Skip to main content

अबु धाबी किंवा दुबईचे आहेत का कुणी?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 28/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी रुवैस, अबु धाबी इथे एस्.के. ईंजि. मध्ये कामाला आहे. महिन्यातून एक दिवस (शुक्रवार) मला अबु धाबी किंवा दुबईला जायला मिळते. "मिसळ्पावचे" कुणी सदस्य ह्या शहरांत असतील, तर त्यांना भेटायची इच्छा आहे. माझा येथील मोबाईल नं. देत आहे. ००९७१५६३५९३५८६
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3744
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

आशा आहे की आपल्याला अबुधाबी व दुबईमध्ये अनेक मिपाकर मिळतील. या धाग्याच्या निमित्ताने मी पण असाच प्रश्न विचारून घेतो. अमेरिकेतील मिनेसोटा व त्याच्या शेजारच्या राज्यांत (उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, आयोवा, विस्कॉन्सिन व सीमेपलिकडील कॅनेडियन भूभागात) कुणी मिपाकर राहतात का? असल्यास जरूर संपर्क साधावा...

अबु धाबी येथे नोकरी ची ऑफर आली आहे , तिथल्या रहाण्या-खाण्याची खर्चाची कल्पना नाही ..गूगलबाबाला साकडे घातलेच आहे.. मिपावर कोणाला / परीचितांना अबु धाबी बदाल माहिती असेल तर कृपया शेअर करा . धन्यवाद !!

In reply to by कपिलमुनी

फॅमिली असेल तर साधारण खर्च 8000 दिराम प्रतिमहिना इतका येईल ,मुलांच्या शिक्षणा सहित एकटेच असाल तर फक्त जेवण व इतर सुमारे 2000 दिराम / राहणे अधिक जेवण 5000 दिराम पर्यन्त जावू शकते शेयरिंग अपार्टमेंट हा पर्याय असू शकतो 1 दिराम = ~16 रुपये

In reply to by जयंत कुलकर्णी

एमिरेट्स एअरलाईन, बुकींग.कॉम अथवा UAE तल्या हॉटेलच्या संस्थळांवर शोध करू शकता. एअरलाईन विमानाचे तिकीट काढल्यास आणि हॉटेल्स त्याच्याकडे रूम बूक केल्यास UAE चा प्रवासी व्हिसा काढून देतात.

कुंदन , मंदार कात्रे , पेठकर काका यांची खुप मदत झाली . या सर्वांचे खुप खुप आभार !!

पुढचा कट्टा लगेच करू असे आश्वासन देऊन अबू धाबी ला पळून गेल्याबद्दल. असो आपल्या नव्या उद्योगात आपले अभिष्ट चिंतन