✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कृष्ण तो आतला ...

आ — आतिवास, Wed, 07/17/2013 - 16:49
रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला. युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला. निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला. प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला. अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला. **

प्रतिक्रिया द्या
6056 वाचन

💬 प्रतिसाद (29)

व्वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 07/17/2013 - 17:35 नवीन
व्वाह!! खुपच सुंदर
प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला.
क्या बात है!!
  • Log in or register to post comments

वेगळाच बाज आहे या लिखाणाला.

स्पंदना
गुरुवार, 07/18/2013 - 08:17 नवीन
वेगळाच बाज आहे या लिखाणाला. उमगल्या सारख वाटल तरी पुन्हा गुढच!
  • Log in or register to post comments

khoopach surekh.. AparNa ji chya pratisadaas sahamat!

निनाव
गुरुवार, 07/18/2013 - 09:57 नवीन
khoopach surekh.. AparNa ji chya pratisadaas sahamat!
  • Log in or register to post comments

आवडली

तिमा
गुरुवार, 07/18/2013 - 11:05 नवीन
कविता आवडली. 'वेगळाच बाज' शी सहमत.
  • Log in or register to post comments

खुप गुढ वाटत आहे. कुणी

धन्या
गुरुवार, 07/18/2013 - 11:10 नवीन
खुप गुढ वाटत आहे. कुणी समजावून सांगेल का?
  • Log in or register to post comments

म्या धन्याशी सहमत. प्लीज

किसन शिंदे
गुरुवार, 07/18/2013 - 17:14 नवीन
म्या धन्याशी सहमत. प्लीज कोणीतरी समजावून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+१ मि.का.--रसगिर्‍हान लिवा...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/18/2013 - 17:36 नवीन
+१ मि.का.--रसगिर्‍हान लिवा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मला वाटलं,

सस्नेह
गुरुवार, 07/18/2013 - 20:17 नवीन
की मलाच समजली नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बापरे चक्क धनोबांशी सहमत

स्पा
गुरुवार, 07/18/2013 - 17:36 नवीन
ना.धांपेक्षा गूढ वाटलं .. काहीच समजले नाही . मिकाला काहीतरी कळल आहे, सांग कि रे - ( फक्त मिकाच्याच कविता कळणारा ) स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खरंतर

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/18/2013 - 17:45 नवीन
खरंतर मी अस म्हणणार होतो:
जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा
पण प्रयत्न करतो नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/18/2013 - 21:20 नवीन
हे रसग्रहण नाही, पण हि रचना वाचून सुचलेल्या काही ओळी. प्रत्येक कडव्याला एक धरुन माझ्या ओळी खाली दिल्या आहेत: ------------ रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला.
मन पाकोळी पाकोळी, जीव अधीर अधीर जाळ पेटला अंतर्मनी, घाव बधीर बधीर
युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला.
सदा संगर चालला, मन सावर सावर रेटीयला दिस कसा, रात आवर आवर
निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला.
वाहत्या मातीला नसे, भय स्थावर स्थावर संवेदना गोठल्या तरी, लव कातर कातर
प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला.
रानभर झडे, पाऊस गंभीर गंभीर देहभर थिरकते, आस अस्थिर अस्थिर
अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला.
दूरवर क्षितीजाशी, घन विभोर विभोर परी घनःश्याम झाकोळला, आत तिमीर तिमीर
आता मी वरची कविता सोपी केली आहे कां अजुन कठीण केली ते मात्र मी नाही सांगू शकत. ;) कवि / कवियत्रीला आवाहन आहे कि त्यांनी यातली माझी समज किती योग्य आहे ते जरुर कळवावे.
  • Log in or register to post comments

व्वा !

सस्नेह
गुरुवार, 07/18/2013 - 21:31 नवीन
काय तरल रचना ! अन अर्थही उमगला आता . दंडवत हो मिका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ऐसाच बोल्ता है...! __/\__

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/18/2013 - 23:54 नवीन
ऐसाच बोल्ता है...! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद ब्वॉ मिका. या

किसन शिंदे
Sat, 07/20/2013 - 00:12 नवीन
धन्यवाद ब्वॉ मिका. या स्नेहातैशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद मिका.

आतिवास
गुरुवार, 07/18/2013 - 21:53 नवीन
धन्यवाद मिका. मजा आली मला तुमच्या ओळी वाचताना. मलाही असा अर्थ उलगडून सांगता येणार नाही. हाच अर्थ मला अभिप्रेत होता का - हेही नाही सांगता येणार. पण मुळात कवितेचा एकच अर्थ असावा असं काही नाही. त्यामुळे बरोबर की चूक असंही काही नाही. कवितेचा अर्थ व्यक्तीनुसार (अगदी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात परिस्थितीनुसार वगैरे वगैरे... .) बदलण्याची शक्यता मी नेहमी गृहित धरुन चालते - तीच कवितेची ताकद असते आणि मर्यादाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

सही

सुधीर
Fri, 07/19/2013 - 09:25 नवीन
तीच कवितेची ताकद असते आणि मर्यादाही हे आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मिका, सुरेख लिहिले आहे

यशोधरा
Sat, 07/20/2013 - 15:22 नवीन
मिका, सुरेख लिहिले आहे तुम्हीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

आधी थोडसंच समजत होतं...

कवितानागेश
Fri, 07/19/2013 - 00:32 नवीन
आधी थोडसंच समजत होतं... मिकाच्या ओळी वाचल्यावर अजून काहितरी समजलं... पण...............
  • Log in or register to post comments

फारच छान

चाणक्य
Fri, 07/19/2013 - 06:40 नवीन
अतिवास अन् मिका....दोघांच्याही रचना अप्रतिम.
  • Log in or register to post comments

आता मी वरची कविता सोपी केली

स्पा
Fri, 07/19/2013 - 09:13 नवीन
आता मी वरची कविता सोपी केली आहे कां अजुन कठीण केली ते मात्र मी नाही सांगू शकत
कविता दोघांच्याही आवडल्याच पण.. सुलभ अर्थ समजला तर बर होईल , डायरेक रसग्रहण का काय ते पण कवितेचं बर्याच वेळा असं संदर्भासहित स्पष्टीकरण नाही देता येत , कविता समजायला अर्थात कवी मन हव. असो :)
  • Log in or register to post comments

छान...

मदनबाण
Fri, 07/19/2013 - 09:57 नवीन
छान...
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
Fri, 07/19/2013 - 10:49 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. अनेक प्रतिसादकांनी 'कविता समजली नाही' असं म्हटलं आहे. मी तुम्हा सर्वांची भावना समजू शकते कारण अनेक कविता मलाही अनेकदा समजत नाहीत. तुमच्या प्रतिसादातून कविता समजून घेण्याची तुमची इच्छा व्यक्त झाली आहे - त्याबद्दल आभारी आहे पुन्हा एकदा. मिका यांनी इथं मदत दिली आहे; तशी मदत प्रत्येक वेळी मिळत नाही आपल्याला. "सर्वांना समजेल अशी कविता लिहायला" मला कधी जमेल का? - असा प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात आला इतकं मात्र खरं :-)
  • Log in or register to post comments

कविता आवड्ली. तथापी ती

निवांत पोपट
Fri, 07/19/2013 - 18:51 नवीन
कविता आवड्ली. तथापी ती 'शांतरस'मध्ये आहे असे वाटत नाही. ती आणि 'एका' रसाच्या थोडी अलीकडील आहे असे म्हटले तर कदाचित त्यावरचा गुढतेचा पडदा पण हटेल.
  • Log in or register to post comments

अगदी मान्य.

आतिवास
Fri, 07/19/2013 - 19:46 नवीन
अगदी मान्य. पण मला हवा तो पर्याय तिथं नव्हता (तो काय हवा हे मला माहिती नाही :-),) आणि काहीतरी पर्याय निवडल्याविना मला कविता प्रकाशित करता येत नव्हती. त्यातल्या त्यात मग जिथं क्लिक झालं ते निवडलं. तुम्ही कोणता 'रस' सुचवता आहात? ते कळल्यास मदत होईल. निदान पुढची कविता प्रकाशित करताना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

आतिवास, कविता आवडली.

यशोधरा
Fri, 07/19/2013 - 19:14 नवीन
आतिवास, कविता आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Sat, 07/20/2013 - 09:57 नवीन
मिकाची कविताही आवडली. खरं तर कोणत्याही कविताच काय लिखाणाला अनेक अर्थ आणि पदर असू शकतात. अगदी पेपरमधे आलेल्या बातमीचा अर्थ आणि जोर कोणत्या भागावर आहे याबद्दलही मतभिन्नता असू शकते. तेव्हा एकदा लिखाण लिहून प्रसिद्ध केलं की ते संपूर्णपणे वाचकांचं!प्रत्येकाला हवा तो अर्थ घ्यायचं स्वातंत्र्य आहे आणि दर वेळी अर्थ कळलाच पाहिजे असंही नाही!
  • Log in or register to post comments

सहमत.

आतिवास
Sat, 07/20/2013 - 13:18 नवीन
खरं तर कोणत्याही कविताच काय लिखाणाला अनेक अर्थ आणि पदर असू शकतात सहमत. तेव्हा एकदा लिखाण लिहून प्रसिद्ध केलं की ते संपूर्णपणे वाचकांचं!प्रत्येकाला हवा तो अर्थ घ्यायचं स्वातंत्र्य आहे मान्य. वाचक म्हणून मला जितकं स्वातंत्र्य हवं असतं तेच मी माझ्या वाचकांनाही द्यायला हवं! दर वेळी अर्थ कळलाच पाहिजे असंही नाही! यात थोडी दुरुस्ती करेन मी. दर वेळी मला कळलेलाच अर्थ इतरांना कळला पाहिजे असं नाही - असं मी म्हणेन.
  • Log in or register to post comments

मला आवडली आतिवासताई... तुमचं

पिशी अबोली
Sat, 07/20/2013 - 15:29 नवीन
मला आवडली आतिवासताई... तुमचं नेहमीचं लिखाण साधं-सरळ असतं. हे मधेच वेगळ्याच पद्धतीचं फार आवडलं... :)
  • Log in or register to post comments

कविता बर्‍याच वेळेस वाचली.

बॅटमॅन
Sat, 07/20/2013 - 19:44 नवीन
कविता बर्‍याच वेळेस वाचली. विशेष काही कळाले नाही. मिका यांच्या अन्वयार्थानेही फारसा प्रकाश पडला नाही. थोडे थोडे ग्रेससारखे वाटले. अर्थ कळत नसला तरी "काहीतरी वेगळं आहे बॉ" असं वाटायला लावणारं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा