मराठी चित्रपट उदयोग ः हिस्टी चॅनलवर ठवससलूववक@100 हा कार्यक्रम चालू होता. कदाचित मी सुरूवातीच्या भागापासून हा कार्यक्रम पाहिला नाही पण एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे ज्या मराठी माणसाने दादासाहेब फाळके यांनी चित्रपट उदयोग सुरू केला त्यांचा साध्या उल्लेखही कोठे आढळला नाही. दुसरी गोष्ट खटकते ती ही की मराठी चित्रपटांसाठी महाराष्टात कदाचित मिळत असतील, पण मुंबईत चित्रपटगृह उपलब्ध होत नाही आणि तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे मराठी माणसांचे दुप्पटी मराठी प्रेम एकीकडे मराठी मराठी म्हणून गळा काढायाचे आणि दुसरीकडे मराठी चित्रपटांना नाक मुरडतात. (थोडसा दक्षिणात्य लोकांचा भाषाप्रेमचा अभ्यास करावा)
किती मराठी माणसे मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पाहतात अर्थात सर्वच मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पाहण्याच्या लायकीचे नसतात तसे हिंदी व अगदी इंग्रजीतही नसतात. दिड दमडीचा (आशयाच्या बाबतीत) चित्रपटासाठी काही शे रूपये खर्चून त्याच्यावर परिक्षण करणारे महाभाग मी हया संकतेस्थळावर पाहीले आहेत.
अजून एक गोष्ट या उदयोगाला मारक आहे ती म्हणजे शासनाकडून मिळणारे अनुदान (माणसांना फुकटात मिळालेल्या गोष्टीची किंमत कळत नसते). कमाल आहे ना राज्य शासनाचा पुरस्कार काही हजारात असतो पण अनुदान मात्र लाखात मिळते राज्य शासनाने अनुदान बंद करून पुरस्काराची रक्कम अनुक्रमे 1 करोड, 50 लाख, आणि 25 लाख करावी.
तसेच महेश मांजरेकर, चंद्रकांत देसाई, अवधुत गुप्ते, कुलकर्णी ब्रदर्स आणि इतर यांनी आपली मराठी टिम (सर्वजण मराठीद्ध घेउन हिंदी आणि जमल्यास इंग्रजी चित्रपट बनवावा ज्याचे दोन फायदे होतील एक मराठी कलाकरांना हिंदी चित्रपटसृष्टी जम बसविणे सोपे होईल आणि चित्रपटाने चांगला व्यवसाय केल्यास उत्तम कमाई होईल ज्याचा उपयोग भावी योजनासाठी करता येर्ईल. हा गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे भेजा फ्राय चित्रपट जो चार करोड मध्ये तयार झाला आणि त्याने चाळीस करोड कमविले अस मी ऐकले आहे.
मराठी उदयोजक ः मराठी माणूस आणि उदयोग हया परस्पर विरोधी गोष्टी पण काही मराठी माणसांनी या दोन गोष्टींना समांतर नेउन त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला हयाबद्दल माझया मनात त्यांच्याबद्दल निनांत आदर आणि अभिमान आहे. पण हाय रे कर्मा त्यांना आपले साम्राज्य स्थापन नाही करता आले ते आपले पिढीजात किंवा एकच व्यवसाय करत राहीले त्या व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायात त्यांनी आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्याकडे पैसा. नाव आणि प्रदिर्घ अनुभव असूनही अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. येथे मी एकच सांगेन की टाटांकडे पैशाची कमी नसावी तरीपण ते मीठ बनविण्याचा उदयोग करतात. मला कल्पना आहे एखादा व्यवसाय उभा करणे आणि तो वाढवून टिकविणे हे कोण्या एै-यागै-याचे काम नाही आहे
उदाहरण म्हणून मी किलोस्कर आणि विको (त्यांची माफी मागून आणि सध्या तरी मला हया दोनच कंपन्या आठवत आहेत) या कपनींची नावे देईन हया दोन जगप्रसिध्द कंपन्या. विकोने तर 50 वर्षानंतर त्यांच्या उत्पादन दाढीच्या क्रिमची भर घातली. साबण, केशतेल वा जेल अशा उत्पादनाची यादी
त्यांना वाढवता आली असती वा टेलकाॅम,IT या क्षेत्रात उतरून नवीन उदयोग सुरू करता आले असते. असो
मराठी नेते ः नेते म्हटल्यावर मला तरी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि सावरकर आठवतात. महाराजांबद्दल काही बोलणे न लागे. टिळक हे माझया मते हया सहस्त्रकातील महान उदयोजक होत की ज्यांनी ‘सार्वजनिक गणेश उत्सव हया आपल्या विचारातून आज एक उदयोग उभा केला आहे आणि सावरकरांचे हिंदुत्व हे वादातीत पण ते जर मान्य झाले असते तर देशात जे बाॅम्बस्फोट होतात त झाले नसते. असो
आजचे नेते अजून किती वर्षे मराठी माणसाला नोकरी मिळावी हया एकाच मुद्दयावर राजकरण करणार आहेत. मराठी साठी काम केल्यावर श्रेय लाटण्यासाठी झगडणार आहेत आणि मराठीचा अपमान झाल्यावर पक्षभ्ेाद विसरून कधी मराठीसाठी एक होणार आहेत. परप्रांतियांना महाराष्ट वसविणारे मराठीच नेते होते आणि आहेत ज्यांनी आपली वोटबॅक तयार केली आणि आता त्यांना मराठी माणसांची गरज वाटत नाही आहे हे विसरू नये.
दान करून भिकेला लागलेल्या राजाची कथा मी वाचली आहे पण दान (मतदान) पदरात पाडून राजा झालेल्याची कथा आजच्या राजक-यांना (फक्त मराठीच नव्हे प्रत्येक राजकारण्याला) शोभून दिसते.
मराठी माणसाचे corporate विश्वातील स्थान ः मंुबई हि देशाची आर्थिक राजधानी आणि ती महाराष्टात आहे तसेच प्रत्येक नावाजलेल्या कंपनीचे कार्यालय मुंबई असते पण यापैकी किती कार्यालयात मराठी माणूस उच्च पदावर आहेत. अर्थात सर्वच कंपन्यात फक्त मराठी माणूस उच्च पदावर असावा अशी माझी अपेक्षा नाही पण ही संख्या लक्षणीय असावी एवढीच अपेक्षा आणि त्यांनी जास्तीत जास्त मराठी तरूणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाव दयावा जसे परप्रांतिय लोक येथे करतात.
सर्वसाधारण मराठी माणूस ः हा अल्पसंतुष्ट आहे. सरकारी नोकरी मिळाली की त्याला आकाश ढेगणे होते. साधारण मराठी माणसाला स्वप्न काय पडतात तर नोकरी करून स्वताचे घर घ्यावे आणि मारवाडी वा भैयांची स्वप्न काय असतात तर प्रथम धंदा जमवू आणि मग घर हेउ. राजस्थान, युपी बिहार येथे उदयोगधंदे नाहीत आणि तिकडचा माणूस एवढया दूर मंुबई येउन चांगले वाईट 'उदयोग' करतो आणि तीच गोष्ट येथील भुमीपुत्राला जमत नाही कदाचित पिकते तेथे विकत नाही. महाराष्टातल्या शेतकरी जीव देते आहे आणि परप्रांतिय येथे अनअधिकतपणे राहून मुंबई लूटत आहेत परप्रांतियापेक्षा महाराष्टातील इतर प्रांतातील गरजू मराठी बांधवानी मुंबई लूटली तर मला ते आवडेल.
काही सदस्यांना वाटेल मी प्रांतवाद उरकुन काढला आहे किंवा एका राजकीय पक्षाचा अजेंडा उचलून धरत आहे. तर एकुणच राजकारण आणि राजकराणी यांच्याबद्दलचे माझे विचार मी वर नमुद केले आहे. किंवा काहीजण म्हणतील पैसा सर्वकाही नाहीय हो कारण पैसा तो रं.. कामाती है.
मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही.
ज्या दिवशी नोकरी आणि घर मिळविण्यासाठी मराठी माणसाला मोर्चे काढावे लागणार नाही, महाराष्टातील शेतकरी आत्महत्या करणार नाही तो खरा सुदिन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6241
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आशावाद आवडला
लेखकाची तळमळ जाणवली. आशेवर जग
लोचा तर आहेच... आता आमच्याच
खरेच परिस्थिती अवघड आहे.
मराठी माणूस उद्योजक नाही ही
सहमत
In reply to मराठी माणूस उद्योजक नाही ही by आदूबाळ
अनेक आहेत.
In reply to सहमत by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खुप उद्योजक आहेत.
In reply to अनेक आहेत. by प्रभाकर पेठकर
नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय
In reply to खुप उद्योजक आहेत. by प्रभाकर पेठकर
प्रत्येक मराठी माणुस उद्योजक
In reply to मराठी माणूस उद्योजक नाही ही by आदूबाळ
भिकारी?
In reply to प्रत्येक मराठी माणुस उद्योजक by NiluMP
प्रत्येक मराठी माणुस उद्योजक
In reply to मराठी माणूस उद्योजक नाही ही by आदूबाळ
अंशतः पटले...
In reply to प्रत्येक मराठी माणुस उद्योजक by NiluMP
अत्यंत समर्पक प्रतिसाद!
In reply to अंशतः पटले... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद. माझ्याकडून सुटलेले
In reply to अंशतः पटले... by प्रभाकर पेठकर
तेच तेच जुने मुद्दे नव्याने
मित्रा गिरण्या बंद झाल्या तो
In reply to तेच तेच जुने मुद्दे नव्याने by विक्रान्त कुलकर्णी
मराठी उद्योजक
मराठी टंकताना मध्येच इंग्रजी
ठवससलूववक@100 = Bollywood@100
In reply to मराठी टंकताना मध्येच इंग्रजी by बाळ सप्रे