कधीतरी
धुसफूस भावनांची विसरू कधीतरी
जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी
आणू कुठून सांगा शोधून एक मित्र
जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी'
मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी
संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी
जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही
होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी
आम्हासही कधी, पुसतील लोक सारे
आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी
कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी
आकाश बंधनांचे भेदू कधीतरी
आहोत तेच आपण, जाणू कधीतरी
'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी
मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व
कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी
मस्त
agdee sahamat! khoopach sundar lihile aahe.
अनेक आभार, निनाव
धन्यवाद, काव्यप्रेमी जी.
सुरेख
@ चाणक्यः अनेक आभार!