.... जाता जाता ...एक शंका आहे ती विचारुन घेतो... आमिर खान च्या मन चित्रपटातले एक गाने आहे .... " मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन " तर ह्या गाण्यावरुन गीत लिहण्यार्याला हेच सुचवायचे आहे की ...ह्रद्य किंवा ब्रेन नाही तर मन च प्रेम वैगेरे करायला लावते ...तर आपण मनाचे एकावे काय?? आणी "मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन" ह्याचे उत्तर आपण मनापासुन कसे वदवुन घ्यायचे??? कळावे लोभ असावा...
  • Log in or register to post comments

या भागातलं जवळ जवळ सगळचं

स्पा
Mon, 08/12/2013 - 11:43 नवीन
या भागातलं जवळ जवळ सगळचं डोक्यावरून गेले , तरी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय
  • Log in or register to post comments

पण मी कदाचित हे लेखन समजायला

स्पा
Mon, 08/12/2013 - 11:46 नवीन
पण मी कदाचित हे लेखन समजायला बराच लहान आहे आणि ""एक्स्पिरियंस्ड इलाइट क्लास"" मध्येही नाही .. आता कसं होणार माझं :(
  • Log in or register to post comments

तुझी सही

पैसा
Mon, 08/12/2013 - 11:48 नवीन
बाळ प्रसन्ना, तुझी सही काय सांगते?
- जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा
आहे ना सोप्पं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@आता कसं होणार माझं smiley>>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/12/2013 - 22:54 नवीन
@आता कसं होणार माझं smiley>>> =)) काय डँबिस मणुक्श आहे हा..! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पा रे ...

चौकटराजा
Tue, 08/13/2013 - 10:49 नवीन
तुझं कसं होणार याची काळजी करू नको. आमची स्वाक्षरी वाच.तू त्या क्लास मधे नाहीस याची जाणीव म्हणजेच तू त्या क्लासला जायचा सोपानावर उभा आहेस ! भिउ नकोस त्या सोपानावर तुझ्या पाठीमागे कुणीच नाही. कारण उणीवेची जाणीव ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चोक्कस्स्स !

विटेकर
Tue, 08/13/2013 - 11:28 नवीन
कारण उणीवेची जाणीव ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !
चोक्कस्स्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

प्रतिसादाचं शीर्षक + पहिलं

लंबूटांग
Tue, 08/13/2013 - 20:04 नवीन
प्रतिसादाचं शीर्षक + पहिलं वाक्य धरून सुद्धा sarcasm मधे काहीच फरक पडत नाही. आता तुमचे व्यनि मला वाचता येत नाहीत. व्यनिमधे कौतुक केले की ते खरे असे मानायचे का? तुमची कोणी टांग खेचत असेल तर तो व्यनि, खरड्वही, ईमेल, फोन, sms कशानेही खेचू शकतो. (मी स्पाने खेचली असेल असे म्हणत नाहीये पण नाकारतही नाहीये) असो बाकी. व्यनि म्हणजे व्यक्तिगत निरोप. आता व्यक्तिगत ह्याचा अर्थ तुम्हाला मी नव्याने सांगायची गरज नसावी. तुम्ही व्यनि खरडवहीतील गोष्ट धाग्यावर आणता आणि इतरांना लेख सोडून लेखकावर प्रतिसाद देता अशी दूषणे देता. त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर - वाचून मला जे वाटलं ते लिहीलं आणि जे मी तुमचा प्रतिसाद वाचून जे जाणवलं ते लिहीलं. बाकी तुमच्याकडून तुम्ही नेमकं तेवढंच सोडूनच दिलंय! हे वाचून डोळे पाणावले. मी गेल्या काही लेखात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची तुम्ही नेमकी सोडून दिली आहेत त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर?

संजय क्षीरसागर
Tue, 08/13/2013 - 23:34 नवीन
पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल! तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल तितकी तुमची मानसिकता उघड होत जाईल याचं भान ठेवून लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

फुटलो मी अक्षरशः

लंबूटांग
Tue, 08/13/2013 - 23:56 नवीन
तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही मला पण त्या प्रतिसादाचा संदर्भ घेऊन हा प्रतिसाद sarcastic नव्हता असे कसे. मी लिहीले होते ते सांगायला की मी सर्व प्रतिसाद नीट वाचतो. म्हणून. भ्रमर १ वर पहिला प्रतिसाद बिरुटे सरांचा आहे. कैच्या कै. कसली मानसिकता आणि कसलं काय. जरा लिहाच तुम्ही माझ्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतेय. मलाही उत्सुकता आहे. इथेच लिहीलेत तरीही चालेल. मी अजिबात वैयक्तिक आरोप केलेत वगैरे बोलणार नाही. तुम्हाला माझ्या आजपर्यंतच्या ५-१० प्रतिसादांतून माझी मानसिकता कळली ह्याचेच मला आश्चर्य आहे. तुमच्या पोस्टवर तुमच्या सिद्धांतांवर/ विचारांवर कोणी आक्षेप घेतला की आक्रस्ताळेपणा करून वाट्टेल ते मानसिकता काय आणि inferiority complexकाय बरळायचे, स्वत:च्या सोयीनुसार एखादे वाक्य घेऊन त्याचा वाट्टेल तसा अर्थ लावायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सोयीस्कररीत्या टाळायचे हे सर्वांना माहिती आहे. बरं मागील धाग्यांत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणार का? तुमच्या संज्ञांच्या व्याख्या विचारल्या होत्या ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लंबूटांगजी - मी एक सुचवू का..

मोदक
Wed, 08/14/2013 - 00:04 नवीन
लंबूटांगजी - मी एक सुचवू का..? ते सगळे प्रश्न (आणि शक्य झाल्यास लिंका) एका प्रतिसादात याच धाग्यावर द्या. आणखी कुणाचे अनुत्तरीत प्रश्न असतील तर ते येथेच येवूदेत.. माझेही काही अनुत्तरीत प्रश्न आहेत - शोधतो सवडीने! का त्याचा नवीन धागा काढूया..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

विचार केला होता देण्याचा

लंबूटांग
Wed, 08/14/2013 - 00:32 नवीन
पण म्हटले इतरांना उपदेश करणारे संक्षी स्वतः सगळे नीट लक्ष देऊन वाचत असतीलच. म्हणून नाही दिल्या.
  1. येथे विचारले होते सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का? तिथेच विनंतीवजा सूचना केली होती तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
  2. त्याच धाग्यात परत आठवण करून दिली होती
  3. ही दुसर्‍या धाग्यावरील प्रतिक्रीया
  4. तिसर्‍या धाग्यात परत एकदा आठवण.
संक्षींनीच ह्या मालिकेतील पहिल्याच धाग्यावरील एका प्रतिसादात लिहीले होते की जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो. . माझ्याबाबतीत तरी असे काही घडले नाही ब्वॉ. बरं मोदकराव तुम्हाला नवीन धागा काढायचा असल्यास माझा प्रतिसाद तिथे उध्रुत करा बिन्धास्त. HTMLहवे असेल तर ते व्यनी/ इमेल करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही?

संजय क्षीरसागर
Wed, 08/14/2013 - 00:25 नवीन
आहो, तुम्ही स्वतःचे प्रतिसाद सुद्धा वाचत नाही असं दिसतंय! तुम्ही लिहीलंय :
त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर- वाचून
आणि त्याला उत्तर म्हणून मी लिहीलंय >पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल! याचा अर्थ पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद. असो, बाकी तुम्ही पहिल्या पोस्टवर जे दिव्य प्रतिसाद दिलेत ते वाचा. त्याबद्दल प्रथम तुम्हाला दिलगीरी व्यक्त करावी लागेल. नाही तर तुमचे प्रश्न आणि तुम्ही गोंधळ घाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

कोणता प्रतिसाद

धन्या
Wed, 08/14/2013 - 00:31 नवीन
कोणता प्रतिसाद स्वतःचे प्रतिसाद संपूर्ण प्रतिसाद पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद दिव्य प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्या ने खाली लिहीलेच आहे.

लंबूटांग
Wed, 08/14/2013 - 00:36 नवीन
तुम्ही संदिग्ध लिहीले आहे. पहिल्या पोस्ट्वरचा पहिला प्रतिसाद आणि पहिल्या पोस्ट्वरचा त्याचा पहिला प्रतिसाद यात प्रचंड फरक आहे. आणि दिलगीरी कशाबद्दल मी व्यक्त करावी ब्वॉ? माझ्या त्या प्रतिसादाची लिंक खाली दिलेली आहे. तुमचा स्मृतीसंबंधीचा जो सिद्धांत होता त्यातील त्रुटी मी उदाहरणासहित दाखवली. आता ती चूक असेल तर तुम्ही दाखवा तसे. मी कशाबद्दल दिलगीरी व्यक्त करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको

मोदक
Wed, 08/14/2013 - 01:41 नवीन
थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको.. ते म्हणतहेत तो स्पा चा पहिला प्रतिसाद हा आहे.
संजय क्षीरसागर बस नाम हि काफी हे ;-) रंजक लेखमाला वाचतोय
संक्षी - थोडा शांतपणे विचार करा - तुम्हालाच सगळेजण का टारगेट करत आहेत..?? काहीही चुकत नसावे का तुमचे? तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य. परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..? थोडा तरी विचार करा राव. (चेष्टा करण्यात आणि टर उडवण्यात माझा सहभाग आहे हे मी बिनशर्त मान्य करत आहे परंतु वरचा प्रश्न कळकळीने विचारला आहे - बाकीच्या प्रश्नांप्रमाणे याही प्रश्नाला फाट्यावर मारणार असलात तरी मला फरक पडणार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

??

प्रभाकर पेठकर
Wed, 08/14/2013 - 01:46 नवीन
तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य.
अच्छा! त्याला ज्ञान आणि अभ्यास म्हणतात का? बॉरं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर

मोदक
Wed, 08/14/2013 - 01:54 नवीन
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..? त्यांचा अभ्यास असेल / नसेल ती त्यांची वैयक्तीक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर

धन्या
Wed, 08/14/2013 - 02:07 नवीन
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.
वपुंची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना

मोदक
Wed, 08/14/2013 - 02:18 नवीन
एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना त्याच्या अस्तित्वाविषयी गृहीतक मांडतो. त्या गृहीतकामध्ये अतर्क्य गोष्टी तार्किकरीत्या योजलेल्या असतात. ते गृहीतक आपण मांडतो कारण आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो. उत्तरही सापडते. पण ते आपल्याला हवे असलेले उत्तर असते. खरे उत्तर..? ते हवे असेल तर पुन्हा एखादे गृहीतक मांडावे लागेल. नवी समज आली की; नवीन धारणेसह! *********** हे कसे वाटते आहे..?? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कोणी काय गृहीत धरायचे?

प्रभाकर पेठकर
Wed, 08/14/2013 - 02:17 नवीन
त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.
आज पर्यंतच्या अनेक धाग्यांवरील अनेक प्रतिसादकांनी अनंत प्रयत्न करूनही कोणी उत्तरापर्यंत पोहोचलेले दिसत नाही.
त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..?
तुम्ही ते गृहीत धरा किंवा नका धरू त्याने काय फरक पडणार आहे? त्यांनी सुरुवातीपासूनच ते गृहीत धरलेले आहे. तसेच, तुमचाच कांही अभ्यास नाही, तुम्हालाच कांही ज्ञान नाही हेही त्यांनीच गृहीत धरलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा