Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सार्थबोध on Wed, 07/24/2013 - 09:26
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे; जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील, त्यांच्या वाटेला मी जाणार नाही. हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना; कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते. उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल, "पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे. जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे, जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत, चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. - सार्थबोध
  • Log in or register to post comments
  • 24070 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on गुरुवार, 07/25/2013 - 09:03

Permalink

देवा! पाहतोयस ना?

देवा! पाहतोयस ना?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/25/2013 - 12:15

Permalink

बाकी काही असो, कुर्ट गोडेल

बाकी काही असो, कुर्ट गोडेल नामक गणितीने देवाचे अस्तित्व गणिती पद्धतीने सिद्ध करून दाखवले आहे. http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof त्यामुळे चक्क गणिताने देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/25/2013 - 12:26

In reply to बाकी काही असो, कुर्ट गोडेल by बॅटमॅन

Permalink

या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही

या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही जिलबी बेशर्त मागे घ्यावीच लागेल म्हणा बाकी.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on गुरुवार, 07/25/2013 - 13:32

Permalink

या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही

अगदि अगदि.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/25/2013 - 23:39

Permalink

कलियुगाची चिंता कशाला?

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ असं भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगातच सांगितलं आहे. आणि आता कलीयुगातसुद्धा भगवान महाविष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत. शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः। भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति।। शम्भल नावाच्या गावाच्या ब्राम्हण प्रमुखाच्या घरी भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Fri, 07/26/2013 - 03:48

Permalink

चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.

ह्यावेळ्ची चारधामाची यात्रा चुकवलात. Direct संपर्क होता.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Fri, 07/26/2013 - 13:13

In reply to चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. by NiluMP

Permalink

त्या साठि

चारधाम यात्रेची गरज नाही हे योग्य वेळ आल्याशिवाय होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 07/26/2013 - 13:38

Permalink

कठीण आहे बुवा! इश्वर या

कठीण आहे बुवा! इश्वर या संकल्पनेचे स्थान आपल्या मेंदुत आहे. तिथे संपर्क असला म्हणजे झाले. आणी अस्तोच तो. इश्वर ही संकल्पना आहे हे मानणे आणि इश्वर मानणे यात फरक आहेच ना? आपण मेलो कि तो संपर्क तुटतो. असो आपण मेलो जग बुडाल.इश्वर माना नका मानु जगाच्या रहटगाडग्यात काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/26/2013 - 14:04

Permalink

याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही.

कारलं फाय केल्यावर त्यातला कडूपणा निघून जातो तरीही मला कारलं आवडत नाही हे उदाहरण खोलवर रुजलेल्या धारणांबाबत तितकंस लागू होत नाही. मनाचा फंडा असा आहे "समझ आचरणमे बदल जाती है" एकदा कळलं आणि पटलं की `देव कल्पना आहे' आणि मनाशिवाय आणि धारणेशिवाय त्याला कुठेही अस्तित्व नाही की विषय संपतो. मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही. याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार? पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या). अर्थात, आकलन निर्विवादपणे मांडायचा प्रयत्न होतो कारण ज्याला ते पटेल त्याचा वेळ, पैसा आणि एनर्जी वाचणार असते. आणि त्याही पुढे जाऊन वैज्ञानिक नाही झाला तरी वास्तविक दृष्टीकोन निर्माण होण्याची शक्यता असते. या गोष्टींच्या सामाजिक आणि जागतिक परिमाणांवर (धर्म, युद्ध, जातीय आणि धार्मिक कलह, भारताची (या धारणांमुळे काही प्रमाणात तरी निश्चितपणे ओढवलेली सध्याची अनिर्बंध स्थिती) ; `देवाला रिटायर का करा?' या पोस्टवर चर्चा झाली आहे. आता प्रश्न असा आहे : पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या पण जनमानसाची अवस्था द्विधा होते. `देव कल्पना आहे' याचा प्रतिवाद त्यांना करता येत नाही आणि ते मान्य करणं झेपत नाही. इथपर्यंत ठीक आहे. त्यामुळेच मी लेखमालेतल्या पहिल्या लेखात नामसाधनेवर चर्चेला तयार नव्हतो, तुम्ही करा तुमची साधना. आता मी नुसतं `बॅक-ट्रॅक' या प्रोसेसवर लिहीलं असतं तर लोक `नामसाधना हा संतमहंतांनी सांगितलेला मनःशांतीचा सोपा मार्ग आहे' असं ठासून सांगणार. त्यामुळे प्रकियेतला नक्की दोष मला विशद करावा लागतो. मग व्यक्तिगत प्रतिसाद सुरु होतात. मी कधीही व्यक्तिगत सुरुवात केलेली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/26/2013 - 14:28

In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर

Permalink

एका गणितीने देवाचे अस्तित्व

एका गणितीने देवाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्याला काँट्रॅडिक्ट करा. बघू गणितापुढे शब्दबुडबुडे कसे चालतात ते. http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 07/26/2013 - 19:15

In reply to एका गणितीने देवाचे अस्तित्व by बॅटमॅन

Permalink

त्याच विकीपानावरचं हे

त्याच विकीपानावरचं हे
"The argument does not, to a modern mind, seem very convincing, but it is easier to feel convinced that it must be fallacious than it is to find out precisely where the fallacy lies."
बाकी पटलं मला.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 07/27/2013 - 16:04

In reply to त्याच विकीपानावरचं हे by आदूबाळ

Permalink

अर्थात!!!

अर्थात!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 07/26/2013 - 14:59

In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर

Permalink

मग कोणत्याही कारणासाठी देवाला

मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही.
हे सुद्धा मनाचेच खेळ आहेत ना? मनच त्याला सांगत असत कि देवाला जबाबदार धर पुजापाठात वेळ घालव नवस बोल देवदर्शनाच्या रांगेत जा.....
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/26/2013 - 16:37

In reply to मग कोणत्याही कारणासाठी देवाला by प्रकाश घाटपांडे

Permalink

सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील?

देव या कल्पनेच्या भीतीनं (किंवा तो माझं रक्षण करेल, भलं करेल या भ्रमापायी) एखादा रोज देवदर्शनाला जातो, पूजा-अर्चा करतो, निरनिराळी व्रतवैकल्य करतो. (पण वरुन दाखवतो की त्यातनं मन:शांती लाभते, माझी श्रद्धा आहे... वगैरे). आता त्याला कळतं की ती फक्त त्याच्या मनाची कल्पना आहे. त्याला कुणी सांगितलं नसतं तर त्यानं असा वेळ घालवला नसता. काम झालं! मनाच्या एका कप्प्यातून त्याची जाणीव मोकळी होते. त्याला विकासाचे नवे पर्याय उपलब्ध होतात, तोच वेळ, पैसा, उर्जा त्याला पेंडींग कामं, संगीत, खेळ, घरच्यांबरोबर वेळ घालवणं, नवं काही शिकणं यासाठी वापरता येते. मुख्य म्हणजे हाताबाहेर जाणार्‍या प्रत्येक गोष्टीला देवाशी जोडायची सवय जाऊन विचारात वस्तुनिष्ठता येते. आणखी काय हवं?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/26/2013 - 17:49

In reply to सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील? by संजय क्षीरसागर

Permalink

मानसशास्त्र..

साहेब, तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/26/2013 - 17:59

In reply to मानसशास्त्र.. by धमाल मुलगा

Permalink

मनच जिथे भ्रम आहे तिथे

मनच जिथे भ्रम आहे तिथे मानसशास्त्र म्हंजे मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळच नव्हे काय धमुशेठ? =)) =)) *वरील उपमा ययातिकार श्री. भौसाहेब खांडेकर यांच्या ययाति कादंब्रीच्या उपसंहारातून घेतलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 07/26/2013 - 23:59

In reply to मनच जिथे भ्रम आहे तिथे by बॅटमॅन

Permalink

@मृगजळात लावलेल्या

@मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळच नव्हे काय धमुशेठ? >>>Image removed. धन्य...धन्य...आहेस रे वाघळा तू!!!... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on Fri, 07/26/2013 - 23:41

In reply to सगळेच कसे मनाचे खेळ म्हणता येतील? by संजय क्षीरसागर

Permalink

व्वा व्वा!

व्वा व्वा! क्या बात है| ------------------------------ सही: मला भांडायला लै आवडतं...
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Fri, 07/26/2013 - 15:42

In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर

Permalink

धर्म

या सन्कल्पनेबद्दलची आपली व्याख्या काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 07/27/2013 - 14:12

In reply to याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. by संजय क्षीरसागर

Permalink

याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो.....

याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार? ---टवाळी मोड सुरु "मना"बद्दल चे लेख वाचणे हा जालियजुलूम किंवा जालजुलूमच होय. --टवाळी मोड समाप्त
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 07/26/2013 - 15:36

Permalink

अगागागा... काय डेंजर काथ्या

अगागागा... काय डेंजर काथ्या कुटायलेत सगळीजणं! :-D ह्या धाग्यावर इतरांच सोडा,पण देवाचं बाकि काही खरं नै!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 07/26/2013 - 17:29

In reply to अगागागा... काय डेंजर काथ्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

आता....

केरळी लोक आता येथील काथ्या विकत घेउन नवी कॉयर म्याट फ्याकटरी काढणारेत म्हणे !
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 07/26/2013 - 15:50

Permalink

आपण यांना पाहिलतं का ? ;)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on Fri, 07/26/2013 - 16:58

Permalink

@दिलिप बिरुते

परमेश्वरानेही माणसं संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्याआधी परमेश्वरानेही त्याच्या बाजूने माणसाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावेत हे आपन कशच्या आधारावर म्हनत आहात कलेल का जरा ? " जो मला अनन्य भावाने शरन येतो त्याचा योग क्शेम मि चालवतो" अस भग्वन्तानि गितेत म्हनल आहे. आपन कधि अस शरन जातो का? दिवसातुन १ दा तरि आप्ल्यला देवाचि अथवन तरि येते का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 07/26/2013 - 20:05

In reply to @दिलिप बिरुते by म्हैस

Permalink

जाऊ दया हो...

अनन्य भावाने भगवंताला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सांगाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Sat, 07/27/2013 - 08:10

In reply to जाऊ दया हो... by धन्या

Permalink

एक सुचवण

याचे उत्तर भगवद्वीता १२.८ - १२.१२ या पाच श्लोकांमधे दिलेले आहे. (या पाच श्लोकांवरचे ज्ञानेश्वरीतील भाष्यही अवश्य वाचा)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Sat, 07/27/2013 - 06:26

Permalink

अनन्य म्हणजे ,,,,

अनन्य म्हनजे " अन्य " कोणीही नाही .. न - अन्य ! एका त्या परमेश्वरांशिवाय दुसरा कोणीही नाही . एकदा एका गिर्यारोहकाचा रस्ता चुकला, गटाबरोबर चुकामुक झाली. रात्रीची वे़ळ , हवामान अचानक बदलले.. घाबरलेल्या मनस्थितीत याचा पाय घसरला आणि हा कोसळला,केवळ कमरेशी लावलेल्या दोरांमुळे हवेत लट्कत राहीला. डोळ्यात बोटे घातली तरी दिसणार नाही असा अंधार ! जीव घेणी थंडी ! अत्यंत आर्ततेने त्याने देवाचा धावा केला.. देवा मला वाचव ! अचानक अंधारातून आवाज आला.. " दोर कापून टाक ! " हा आता आणखी घाबरला ,ही भुताटकी आहे की माझ्याच मनाचे खेळ आहेत ? पुन्हा आर्त धावा .. पुन्हा आवाज ! हा थकून गेला आणि त्याला ग्लानी आली , गात्रे काम करेनाशी झाली ! --दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या मित्रांना त्याचे प्रेत जमिनीपासून ५ फुटांवर... दोरावर लटकलेले .. सापडले. समर्थ म्हणतात.. देवावेगळे कोणी नाही | ऐसें बोलती सर्वही | परंतु त्यांची निष्ठा काही | तैसी नसे ||४-८-१९ दासबोध || आमची दोर कापायची तयारी आहे का? तरच तो योग्क्शेम चालवेल. सकल जीवांचा करितो सांभाळ , तुज मोकलील ऐसे नव्हे !
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 07/27/2013 - 18:36

Permalink

देवाला सर्वस्व मानायचे मात्र

देवाला सर्वस्व मानायचे मात्र त्याच्या भरोशावर रहायचे नाही. हे थोडे विचित्र वाटते. त्याबाबतीत असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हे जास्त प्रॅक्टीकल वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 07/28/2013 - 11:30

Permalink

विटेकर अन चौरा यांचे काही

विटेकर अन चौरा यांचे काही प्रतिसाद आवडले. बाकी नेहमीचंच "मी मी मी मी" याने आता मनोरंजन होत नै त्यामुळे अर्धवटरावांनाच विनंती की "जौद्या भौ !"
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 08/03/2013 - 11:16

Permalink

माझा तर

माझा तर देवाशी थेट संपर्क आहे. आणि तो सुद्धा, कुठल्याही देवळात न जाता आणि कधीही पूजा अर्चा न करता. त्याला सांगितलं की काम झालंच! पण ही सेवा इतरांना उपलब्ध नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by Gawade Jawahar… on Sat, 08/03/2013 - 11:28

Permalink

अंतर्मन हाच माझा देव

माझ्या मते माझे अंतर्मन हाच माझा देव आहे. संत तुकाराम व संत रामदास यांनीही मनालाच महत्व दिले आहे . जवाहरलाल
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Sat, 08/03/2013 - 12:12

In reply to अंतर्मन हाच माझा देव by Gawade Jawahar…

Permalink

अंतर्मन हाच माझा देव

बहिर्मनाचे काय? त्याला विसर्लात काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/03/2013 - 11:42

Permalink

There is no need for temples,

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com