✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सावल्या ___ शतशब्दकथा

त
तुमचा अभिषेक यांनी
Wed, 08/07/2013 - 12:44  ·  लेख
लेख
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले.. चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत.. त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या... जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या... काळ्याकुट्ट सावल्या..! त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता..... क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला.. उर नुसता धपापत होता.. हाताने अंग नुसते झाडत होता.. मात्र अनुभवलेली झोंबाझोंबीची शिरसिरी शरीराची साथ सोडायला तयार नव्हती.. स्वप्न होते समजूनही त्याला स्विकारायला मन धजावत नव्हतं... आज त्याला कळलं, तिने काय भोगलं ! - तुमचा अभिषेक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख

प्रतिक्रिया द्या
4275 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला

तुमचा अभिषेक
Wed, 08/07/2013 - 12:45 नवीन
मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला १०० शब्दांत कथा लिहायचा एक प्रकार अन त्यातला माझा एक प्रयत्न !
  • Log in or register to post comments

बापरे!

पैसा
Wed, 08/07/2013 - 15:07 नवीन
भयंकर घटना थोडक्यात शब्दबद्ध केली आहे. छान! आणखी वेगळ्या विषयांवर प्रयोग करा!
  • Log in or register to post comments

नटरंग

तिमा
Wed, 08/07/2013 - 17:06 नवीन
'नटरंग' मधल्या प्रसंगाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

शहारा आला

सुधीर
Wed, 08/07/2013 - 17:13 नवीन
शहारा आला. पैसा ताईंसारखंच म्हणेन, आणखी वेगळ्या विषयांवर प्रयोग कर.
  • Log in or register to post comments

सादर नमन!

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/07/2013 - 18:12 नवीन
सादर नमन!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्व प्रतिसादांचे...

तुमचा अभिषेक
गुरुवार, 08/08/2013 - 18:34 नवीन
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे... जमल्यास नक्की करेनच आणखी एखादा तरी प्रयोग..
  • Log in or register to post comments

अस्वस्थ झालो......

विजुभाऊ
गुरुवार, 08/08/2013 - 18:36 नवीन
अस्वस्थ झालो...... शतशब्द कथा.अंतोन चेकॉव च्या कथा आठवल्या
  • Log in or register to post comments

प्रयोग आवडला

सौंदाळा
गुरुवार, 08/08/2013 - 18:51 नवीन
प्रयोग आवडला. केवळ शंभर शब्दात अपेक्षित परीणाम साधलाय.
  • Log in or register to post comments

मोजक्या शब्दात बरंच काही लिहीलंत.

सूड
गुरुवार, 08/08/2013 - 19:22 नवीन
मोजक्या शब्दात बरंच काही लिहीलंत.
  • Log in or register to post comments

परिणामकारक!

आतिवास
गुरुवार, 08/08/2013 - 19:28 नवीन
परिणामकारक!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

चिगो
Fri, 08/16/2013 - 18:04 नवीन
हा कथाप्रकार जमतोय तुम्हाला, अभि..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

प्रभावी.

प्रभाकर पेठकर
Fri, 08/09/2013 - 13:14 नवीन
फक्त शंभर शब्द आणि अत्यंत प्रभावी आशय. अंतर्मुख करायला लावणारी शतशब्द कथा. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

पहिलाच प्रयत्न असला तरी खूप

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/09/2013 - 13:51 नवीन
पहिलाच प्रयत्न असला तरी खूप परिणामकारक आहे... शेवटची ओळ एकदम प्रभावी. अजून नक्की लिहा.
  • Log in or register to post comments

जमलंय!!!!!! जब्री आवडेश.

बॅटमॅन
Fri, 08/09/2013 - 14:12 नवीन
जमलंय!!!!!! जब्री आवडेश.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप

तुमचा अभिषेक
Fri, 08/09/2013 - 21:25 नवीन
धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप वाढवलात .. :)
  • Log in or register to post comments

पोहचला आशय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/09/2013 - 21:31 नवीन
प्रयोग आवडला. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अप्रतिम, नेहमीप्रमाणे आवडली

अनिल तापकीर
Fri, 08/16/2013 - 18:11 नवीन
अप्रतिम, नेहमीप्रमाणे आवडली आणि विशेष म्हणजे शतशब्दात इतकी परिणाम्कारक मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा