Skip to main content

संपर्क ईश्वराचा

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 24/07/2013 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे; जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील, त्यांच्या वाटेला मी जाणार नाही. हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना; कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते. उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल, "पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे. जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे, जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत, चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. - सार्थबोध

वाचने 24101
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

>याचा अर्थ `तो' सगळं घडवतो पण `त्याला' कुणी घडवलेला नाही. भावभोळ्या लोकांसाठी ही कल्पना म्हणून ठीक आहे. हा तुमचा विशद मुद्दा केला आहे! कारण हे तुमचं म्हणणं आहे : >ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो. पुढे तर काय वाट्टेल ते ठोकलंय : >अच्छा. म्हणजे मनुष्यात एकतर काहि "घडवण्याची" क्षमताच नाहि, आणि असेल तर अपघाताने आलि व अपघातानेच विरुन जाईल नाहि का? पण आमच्या विज्ञानाला "अपघात" मंजुर नाहि ना..... = मनुष्यात घडवण्याची क्षमता नाही हा अर्थ कुठून काढला? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या तुमच्या विधानावर तुम्हाला सुसंगत प्रतिवाद करायचा आहे. आणि "आमच्या विज्ञानाला?" कुठे खेटताय? स्टीफन देव साफ नाकारतो. तो वैज्ञानिक असल्यानं कार्यकारणाचा शोध घेतो. "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" असल्या भोंगळ धारणा असल्या की कार्यकारणाचा संबंधच नाही! तुमचा देवंच मूळ कारण झाला, विषय संपला. >त्याचच उत्तर दिलय ना वर, कि देव कि कल्पना मानलं तर प्रश्न केवळ ट्रान्स्फर होईल व ते म्हणजे मूळतत्व आहे हे उमगलं तर प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकतर "घडवण्याची" क्षमता नावाचा प्रकारच नाहि, असलाच तो सदा-सर्वदा विद्यमान आहे, इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ मनुष्याचं एक्झीस्ट्न्स... अशा बर्‍याचश्या मुद्द्यांवर स्टीफन साहेबांशी चर्चा करता येईल. = तुम्ही काय लिहीलंय ते कळतंय का ते प्रथम पाहा, स्टीफनशी कशावर चर्चा करणार? त्याचं म्हणणं तर स्पष्ट आहे "देव ही कल्पना मानणे! (म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे)" तुम्हाला तो उभं देखील करेल की नाही शंका आहे. >मनाबाहेरुन कोणि मनाला "ऐच्छीक" कंट्रोल करतं या विनोदावर ते प्रचंड हसतील हे नक्की. = येस! मनाला ऐच्छिक करण्यासाठी सुसंगत वैचारिक क्षमता लागते... आणि "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या भक्तीमार्गीयांच्या `महान कल्पनेवर' तुम्ही स्टीफनशी चर्चा करणार हा तर या शतकातला सर्वात मोठा विनोद होईल. >आणि भक्तांनी तर विज्ञानाच्या नादी लागणं बरं "......कारण ज्याला विचार करण्याचच वावडं आहे त्याने विज्ञानाच्या मागे लागुन काहि फायदाच नाहि." काय विचार आहे तुमच्याकडे? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" हा विचार नाही धारणा आहे. >आता कसं बोललात... संजय क्षीरसागर ( व अर्धवटराव देखील) आयडी धारण करणारे व्यक्ती १) निर्वैयक्तीक नाहित २) स्थल-काल निरपेक्ष नाहित ३) त्यांच्या माय बापांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची वारंवारीता शक्य नाहित. म्हणजे एकतर तुम्ही-आम्हि अस्तित्वात नाहि किंवा मग विज्ञान खोटं पडलं म्हणा कि इतका पोकळ विचार असू शकतो? वैज्ञानिक सत्य म्हणजे व्यक्ती नाही, नियम. उदा. गुरुत्त्वाकर्षण हा नियम आहे, व्यक्ती नाही. एकतर तुम्हाला मुद्देसूद चर्चा करता येत नाही कारण तुम्ही कोणतीही गोष्ट कुठेही जोडता आणि त्यात तुमचे फंडाच इतके गंडलेयत की बोलायची सोय नाही. माझं लेखन तुम्हाला कळत नाही याचं खरं कारण ते आहे. हा मुद्दा मी आणणार नव्हतो पण माझ्या लेखाचा विषय तुम्ही काढल्यामुळे लिहावं लागलं.

In reply to by संजय क्षीरसागर

तार्कीक प्रतिवाद करता येत नसेल तर सरळ न्यायाधीशाची खुर्ची पकडायची आणि दुसर्‍याला भोंगळ, पराभूत वगैरे ठरवुन मोकळं व्हायचं हे तुमची नेहमीची स्टाईल. त्यालाच अनुसरुन मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे. >>पुढे तर काय वाट्टेल ते ठोकलंय : -- आले न्यायधीश महोदय. मी अगोदरच म्हटलं होतं... दुसर्‍याचं म्हणणं काय आहे हे जर कळत नसेल तर त्यावर विचार करणं हि साधी पद्धत आहे व त्याला "ठोकुन देणे" सारख्या वाटाण्याच्या अक्षता लावणे हि अत्यंत साधी पद्धत आहे... विचार करायचा कंटाळा आणि काय. >>"ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या तुमच्या विधानावर तुम्हाला सुसंगत प्रतिवाद करायचा आहे. -- अर्थात. आणि ते समजुन घेण्याकरता "घडवण्याची क्षमता" हि मनुष्य निर्मीत नाहि तर ति मनुष्याला "मिळाली" आहे हे कळणं आवश्यक आहे. पुढील तर्कसंगतीच्या विश्लेषणाची ति सुरुवात आहे. पण विचार करण्याचं वावडं असेल तर तर्क कसे कळतील? >>आणि "आमच्या विज्ञानाला?" कुठे खेटताय? -- विज्ञानालाच खेटतोय, आणखी कुठे. कारण काय ना, आम्हि "विचार करणे किंवा जगणे" करत नाहि, तर विचारपूर्वक जगतो... तसा प्रयत्न करतो म्हणा हवं तर. विज्ञानाला ते कंपल्सरी आहे ना... तिथे विचार न करुन भागत नाहि. >> स्टीफन देव साफ नाकारतो. -- हो ना. पण त्याने मनाबाहेरुन मनाला ऐच्छीक कंट्रोल करणारं तत्वज्ञान अगदी मनापासुन स्विकारलं असं ऐकलं कुठेतरी... बाय द वे, स्टीफन "देव" या "कल्पनेला" नाकारतो... कारण धर्मग्रंथ प्रणीत नियमांतर्गत जि़ज्ञासा नाकारणारी दैवी व्यवस्था त्याला अस्वस्थ करते. मूलतत्वाच्या शोधात स्टीफनचे मन देखील धावत असतं (सृष्टीचा आरंभ बिंदु मानला जाणारं बीग बँग याच मूलतत्वाच्या शोधाची अभिव्यक्ती आहे) आणि त्याकरता तो आपल्या मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती वापरतो. विचार करण्यात कंजुसपणा त्याला खपत नसावा. >> तो वैज्ञानिक असल्यानं कार्यकारणाचा शोध घेतो. -- हो तर. आणि त्याकरता त्याला विचार करावा लागतो. आणि गंमत म्हणजे जो जगतो देखील... भन्नाट आहे ना तो?? >> "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" असल्या भोंगळ धारणा असल्या की कार्यकारणाचा संबंधच नाही! तुमचा देवंच मूळ कारण झाला, विषय संपला. -- विचार करायचा कंटाळा असला तर तसंही कार्यकारण वगैरे शब्दांचा काहि अर्थ उरत नाहि. आपल्या करता एखादा विषय संपला तरी दुसर्‍यकरता ति एक वैचारीक श्रुंखला असेल हे उमगायला थोडा कॉमनसेन्स लागतो. तिथेही कंजुशी केली कि मग दुसर्‍यांना भोंगळ वगैरे ठरवुन आपण न्यायधिशाची खुर्ची उबवायला मोकळे... झकास. >>= तुम्ही काय लिहीलंय ते कळतंय का ते प्रथम पाहा, स्टीफनशी कशावर चर्चा करणार? -- यंदा तुम्हाला चान्स दिला विचार करायचा. नेहमीप्रमाणे तुम्ही तो घालवला... असो आश्चर्य नाहि वाटत आता. राहिला मुद्दा स्टीफनशी चर्चा करायचा, तर बातोबातोमे विषय रंगेलच. >>त्याचं म्हणणं तर स्पष्ट आहे "देव ही कल्पना मानणे! (म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे)" तुम्हाला तो उभं देखील करेल की नाही शंका आहे. -- आपण स्टीफनला मनाच्याबाहेरुन ऐच्छीक कंट्रोल करायचे क्लासेस देऊन आले वाटतं. आपल्याला कुठे उभं केलं त्याने? >>= येस! मनाला ऐच्छिक करण्यासाठी सुसंगत वैचारिक क्षमता लागते... -- "क्षमता" ऐवजी "तिलांजली" म्हणायचं असेल तुम्हाला. >>"ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या भक्तीमार्गीयांच्या `महान कल्पनेवर' तुम्ही स्टीफनशी चर्चा करणार हा तर या शतकातला सर्वात मोठा विनोद होईल. -- हम्म्म... आता तुम्ही कॉमेडी सर्कस मिपावर चालवलीच आहे... तेंव्हा आम्हालाही थोडं स्फुरण चढलं... >>काय विचार आहे तुमच्याकडे? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" हा विचार नाही धारणा आहे. -- तुमच्या करता असेल ना ति धारणा... आम्हि कुठे नाहि म्हणतोय?? पण आमच्या करता तो एक विचार आहे... आता एव्हढं स्वातंत्र्य तरी घेऊ देत कि. >>वैज्ञानिक सत्य म्हणजे व्यक्ती नाही, नियम. -- अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. आम्हाला वाटायचं कि वैज्ञानीक सत्य म्हणजे कार्यकारण पद्धतीनं दिलेले एक्सप्लनेशन. चला. आणखी एक व्याख्या मिळाली. पण आम्हि या व्याख्येवर विचार करु... एकदम तुम्हाला भोंगळ वगैरे म्हणणार नाहि. >>उदा. गुरुत्त्वाकर्षण हा नियम आहे, व्यक्ती नाही. -- धत तेरे कि. गुरुत्वाकर्षण म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं बल, ज्याचं कार्यकारणाने एक्स्प्लनेशन देता येतं, असं वाटायचं मला. तो नियम आहे होय? यावर पण आम्हि विचार करु. >> एकतर तुम्हाला मुद्देसूद चर्चा करता येत नाही कारण तुम्ही कोणतीही गोष्ट कुठेही जोडता आणि त्यात तुमचे फंडाच इतके गंडलेयत की बोलायची सोय नाही. -- आता कसं एकदम ओरीजनल तुम्ही बोलल्यासारखं वाटतय :) न्यायधीशमहोदयांचा आवाज कसा खुलुन आलाय, व्वा. अर्थात, आमच्या मुद्द्यांची जोड आणि फोड करायला थोडा विचार करायला लागेल... त्याकरता तुमची तयारीच नाहि म्हटल्यावर आणखी काय एक्सपेक्ट करणार. >>माझं लेखन तुम्हाला कळत नाही याचं खरं कारण ते आहे. हा मुद्दा मी आणणार नव्हतो पण माझ्या लेखाचा विषय तुम्ही काढल्यामुळे लिहावं लागलं. -- त्यात तुमची चुक नाहि हो. तुम्ही तुमच्या मनाला हे पटवुन दिलय कि त्याचे मनाबाहेरुन ऐच्छीक कंट्रोलींग होतेय. स्वतःच्या मनाची इतकी फसगत तुम्ही स्विकारल्यामुळे त्यातल्या विसंगती तुम्हाला दिसणारच नाहित... व इतरांनी त्या दाखवुन दिल्या तर त्यांना आपले लेखन कळत नाहि हे मनाला पटवुन देण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहि. इट्स ऑल युअर माईंड ड्युड. मनाची हि बंधन तुम्ही टाळु शकत नाहि. पर्सेप्शन्स ड्राईव्ह यु. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

माझा स्टीफन साहेब काय म्हणतात याचाशी कधी संबंध आला नाही. पण ढोबळपणाने हिंदू मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा मी वाचलेला भाग पुढीलप्रमाणे... अगोदर अगदी निश्चळ निर्विकार होते,, त्यामध्ये हलचाल झाली ( का? माहीत नाही) त्याला एकोहं बहुस्याम व्हावे वाट्ले.. त्यातून मूळ मायेची निर्मिती - तिथूनच प्रकृती किंवा गुणक्षोभिणी- त्यातून अष्ट्धा प्रकॄती ( त्रिगुण +पंचमहाभूते ) --त्यातून पुढची जीवसृष्टी .चारी खाणी चौर्यांशी लक्ष जीव योनी... आणि शेवटी महाप्रलयानंतर हे सारे उलट्या क्रमाने नष्ट हो़ईल. जे शिल्लक राहील ते परब्र्ह्म.. तोच् खरा ईश्वर / खरा देव / थोरला देव / परमात्मा ! जो विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी होता आनि विनाशानंतर ही असणार आहे ! आणि सारे विश्व व्यापून आहे. ही सारी मायिक जीव सृष्टी ज्या जाणीवेमुळे चालते .. ती जगज्जोती ही त्या परमात्म्याचा ( अविनाशी तत्व) अंश आहे. तोच आपला अथबा जीवांचा अंतरात्मा ! .. बाकी सारे नाश पावणार आहे. ( यामध्ये विविध पंथांच्या मान्यतेनुसार किरकोळ भेद आहेत. वरिल सांगणे सांख्य मतांप्रमाणे आहे. )

In reply to by प्रभाकर पेठकर

अरे बाप्रे!!! माउने मजबुत बटर हादडुन बमचिक बमचिक केल्यामुळे सध्या लांडगा मागे लागलेला दिसतोय ! ;) (बोका) ;)

In reply to by कवितानागेश

माऊ ईतकी घाबरुन जावु नकोस कि अध्यात्मावरुन ईसापनीतिवर उडि मारु नकोस,हे सर्व होण्यासाठी लाखो कोटी वर्ष जावे लागतात,अशी किति युग येवुन जतिल याची काही कल्पना नाही,कारण आपले वारकर्याचे दैवत गेली २८ युगे भक्तान्साठी ठाम उभे आहे,वीटेकर काका बरोबर ना?

In reply to by अनिरुद्ध प

येस... यू आर म्हणिंग राईट्ट ! "Nimesh" is the time it takes to blink an eye. This is the smallest unit of time (similar to seconds). Fifteen Nimesh add up to one "Kashth". Thirty Kashth's equal a "Kaal", and thirty Kaal's make a "Muhurt". Thirty Muhurt's sum up to a "Ahoratr". One Ahoratr constitutes a day. Thus there are thirty Muhurts in a day (or in one Ahoratr) – fifteen each for day and night. A God Ahoratr (day) equals one man year. The first six man months- when Gods have their first half of a day is called "Uttar Yaan" and the next six man months - when Gods have their night is called "Dakshin Yaan". Three hundred and sixty human years equal one God year. Thus 12,000 God years equal 4,320,000 man years. This is a "Maha Yug". There are four major Yugas or periods/eras. Satya Yug, Tret Yug, Dvapar Yug and Kali Yug. Satya Yug lasts 1,440,000 man years; Tret Yug for 1,080,000 ; Dwapar Yug for 720, 000 and Kali Yug for 360,000 man years. In addition ,there are other time periods between these four Yugas. These periods are referred to as "Sandhyamsh" and they last for 720, 000 man years. Adding up the four Yugas and the Sandhyamsh we get a total of 4,320,000 man years or a Maha Yuga. One "Manvantr" equals seventy one Mahayugas. Thus there are 296,720,000 man years in a Manvantr. One "Kalp" equals a thousand Mahayugas. Thus there are 4,320,000,000 man years in a Kalp. One Kalp corresponds to one Brahma day ! Thus there are 8,640,000,000 man years in one day/night of Brahma. Between the time he opens his eyes- to start all over again. Time between creation and destruction. That is a count of 8.64 billion years !! (साभार - संजीव त्रिगुणी आणि के. रवि, ड्ल्लास ) मराठी करुन टंकायचा कंटाळा आला. क्श्मस्व!

In reply to by विटेकर

हि सगळी माहिती पन्चागात मराठीत लिहीलेली आहे,कदाचित आकडे वेगळे असु शकतिल तपासुन पहावे लागेल.

असा "संपर्क" कुठे करायची खरे म्ह्णजे काही आवश्यकता नाही. मी कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच त्या ईश्वराच संपर्क होय. बाह्य साधने अथवा गुरु या प्रवासांतील मैलाचे दगड अथवा मार्गदर्शक आहेत ( म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही ), त्यांचे साह्य होतेच होते पण अनुभुती ज्याची त्यानेच घ्यायची आहे. एकदा त्या सार्वभौम शक्तिचाच मी अंश आहे हे जाणले / तशी अनुभुती घेतली की तो संपर्क झाला असेच आहे. मग त्यामध्ये भक्तिमार्ग आहे , ज्ञान मार्ग आहे , कर्ममार्ग आहे पण जाण्याचे ठिकाण एकच आहे.
सत्याची कास; चांगले वागणे म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?.
अशी व्याख्या धर्माने केली आहे. चांगले वागणे म्हणजे धर्माने वागणे. धर्माने आखून दिलेल्या चौकटीत राहून उपभोग घेणे. त्याचा अतिरेक म्हणजे " ययाती" आणि अशाश्वतता आणि दु: ख !
वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल, "पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल.
याचे उत्तर कर्माच्या सिद्धांतात आहे. पापाचा घडा भरणे म्हणजे संचित संपून गेले आहे आणि आता भोगा ! आपण आपल्या समजुतीप्रमाणे निष़्कर्ष काढ्त असतो.प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ मिळते असेच वाईटाचे पण मिळते. कालावधीला आपण आपले परिमाण लावतो म्ह्णून आपल्याला वाटते असे कसे ?
परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय?
परमेश्वर काहीही करत नाही ! तुमचा कर्मांश तुम्हाला फळ देत असतो. तो दयाळु तर अजिबात नाही ! पण तो न्यायी आहे. त्याचेकडे कसलेच कर्तृत्व नाही. मना त्वाचि रे पूर्व संचित केले,तयांसारखे भोगणे प्राप्त झाले !
आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत, चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.
आपण बिल्कुल त्याचाच स्ंपर्क क्षेत्रात आहोत.आपला फोन बिझी असल्याने त्याला लाईन मिळत नाही !! अस्तु . प्राध्यापक बिरुटेची लाईन आवडली - सही म्हणून असायला हरकत नाही.. तेव्हा असे म्हणतो की ..
आणि हो कोणी लहान नाही आणि कोणी मोठे नाही आपण सारखे....काय चुभु असेल तर देऊ घेऊ आणि नाही पटलं तर सोडून देऊ. हाय काय अन नाय काय.

In reply to by अग्निकोल्हा

शिवाय कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे वाचून मला फार आनंद झालाय! ;) - मुलखाची आळशी माउ

In reply to by कवितानागेश

आता तुम्हि उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी अवश्य संपर्क करावा.

In reply to by कवितानागेश

कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे ऐकून आमचेही डोळे पाणावले. जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे, स्कॅम करणारे, इ.इ. अनेक पुण्यवान लोक नजरेसमोर आले.

In reply to by बॅटमॅन

जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे>>> ????? जमिन विकणे घोर पाप अहे काय? एका रात्रीत किंवा अजून बर्‍याच दिवसात गबर होणं पाप आहे का? =))

In reply to by कवितानागेश

पाप नै म्हणूनच पुण्यवान म्हणालो गं माऊ ;) गबर होणारे लोक अजून बाकीची पुण्यकर्मे करतात ती सगळ्यांना माहितीच असतील, वेगळे कशाला स्तवन करा =)) =))

In reply to by कवितानागेश

नाहीच वाईट! गब्बर होणार्‍यांच्या अन्य पुण्यकर्मांमुळे ते आठवले इतकेच. त्याचा गब्बर होण्याशी कैकदा संबंध असतो. पण अर्थातच-गब्बर होण्यात वाईट कैच नै.

In reply to by बॅटमॅन

म्हणजेच जे कोणी एका रात्रित गबर होणारे पुण्यवान असतात असे आप्ले मत आहे तर.

जो देतो तो देव, देव कोणी आकाशातला बाप किन्वा खान्द्यावरचा चित्र गुप्त नाही , बाकि विटेकर बरोबर सहमत

>>अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे; जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. -- मला तरी असं अजीबात वाटत नाहि. सध्या उपलब्ध प्रागैतेहासीक इतीहास हेच सांगतो कि आज मानव समाज संख्या दृष्टीने, भौतीक प्रगतीच्या दृष्टीने, वैज्ञानीक सत्याच्या दृष्टीने सर्वात जास्त प्रगत आहे. त्यामुळे त्यातली गुंतागुंत देखील प्रचंड आहे. त्याला बजबजपुरी कसं म्हणावं ? आजकाल माणसाचा तोल ढळलाय, ढळत चालला, हे देखील सत्य नाहि. माणुस नेहमी असाच होता. अगदी पुराणकाळातलं साहित्य (तो इतिहास मानला तर)देखील ऋषीमुनींच्या काम-क्रोधाचे आणि राज्यकर्त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेचे प्रदर्शन आहे. मग हे सगळं आज कलियुगातच होतय असं कसं म्हणता येईल? >>मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे, जेणे करून शंका समाधान होईल. -- येस. ज्याला खरच उत्तर शोधायचं आहे त्याला त्याच्यापरिने प्रयत्न करण्यावाचुन गत्यंतर नाहि. ज्याला त्याच्यशी काहिही घेणं देणं नाहि तो त्या भानगडीत तसंही पडणार नाहि. अर्धवटराव

कोण कलियुग? कोण देव?? कोण परमेश्वर??? धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया वापरून परमज्ञान मिळवून करून मो़क्षप्राप्ती करून घ्या ! :) कलियुगात अनेक गोष्टी सोप्या आहेत म्हणतात, त्यातलीच ही एक सोय म्हणावी काय? ;) (सगळ्यांनीच ह घ्या, हेवेसांनल)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया वापरून परमज्ञान मिळवून मो़क्षप्राप्ती करून घ्या ! :) कलियुगात अनेक गोष्टी सोप्या केलेल्या आहेत म्हणतात, त्यातलीच ही एक सोय म्हणावी काय? ;) (सगळ्यांनीच ह घ्या, हेवेसांनल)

बाकी काही असो, कुर्ट गोडेल नामक गणितीने देवाचे अस्तित्व गणिती पद्धतीने सिद्ध करून दाखवले आहे. http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof त्यामुळे चक्क गणिताने देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे =)) =))

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ असं भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगातच सांगितलं आहे. आणि आता कलीयुगातसुद्धा भगवान महाविष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत. शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः। भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति।। शम्भल नावाच्या गावाच्या ब्राम्हण प्रमुखाच्या घरी भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत.

कठीण आहे बुवा! इश्वर या संकल्पनेचे स्थान आपल्या मेंदुत आहे. तिथे संपर्क असला म्हणजे झाले. आणी अस्तोच तो. इश्वर ही संकल्पना आहे हे मानणे आणि इश्वर मानणे यात फरक आहेच ना? आपण मेलो कि तो संपर्क तुटतो. असो आपण मेलो जग बुडाल.इश्वर माना नका मानु जगाच्या रहटगाडग्यात काही फरक पडत नाही.

कारलं फाय केल्यावर त्यातला कडूपणा निघून जातो तरीही मला कारलं आवडत नाही हे उदाहरण खोलवर रुजलेल्या धारणांबाबत तितकंस लागू होत नाही. मनाचा फंडा असा आहे "समझ आचरणमे बदल जाती है" एकदा कळलं आणि पटलं की `देव कल्पना आहे' आणि मनाशिवाय आणि धारणेशिवाय त्याला कुठेही अस्तित्व नाही की विषय संपतो. मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही. याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार? पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या). अर्थात, आकलन निर्विवादपणे मांडायचा प्रयत्न होतो कारण ज्याला ते पटेल त्याचा वेळ, पैसा आणि एनर्जी वाचणार असते. आणि त्याही पुढे जाऊन वैज्ञानिक नाही झाला तरी वास्तविक दृष्टीकोन निर्माण होण्याची शक्यता असते. या गोष्टींच्या सामाजिक आणि जागतिक परिमाणांवर (धर्म, युद्ध, जातीय आणि धार्मिक कलह, भारताची (या धारणांमुळे काही प्रमाणात तरी निश्चितपणे ओढवलेली सध्याची अनिर्बंध स्थिती) ; `देवाला रिटायर का करा?' या पोस्टवर चर्चा झाली आहे. आता प्रश्न असा आहे : पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या पण जनमानसाची अवस्था द्विधा होते. `देव कल्पना आहे' याचा प्रतिवाद त्यांना करता येत नाही आणि ते मान्य करणं झेपत नाही. इथपर्यंत ठीक आहे. त्यामुळेच मी लेखमालेतल्या पहिल्या लेखात नामसाधनेवर चर्चेला तयार नव्हतो, तुम्ही करा तुमची साधना. आता मी नुसतं `बॅक-ट्रॅक' या प्रोसेसवर लिहीलं असतं तर लोक `नामसाधना हा संतमहंतांनी सांगितलेला मनःशांतीचा सोपा मार्ग आहे' असं ठासून सांगणार. त्यामुळे प्रकियेतला नक्की दोष मला विशद करावा लागतो. मग व्यक्तिगत प्रतिसाद सुरु होतात. मी कधीही व्यक्तिगत सुरुवात केलेली नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

एका गणितीने देवाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्याला काँट्रॅडिक्ट करा. बघू गणितापुढे शब्दबुडबुडे कसे चालतात ते. http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

त्याच विकीपानावरचं हे
"The argument does not, to a modern mind, seem very convincing, but it is easier to feel convinced that it must be fallacious than it is to find out precisely where the fallacy lies."
बाकी पटलं मला.

In reply to by संजय क्षीरसागर

मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही.
हे सुद्धा मनाचेच खेळ आहेत ना? मनच त्याला सांगत असत कि देवाला जबाबदार धर पुजापाठात वेळ घालव नवस बोल देवदर्शनाच्या रांगेत जा.....

In reply to by प्रकाश घाटपांडे

देव या कल्पनेच्या भीतीनं (किंवा तो माझं रक्षण करेल, भलं करेल या भ्रमापायी) एखादा रोज देवदर्शनाला जातो, पूजा-अर्चा करतो, निरनिराळी व्रतवैकल्य करतो. (पण वरुन दाखवतो की त्यातनं मन:शांती लाभते, माझी श्रद्धा आहे... वगैरे). आता त्याला कळतं की ती फक्त त्याच्या मनाची कल्पना आहे. त्याला कुणी सांगितलं नसतं तर त्यानं असा वेळ घालवला नसता. काम झालं! मनाच्या एका कप्प्यातून त्याची जाणीव मोकळी होते. त्याला विकासाचे नवे पर्याय उपलब्ध होतात, तोच वेळ, पैसा, उर्जा त्याला पेंडींग कामं, संगीत, खेळ, घरच्यांबरोबर वेळ घालवणं, नवं काही शिकणं यासाठी वापरता येते. मुख्य म्हणजे हाताबाहेर जाणार्‍या प्रत्येक गोष्टीला देवाशी जोडायची सवय जाऊन विचारात वस्तुनिष्ठता येते. आणखी काय हवं?

In reply to by धमाल मुलगा

मनच जिथे भ्रम आहे तिथे मानसशास्त्र म्हंजे मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळच नव्हे काय धमुशेठ? =)) =)) *वरील उपमा ययातिकार श्री. भौसाहेब खांडेकर यांच्या ययाति कादंब्रीच्या उपसंहारातून घेतलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

@मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळच नव्हे काय धमुशेठ? >>>http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif धन्य...धन्य...आहेस रे वाघळा तू!!!... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

In reply to by संजय क्षीरसागर

या सन्कल्पनेबद्दलची आपली व्याख्या काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार? ---टवाळी मोड सुरु "मना"बद्दल चे लेख वाचणे हा जालियजुलूम किंवा जालजुलूमच होय. --टवाळी मोड समाप्त

अगागागा... काय डेंजर काथ्या कुटायलेत सगळीजणं! :-D ह्या धाग्यावर इतरांच सोडा,पण देवाचं बाकि काही खरं नै!!! =))

परमेश्वरानेही माणसं संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्याआधी परमेश्वरानेही त्याच्या बाजूने माणसाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावेत हे आपन कशच्या आधारावर म्हनत आहात कलेल का जरा ? " जो मला अनन्य भावाने शरन येतो त्याचा योग क्शेम मि चालवतो" अस भग्वन्तानि गितेत म्हनल आहे. आपन कधि अस शरन जातो का? दिवसातुन १ दा तरि आप्ल्यला देवाचि अथवन तरि येते का?

In reply to by धन्या

याचे उत्तर भगवद्वीता १२.८ - १२.१२ या पाच श्लोकांमधे दिलेले आहे. (या पाच श्लोकांवरचे ज्ञानेश्वरीतील भाष्यही अवश्य वाचा)

अनन्य म्हनजे " अन्य " कोणीही नाही .. न - अन्य ! एका त्या परमेश्वरांशिवाय दुसरा कोणीही नाही . एकदा एका गिर्यारोहकाचा रस्ता चुकला, गटाबरोबर चुकामुक झाली. रात्रीची वे़ळ , हवामान अचानक बदलले.. घाबरलेल्या मनस्थितीत याचा पाय घसरला आणि हा कोसळला,केवळ कमरेशी लावलेल्या दोरांमुळे हवेत लट्कत राहीला. डोळ्यात बोटे घातली तरी दिसणार नाही असा अंधार ! जीव घेणी थंडी ! अत्यंत आर्ततेने त्याने देवाचा धावा केला.. देवा मला वाचव ! अचानक अंधारातून आवाज आला.. " दोर कापून टाक ! " हा आता आणखी घाबरला ,ही भुताटकी आहे की माझ्याच मनाचे खेळ आहेत ? पुन्हा आर्त धावा .. पुन्हा आवाज ! हा थकून गेला आणि त्याला ग्लानी आली , गात्रे काम करेनाशी झाली ! --दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या मित्रांना त्याचे प्रेत जमिनीपासून ५ फुटांवर... दोरावर लटकलेले .. सापडले. समर्थ म्हणतात.. देवावेगळे कोणी नाही | ऐसें बोलती सर्वही | परंतु त्यांची निष्ठा काही | तैसी नसे ||४-८-१९ दासबोध || आमची दोर कापायची तयारी आहे का? तरच तो योग्क्शेम चालवेल. सकल जीवांचा करितो सांभाळ , तुज मोकलील ऐसे नव्हे !

देवाला सर्वस्व मानायचे मात्र त्याच्या भरोशावर रहायचे नाही. हे थोडे विचित्र वाटते. त्याबाबतीत असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हे जास्त प्रॅक्टीकल वाटते.

विटेकर अन चौरा यांचे काही प्रतिसाद आवडले. बाकी नेहमीचंच "मी मी मी मी" याने आता मनोरंजन होत नै त्यामुळे अर्धवटरावांनाच विनंती की "जौद्या भौ !"

माझा तर देवाशी थेट संपर्क आहे. आणि तो सुद्धा, कुठल्याही देवळात न जाता आणि कधीही पूजा अर्चा न करता. त्याला सांगितलं की काम झालंच! पण ही सेवा इतरांना उपलब्ध नाहीये.

माझ्या मते माझे अंतर्मन हाच माझा देव आहे. संत तुकाराम व संत रामदास यांनीही मनालाच महत्व दिले आहे . जवाहरलाल

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama