नात्यातले उमाळे- नसतात सत्य सारे
ओठांवरील शब्द ,नुसतेच वांझ भारे
हातातुनी निसटती हळवी चुकार स्वप्ने
हृदयात फक्त् उरते बेचैन आर्त गाणे
आभाळ शोधताना हातात मेघ येई
डोळ्यामधील अश्रू मग पापणीत राही
कोणासही कराव्या का व्यर्थ वल्गना मी
माझे मलाच ठावे, ठरलो कसा निकामी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3121
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
फुलवाताई...
मस्त
छान
असेच म्हणतो
In reply to छान by बेसनलाडू
+१!
In reply to असेच म्हणतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
खरच सुरेख!!
छान !!
किती सुरेख
सुरेख..
अतिशय सुरेख..
व्वा..
काही काही रचनाच असतात की