Skip to main content

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/07/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!? https://lh6.googleusercontent.com/-0GQsszprAq4/UOmuf-K1p2I/AAAAAAAAV_s/WtGNYtQz17M/w702-h468-no/IMG_3714.JPG गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!? https://lh4.googleusercontent.com/-m6PSkS0HP8s/UOmuXattpQI/AAAAAAAAV_M/qDzljr7bmEM/w702-h468-no/IMG_3710.JPG वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो? https://lh6.googleusercontent.com/-tuyJTOzVNEA/UOmuRLAkHpI/AAAAAAAAWKc/UVwxDHcMhOQ/w702-h468-no/IMG_3707.JPG गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय? हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!! https://lh6.googleusercontent.com/-1XWU-EkGyUI/UOmuhkR-ecI/AAAAAAAAV_0/0xwj7PI2nEU/w702-h468-no/IMG_3715.JPG कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते. https://lh3.googleusercontent.com/-62YPWqZPoI4/UOmusblIGwI/AAAAAAAAWAs/VctXhvk_AGI/w702-h468-no/IMG_3724.JPG सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी. https://lh4.googleusercontent.com/-QEqFBjbsDBc/UOmvZNeurAI/AAAAAAAAWDc/RPW5b9A2IEU/w702-h468-no/IMG_3756.JPG ======================================================== डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!? गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!? वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो? गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय? हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!! कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते. सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी. ======================================================== सर्व छायाचित्र-वल्लींकडून साभार.
लेखनविषय:

वाचने 12850
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

In reply to by जयंत कुलकर्णी

धन्यवाद हो जयंत काका. फोटोंचि किमया वल्लींची आहे,माझी नाही. :)

सुंदर! गेलो नाहीये इथे कधी. पण सगळ्याच लेण्या जणु एक प्रश्नच देऊन परत पाठवतात बघणा-याला, की 'कसं काय???' काव्य छान आहे !

सुंदर कविता. तुम्ही तिथे किती भारून गेला होतात हे प्रत्यक्षच पाहिलेच आहे.
कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
'नसता हाती छिन्नी हातोडा' ही शब्दयोजना चुकीची वाटतेय. कारण ह्या शिल्पकारांनी इतर कुठलीही साधने नसता फक्त छिन्नी आणि हातोडीच्याच साहाय्याने हे अफाट काम करून खडकात कवित्व ओतलंय. थोडासा बदल कसा वाटतोय पहा. कुण्या देशीचे कोण प्रवासी असता फक्त छिन्नी हतोडा खडकामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!

In reply to by प्रचेतस

सुंदर कविता आणि लेण्यांची चित्रे ! आमचे दोन पैसे... कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा ऐवजी कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा असं लिहिलं तर कसं वाटेल?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा>>> ग्रेट...ग्रेट...हेच बरोब्बर!!! (संपादक हाच बदल करा!...लवकर...प्लीज!!!) माझा "केवळ" हा(बदललेला) शब्दपण तीच अर्थनिष्पत्ती करतो,पण परिणामकारता साधली ती इस्पिकच्या एक्क्यानेच...!!! त्यामुळे तोच बदल हवा. :)

(अत्रुप्त आत्मा - एक गूढानुभव!) खालील ओळीत प्रश्नचिन्हाची दुरूस्ती केली आहे. हातामधुनी कसा अवतरे मत्त हाती अन निधडा घोडा!? जुळता जुळता सर्व गणीते...हिशेब मन का मागत नाही!? बाकी वेगळ्याच अनुभूतीची कविता.

खुपच छान. मस्त. फोटो आणि वर्णन कवितेच्या माध्यमातून बघताना, वाचताना वेगळाच अनुभव आला. सहीच.
बुवा आता एखादे दीर्घकाव्य रचायला हरकत नाही
+१००

मस्त धागा. काव्य अणि फोटो दोन्हीही अतिशय आवडले. गुड मॉर्निन्ग झाली माझी एकदम! :)

In reply to by स्पा

जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा
या विषयावर तेजग्यान फाउंडेशनच्या सरश्रींचं "स्विकाराची जादू" नावाचं छान पुस्तक आहे.

In reply to by धन्या

भौतिक सुखांच्या राशित असतात असे निरीक्षण आहे. खरं खोटं देवाक माइत.

पहिला फोटो जरा सुधारुन टाकला आहे. कॉम्प्रेसड असल्यामुळे विशेष चांगला करता आलेला नाही..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लेण्यांइतकीच सुघड घडण ! रच्याकने कुठे आली हो ही बेडसे लेणी ?

In reply to by सस्नेह

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत वरून पवनानगर (काळे कॉलनी) कडे जाणार्‍या रस्त्यावर ११/१२ किमी पुढे करूंज गाव आहे. करूंज गावातूनच उजवीकडे १/१.५ किमी आत बेडसे गाव. तिथल्याच डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.

In reply to by सस्नेह

पुण्यास आलात तर जाउ आपण.. अशी जवळ आहेत. वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतात व मी इतिहासाची मस्करी करतो दोन्ही अनुभव मस्त असतील.

In reply to by कान्होबा

काँलिंग वल्ली... तुमच्या बेडसे लेणीच्या धाग्याचि लिंक टाका हो इथे! म्हणजे कामच होइल. :)

व्वा बुवा!! वल्लीच्या जबरदस्त फोटोंना तुमच्या सुंदर काव्याची साथ मिळालीय.!