Skip to main content

मराठी समाज्याचा लोचा

लेखक NiluMP यांनी गुरुवार, 18/07/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपट उदयोग ः हिस्टी चॅनलवर ठवससलूववक@100 हा कार्यक्रम चालू होता. कदाचित मी सुरूवातीच्या भागापासून हा कार्यक्रम पाहिला नाही पण एक गोष्ट मला खटकली ती म्हणजे ज्या मराठी माणसाने दादासाहेब फाळके यांनी चित्रपट उदयोग सुरू केला त्यांचा साध्या उल्लेखही कोठे आढळला नाही. दुसरी गोष्ट खटकते ती ही की मराठी चित्रपटांसाठी महाराष्टात कदाचित मिळत असतील, पण मुंबईत चित्रपटगृह उपलब्ध होत नाही आणि तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे मराठी माणसांचे दुप्पटी मराठी प्रेम एकीकडे मराठी मराठी म्हणून गळा काढायाचे आणि दुसरीकडे मराठी चित्रपटांना नाक मुरडतात. (थोडसा दक्षिणात्य लोकांचा भाषाप्रेमचा अभ्यास करावा) किती मराठी माणसे मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पाहतात अर्थात सर्वच मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाउन पाहण्याच्या लायकीचे नसतात तसे हिंदी व अगदी इंग्रजीतही नसतात. दिड दमडीचा (आशयाच्या बाबतीत) चित्रपटासाठी काही शे रूपये खर्चून त्याच्यावर परिक्षण करणारे महाभाग मी हया संकतेस्थळावर पाहीले आहेत. अजून एक गोष्ट या उदयोगाला मारक आहे ती म्हणजे शासनाकडून मिळणारे अनुदान (माणसांना फुकटात मिळालेल्या गोष्टीची किंमत कळत नसते). कमाल आहे ना राज्य शासनाचा पुरस्कार काही हजारात असतो पण अनुदान मात्र लाखात मिळते राज्य शासनाने अनुदान बंद करून पुरस्काराची रक्कम अनुक्रमे 1 करोड, 50 लाख, आणि 25 लाख करावी. तसेच महेश मांजरेकर, चंद्रकांत देसाई, अवधुत गुप्ते, कुलकर्णी ब्रदर्स आणि इतर यांनी आपली मराठी टिम (सर्वजण मराठीद्ध घेउन हिंदी आणि जमल्यास इंग्रजी चित्रपट बनवावा ज्याचे दोन फायदे होतील एक मराठी कलाकरांना हिंदी चित्रपटसृष्टी जम बसविणे सोपे होईल आणि चित्रपटाने चांगला व्यवसाय केल्यास उत्तम कमाई होईल ज्याचा उपयोग भावी योजनासाठी करता येर्ईल. हा गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे भेजा फ्राय चित्रपट जो चार करोड मध्ये तयार झाला आणि त्याने चाळीस करोड कमविले अस मी ऐकले आहे. मराठी उदयोजक ः मराठी माणूस आणि उदयोग हया परस्पर विरोधी गोष्टी पण काही मराठी माणसांनी या दोन गोष्टींना समांतर नेउन त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला हयाबद्दल माझया मनात त्यांच्याबद्दल निनांत आदर आणि अभिमान आहे. पण हाय रे कर्मा त्यांना आपले साम्राज्य स्थापन नाही करता आले ते आपले पिढीजात किंवा एकच व्यवसाय करत राहीले त्या व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायात त्यांनी आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्याकडे पैसा. नाव आणि प्रदिर्घ अनुभव असूनही अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. येथे मी एकच सांगेन की टाटांकडे पैशाची कमी नसावी तरीपण ते मीठ बनविण्याचा उदयोग करतात. मला कल्पना आहे एखादा व्यवसाय उभा करणे आणि तो वाढवून टिकविणे हे कोण्या एै-यागै-याचे काम नाही आहे उदाहरण म्हणून मी किलोस्कर आणि विको (त्यांची माफी मागून आणि सध्या तरी मला हया दोनच कंपन्या आठवत आहेत) या कपनींची नावे देईन हया दोन जगप्रसिध्द कंपन्या. विकोने तर 50 वर्षानंतर त्यांच्या उत्पादन दाढीच्या क्रिमची भर घातली. साबण, केशतेल वा जेल अशा उत्पादनाची यादी त्यांना वाढवता आली असती वा टेलकाॅम,IT या क्षेत्रात उतरून नवीन उदयोग सुरू करता आले असते. असो मराठी नेते ः नेते म्हटल्यावर मला तरी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि सावरकर आठवतात. महाराजांबद्दल काही बोलणे न लागे. टिळक हे माझया मते हया सहस्त्रकातील महान उदयोजक होत की ज्यांनी ‘सार्वजनिक गणेश उत्सव हया आपल्या विचारातून आज एक उदयोग उभा केला आहे आणि सावरकरांचे हिंदुत्व हे वादातीत पण ते जर मान्य झाले असते तर देशात जे बाॅम्बस्फोट होतात त झाले नसते. असो आजचे नेते अजून किती वर्षे मराठी माणसाला नोकरी मिळावी हया एकाच मुद्दयावर राजकरण करणार आहेत. मराठी साठी काम केल्यावर श्रेय लाटण्यासाठी झगडणार आहेत आणि मराठीचा अपमान झाल्यावर पक्षभ्ेाद विसरून कधी मराठीसाठी एक होणार आहेत. परप्रांतियांना महाराष्ट वसविणारे मराठीच नेते होते आणि आहेत ज्यांनी आपली वोटबॅक तयार केली आणि आता त्यांना मराठी माणसांची गरज वाटत नाही आहे हे विसरू नये. दान करून भिकेला लागलेल्या राजाची कथा मी वाचली आहे पण दान (मतदान) पदरात पाडून राजा झालेल्याची कथा आजच्या राजक-यांना (फक्त मराठीच नव्हे प्रत्येक राजकारण्याला) शोभून दिसते. मराठी माणसाचे corporate विश्वातील स्थान ः मंुबई हि देशाची आर्थिक राजधानी आणि ती महाराष्टात आहे तसेच प्रत्येक नावाजलेल्या कंपनीचे कार्यालय मुंबई असते पण यापैकी किती कार्यालयात मराठी माणूस उच्च पदावर आहेत. अर्थात सर्वच कंपन्यात फक्त मराठी माणूस उच्च पदावर असावा अशी माझी अपेक्षा नाही पण ही संख्या लक्षणीय असावी एवढीच अपेक्षा आणि त्यांनी जास्तीत जास्त मराठी तरूणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाव दयावा जसे परप्रांतिय लोक येथे करतात. सर्वसाधारण मराठी माणूस ः हा अल्पसंतुष्ट आहे. सरकारी नोकरी मिळाली की त्याला आकाश ढेगणे होते. साधारण मराठी माणसाला स्वप्न काय पडतात तर नोकरी करून स्वताचे घर घ्यावे आणि मारवाडी वा भैयांची स्वप्न काय असतात तर प्रथम धंदा जमवू आणि मग घर हेउ. राजस्थान, युपी बिहार येथे उदयोगधंदे नाहीत आणि तिकडचा माणूस एवढया दूर मंुबई येउन चांगले वाईट 'उदयोग' करतो आणि तीच गोष्ट येथील भुमीपुत्राला जमत नाही कदाचित पिकते तेथे विकत नाही. महाराष्टातल्या शेतकरी जीव देते आहे आणि परप्रांतिय येथे अनअधिकतपणे राहून मुंबई लूटत आहेत परप्रांतियापेक्षा महाराष्टातील इतर प्रांतातील गरजू मराठी बांधवानी मुंबई लूटली तर मला ते आवडेल. काही सदस्यांना वाटेल मी प्रांतवाद उरकुन काढला आहे किंवा एका राजकीय पक्षाचा अजेंडा उचलून धरत आहे. तर एकुणच राजकारण आणि राजकराणी यांच्याबद्दलचे माझे विचार मी वर नमुद केले आहे. किंवा काहीजण म्हणतील पैसा सर्वकाही नाहीय हो कारण पैसा तो रं.. कामाती है. मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही. ज्या दिवशी नोकरी आणि घर मिळविण्यासाठी मराठी माणसाला मोर्चे काढावे लागणार नाही, महाराष्टातील शेतकरी आत्महत्या करणार नाही तो खरा सुदिन.  
लेखनविषय:

वाचने 6241
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

लोचा तर आहेच... आता आमच्याच हापिसात घ्या... मराठी संगणक तज्ञाला मराठीत संवाद साधण्याचीच लाज वाटते.. आपण मराठीत बोललो तरी उत्तर हिन्दीतुन मिळते..घरच्यांशी बोलताना तरी नशिब मराठीतुन बोलतो ... आता बोला..

पण एक गोष्ट खरी कि मराठी माणुस हा जात्याच पापभिरु व्रुत्तिचा अस्ल्याने हे असे घडत असावे,कारण त्यन्ची कातडी अजुन तरी नेत्यान्प्रमाणे झाली नाही आहे.

मराठी माणूस उद्योजक नाही ही रडकथा आता जुनी झाली. सहज म्हणून आठवायला घेतलं तरी किर्लोस्कर, गरवारे, दांडेकर (कॅम्लिन), पेंढारकर (विको), ओगले (काच) ही जुनी मंडळी आठवली. नव्यांमध्ये चितळे (मिठाईवाले), गाडगीळ (सराफ), जाधव (फार्मा), भुजबळ (बांधकाम), गायकवाड (बीव्हीजी) हे लोक आठवले. गुरूराज "देश" देशपांडे यांनी अमेरिकेत आयटी कंपनी काढली होती. ती त्यांनी अब्जावधी डॉलर्सना विकली. विवेक रणदिवे यांच्या "टिबको" या कंपनीच्या शाखा जगभरात आहेत (अगदी पुण्यातसुद्धा).

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जुन्यातले लोणचेवाले कुबल, बेडेकर, तसेच कॅम्लीनचे दांडेकर, बांधकाम व्यावसायिक परांजपे, नव्यातले काटदरे (लोणची मसाले) तसेच शिक्षण व्यवसायातही अनेक जणं आहेत. ते सर्व राहिलेच की.

In reply to by प्रभाकर पेठकर

हीच यादी पुढे नेऊन बांधकांम व्यावसायिक, ज्यांनी भारताबाहेरही त्यांचा उद्योग पसरवला ते, बी. जी. शिर्के, चित्रपट क्षेत्रातील अनेक निर्माते, संगीतकार, मराठी नाटक व्यवसायातील मराठी निर्माते, वाहतुक व्यवसायातील घाटगे-पाटील, पर्यटन क्षेत्रातील वीणा पाटील, जादुगार रघुवीर, अत्तरवाले एस. एच. केळकर अनेक अनेक मराठी उद्योजक आहेत. हं हे खरे आहे की आपला समाज 'उद्योजकांचा' नाही. जसा गुजराथी, मारवाडी, सिंधी समाज आहे. तेवढे असण्याची, मला तरी, गरज भासत नाही. नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय ह्या दोहोतली, मराठी मनातील, दरी जरी भरून निघाली तरी फार मोठे यश आहे असे मी म्हणेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय ह्या दोहोतली, मराठी मनातील, दरी जरी भरून निघाली तरी फार मोठे यश आहे असे मी म्हणेन. Awesome

In reply to by आदूबाळ

प्रत्येक मराठी माणुस उद्योजक असावा मा़झाही आग्रह नाही. मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही.

In reply to by NiluMP

मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही. भिकारी दिसला की त्याला तू कोठल्या समाजाचा असे विचारता काय?

In reply to by आदूबाळ

प्रत्येक मराठी माणुस उद्योजक असावा मा़झाही आग्रह नाही. मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही.

In reply to by NiluMP

पारसी भिकारी चर्चगेटला पाहिलेला आहे. सर्वसाधारणपणे अशा लोकांच्या जेवणाखाण्याची सोय अग्यारीत होत असते. त्यामुळे त्यांना भिक मागावी लागत नाही असे ऐकले आहे. खरे-खोटे झरतृष्टच जाणो. पंजाबात, मारवाडात तिथल्या समाजाचे भिकारी सापडतील. तिथे मराठी भिकारी सापडत नाहीत. प्रत्येक समाजात भिकारी, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत असे वेगवेगळे आणि सर्व स्तर सापडतात. स्वतंत्र व्यवसायात मराठी टक्का कमी आहे हे सत्य असले तरी परिस्थिती बदलते आहे. मुळात ह्या सर्वास आपली घरची शिकवण, संस्कार कारणीभूत असतात. पुस्तकी ज्ञानाला अवास्तव महत्त्व, पक्क्या स्वरूपाची आणि महिन्याला चांगले उत्पन्न देणारी, धोका विरहीत नोकरी, उद्योग व्यवसाय म्हंटले की त्याला लागणार्‍या भांडवलाची मुळात कमी, बँकेचे कर्ज घेतले तरी परतफेडिची धाकधूक, धंद्यासाठी लागणारे शारीरीक आणि मानसिक कष्ट उपसण्याची आवड नसणे, फायद्यापेक्षा तोटाच होईल ही अनाठायी भिती आणि आज धंदा सुरु केला की उद्याच श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणे ही आपल्या समाजाची कमजोर स्थाने आहेत. ह्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला उद्योगव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, लहान लहान व्यवसायातून त्यांच्या मनात धंद्याची आवड निर्माण करणे आणि डोळे उघडे ठेऊन 'धाडसी' बनण्यास प्रवृत्त करणे ही आपल्या आणि पुढच्या सर्व पिढ्यांची नैतिक जबाबदारी आहे. ती आपण व्यवस्थित पार पाडली तर भविष्यात मराठी माणसाचा उद्योजकतेतील टक्का नक्कीच वाढीस लागेल. पूर्वी आपण राहतो ते क्षेत्र सोडून जसे, मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर, बाहेर जाण्यास मराठी माणूस राजी नसायचा. आज भारताबाहेर अनेक मराठी माणसे नोकरी-धंद्या निमित्त विखुरलेली दिसतात. बी.जी. शिर्के सारख्या मराठी उद्योजकाने अनेक मराठी माणसांना दुबईचा मार्ग दाखविला. मराठी माणूस आखातात पाऊल टाकता झाला, संगणकक्षेत्राने अमेरिका दाखविली. तसेच, हळू हळू फरक पडेल आणि मराठी उद्योजकही मोठ्या प्रमाणात तयार होतील. पूर्वीचा मराठी समाजाचा, संकुचित आणि सुरक्षित वर्तुळात राहण्याचा, स्वभाव हळूहळू बदलत आहे.

तेच तेच जुने मुद्दे नव्याने खरडले आहेत्..कसला लोच्या आहे तेच कळत नाही. बहुतेक धागाकर्त्याच्या डोक्यात केमिकल लोच्या असावा.

फ्रिश्मन-प्रभू हा बांधकाम उद्योग जगविख्यात आहे. त्यातले एक भागीदार सुधाकर प्रभू हे प्रवासवर्णनकार मीना प्रभू यांचे पती. युनिटी बिल्डर्सचे अवरसेकर, पितांबरीचे प्रभुदेसाई, अंडरवॉटर सर्विसेस चे सामंत, सुला वाईन्स, मास्टेक, आय आर बी, मसालेवाले जोग, कोहिनूर, केसरी अशी अनेक नावे आहेत. वाडवळ-एस्केपी समाज पर्यटन व्यवसायात, पांचाळ-मिस्त्री समाज फोर्जिंग, लेथ मशिन्स वगैरेमध्ये आघाडीवर आहे आणि आज एक संपन्न समाज बनून राहिला आहे.

मराठी टंकताना मध्येच इंग्रजी शब्दांचा आधार घेताना crtl \ वापरून टंकनाची भाषा बदलावी.. म्हणजे "ठवससलूववक@100" असे होणार नाही.. लेख / प्रतिसाद टंकल्यानंतर पूर्वपरीक्षणाची सोय वापरावी.. ठवससलूववक@100 म्हणजे काय तेही सांगा हे वेगळे सांगणे न लागावे!! बाकी.. पेठकरकाकांचा प्रतिसाद आवडला.. ते स्वतः एक उद्योजकच आहेत हे ही कसे विसरता येईल..