परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो.
मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले? त्यावर ते म्हणाले कि अहो माझे वय आता पासष्ट वर्षे आहे रिटायर होऊन पाच वर्षे झाली.
यावर मी त्यांना म्हटले कि साहेब तुमच्या हृदयाची, गुढघ्याची पासष्टी झाली डोळ्याची पासष्टी झाली केसांची पासष्टी झाली मग तुमच्या पोटाची पासष्टी नाही का झाली ?
यावर मित्राच्या सासूबाई पटकन म्हणाल्या अहो आत्ता लग्नात त्यांनी पाच गुलाबजाम खाल्ले. डॉक्टर आता तुम्हीच काही तरी सांगा.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक दहावीतील मुलगी पाळी वेळेत येत नाही म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. वय वर्षे पंधरा आणि वजन शहाण्णव किलो (९६). ती खुर्ची मावत नव्हती. त्यामुळे तिच्या बीजांड कोशाना(ovaries)ना सूज आली होती. तिला वजन कमी करायला पाहिजे असे मी तिच्या वडिलांना सांगितले तर तिचे वडील म्हणाले डॉक्टर तुम्हीच सांगा तिला. मला संतापच आला सरळ विचारावेसे वाटले पंधरा वर्षाच्या मुलीचे शहाण्णव किलो वजन होईपर्यंत तुम्ही काय गोट्या खेळत बसला होतात काय? पण संयम बाळगून मी त्यांना सांगत होतो कि काय करायला पाहिजे तर त्यांचे आपले एकच टुमणे डॉक्टर तुम्हीच सांगा तिला.
अशाच एका लग्नाला शैलजाताई भेटल्या. त्यांचे बोलणे सुरु झाले कि आजकाल पायांची फार जळजळ होते. त्यांना मधुमेह आहे आणि त्या माझ्या बायकोकडे औषधोपचार घेत असतात.मधुमेह काही केल्या "कंट्रोल"च होत नाही अशी तक्रार करू लागल्या. (आई वडिलांपासून ओळख आहे त्यामुळे सुबोधला काय लहानपणापासून पाहीला आहे) हा एक उच्छाद असतो. डॉक्टर भटले कि वरिष्ठ नागरिकांना आपला कुठला तरी आजार आठवतो आणि ते पिच्छा पुरवतात त्यामुळे मी कोणत्याही सार्वजनिक प्रसंगांना वरिष्ठ नागरिकांना टाळू लागलो आहे.
थोड्या वेळाने त्या लग्नातील बुफेचे ताट घेऊन जेवत होत्या.त्यात पाच पुर्या, वाटी भरून श्रीखंड, तीन चार भाज्या, पुलाव, सार पापड इ सर्व जीन्नसानी त्यांचे ताट भरगच्च भरलेले होते. मी विनायकरावाना विचारले कि एवढा त्रास होतो तरी त्या पथ्य करीत नाहीत मग औषधोपचाराचा फायदा कसा होणार? त्यावर त्यांचे म्हणणे हेच डॉक्टर आता तुम्हीच काहीतरी सांगा तिला.
अंकिता पाटील चार वर्षे वय पोट दुखते आणि जळजळ होते म्हणून बालरोग तज्ञांनी तिला सोनोग्राफी साठी पाठविले होते. चार वर्षाच्या मुलीला आम्लपित्त होते हे पाहून मला पण जरा धक्काच बसला म्हणून तिच्या आजोबाना विचारले कि ती काय खाते? आजोबा तक्रार करून सांगत होते कि तिला रोज कुरकुरे लागतातच. त्याशिवाय ती ऐकतच नाही तुम्हीच काहीतरी सांगा तिला. मग मात्र माझा संयम सुटला आणि मी आजोबाना रागात विचारले अहो ती पैसे कमवत नाही कि दुकानात जाऊन कुरकुरे आणण्याची तिला अक्कल नाही मग ती रोज कुरकुरे कसे खाते? तुम्ही तिला कुरकुरे देणे बंद करा. हे सांगायला तुम्हाला डॉक्टर लागतो का ?
आहान वय वर्षे ५ सारखा माझ्या दवाखान्यात या वस्तूला हात लाव त्या वस्तूला हात लाव. कॉम्प्युटरशी चाळे कर. मी आई वडिलांकडे रागाने पहिले तर आई सांगु लागली गप्प बस आता नाहीतर डॉक्टर तुला इंजेक्शन देतील.
मी त्यांना विचारले कि दुसर्या ऑफिसात डॉक्टर नसतील तर काय सांगणार त्याला? त्यावर त्यांचे तोंड गप्प?
मला या सर्व गोष्टीमध्ये एक मूळ सूत्र असे दिसते आहे कि आपण सर्व आपली जबाबदारी टाळू पाहतो आहे. आणि आपल्या जवळच्या माणसाना त्यांच्या हिताच्या पण कटू गोष्टी सडेतोडपणे सांगण्याची वेळ येते तेंव्हा एक सोपा मार्ग (शोर्टकट) शोधतो आहोत.या वृत्तीमुळे आपण आपल्या जवळच्या माणसाचे अपरिमित नुकसान करीत आहोत ह त्यांना कळत नाही का?
बायकोशी/ नवर्याशी भांडण होऊ नये किंवा अप्रिय गोष्टी सांगायला लागू नयेत म्हणून वाईट पणा डॉक्टरच्या गळ्यात टाकतो आहोत. हे म्हणजे पाहूण्याच्या हातून साप मारण्याची कावेबाज वृत्ती आहे असे त्यांना वाटते काय?
नातीला ती हट्ट करते म्हणून रोज कुरकुरे देणारे पालक/ आजोबा किंवा ७० टक्के अधिक वजन होई पर्यंत मुलीला काही न बोलणारे पालक हे याच गटात मोडत आहेत. स्वतःला वाईटपणा नको म्हणून आपल्या नातेवाईकचे नुकसान होऊ द्यायची हि कोणती वृत्ती?
आपल्या लहान मुलाचे फाजील लाड करून आपण त्याचे नुकसान करीत आहोत हे त्यांना कळत नाही का?
वाचने
29884
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
अगदी बरोबर...
In reply to . by आशु जोग
खरं आहे डॉक्टर! असाच अनुभव
हा हा हा !!!
तुमचे बरोबर आहे पण...
.
In reply to तुमचे बरोबर आहे पण... by ज्ञानोबाचे पैजार
अरे कंबख्त...
In reply to . by आशु जोग
अरे कंबख्त... तूने पी ही नही!
In reply to अरे कंबख्त... by वामन देशमुख
हा हा हा...
In reply to अरे कंबख्त... तूने पी ही नही! by बॅटमॅन
पैजारबुवांशी सहस्रवेळा सहमत.
In reply to तुमचे बरोबर आहे पण... by ज्ञानोबाचे पैजार
पेपरात दिलखुलास सदरे लिहिणारे
In reply to पैजारबुवांशी सहस्रवेळा सहमत. by गवि
एकंदरीतच मुलांना योग्य
In reply to पेपरात दिलखुलास सदरे लिहिणारे by राजेश घासकडवी
मार्केट झालं नव्हतं हा मुख्य
In reply to एकंदरीतच मुलांना योग्य by विश्वनाथ मेहेंदळे
पैजारबुवा
In reply to तुमचे बरोबर आहे पण... by ज्ञानोबाचे पैजार
कौतुक कोवळं बेंबीला आवळं.
बेंबीला आवळं?
In reply to कौतुक कोवळं बेंबीला आवळं. by नगरीनिरंजन
त
'व्यावसायिक आपत्ती' आहे, बाकी
अतिवास ताई
In reply to 'व्यावसायिक आपत्ती' आहे, बाकी by आतिवास
केवळ मला लहानपणा पासून ओळखता
In reply to अतिवास ताई by सुबोध खरे
दुसरे टोक
अर्थात, सार्वजनिक ठिकाणी,
.
In reply to अर्थात, सार्वजनिक ठिकाणी, by राजेश घासकडवी
लेखन नेहमीप्रमाणेच आवडले हो
खाजगी आयुष्य.
आणिबाणीची परिस्थिती. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा.
In reply to खाजगी आयुष्य. by प्रभाकर पेठकर
.
In reply to आणिबाणीची परिस्थिती. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा. by सुबोध खरे
रुग्ण आणि आणिबाणी.
In reply to आणिबाणीची परिस्थिती. डॉक्टर २४ तास उपलब्ध असावा. by सुबोध खरे
.
लिखाण आवडले
दैवी देणगी
लेख पटला आणि आवडला. पैंजार,
लहान मुलांना चांगल्या सवयी
लेख आवडला आणि पटला. लाडानं
+१००% सहमत, आइ बाबा चोकलेट
In reply to लेख आवडला आणि पटला. लाडानं by चावटमेला
नेहेमीप्रमाणे
लेखन आवडले...
डो़क्टर साहेब ..
In reply to लेखन आवडले... by मदनबाण
हा हा हा
In reply to डो़क्टर साहेब .. by विटेकर
"सस्ती चीज और अच्छी चीज मी फरक होता है
In reply to हा हा हा by योगी९००
१) (NECESSITY) आवश्यकता यात
In reply to "सस्ती चीज और अच्छी चीज मी फरक होता है by सुबोध खरे
व्यक्तिसापेक्ष
In reply to १) (NECESSITY) आवश्यकता यात by प्रभाकर पेठकर
लग्न आणि कार खरेदी.
In reply to व्यक्तिसापेक्ष by सुबोध खरे
लहान मुलांना लावलेल्या सवयी
सुबोध सर, तुम्ही काही दिवस आमच्या सदाशिव पेठेत रहायला या.....
कळकळीने सल्ला
In reply to सुबोध सर, तुम्ही काही दिवस आमच्या सदाशिव पेठेत रहायला या..... by बाबा पाटील
मुळ मुद्दा राहुद्या आता ! मी
In reply to कळकळीने सल्ला by सुबोध खरे
येस मादाम
In reply to मुळ मुद्दा राहुद्या आता ! मी by शिल्पा ब
बायकांना असले प्रश्न विचारीत
In reply to येस मादाम by सुबोध खरे
लोल +१
In reply to बायकांना असले प्रश्न विचारीत by शिल्पा ब
काही बोलणे धोक्याचे आहे यावर,
In reply to बायकांना असले प्रश्न विचारीत by शिल्पा ब
महत्प्रयासाने गप्प बसलो आहे
In reply to काही बोलणे धोक्याचे आहे यावर, by बॅटमॅन
छान विषय....
मस्त लेख...
परवाच घरी एक मित्र त्याच्या
In reply to मस्त लेख... by दादा कोंडके
नशीब
In reply to परवाच घरी एक मित्र त्याच्या by मदनबाण
(उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या)
In reply to मस्त लेख... by दादा कोंडके
(उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या)
In reply to (उगाच कानफाडीत मारावं असं वाटणार्या) by सुबोध खरे
डॉक्टर
.
मानवी स्वभाव बघितला तर या
जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक
In reply to मानवी स्वभाव बघितला तर या by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to जिवनावश्यक सेवा पुरवणारा व्यावसायिक by सुबोध खरे
महत्वपूर्ण लेख आणि विचार विनिमय
खुप सुन्दर
भारतीय लोकांना एखाद्या
चर्चेच्या ओघात अनेक
In reply to भारतीय लोकांना एखाद्या by निनाद मुक्काम …
व्यवसायाबद्दल कुतूहल
In reply to भारतीय लोकांना एखाद्या by निनाद मुक्काम …
शेवटचा उपाय म्हणून ते डॉक्टरांची मदत अपेक्षित असतात.
मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक