✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कन्नडा हाडु

आ
आजानुकर्ण यांनी
Wed, 11/28/2007 - 09:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14770 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 11/28/2007 - 09:56 नवीन

कर्णा,

तू मारलेला प्रतिटोलाही आवडला! आम्हाला अशीच हेल्दी बॅटिंग पाहायला आवडते! एखाद्या वादाला नुसती शाब्दिक चर्चा करून उत्तर न देता कलेच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची तुझी पद्धत मला अतिशय आवडली! अहो भाषा काय उर्दू असो, कन्नड असो, किंवा आणखी कुठली असो, आम्हा वाचकांना चांगलंचुंगलं वाचायला मिळाल्याशी कारण! :) बाय द वे, कन्नड भाषेबद्दलही आम्हाला प्रेम आहे. आमच्या गुरुजींची मातृभाषा आहे ती! :) असो, आत्ता गडबडीत आहे, गाण्याबद्दलचा प्रतिसाद सवडीने... आपला, (कर्णाचा फ्यॅन आणि अण्णांचा मानसशिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 11/28/2007 - 10:19 नवीन

उत्तम प्रकल्प

ಸುತರಾಂ ಉತ್ತಮ ಪ್ರಕಲ್ಪ, ಆಜಾನುಕರ್ಣವರು. कन्नडातले साहित्य मराठीत जरूर यावे. कन्नड भाषा गोव्याची आणि महाराष्ट्राची दुहेरी शेजारीण असून मला मुळीच कळत नाही, हे माझे दुर्भाग्य! "कानडा तो विठ्ठलू" म्हणून सोडून न देता त्याच्या भाषेत त्याच्याशी गप्पा मरता आल्या पाहिजेत नाही का? पण कन्नड शिकेस्तोवर तो तिकडे आपल्याला न सांगता काय काय खलबते करतो आहे, ते कोणीतरी अनुवाद करून बित्तंबातमी येथे पोचवावी. (आजानुकर्ण यांनी ही हेरगिरी पोचवल्यास हरकत नाही. नाहीतरी ते सुळके वगैरे चढतात, हा जनूबांडेपणा त्यांना सहज जमावा.) तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. चला, इथे कर्णांनी पत्ते पिसून कन्नडात प्रेम सुरू केले आहे (, आणि उर्दूत भांडण). :-)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/28/2007 - 10:22 नवीन

हे काय ?

उर्दुत इश्क आणि शराब विषयीच सगळे असते, हे वाटणार्‍याने कन्नडातले इश्कविषयक साहित्यच मांडले आहे इथे ! काही अध्यात्म, देशप्रेम वगैरे इक्बाल सारखे ? येऊ द्यात ! - सर्किट
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 10:29 नवीन

अध्यात्मिकच

हे गीत अध्यात्मिकच आहे. वरवर दिसणारा अर्थ व छुपा अर्थ वेगळा आहे हे आपल्यासारख्या जाणकारांस म्या पामराने स्पष्ट करावे काय? अगदीच उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. पहा बरे अगदी चपखल बसणार्‍या ओळी:- तुझ्या ओठांवरील रंगांना तू न बोललेल्या शब्दांचा गोडवा आहे माझ्या हृदयातील पानांवर केवळ तुझ्याच स्वाक्षर्‍या आहेत तुझे नाव दैवाने माझ्या नशिबी लिहिलेले नसून मीच ते माझ्या हृदयात कोरले आहे तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/28/2007 - 10:37 नवीन

नाही पटले

उदा. द्यायचे म्हटले तरी मराठी वाचक आपल्या आवडत्या किंवा नावडत्या संकेतस्थळाविषयी हे गीत म्हणताहेत ही कल्पना केली तरी ओळ न ओळ लागू पडेल. आता समजा "सर्किट" हा "एखाद्या" संकेतस्थळावर "खार खाऊन" आहे. तर मग.. तुला ह्याची कल्पना आहे का वेडे. माझे नाव एकदा तुझ्या मुखातून मला ऐकूदे असे त्याला अजीबात वाटत नाही ! कैच्या कै सांगताय राव तुम्ही ! हे कन्नड इश्काचेच गाणे आहे, हे कबूल करा की. असे लाजू नका ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 10:48 नवीन

सर्किट

सर्किट खार खाऊन असतील तर त्यांना पहिले कडवे लागू पडेल मला हे असे आज का वाटत आहे कोण जाणे की केवळ तूच एक माझ्यासाठी आहेस मायावी दुनियेतून खास माझ्यासाठीच तू आज आली आहेस हाय! काय गोड यातना आहे ही हे मुली मला मारून टाक बरे, उगीचच. थोडक्यात "जिंकू किंवा मरू" या देशप्रेमी भावनेचा पुरस्कार या पंक्तींमध्ये आहे. संपूर्ण गीत पहावे, केवळ एक कडवे घेतले तर अर्थ लावणे अवघड जाईल. सत्य हे नेहमी अंशाअंशाने प्रकट होत असते हे लक्षात ठेवावे. वन प्लस वन इज इक्वल टू मोअर दॅन टू हे तर माहितीच असेल. मटाच्या मराठीत यालाच "एक और एक ग्यारह" असे म्हणतात. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मनिष Wed, 11/28/2007 - 10:48 नवीन

दुर्दैवान

दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! "सर्वोत्कृष्ट" नाही पण उत्कृष्ट साहित्य आहे (सर्वोत्कृष्ट चा दावा कुठे केला?). कुठल्याही एका भाषेने सर्वोत्कृष्ट साहित्याचा दावा करू नये अशा मताचा मी आहे. शिवाय उर्दू ही एक अस्सल भारतीय भाषा आहे - तिला एका देशाशी बांधून घेणे हे उर्दूचे दुर्भाग्य आणि आपलेही.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 10:53 नवीन

मान्य

उर्दू अस्सल भारतीय भाषा असावी. लेखामध्ये "इतर भारतीय भाषाभगिनींमधील" अशी दुरुस्ती करतो. :) कोणत्याही भाषेला एका देशाशी किंवा राज्याशी बांधून घेणे हे त्या भाषेचे व भाषकांचे दुर्भाग्यच असते. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 10:59 नवीन

इथे किंवा इथे

http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHM http://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search= दोन्हीपैकी एका ठिकाणी हे सुंदर गाणे ऐकता (व पाहता) येईल. कार्यालयात यूट्यूब प्रतिबंधित असल्याने खात्री करता आली नाही. :(( - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 11/28/2007 - 19:48 नवीन

हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे

कर्णराव (कन्नड राव लावलेला छान वाटतंया...), तुम्ही दिलेली लिंक काम करत आहे. आणि हे गाणे चक्क सोनू निगम याने गायलेले आहे... सर्वोत्कृष्ट कन्नड गाणे नॉन-कन्नड गायकाने गायिले आहे हे विशेष... गाणे पाहताना आणि ऐकतानाही भाषा कळत नसली तरी प्रणयाची नशा चढते यात काही संशय नाही... लय भारी गाणं हाय ... (हे गाणे ऐकून प्रितीमय झालेला ) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ध
धनंजय Wed, 11/28/2007 - 10:59 नवीन

गूगलाय नमः, विकये नमः

चित्रपट "मुंगारु मळे" मधील गाणे. कवी कोण? (जयन्त कायकिणी, कविराज, योगराज भट, शिव, पैकी एक) चित्रपटातला प्रसंग कर्ण सुचवतात तितका आध्यात्मिक रंगवला नाही, असे वाटते. पण आध्यात्मिक रंगवला असता तरी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 11/28/2007 - 11:00 नवीन

बरोबर!!!

तेच सांगत होतो मी! :) "हागे सुम्मने" म्हणजे "उगीचच" का? अवांतर : आमच्या शेजारचा लहान कन्नड मुलगा "मामा, तू 'कुंडी' म्हणू नकोस, मला सारखे हसायला येते" असे सांगायचा! :)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 11:04 नवीन

हागे सुम्मने

हागे म्हणजे असे (की तसे?) सुम्मने म्हणजे गप्प पण दोहोंचा एकत्रित अर्थ गाण्यामध्ये उगीच काहीतरी अशा अर्थाचा आहे. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 11/28/2007 - 11:41 नवीन

कंड क्षणा

हागे सुम्मने म्हणजे समजले पण "कंड क्षणा" म्हणजे काय हो ?
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 11:49 नवीन

कंड क्षणा

कंड म्हणजे भाग किंवा तुकडा. (खंड?) क्षण म्हणजे क्षण (म्हराटीत हाये तोच) कंड क्षणा म्हणजे क्षणाचा एक तुकडा. - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/28/2007 - 18:43 नवीन

आवडले !!!

कर्णा, कन्नड भाषेतील गाण्याचा अनुवाद आवडला. मराठी साहित्यात तौलनिक साहित्याचा अभ्यास हा एक भाग आहे, आपण जर कन्नडी भाषा जाणता, तेव्हा त्या भाषेचा साहित्याचा इतर भाषेशी तौलनिक अभ्यास इथे अन्य लेखात दिला तर आजच्या अनुवादाइतकाच आनंद होईल. तुटिगळा हुवलि... आडद मातिना सिहियिदे मनसिना पुटदलि..केवला निन्नदे सहियिदे हण्णेयलि बरेयदा निन्ना हेसरा... हृदयदि नाने कोरेदिरुवे निननुंटे इदरा कल्पने नन्न हेसरा कोगे ओम्मे... हागे सुम्मने याचा अनुवाद आवडला ! :) अवांतर :- माझ्या संगणकावर कन्नडी भाषेऐवजी चौकोने डबे दिस्ताहेत. दिसले असते तरी वाचता येत नाही तो भाग वेगळा.पण दिसावे यासाठी काय करावे लागेल. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 04/11/2013 - 23:52 नवीन

वा छान

वा छान पूर्वी 'आप्तमित्र' पाहिला होता थिएटरला जाऊन पण नंतर त्यावर आलेला हिंदी भूलभूलैय्या त्यापुढे अगदीच हे वाटला.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/25/2017 - 11:54 नवीन

वाचनखुणा आल्या अन माझ्या

वाचनखुणा आल्या अन माझ्या पहिल्यापहिल्या वाचनखुणेची आठवण झाली. मस्तच एकदम कर्णराव. पिक्चर, गाणे अन लेखन प्रतिसाद सगळेच भारी. बादवे सिक्वल आलाय्/येतोय मंगारु मळे चा. गणेशच आहे हिरो. पूजा गांधी मात्र नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 04/25/2017 - 20:33 नवीन

सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे .

सोनु निगमने गायलेले "निन्दिन दले " हे गाणे छान आहे . ----- https://www.youtube.com/watch?v=-xmRjO2G05c --"तमिळमध्ये भांडण करावे, कन्नडात भजन, मलयाळममध्ये कथन, आणि तेलुगुमध्ये प्रेम. "---- काहि जणांना या चारही भाषा येत असतात . उदा. - https://www.youtube.com/watch?v=gLSVzz6piJU
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/25/2017 - 21:00 नवीन

मिंचागी नीनू बरलू हे पण

मिंचागी नीनू बरलू हे पण सोनूचे एक सुरेख गाणे आहे. गणेशबाप्पा बघवत नाही, पण ऐकायला छान वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा