✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

प — पाषाणभेद, Sun, 07/14/2013 - 03:39
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.) ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई तू मन्हाकडे का पाहत नाही? ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई || तुन्हा गळा मा सोनानी माळ तू पायमा बांधस चाळ तू लाजत लाजत जाई ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई || तुन्हा घरावर मी मारस चकरा तुन्हा बाप व्हई का मना सासरा? मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई || तुले पाहीनसन व्हयनू मी येडा तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा जीव जळस मन्हा थोडा थोडा एखादडाव मनाकडे जरा लय पाही तुन्ह नाव शे सुपडाबाई || तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास मी तठे तुन्हा मांगे मांगे येस तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही तुन्ह नाव ग सुपडाबाई || तुन्हा भावाले मी मित्र करी लेस तो पैलवान गडी शे मी घाबरस आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही तुन्ह नाव ग सुपडाबाई || आते पाऊसपानी बरा व्हयेल शे डांळींबनी बाग मी आता लावेल शे कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही तुन्ह नाव ग सुपडाबाई || - पाभे

प्रतिक्रिया द्या
8800 वाचन

💬 प्रतिसाद (16)

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/14/2013 - 10:21 नवीन
छान. आवडली कविता. तुमच्याकडे लाख पैसे येऊ दे, पण सुपडाबाईला तुम्ही आवडले पाहिजे ना. :) भाषा आवडली. वाचतांनाही मजा आली. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

व्वा.

चित्रगुप्त
Sun, 07/14/2013 - 10:43 नवीन
लकरच अशी एकादी सीडी येणार म्हणायची: Image removed.
  • Log in or register to post comments

ढिंड...ढिंड...ढिपांग...ढिंड..

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/14/2013 - 17:13 नवीन
ढिंड...ढिंड...ढिपांग...ढिंड...ढिंड...ढिपांग...ढिपांग..टिपांग ढांग...!!! पाभे इज बॅक! :)
  • Log in or register to post comments

अहीराणी.

प्रभाकर पेठकर
Sun, 07/14/2013 - 18:44 नवीन
मस्त.. अहिराणी भाषेचा लहेजा..मराठी, हिन्दी, गुजराथी भाषांचा प्रभाव ऐकायला/वाचायला चांगला प्रेमळ वाटतो. बहिणाबाईंच्या रचना अहिराणी भाषेत आहेत असे वाटते. अशाच अजून कविता येऊ द्या. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अतिशय छान झालीय कविता.

प्रचेतस
Sun, 07/14/2013 - 19:40 नवीन
अतिशय छान झालीय कविता. भाषेचा गोडवा पुरेपूर उतरलाय.
  • Log in or register to post comments

मस्त

निवेदिता-ताई
Sun, 07/14/2013 - 20:06 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

लगीनले मन्ही काही हरकत नाही>

बॅटमॅन
Sun, 07/14/2013 - 20:06 नवीन
लगीनले मन्ही काही हरकत नाही>>क्या बात!!! पाभेजी, कविता मस्तच शे, अहिराणी मना येस ना पण कविता खूपच आवडे शे!!!!!! जबरीच एकदम.
  • Log in or register to post comments

मस्त आहे कविता!

पैसा
Sun, 07/14/2013 - 20:51 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त

सुधीर
Sun, 07/14/2013 - 22:22 नवीन
कविता आवडली. काही ठिकाणी थोडी गुजराथी सारखी वाटली.
  • Log in or register to post comments

व्वा पाभे! मस्त!

स्पंदना
Mon, 07/15/2013 - 08:04 नवीन
व्वा पाभे! मस्त!
  • Log in or register to post comments

प्रतिसादांबद्दल सर्व रसिक

पाषाणभेद
Mon, 07/15/2013 - 08:20 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्व रसिक वाचकांचे मन:पुर्वक आभार. मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते. वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात. ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते. बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे. बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.
  • Log in or register to post comments

मन्हे अहिराणी भाषा अजिबात

गंगाधर मुटे
Mon, 07/15/2013 - 08:49 नवीन
मन्हे अहिराणी भाषा अजिबात छमज्यत नै शे. पण कविता छमज्यली.
  • Log in or register to post comments

मला वाटलं समदा सुपडा साफ यावर

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 12:51 नवीन
मला वाटलं समदा सुपडा साफ यावर कविता केली की काय ! ;) पण कविता आवडली. आगरी स्त्रीयांच्या नावामधे बर्‍याचदा "बाई" हा शब्द आठळुन येतो...उदा.शांताबाई इ.इ.तसेत भय्या स्त्रीयांमधे "देवी" हा शब्द आढळुन येतो उदा.राबडीदेवी. इ. :)
  • Log in or register to post comments

संदर्भ...

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 12:53 नवीन
सुपडा साफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पाभे, मस्त झालीये कविता

चाणक्य
Mon, 07/15/2013 - 13:18 नवीन
मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

पाभे जी

इरसाल
Mon, 07/15/2013 - 15:17 नवीन
प्रयत्न छान आहे. काही ठिकाणी काही बदल आवश्यक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अहिराणी भाषेत 'ळ' नाही. तरी सटाणा-नाशिक भागामधील अहिराणीत ळ वापरला जातो.वेळ मिळताच अजुन टायपतो.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा