माझे चाट जीवन २
माझे चाट जीवन १
मी कट्ट्यावर जावून तुषार आणि विवेकला जॉईन झालो. मी एक cutting आणि एक मोठी गोल्ड घेतली… गप्पा चालू झाल्या.
तुषार "अंड्या कंपनी कशी आहे? आमची eningeering मुळे पार लागली आहे. submission करून जीव जातो आहे कधी अभ्यास करणार? साल्या तुझे बरे आहे"
मी "काय घंटा बरे आहे, मरणाचे काम असते . २४ तास पुरत नाहीत." मी पण दिली ठेवून. तसे हि त्यांना काही माहित नव्हते. त्या मुले टाका टाकीला फुल chance होता.
विवेक "हो अंड्या म्हणतो ते खरे आहे, माझा मामे भाऊ पण मार्केटिंग मध्ये आहे. तो हि मला हेच सांगत होता"
विवेकने माझी बाजू उचलून धरली. त्या बिचार्यांना काय माहित कि मी ऑफिसमध्ये काय करतो ते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिघेही मूळ मुद्द्या कडे वळलो, तो म्हणजे VALENTINE.
विवेक "साले आपले नशीबच गां# आहे, आपल्या नशिबात पोरी नाहीत"
मी आणि तुषारने त्याला अनुमोदन दिले. आणि येणाऱ्या जाणार्या मुलींकडे पाहत बसलो.
समोर होस्टेलची बाल्कनी होती. तिथे बर्याच मुली जमा झाल्या होत्या. त्यात बर्याचश्या आमच्या सारख्या इच्छुक उमेदवार होत्या. एका मुलाने एक बुंगाट idea लढवली. तो कुठून तरी जत्रेत मिळतो तो काड्यांचा नाग घेवून आला. ज्याच्या कड्या मागून दाबल्या कि तो नाग लांब व्हायचा. त्याने नागाच्या फण्याच्या तिथे गुलाबाचे फुल लावले. आणि बाल्कनी खाली उभे राहून काड्या दाबायचा त्यामुळे नाग वर जायचा जिथे मुली उभ्या होत्या. हा कार्यक्रम बराच वेळ चालला. आमचा वेळ बर्यापैकी पास होत होता . पण नंतर हे बोर झाले. मी मंदिराचा विचार करत होतो, काय करत असेल ती? तिला आज कोणी प्रोपोज तर केले नसेल? कधी भेटणार मी तिला?
तुषार "अंड्या चल निघु… आपल्याला कोणी नाही भेटणार हयातली"
माझ्या मनात आल कि ह्या दोघांना मंदिरा बद्दल सांगावे पण भीती होती कि हे दोघे सगळ्यांना सांगतील….
तुषारने विचारले "ऑफिस मध्ये कोणी नाही का तुझ्या"
मी "नाही रे" (मनात म्हणालो जशी असली तर मला पटणार होती)
विवेक " अरे माझ्या एका मित्राने चाट करून पोरगी पटवली"
मी सावध झालो. मला आधी वाटले कि हा माझ्या बद्दल बोलतो आहे …पन तो दुसर्याचा किस्सा सांगत होता.
मी व्विचार केला कि आपण पण सांगून टाकावा आपला पराक्रम……
मी "त्यात काय मग?"
विवेक "तू जास्त हुशारी नको करूस…तुला चाट करता तरी येते का?"
हे मला कुठे तरी hurt करून गेले … ठरवले सगळे सांगूनच टाकू …. मग मी पण माझे मंदिरा प्रकरण सांगून टाकले…. दोघे माझ्या कडे आ वासून बघत होते. माझ्या बद्दल त्यांच्या मनात आदर वाढला होता… तुषार स्वतः जावून चहा आणि सिगारेट घेवून आला होता. मला पण काही तरी वाटू लागले. चवी चवीने त्यांना किस्से सांगू लगलो…. कसे चाट केले …कस फोनवर बोललो अनि बरचसे…दिली ठोकून कि तिने मला विचारले होते कि Valentine ला भेटशील का …पन मीच नाही म्हणालो. त्यांचा ह्यावर पण विश्वास बसला. म्हणाले तू असे नव्हते करायला पाहिजे रे …तिला किती वाईट वाटले असेल …. मी म्हणालो अरे attitute दाखवावा लागतो … तुम्ही बच्चे आहात अजून … तुम्हल ह्यातले काय कळते …
तुषार "अंड्या तिला फोन कर ना आपण भेटायला जावू"
मी "नको रे …मला नाही इंटरेस्ट"
विवेक "अंड्या जास्त भाव नको खावूस …चल फोन कर"
आता मात्र गोची झाली होती …. हे टाका टाकी प्रकरण माझ्यावर उलटू पाहत होते.
तुषार "आज आपण तिघे हि तिला भेटायला जावू"
मी "नको म्हणालो ना"
दोघांनी मला खूप pressurised केले …. शेवटी मी फोन करायला तयार झालो. जवळच्या पुब्लिक बूथ मधून तिला फोन केला, आणि भेटण्या बद्दल विचारले. ती भेटते म्हणाली पण जास्त वेळ नाही जमणार कारण ती तिच्या बहिणीबरोबर येणार होती आणि तिची बहिण १२ वि मध्ये होती. आणि तिची बोर्ड exam next वीक मध्ये होती. मी म्हणालो ठीक आहे मी येतो मित्राला घेवून.
विवेक आणि तुषार ला सांगितले कि भेटायला जायचे आहे माझ्यापेक्षा त्यांनाच उत्साह आला होता …. खरे सांगायचे तर मी मनातून फार घाबरलो होतो …फोन्वर ठीक होते पण प्रतक्ष्यात भेटायचा मी कधी विचार हि नव्हता केला…. समज जर तिला मी नाही आवडलो तर? तिने भेटल्या नंतर बोलणे बंद केले तर? …. असे वाटू लागले कशाला मी ह्या दोघांच्या नादि लागलो आणि तिला फोन केला …. अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आज मला कळले … इतके दिवस किती छान चालले होते …
तुषारने विचारले कि जायचे कसे तेव्हा मी भानावर आलो … तेव्हा माझ्याकडे बाईक वैगेरे नव्हती. विवेकची kinetic होती … पण एका गाडीवर तिघे कसे जाणार. तुषार म्हणाला मी घरी बघतो …आज वडील कुठे जाणार नसतील तर त्याची CD १०० घेवून जावू शकतो. तिघांना हि हायसे वाटले.
त्यांना म्हणालो मला घरी सोडा, मी change करून येतो. घरी पोहचलो…. कुठले कपडे घालावे? मोजून ७ ड्रेस … २ ३ तरी try केले ज्यात मी बरा दिसत होतो तो घातला. खिशात फक्त ७८ रुपये. विचार केला ह्यात भागेल ? हा विचार करत असताना तुषार आला … आम्ही विवेकच्या घरा कडे निघालो… विवेक तयार होताच. आम्ही तिघे हि पुण्याकडे निघालो. विवेकने विचारले तिच्या साठी गिफ्ट काय घेतलेस?
मी "म्हणजे"
दोघे हि हसू लागले
"लठठ डोक्यात मठठ विचार. अरे पहिल्यांदा भेटतो आहेस…गिफ़्त घे कि"
आत्ता पर्यंत कधी हि कोणाला गिफ्ट दिले नव्हते …तिच्य साठी काय गिफ्ट घ्यायचे.
मी "काय घेवू रे ?"
त्यांनी परत हसून घेतले. मला राग आला
मी "तुमच्या आईची जय… सांगायचे असेल तर सांगा नाही तर मी जातो घरी"
ते शांत झाले
गाडी गिफ्ट शोपी कडे वळली
एक valentine day चे ग्रीटिंग, एक पोस्टर … आणि एक dairymilk याची खरेदी झाली. बिल झाले ९६ रुपये. दोघांनी परतीच्या बोलीवर पैसे दिले. तिकडचा खर्च TTMM करायचा ठरला.
आम्ही १२.३० पर्यंत डेक्कनला पोहचलो. तिला मी सांगितले होते कि hongkong लाने पाशी मी तुझी वाट पाहीन. १२.४५ झाले आम्हाला कोणीच दिसले नाही कि जी कोणाची वाट पाहत असेल. तेवढ्यात एक झकास सुंदर मुलगी तिथे येवून थांबली. आम्ही तिघांनी अधाशी नजरेने तिच्या कडे बघून घेतले. तिने पण आम्हाला एक लूक दिला. तुषार म्हणाला बहुतेक हीच असेल चल तिला विचारू. माझे heartbeats वाढले. ती तशी छानच होती. स्लीवलेस पंजाबी ड्रेस मध्ये तर एकदम परी वाटत होती.
तुषार आणि विवेक तिच्याकडे जायला लागले तसा मीही त्यांच्या मागून निघालो. ती हि आमच्या कडे पाहत होती.
तुषार "Excuse me Are u Mandira ?"
ती " Sorry wrong Number"
म्हणजे माझा दर वेळी प्रमाणे KLPD झाला होता. मन खट्टू झाले. तुषार आणि विवेकला हे एक कारणच मिळाले. पुढच्या २० मिनिटामध्ये त्यांनी ८ मुलीना विचारले "Excuse me Are u Mandira ?" एकीचा boyfriend जेव्हा अंगावर आला तसे शांत झाले.
विवेक "अंड्या ती मंदिरा खरेच आहे का ? कि आम्हाला टेपा लावतोस?"
तुषार "मंदिरा गेली असेल मंदिरात"
मी पण विचार केला अजून का नाही आली ती ?आता जवळ जवळ ४० मिनिटे होत आली होती. तिला मला भेटायचे नसेल असे काही असेल का ? कि ती माझी मस्करी करत होती ? डोक्यात असंख्य विचार.
मी पुब्लिक बूथ गाठले आणि तिच्या घरी फोन केला. तिच्या आईने सागितले कि तिच्या बहिणीबरोबर जावून अर्धा तास झाला आहे. अरे मग हि गेली कुठे?
तितक्यात hongkong च्या दुसर्या बाजूने म्हणजे कॅफे गुड लक्च्या बाजूने दोन मुली येताना दिसल्या. एक दिसायला एकदम झकास होती. आणि दुसरी सो सो. ह्या दोघांना परत हुक्की आली आणि त्या दोघींना जावून विचारले ""Excuse me Are u Mandira ?" त्यातली एक म्हणाली " अय्या हो …कुठे होता तुम्ही इतका वेळ …आम्हि आत्ता जाणार होतो घरी…विचर केला ह्याबाजुला बघून यावे म्हणून आलो इकडे". म्हणजे त्या कॅफे गुड लकच्या बाजूंला थांबल्या होत्या आणि आम्ही पुना कॉफी हाऊसच्या बाजूला. अशी गडबड होती तर …. ते दोघे त्या दोघीशी गप्पा मारू लागले ……. मी त्यांच्या पासून ७ ते ८ मीटर वर हातात पोस्टर …ग्रीटिंग आणि dairymilk घेवून थांबलो होतो. ते चौघेही गप्पा मारण्यात रमले होते इकडे माझा पुतळा झाला होता. ते दोघे तर माझ्याकडे बघायला हि तयार नव्हते. तेव्हा मनात आले "नारी नारी कर के भूल न जाना यारी …… लाथ मारेगी नारी तो याद आयेगी हमारी"
मी जर त्यांच्या जवळ सरकलो आणि मला ते काय बोलत आहेत ते ऐकू येवू लागले. नुसत्या पांचट गप्पा आणि जोक चालले होते. मला वाटत होते कि त्यांना ओरडून सांगावे कि मला पण बोलावा रे. २० मिनिट झाले … त्यातली एक जन म्हणाली कि (जी सो सो दिसत होती) अरे आम्ही निघतो पुढच्या आठवड्यात हिची exam आहे. म्हणजे जी सो सो दिसत होती ती मंदिरा होती. आणि जी छान दिसत होती ती तिची बहिण…. असो सो सो असली म्हणून काय झाले? शेवटी wave lenghts जुळणे महत्वाचे असते. मनाची समजूत घातली.
तुषार म्हणाला ठीक आहे परत कधी भेटूयात? आयल्ला म्हणजे ज्याला हि बाई भेटायला आली होती त्याला तर भेटली नाहीच :(
ती म्हणाली अरे पण तुमच्या पैकी आनंद कोण आहे हे तर सांगा ?विवेक म्हणाला तो काय तिथे उभा आहे तो. मी उगीच चेहऱ्यावर हसू आणायचं प्रयत्न केला. मला माहित आहे कि बळेच हसायचा प्रयत्न केला तर विचित्र दिसतो . तिने माझ्या कडे रागाने पहिले …तिने त्या दोघांना विचारले मग तुम्ही कोण आहात? विवेक म्हणाला कि आम्ही त्याचे मित्र.
तीने आवाज चढवला "तुम्ही दोघे circuit आहात का? मी त्याला भेटायला आले होते तुम्हाला नाही. समजले ना?"
तिचा हा अवतार पाहून मी पण घाबरलो. मला सुचेना काय करावे. आता तर तिच्याशी बोलायची माझी हिम्मत पण नव्हती. तिने परत एकदा माझ्या कडे रागाने पहिले आणि तरा तरा hongkong लानेच्या दिशेने जावू लागली. मी पाहताच रहिलो. माझ्या आयुष्यातल्या पहिल्या डेटिंगची वाट लागली होती. आणि त्याला पूर्णपणे मी जबाबदार होतो.
तितक्यात तुषार माझ्या जवळ आला म्हणाला अरे जे गिफ्ट आणले आहेस ते तरी दे. अरे हो कि ते तर माझ्या हातातच होते. क्षणभर मनात विचार चमकून गेला… जर हे गिफ्ट्स घेवून घरी गेलो आणि बहिणीने किंवा जमेस बोंड ने पहिले तर वाटच लगेल. मी पळत पळत hongkong लेन मध्ये शिरलो. तिला एक आवाज दिला , जसे तिने मागे वळून पहिले तिला गिफ्ट द्यायचा प्रयत्न केला. ती घ्यायला तयार नव्हती, मी बळे बळे ते तिच्या हातात कोंबले. आणि परत फिरलो. पुन्हा मागे वळून पहिले नाही. मला माहित नाही कि तिने ते घेतले कि फेकून दिले.
त्या दोघांना रागाने म्हणालो चला आता … ते दोघेही काही बोलले नाहीत …पन मला असे वाटत होते कि ते दोघे माझ्या कडे बघून हसत आहेत. गाडीवर बसलो. औंध मागे सोडले मनात विचारांचे काहूर माजले होते… आता तिच्याशी कसा बोलु?ती परत माझ्याशी बोलेल का? तिला काय वाटले असेल? तिला कसे सांगू अग बाई मला खरच भीती वाटत होती म्हणून मी त्यांना घेवून आलो होतो … मला तुझ्याशी खूप खूप बोलायचे होते …. सगळे मनातच राहिले …. आता विचार करून काही उपयोग नव्हता … वेळ निघून गेली होती …. दर वेळेपेक्षा हा valentine day खराब गेला होता. घरी आलो … न जेवता बेडरूम मध्ये गेलो… आईने विचारले जेवायचे नाही का? म्हणालो कि भूक नाही … बहिण मधेच म्हणाली "आई तो आता जॉब करतो , बाहेर खावून आला असेल" डोक्यात तिडीक गेली पण काय बोलणार. गप्प पडून राहिलो कधी झोप लागली कळले नाही
क्रमश:
याद्या
4192
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट
:)
In reply to ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट by गणपा
मराठीच चाट
In reply to ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट by गणपा
झक्कास
लै बोर मारता राव तुम्ही.
अमित, अत्यंत प्रामाणिक लेखन!
मस्त लिहित आहात...
अरे !
एकदम सह्हि है भीडु
धोबी पछाड म्हणाकी?
:(
In reply to धोबी पछाड म्हणाकी? by स्पंदना