७०च्या दशकातला काळ.. स.प. महाविद्यालयाचा 'कट्टा', (कु?)प्रसिध्द कट्टा गँग, अतिशय जिवंत वाटाव्या अशा व्यक्तिरेखा, वेगवान, साचेबध्द कथा... सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' प्रचंड गाजली नसती तरच नवल होतं.
वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या या दुनियादारीवर येऊ घातलेला चित्रपट, संजय जाधव सारखा दिग्दर्शक, झी ने केलेलं जोरदार प्रमोशन, यामुळे प्रचंड उत्सुकता असणं व त्याकडून प्रचंड अपेक्षा असणं हेही ओघानी आलंच.
पण अशा अतिशय गाजलेल्या कलाकृतींना नीट प्रामाणीकपणे न हाताळल्यास चित्रपट किती फसू शकतो याची उदाहरणंही अगदी ताजीच आहेत (म्हैस, गोळाबेरीज, इत्या.). दुर्दैवाने, दुनियादारी या यादीत अजून भर घालतो, असेच म्हणावे लागेल.
मुंबईहून पुण्याला शिकायला आलेला, आई वडिलांकडून सदैव दुर्लक्षिला गेलेला, सरळमार्गी श्रेयस, त्याची रगेल डी.एस.पी आणी त्याच्या कट्टा गँगशी झालेली मैत्री, प्रेमप्रकरणं, प्रेमभंग, विरुध्द गँगबरोबरच्या कुरघोडि वगैरे.. नंतर स्वतःच्या आईवडिलांचा भूतकाळ उलगडल्यावर बदललेला दृष्टीकोण, इत्यादीनी भरलेली ही कथा वास्तवीक चित्रपटासाठीच लिहिली असावी की काय अशी वाटण्याजोगीच. पण असं असूनही पटकथा लेखकाला मूळ कथेला स्वतःची ठिगळं लावण्याचा मोह का झाला असावा.. आय मीन, अवदसा का आठवली असावी देव जाणे. मुळ कथेच्या एवढ्या निर्दयीपणे चिंधड्या उडवलेल्या क्वचितच पहायला मिळत असाव्यात. कट्टा गँगमध्ये स्वतःच्या कल्पनेतील एखादं पात्र घुसवणं, किंवा शिरीन पटेल ची शिरीन घाटगे करणं, इतपत कल्पनास्वातंत्र्य एक वेळ समजू शकतो.. पण मूळ पुस्तकात जी दोन पात्रं कधी एकमेकासमोर देखील येत नाहीत, त्या शिरीन व साईनाथ (हा मूळ कथेत दिग्याला थोडासा वचकून असणारा व छुप्या कुरापती करणारा दाखवला असला, तरी चित्रपटात मात्र आमदार पुत्र व चांगलाच धटिंगण दाखवलाय)या दोघांचं थेट लग्नच ठरलं असल्याचं दाखवणं म्हणजे कहरच आहे.
मूळ कथेत शिरीनचं ठरलेलं लग्न मोडल्यास अजून एक 'श्रेयस गोखले' तयार होऊ नये म्हणून स्वतः तिच्यापासून दूर होणारा श्रेयस, चित्रपटात मात्र भर लग्नमंडपात घुसून फोल्मी मारामार्या वगैरे करून थेट तिला पळवूनच नेतो. हि प्रेक्षकांची निव्वळ फसवणूक व कथेशी केलेली प्रतारणा नसून लेखकाचा सरळ सरळ केलेला अपमानच आहे. ज्यांनी शिरवळकरांच दुनियादारी वाचलंय, त्यांच्या डोक्यात तिडीक गेल्यावाचून राहणार नाही. जोडीला, मीनूला पटवण्यासाठी केलेले तद्दन फोल्मी स्टंट, आत्महत्येच्या प्रयत्नाची थाप वगैरे आचरटपणा आहेच. मूळ कथेत मनोरंजक प्रसंगांची, व नाट्याची कोणतीही कमतरता नसताना, नक्की कोणत्या अट्टहासापायी या सर्व प्रसंगांना बगल देऊन स्वतःच्या मनातले प्रसंग घुसवण्याचा बौध्दिक दरिद्रीपणा केला आहे, हे पटकथाकारच जाणोत. कथेची ही अवस्था, तर व्यक्तिचित्रणाचीही तितकीच बोंब. श्रेयस सरळ व समजूतदार असला तरी त्याला अत्यंत बावळट दाखवून त्या व्यक्तिरेखेतला जीवच काढून घेतला आहे. दिग्याशी थेट सामना शक्यतो टाळणारा साईनाथ इथे मात्र भलताच जिगरबाज व ताकदवान दाखवला आहे. त्यात उगाच त्याला आमदाराचा मुलगा वगैरे दाखवून नक्की कोणता कथाविस्तार झाला हे समजत नाही. दिग्याच एक त्यातल्या त्यात बरा जमून आला आहे.चिन्मय मांडलेकर सारख्या प्रतिभावान लेखकाने मूळ कथेची अशी माती करावी हे खरोखरच दुर्दैवी आहे.
अभिनयाच्या बाबतीत सर्वात जास्त वाव दिग्याच्या भूमिकेतल्या अंकुश चौधरीला आहे, आणी तो चांगलाच भाव खाऊनदेखील जातो. स्वप्नील जोशी कितीही चांगला अभिनेता असला तरी त्याला तरुण श्रेयसच्या भूमीकेत बघून हसावं का रडावं कळत नाही. अतिशय भीषण 'विग' घालून त्याला तरूण दाखवण्याच्या प्रयत्नाची तुलना 'चार्जशीट' वगैरेतल्या देव आनंदशीच होऊ शकते. सई ताम्हणकर ठीकठाक. उर्मिला कानेटकर / कोठारे ला सुंदर दिसणे, एवढाच रोल आहे, व तो ती व्यवस्थीत पार पाडते. वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी हजेरी लावून जातात. त्यात विशेष उल्लेखावं असं काही नाही. या तीनही व्यक्तिरेखा मूळ कथेत अधिक सखोल आहेत. पण शिरवळकरांच्या कथेपासून या कथानकाने कधीच फारकत घेतली असल्यामुळे त्याबाबत तरी काय लिहावं! जितेंद्र जोशी साईनाथच्या भूमिकेत पुरेसा ओंगळवाणा दिसतो व वागतो. दिग्दर्शकाला तेच अभिप्रेत असावं.
संगीत ही मात्र या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे यात शंकाच नाही. 'जिंदगी', व 'टिक टिक वाजते' ही गाणी आधिपासूनच गाजत आहेतच. त्याच बरोबर 'यारा यारा' व 'देवा तुझ्या गाभार्याला' ही गाणी देखील अतिशय श्रवणीय आहेत. एकूण सर्वच गीते निश्चितच संग्रही ठेवण्याजोगी आहेत. (अवांतर : 'टिक टिक वाजते' हे सुंदर व मनात घर करून राहणारं गाणं सोनू निगमच्या खिशात गेलेलं बघून, आता खरोखरच मराठी गायकांची वानवा असावी, का मराठी चित्रसृष्टीत मराठी गायकांनाच काम मिळेनासं झालं असावं, या विचारानी अंमळ अस्वस्थ व्हायला होतं. असो.)
पटकथे खालोखाल ढिसाळ कामगिरीत क्रमांक द्यायचे झाल्यास वेशभूषाकार व कला दिगदर्शक यांना विभागून द्यावा लागेल. विशेषतः स्वप्निल, जितेंद्र यांचे हास्यास्पद विग बघून थक्क व्हायला होतं. एकीकडे मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्यं अधिकाधिक उंची गाठत असताना, एखाद्या बालनाट्याला शोभावेत असे गरीब विग का वापरले असावेत, हे एक कोडंच आहे. आणि इतर पात्रं ७० च्या दशकात शोभतील अशा बेल बॉटम वगैरे कपड्यांनध्ये असताना, सई व उर्मिलाचा पेहेराव मात्र अगदी आजकालच्या मुलीसारखा. चित्रपटात कित्येक ठिकाणी ठळकपणे दिसणारे ब्रँड त्या काळात अस्तित्वातच नव्हते. असल्या ढोबळ चुका टाळायलाच हव्या होत्या!
एकूणात, मनोरंजनाच्या माफक अपेक्षा घेऊन गेलात, तर हा चित्रपट फारसा निराश करणार नाहे. पण तुम्ही जर शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचलं असेल, तर मात्र ही दुनियादारी पाहून मनःस्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
वाचने
33300
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद बॅटमॅन.
त्यांना काहीही करुन कोणता का
In reply to धन्यवाद बॅटमॅन. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तरूण-तरूणी.
In reply to धन्यवाद बॅटमॅन. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साफ निराशा झाली चित्रपट पाहुन!!!
चित्रपट बघुन ठरवीनार की तो
दिलगिरी
In reply to चित्रपट बघुन ठरवीनार की तो by नि३
कादंबरी वाचली नाही. पिक्चर
येवढी टीका ऐकूनही .....
चित्रपटकर्त्यांचा खोटारडेपणा
In reply to येवढी टीका ऐकूनही ..... by सूड
+११११११११११११.
In reply to चित्रपटकर्त्यांचा खोटारडेपणा by श्रीरंग
नेट बुकिंग
In reply to येवढी टीका ऐकूनही ..... by सूड
चित्रपट पाहणारा वर्ग
दुनियादारीवर चित्रपट येतोय हे
मजबूरी..
ज्जे बात!
In reply to मजबूरी.. by चिगो
तरिसुद्धा चित्रपट पाहण्यात
नशीब
हम्म!
बाकी सुशि नै वाचले पण
In reply to हम्म! by अग्निकोल्हा
सुशि नै वाचले पण दुनियादारी
In reply to बाकी सुशि नै वाचले पण by बॅटमॅन
माझ्या दुनियादारी कॉलेज लाईफ
In reply to बाकी सुशि नै वाचले पण by बॅटमॅन
बोंबला
In reply to हम्म! by अग्निकोल्हा
चकचकीत कपडे आणि चांगली
In reply to बोंबला by कपिलमुनी
बुलेट
खिक्क
हाऊस फुल्ल चे स्पेलींग काय?
प्रचंड सहमत
आयला, कलाकार असतानाही शिव्या
In reply to प्रचंड सहमत by प्रीत-मोहर
+१
In reply to आयला, कलाकार असतानाही शिव्या by बॅटमॅन
ही ही ही !!
In reply to प्रचंड सहमत by प्रीत-मोहर
हाहाहा! "काय सॉल्लिड पिक्चर
In reply to प्रचंड सहमत by प्रीत-मोहर
सीनेमा आवडला...
सिनेमा रटाळ असल्याचे कुठे
In reply to सीनेमा आवडला... by रघुनाथ.केरकर
> एकदम बरोबर......
In reply to सिनेमा रटाळ असल्याचे कुठे by श्रीरंग
काल पाहिला, चित्रपट चांगला
सहमत
In reply to काल पाहिला, चित्रपट चांगला by मालोजीराव
एकन्दर सुर तसाच होता ना?
?? काहीही.. चित्रपटाबाबत काय
In reply to एकन्दर सुर तसाच होता ना? by रघुनाथ.केरकर
दुनियादारी आताच पाहून आल्यावर
म्हणूनच कादंबरी नाय वाचली आणि
In reply to दुनियादारी आताच पाहून आल्यावर by प्रचेतस
आपल्याला ब्वॉ चित्रपट आवडला.
अत्यंत सहमत!
In reply to आपल्याला ब्वॉ चित्रपट आवडला. by मृत्युन्जय
इतकं चर्चेत असणारं पुस्तक आपण
सिनेमा आवडलेला मी एक !
दुनियादारीने १५ कोटी च
ऑ??
In reply to दुनियादारीने १५ कोटी च by श्रीरंग
१५च बरोबर आहे. या चित्रपटाशी
In reply to ऑ?? by किसन शिंदे
उत्तम!!!
In reply to दुनियादारीने १५ कोटी च by श्रीरंग
ऐसेच म्हणतो. पिच्चर पाहिला
In reply to उत्तम!!! by धमाल मुलगा
टीम दुनियादारी, अभिनंदन!
In reply to उत्तम!!! by धमाल मुलगा
२५ कोटी
ते तुम्ही पण एडीट करून १२५
In reply to २५ कोटी by कपिलमुनी
धन्यु
In reply to ते तुम्ही पण एडीट करून १२५ by विश्वनाथ मेहेंदळे
तुझी माझी यारी, मग........दुनियादारी.....
:D
In reply to तुझी माझी यारी, मग........दुनियादारी..... by बाबा पाटील
सु. शिं च दुनियादारी वाचल
In reply to तुझी माझी यारी, मग........दुनियादारी..... by बाबा पाटील
काही पण काय???
कट्ट्यावरच सगळ जगच अधांतरी असतो हो ....
In reply to काही पण काय??? by मृणालिनी
दुनियादारी सिनेमा पाहिला आणि आवडला..
पण हे पहा ...
अतिशय आनंद झाला हा फोटो बघून!
In reply to पण हे पहा ... by पुष्कर जोशी