अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज)
फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________
ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.
मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.
या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.
______________________________
पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे.
आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.
त्यामुळे :
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी ।
हा आपला अनुभव होत नाही.
आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही.
_______________________
ट्राय टू अंडरस्टँड धिस,
एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं.
थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!
________________________
झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो.
साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.
असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.
_________________________________
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल.
___________________________
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल.
ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल.
तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे.
तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.
जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.
__________________________
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।
हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.
ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता)
असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय.
तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.
__________________________
या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे.
'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
37878
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार केला होता देण्याचा
In reply to लंबूटांगजी - मी एक सुचवू का.. by मोदक
- येथे विचारले होते सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का?
तिथेच विनंतीवजा सूचना केली होती तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
- त्याच धाग्यात परत आठवण करून दिली होती
- ही दुसर्या धाग्यावरील प्रतिक्रीया
- तिसर्या धाग्यात परत एकदा आठवण.
संक्षींनीच ह्या मालिकेतील पहिल्याच धाग्यावरील एका प्रतिसादात लिहीले होते की जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो. . माझ्याबाबतीत तरी असे काही घडले नाही ब्वॉ. बरं मोदकराव तुम्हाला नवीन धागा काढायचा असल्यास माझा प्रतिसाद तिथे उध्रुत करा बिन्धास्त. HTMLहवे असेल तर ते व्यनी/ इमेल करेन.तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही?
In reply to फुटलो मी अक्षरशः by लंबूटांग
कोणता प्रतिसाद
In reply to तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही? by संजय क्षीरसागर
धन्या ने खाली लिहीलेच आहे.
In reply to तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही? by संजय क्षीरसागर
थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको
In reply to धन्या ने खाली लिहीलेच आहे. by लंबूटांग
??
In reply to थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको by मोदक
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by मोदक
एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by धन्या
कोणी काय गृहीत धरायचे?
In reply to समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर by मोदक
साक्षात्कार झाला!!
In reply to कोणी काय गृहीत धरायचे? by प्रभाकर पेठकर
तुमचे तार्कीक निष्कर्ष नेहमीच माझ्या आवाक्याबाहेरचे असतात
In reply to माय गॉड! इतका इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स? by संजय क्षीरसागर
पूर्वी कंटाळा आला की मी काही
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल
In reply to पूर्वी कंटाळा आला की मी काही by धन्या
दुनिया काय म्हणेल याचं भान
In reply to तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल by मोदक
+१
In reply to पूर्वी कंटाळा आला की मी काही by धन्या
आवडले !
धन्यवाद!
In reply to आवडले ! by धर्मराजमुटके
Psychology's answer to trolling and online abuse
Ayya hi tar gadya sharadini
वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
`टू रेज अप अ डेड' हेच
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही."`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..?? तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?आत्म्याचे परमात्म्याशी मिलन
In reply to `टू रेज अप अ डेड' हेच by मोदक
आत्म्याचे परमात्म्याशी मिलनइतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं ) दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान ! संक्षी - एक अनाहूत सल्ला - नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!छे: छे:...
In reply to आत्म्याचे परमात्म्याशी मिलन by विटेकर
व्यक्तिगत रोख, तुच्छता आणि
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
समाजमान्य धारणांच दळण
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
जवळ जवळ म्हणजे सोप्प्या अडचणीत न टाकणार्या प्रश्नांची का?
In reply to वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो by संजय क्षीरसागर
ज्या प्रमाणे एखाद्या
आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे
काय निष्कर्श निघतो यावरनं?
In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
काय निष्कर्श निघतो यावरनं?तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे.माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..? वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे. वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे. _____________________ सुटसुटीत तेच लिहीतोतुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा ?
In reply to काय निष्कर्श निघतो यावरनं? by मोदक
इतक्या भंपक कल्पना असलेल्या
In reply to तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा ? by संजय क्षीरसागर
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा.१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली. असो. देव तुमचे भले करो.लेखकच पुरावे देतोय :
In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
लेखकच पुरावे देतोय
In reply to लेखकच पुरावे देतोय : by धन्या
मी प्रतिसादात काहीही लिहिलं
In reply to लेखकच पुरावे देतोय by संजय क्षीरसागर
तुमच्या लेखावर
In reply to मी प्रतिसादात काहीही लिहिलं by धन्या
मानसिकता.
In reply to आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे by संजय क्षीरसागर
संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो
हे अपेक्षित होतंच!
In reply to संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो by मोदक
मस्त बॅटींग चाललीये ...
यूअर टर्न नाऊ!!
In reply to मस्त बॅटींग चाललीये ... by प्रसाद गोडबोले
बॉलिंग
In reply to यूअर टर्न नाऊ!! by मोदक
बापरे !
आमुलाग्र बदलाची गरज.
In reply to बापरे ! by उन्मेष दिक्षीत
पेठकर काकांशी सहमत
In reply to बापरे ! by उन्मेष दिक्षीत
=)) =))
दगडावर डोके आपटणे सुरुच आहे हे पाहुन थक्क झालो
छे!
@ लंबूटांग, प्रभाकर पेठकर ..
गूड फॉर यू!
In reply to @ लंबूटांग, प्रभाकर पेठकर .. by उन्मेष दिक्षीत
मी स्वतः २०१० पासुन सरांचे
In reply to @ लंबूटांग, प्रभाकर पेठकर .. by उन्मेष दिक्षीत
माझा उद्देश
आता याचा विचार करून पहा.
In reply to माझा उद्देश by उन्मेष दिक्षीत
यादी
धागाकर्त्याचे प्रतिसाद
In reply to यादी by Nile
माय गॉड, वॉट अ स्ट्रेट प्रूफ !
आता तुमचे प्रतिसाद असे quote च करायचे झाले तर
In reply to माय गॉड, वॉट अ स्ट्रेट प्रूफ ! by संजय क्षीरसागर
वॉट अ ज्योक!
In reply to आता तुमचे प्रतिसाद असे quote च करायचे झाले तर by लंबूटांग
मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा लहान आहे
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
- तिथे लिहीले आहे की तो तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून दिलेला आहे. फक्त त्याच लेखाला/ प्रतिसादाला नाही.
- मी जे वेळ वाया घालवणे लिहीले आहे तेही ह्या बॅक ट्रॅक करून आलेल्या अनुभुतीतून लिहीले आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे नं देऊन त्याला पुष्टीच दिलीत. "प्रूफ" हवा असेल तर हा घ्या. consolidated प्रूफ.
बादवे. हा आणि इतर सर्व प्रतिसाद म्हणजे त्या पहिल्या लेखातच लिहील्याप्रमाणे सध्या हातात प्रचंड मोकळा वेळ आहे ह्याचा प्रूफ समजावा. अवांतर: तुमची दुसर्या कोमा वाल्या प्रतिसादाची लिंक चुकली आहे. माझ्याच प्रतिसादाला जातेय.आत्मैव आत्मनो बंधू
रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)
चैतन्य काळे अका लंबुटांग