सावल्या ___ शतशब्दकथा
लेखनविषय (Tags)
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले..
चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत..
त्यात दिसणार्या, अंगावर झेपावणार्या...
जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्या...
काळ्याकुट्ट सावल्या..!
त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा..
त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता.....
क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला..
उर नुसता धपापत होता.. हाताने अंग नुसते झाडत होता..
मात्र अनुभवलेली झोंबाझोंबीची शिरसिरी शरीराची साथ सोडायला तयार नव्हती..
स्वप्न होते समजूनही त्याला स्विकारायला मन धजावत नव्हतं...
आज त्याला कळलं, तिने काय भोगलं !
- तुमचा अभिषेक
प्रतिक्रिया
मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला
बापरे!
नटरंग
शहारा आला
सादर नमन!
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे...
अस्वस्थ झालो......
प्रयोग आवडला
मोजक्या शब्दात बरंच काही लिहीलंत.
परिणामकारक!
हेच म्हणतो..
प्रभावी.
पहिलाच प्रयत्न असला तरी खूप
जमलंय!!!!!! जब्री आवडेश.
धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप
पोहचला आशय.
अप्रतिम, नेहमीप्रमाणे आवडली