Skip to main content

दुनियादारी

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 20/07/2013 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं. वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच. पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल. मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे. मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे. अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं. संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.) पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या! एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33300
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

धन्यवाद बॅटमॅन. धन्या, पीअर प्रेशर, जाहीरातबाजीमुळे तर फरक पडतोच शिवाय काल असे लोक (तरुण, तरुणी) पण पाहिले की जे फक्त आणि फक्त चित्रपट बघण्यासाठी आले होते. भाग मिल्खा भाग हाऊसफुल आहे मग दुनियादारी द्या, दुनियादारी हाऊसफुल आहे मग रमय्या वस्तावया (का काय ?) तो द्या. त्यांना काहीही करुन कोणता का होईना पण चित्रपट बघायचा होता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

त्यांना काहीही करुन कोणता का होईना पण चित्रपट बघायचा होता.
नाहीतर अन-कूल , वेडे किंवा गावंढळ ठरतील ना! वीकेंडला पिच्चर नै पाहिला तर काय खाक वीकेंड साजरा केला???इ.इ.इ.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

असे लोक (तरुण, तरुणी) पण पाहिले की जे फक्त आणि फक्त चित्रपट बघण्यासाठी आले होते.
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, 'आज आपण पिक्चर बघायला जाऊ. मी एकदम शेवटच्या रांगेतील एकदम कोपर्‍यातील दोन तिकिटे काढतो.' प्रेयसी: 'आणि अशी तिकिटं नाही मिळाली तर?' प्रियकरः 'पिक्चर पाहूsss..!.'

चित्रपट बघुन ठरवीनार की तो चांगला आहे की वाईट ..... आणी श्रीरंग साहेब, चित्रपट निरीक्षण करताय ..तेव्हा किमान अपेक्षा आहे की spoiler alert ठेवावा .. ईथे बर्याच लोकांनी कांदबरी वाचली आहे पण चित्रपटात जे बदल केले गेले आहे असे ऊघड करायला नको होते..

चित्रपट पहायला गेलो. काल सलग चार थेटरात हाऊसफुल ऐकून परत आलोय. रिक्षेला दिलेल्या पैशात पिक्चर बघून झाला असता या विचारानेच दडपण आलं. दुनियादारी बघायला सकाळी साडेअकराला म्हणून आम्ही जे बाहेर पडलो ते इथे तरी मिळेल तिथे तरी मिळेल म्हणून पळापळ करुन शेवटी संध्याकाळी साडेसातच्या शोसाठी सुद्धा दुपारी दोन वाजता हाऊसफुल ऐकलं तेव्हा नाईलाजाने घर गाठलं.

In reply to by सूड

चित्रपटकर्त्यांचा खोटारडेपणा मला व्यक्तिशः कितीही आवडला नसला, तरी एका मराठी चित्रपटाबद्दल हे वाचून खरोखर खूपच बरं वाटलं. :)

In reply to by श्रीरंग

+११११११११११११. अगदी असेच म्हणतो. तेलुगु अन तमिळ पिच्चरसारखे मराठी पिच्चर कधी हौस्फुल्ल होतील देव जाणे.

In reply to by सूड

रिक्षेला दिलेल्या पैशात पिक्चर बघून झाला असता या विचारानेच दडपण आलं.
आधी इंटरनेटवरून तिकीटे काढावीत असे सुचवतो. ;)

चित्रपट पाहणारा वर्ग हा कादंबरी वाचणार्या वर्गा पेक्षा खूप मोठा आहे. आणि चित्रपट जर आर्थिक दृष्ट्या यशस्वी करायचा असेल तर तो class पेक्षा पिटातल्या public ला पटेल असा बनवावा लागतो... उत्तम उदाहरण म्हणजे "3 idiots ". अमीर खानचे पात्र चित्रपटात खूपच यशस्वी दाखवले आहे पण मूळ कादंबरी मध्ये तसे नाही दाखवले. मला वाटते कि दुनियादारी बाबतही तसेच काहीसे बदल केले गेले आहेत. आणि माझ्या तर सर्व मित्र मैत्रीणीना हा चित्रपट खूप आवडला ( वयोगट १६ ते २६ ) आणि त्यापैकी एकानेही कादंबरी वाचलेली नाही....

दुनियादारीवर चित्रपट येतोय हे समजताच तो बघायचा नाही हे ठरवले होते. माझ्या डोक्यात घट्ट बसलेली दुनियादारी मी स्वतः पडद्यावर आणायची म्हटली तरी जमणार नाही

श्रीरंगजींच्या ह्या परीक्षणानंतर "दुनियादारी" पुन्हा वाचली, आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक ह्यांची मजबूरी कळली.. सुशिंनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, ही एक अत्यंत फसवी कादंबरी आहे. वरकरणी धुमाकूळ, मस्ती असलेल्या ह्या कादंबरीत कुणाच्याच नशीबी सुखांत नाही. मग ते श्रेयस-मिनु-शिरीन असो, मीरा सरदेसाई-श्रेयस गोखले- एम. के. - तळवलकर असो, दिग्या - सुरेखा असो की अगदी एका प्रसंगापुरते आलेले अपर्णा भालेराव - मनीष जाधव असोत. श्रेयस शिरीनऐवजी मिनुकडे का जातो, शिरीनला श्रेयस आवडत असतांनाही ती धीरुभाईशी लग्न का करते, कादंबरीत शेवटी शेवटी मिनु आणि शिरीन दोघीही त्याच्याकडे यायला तयार असतांना श्रेयस त्यांना का नाही म्हणतो इत्यादी गोष्टी कादंबरी वाचल्यावरच कळतात. चित्रपटाला दुनियादारीतली भावनिक गुंतागुंत आणि बारकावे दाखवायला जमणं जवळपास अशक्य आहे.. पात्रांच्या परस्पर संबंधातली अंडरकरन्ट्स दाखवणंही फार कठीण. ते दाखवायला अभिनेत्याला, दिग्दर्शकाला जमायला पाहीजे, आणि प्रेक्षकांनाही ते "कन्व्हिंसींग" वाटलं पाहीजे.. कशाला एवढा त्रास घ्या मग? शिरवळकर थोडीच "समिक्षक-मान्य" होते.. करा मग राडा. (कहर म्हणजे "ह्या चित्रपटाच्या म्युजीक रिलीजला "सुहास" उपस्थित होते." हे वाचण्याचं दुर्दैव नशीबी आलंय. अरे, बातमी देतांना जरा अभ्यास / विचार कराल की नाही !? तर, आम्हाला चिन्मयबुवांची मजबूरी कळलीय. ती आम्ही समजूनही घेतोय. फक्त मायबाप रसिकांना एकच विनंती आहे, की चित्रपट पाहील्यावर ही कादंबरी वाचा. चित्रपटाचं यश त्यांचं त्यांना लखलाभ होवो, पण "दुनियादारी" म्हणजे "कॉलेजात जाणार्‍या पोरापोरांची टगेगिरी" असं चित्रपट पाहून वाटलं, तर तुम्ही चुकताय.. बाकी प्रकाशनापासून गेल्या एकतीस वर्षांत कॉलेजात जाणार्‍यांच्या आवडीनिवडीत आणि एकंदरीत सामाजिक परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक पडला, लेखकाला "त्याच्या लिखाणात काही साहित्यमुल्य आहे का?" म्हणून नाकारलं गेलं असलं तरी तितक्याच आवडीने दर तरुण पिढीला आवडणार्‍या "दुनियादारी"ला सर्टीफिकेट्सची गरज नाहीय, हेही तितकंच खरंय.. :-)

In reply to by चिगो

ज्जे बात! "उलटा प्रवास" म्हणजे चित्रपटावरून कादंबरीला जोखलं जाण्याची शक्यता लक्षातच आली नव्हती...

नशीब ह्यात "तांबडे बाबा" नाही घुसडले ;)

सुशि पासुन नेहमीच लांब राहिलो कारण ओरिजिनॅलिटी यथातथाच वाटायची... कारण आधिच इतरांचे अनुवादित साहित्य जास्तच वाचलं गेलं होतं. दुनियादारीच्या नादि मात्र न लागण्याचे एकमेव कारण म्हणजे भर तारुण्यात व्यसनाधिन बनलेला एक आप्त सदानकदा या कदंबरिच गुणगान करायचा म्हणुन तर विषेश तिटकारा. आजच हा चित्रपट बघुन आलो. रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा, खोलि सोडा आगापिछाच नसलेलि पात्रे वगैरे कमकुवत बाजु उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद यांच्या जोरावर शेवटपर्यंत बसणे सुसह्य करतो इतकच.

In reply to by अग्निकोल्हा

बाकी सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही ती अशाच काहीशा कारणांमुळे. कॉलेजात जास्तीत जास्त पोरे करू तरी काय शकणार-गँगबाजी. लिहा गँगबाजी. असे काहीसे वाटले. असो.

In reply to by बॅटमॅन

सुशि नै वाचले पण दुनियादारी वाचवली नाही अगदी अगदी. खूप बोलबाला असल्यानं एवढ्यातच ते पुस्तक आणलं गेलं पण मी कॉलेजात असतानाही ते भावलं नसतच. कुठेच कनेक्ट होत नव्हते. नुकतच झिम्माही वाचलं. नाटकाच्या संदर्भात असलेलं तरी कुठे सगळं आपण रिलेट करू शकतो? पण काहीतरी असं होतं की ज्यामध्ये थोडंफार गुंतता येईल. आता सिनेमाबद्दल जितकं जास्त बोललं जातय तितकं ते पुस्तक वाचावसं वाटण्याऐवजी नकोसं झालय. मला जसं वाचवलं नाही तसं आणखी कोणालातरी वाटलं म्हणून बरं वाटलं. ;)

In reply to by बॅटमॅन

माझ्या दुनियादारी कॉलेज लाईफ 'कसं असतं' यापेक्षा ते बहुसंख्यांना 'कसं असलेलं सांगायला आवडलं असतं' त्याचं वर्णन आहे. आणि त्या दृष्टीकोनातून पुस्तक नेमकं आहे!

In reply to by अग्निकोल्हा

उच्च निर्मीतिमुल्ये, सुरेख अभिनय व काही संवाद ? उच्च निर्मीतिमुल्ये ? चकचकीत कपडे आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असली की उच्च निर्मीतिमुल्ये ?? एक अंकुश चौधरीचा अभिनय सोडला तर इतर कोणी अभिनय केला आहे का ? >>रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा....यावर काहीच म्हणायचे नाहिये ..कारण मला एकहि व्यसन नसून , गुंडगिरी करत नसून देखील मला दुनियादारी आवडते

In reply to by कपिलमुनी

चकचकीत कपडे आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असली की उच्च निर्मीतिमुल्ये ??
आणखि काय असते ? तांत्रिक सफाइ अन स्पेशल इफेक्ट्स खरोखरच सुरेख आहेत. म्हणूनच चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बघताना अगदी फ्रेश वाटते. उगाच चायनिज फोन मधुन शूटिंग केलेल्या प्रिंटसारखे दिसणार्‍या अनेको मराठि चित्रपटांपेक्षा हजारपटिने सरस आहे.
रटाळ प्रेडिक्टेबल आउटडेटेड कथा....यावर काहीच म्हणायचे नाहिये ..कारण मला एकहि व्यसन नसून , गुंडगिरी करत नसून देखील मला दुनियादारी आवडते
मी चित्रपटाच्या कथेबाबत बोललोय कादंबरी न्हवे. तसही निव्वळ व्यसने व गुंडगिरी आहे या निकशावर मी चित्रपट चांगला अथवा वाइट हे ठरवत नाही. कथेचा गाभा कसा आहे हे महत्वाचे असते त्याला दिलेली फोडनी न्हवे. उदा. डि-डे चित्रपट, अतिशय बकवास वाटला.

दिग्याची इलेक्ट्रा आणि प्रीतमची क्लासिक दोन्ही मॉडेल नव्हते त्या काळात .. येझदी, जावा किंवा स्टँडर्ड बुलेट दाखवायला हवी होती

फक्त एकच म्हणेन तुम्ही 'दुनियादारी' मुळे बदलु शकता पण तुम्ही 'दुनियादारी' बदलु शकत नाही

'दुनियादारीच्या' हाऊस फुल्ल यशाच्या निमित्ताने आज झी टिव्हीच्या स्टुडिओत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात जो केक कापला गेला त्यावर 'हाऊस फुल्ल' चे स्पेलींग 'HOSE FULL'. असे पाहून हसावे की रडावे हेच कळेना. 'दुनियादारी'ची टिम आनंद जल्लोष साजरा करीत आहे आणि झी टिव्ही HOSE FULL चा केक मिरवते आहे असे केविलवाणे दृष्य झी २४ वर दाखविले जात आहे.

मी ह्या चित्रपटाच्या प्रिमीयरला गेले होते, पराच्या चेतावनीनंतरही. मनसोक्त शिव्या घालुन आले. कलाकारांनी ऐकल्याही. स्पेशली ज्तेंद्र जोशेए. मान वळवु वळवुन पाहत होता मागे. :ड

In reply to by प्रीत-मोहर

भारीच की ! "ना तुम जानो ना हम" नावाच्या भिक्कार पिक्चरच्या शो ला हेमा मालिनी आणि इशा देओल असताना आम्ही शिव्या घातल्या होत्या ..मग आम्हाला बाहेर काढला ... बाकी प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर "नशीबवान आहेत , सुटले !" असे भाव होते ..

In reply to by प्रीत-मोहर

हाहाहा! "काय सॉल्लिड पिक्चर आहे रे.. अगदी कादंबरीच वाचतोय असा फील आला!" असे म्हणून मित्राला टाळी दिली आणी अचानक लक्ष्त आलं, संजय जाधव अगदी शेजारीच उभे होते. एक ऑकवर्ड स्माईल देऊन निसटलो. सुरुवातीला दाखवलेली "नारबाची वाडी" चित्रपटाची झलक बरी वातली. चांगला असावा चित्रपट असं वाटतंय.

अतीरन्जक समीक्शा....... आणी धागाकर्त्याने म्हटल्या प्रमाणे जर सिनेमा एवढाच जर रटाळ अस्ता तर हाउस फुल चालल नसता...... नोटः दुनियादारी सिनेमा म्हणुन पहावा.... कादम्बरी सोबत तुलना न केलेली बर.

In reply to by रघुनाथ.केरकर

सिनेमा रटाळ असल्याचे कुठे म्हटले आहे जरा दाखवाल का? आणी कादंबरीबरोबर तुलना होणं सहाजीक आहे. कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत.

In reply to by श्रीरंग

कारन कादंबरीवरच सिनेमा बनवल्याचे, स्वतः चित्रपटकर्ते हज्जारदा टाहो फोडून सांगत आहेत. >> एकदम बरोबर......

काल पाहिला, चित्रपट चांगला वाटला…उर्मिला कानेटकर सोडली तर कॉलेजवयीन कोणीच वाटत नव्हत, श्रेयस आणि साई च्या भूमिकेत इतर कोणी कलाकार घेता आले असते तर चित्रपट अजून चांगला वाटला असता. बाकी दिग्या बेष्ट (कादंबरी वाचली नाही अजून)

In reply to by मालोजीराव

चित्रपट चांगला वाटला…उर्मिला कानेटकर सोडली तर कॉलेजवयीन कोणीच वाटत नव्हत, श्रेयस आणि साई च्या भूमिकेत इतर कोणी कलाकार घेता आले असते तर चित्रपट अजून चांगला वाटला असता. बाकी दिग्या बेष्ट
+१

In reply to by रघुनाथ.केरकर

?? काहीही.. चित्रपटाबाबत काय काय खटकलं ते स्पष्ट लिहिलंय मी. त्यात चित्रपट रटाळ असल्याचा सूर तुम्हाला कुठे जाणवला माहित नाही. असो..

दुनियादारी आताच पाहून आल्यावर अशी अवस्था झाली. a सुशिंच्या कथेची शक्य तितकी वाट लावण्यात आली आहे. (स्वगतः का? का?? का??? भाग मिल्खा भाग नैतर वूल्वरीन का नै पाहिलास?)

आपल्याला ब्वॉ चित्रपट आवडला. सुशि भक्तांना नाही आवडणार कदाचित. स्वप्नील जोशी कॉलेजकुमार नाही वाटत. पण शम्मी कप्पूर, धर्मेंद्र, गोंद्या, संजय दत्त यांना कॉलेजकुमार म्हणून सहन केल्यानंतर स्वप्नील जोशी फारसा वावगा वाटत नाही. कालेजात असताना मीही बर्‍यापैकी वजनदार होतो. अजुनही आहे. त्यामुळे श्रेयस तसा दाखवल्यास मला काहीच खटकत नाही. दिग्या म्हणुन अ़ंकुश चौधरी बरा वाटत नसेल तर त्याच्याऐवजी बरा वाटणारा चेहराच मराठीत नाही. दिग्या म्हणुन एखादा अनोळखी कलाकार चाललाच नसता त्यामुळे अंकुश चौधरीच योग्य आहे. उर्मिला कानेटकर खास दिसली आहे. ती कॉलेजातली देखील वाटते :) सई ताम्हणकर बेष्ट आहे. आपल्याला तर लै आवडली. सुशांत शेलारला वाया घालवला आहे आणि तो चित्रपटातल्या प्रीतमच्या क्यारेक्टरला शोभत नाही. गाणी उत्तम आहेत. जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही. सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती. ती वाचायला खुपच छान वाटते. त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. सुशिंच्या पुस्तकात असे होते अशी तुलना केली तरच चित्रपट खटकतो. पुस्तक न वाचलेल्या जनतेला तो आवडला असेल तर चित्रपट उत्तमच जमला आहे असे म्हणायला हरकत नाही. पुस्तक वाचलेल्या जनतेला तो आवडला नाही हे सुशिंचे यश. उद्या ३ इडियट्स फाइव्ह पॉईंट सारखा नाही म्हणुन कसे चालेल. माध्यम वेगळे आहे शेवटी.

In reply to by मृत्युन्जय

@जितेंद्र जोशीने अभिनय चांगला केला आहे. सुशिंचा साईनाथ वेगळा आहे म्हणुन जितेंद्र जोशीला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नाही.>>>> http://www.mimarathi.net/smile/congrats.gif @सुशिंची दुनियादारी चित्रपट माध्यमात रटाळ वाटली असती.त्यामुळे त्या माध्यमासाठी म्हणुन केलेले बदल खटकत नाहित. >>> ++++++११११११११

इतकं चर्चेत असणारं पुस्तक आपण वाचलेलं नाही हे लक्षात आलं होतं. पुण्यात आले तेव्हा योगायोगाने शेजा-यांच्याकडे हे पुस्तक सापडलं (त्यांच्या पुतणीने चित्रपट पाहून विकत घेतलं ..), हाताशी वेळ होता, मग वाचून काढलं. पुस्तक "ठीकठाक" आहे. वाचलं नसतं तरी चाललं असतं असं लक्षात आलं! चित्रपट पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पुस्तक आणि चित्रपट ही दोन वेगळी माध्यमं असताना अशा चर्चा होत राहतात पुस्तकाधारित सिनेमांवर - हे खूप रोचक आहे. त्याबाबत विचारांत पडले आहे :-)

माझे कालचे फेसबूक अपडेट _____________________ आज "दुनियादारी" बघितली..!! आय नो, बरेच उशीरा पाहिली.. पण तसे वाटले नाही.. आजही थिएटर हाऊसफुल्ल होते.. बरेच दिवसांनी एक चित्रपट अगदी आतवर भिडला, अगदी सुरुवातीपासूनच.. ईंटरव्हल कधी आलागेला कळलेच नाही आणि दि एण्डची पाटी लागली तरी टिकटिक डोक्यात वाजतच होती.. एखाद्या लव्हस्टोरीची नाही तर यारीदोस्तीची टिकटिक.. ज्याने आयुष्यातले चार दिवस जरी मित्रांच्या कट्ट्यावर घालवले असतील त्यावर हा चित्रपट असेच काहीसे गारुड करून जात असेल.. आमची तर वर्षे गेलेली.. स्वप्निल, सई आणि इतर सारेच सही, पण अंकुश चौधरीला दिग्याभाईच्या भुमिकेत बघून बरे वाटले.. पण पिक्चरच्या शेवटी त्याच डीएसपी बद्दल सर्वात जास्त वाईट वाटले.. एनीवेज, पिक्चरचे परीक्षण द्यायला मी इथे बसलो नाही.. पण अजून कोण इडियट असेल आपल्यात ज्याने अजून हा पिक्चर पाहिला नाही तर आजच तिकीट बूक करा आणि थिएटरमध्येच बघा.. मराठी पिक्चर आहे, पॉपकॉर्नच्या किंमतीपेक्षाही स्वस्तात पडेल तिकिट.. आणि म्हणूनच मी आज पॉपकॉर्नच खाल्ले नाहीत.. ;) .. विचार करतोय वाचलेल्या पैश्यात पुन्यांदा होऊन जाऊ दे.... तुझी माझी यारी, तर भोकात गेली दुनियादारी !! ___________________________ फेसबूक अपडेट संपले १५ ऑगस्टला पुन्हा जातोय दुनियादारीला.. :) आता तळटीप - पुस्तक मी वाचले नाही आणि त्या वादात मला पडायचे नाही :)

दुनियादारीने १५ कोटी च विक्रमी व्यवसाय केल्याची बातमी आजच समजली. एका मराठी चित्रपटाला मिळालेलं घवघवीत यश बघून अतीशय आनंद झाला.

In reply to by श्रीरंग

आमची वैयक्तिक मतं काहीही असोत, एका मराठी सिनेमानं इतका तगडा धंदा करुन दाखवला ह्याचं मात्र कौतुक आहे. :) टीम दुनियादारी, अभिनंदन!

In reply to by धमाल मुलगा

ऐसेच म्हणतो. पिच्चर पाहिला नाही, कदाचित पाहणारही नाही. पण असा तगडा धंदा मराठी पिच्चर करू शकले याचे लै कौतुक आहे राव.

काल दुनियादारी पाहिला,विमाननगर पुणे सारख्या तथाकथीत हुच्चाभ्रू सोसातटॆत असणाऱ्या फिनिक्स मल्टीप्लेक्स मध्ये मराठी पिक्चरचा सक्काळी सक्काळी दहाचा शो हाउसफुल्ल ,निच्छितच पिक्चर मध्ये दम आहे ……। पण ………… आयच्या गावात …सु. शिं च दुनियादारी वाचल असल्यामुळे असा वाटत होत की भोसडीचा दिग्दर्शक काय डोक्यावर पडला होता काय भेंडी………

In reply to by बाबा पाटील

सु. शिं च दुनियादारी वाचल असल्यामुळे असा वाटत होत की भोसडीचा दिग्दर्शक काय डोक्यावर पडला होता काय भेंडी………
दुनियादारी प्रेमींची ही प्रतिक्रिया सार्वत्रिक आहे. त्यामुळेच शिणुमा पहाण्याचा उत्साह मावळत चाललाय! पण दुनियादारीने केलेल्या जोरदार धंद्यामुळे म्हणूया हवं तर सुशिंच्या इतर कादंबर्‍यांकडे चित्रपट निर्मात्यांचं लक्ष गेलं तर फार बरं होईल. विशेषतः दारा बुलंद आणि मंदार पटवर्धन असलेल्या कादंबर्‍यांकडे.

मी पाहिला 'दुनियादारी'. खुप छान आहे. सु.शिं.ची कादंबरी पण वाचली...अजिबात आवडली नाही....टपोरी संवाद, अधांतरी कथानक. उगाचच ती कादंबरी वाचली, अस झालंय. नसती डोकेदुखी विकत घेतल्याचा मनस्ताप झाला मला.' असो, हे माझ मत आहे, आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते.

In reply to by मृणालिनी

कट्ट्यावरच सगळ जगच अधांतरी असतो हो . एथे फिक्स असते ती दोस्ती,अकरावी पासुन ते वैद्यकिय शिक्षणाची साडेपाच वर्ष अशी तब्बल ७ ते ८ वर्ष या कट्ट्यानेच तर जगवल राव,जो कट्टा जगला त्याच्या मनाचा हळवा कोपरा आहे ही कादंबरी....तुम्हाला नाही कळणार ते.....

मी पुस्तक वाचलेले नाही. श्रीरंग यांचा राग समजु शकते... ५ पॉइंट समवन वाचल्यानंतर जेव्हा ३ इडियट हा डोक्यात जाणारा चित्रपट बघितला तेव्हा मला सुध्दा असाच त्रास झाला होता... तारे जमीं पर मधे समंजस वाट्णारा अमीर खान, यात आपल्या शिक्षकांनाच अक्क्ल शिकवत होता... मोना सिंग आणि जावेद जाफ्री यांनी जो उच्छाद मांडला त्या बद्दल काय बोलणार.. आजच दुनियादारी पुस्तक मैत्रिणीकडुन मागवले आहे.. बघुया कसे वाटते ते.....