✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फिमेल बाइटस!

स — स्पंदना, Mon, 07/01/2013 - 08:03
"फिमेल बाइटस!" पक्षी विक्रेता सांगत होता. "यु कॅन टेम अ मेल बट नॉट अ फिमेल" त्याने माहिती पुरवली. माझ्या चेहर्‍यावर अनेक भाव, थोडा उपहास, थोड आश्चर्य, थोडा राग... मग तो माझ्या नवर्‍याकडे वळला "माय वाइफ अल्सो बाइटस" हसु, विनोद गिर्‍हाईकाशी थोडी जवळीक "हाउ अबाउट यु?" माझा नवरा मजेशीर हसला मी ही दात काढले मी चावत नाही हे दाखवायला मी चावणार नाही हे पटवायला मी चावरी नाही हे ठसवायला. रात्री अंथरुण काटेरी झालं पुन्हा पुन्हा तेच वाक्य..."फिमेल बाईटस" व्हाय? व्हाय डज शी बाइट? तिथे न विचारु शकलेला प्रश्न आता मनात वादळत होता. काना कोपर्‍यातुन घोंगावत होता. फिमेल बाईटस बाय नेचर नॅचरली शी बाइटस का? का ग? आठवली एक रात्र बिल्डींगच्या सुरक्षीततेत राहुन रस्त्यावरच्या तिच्या आक्रंदाची. बडबड, न कळत्या बोलीतली तरीही काहीतरी लुटल्याची, परतुन न मिळणारं हरवल्याची, हरल्याची भावना मनापर्यंत पोहोचवणारी. शी कुड नॉट बाइट. मग आठवली एक शेवटचा प्रयत्न म्हणुन चावलेली.........!!!! मी समाजात राहुन हे निसर्गाच देणं विसरले का काय? बाकिच सारं निसर्गदत्त; मी लावण्य म्हणुन मिरवते मग हेच लेण, हे नैसर्गीक देणं मी का विसरले? शी बाईट्स कारण पुढची पिढी तिच्या कुशीत रुजते, त्या पिढीच्या रक्षणासाठी. शी बाईटस कारण तिचं एकटीच जगणं मह्त्वाच नसत, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारा जीव महत्त्वाचा तिच्यासाठी. शी बाईट्स कारण तिच कोमल,नाजुक दिसणं तिला व्हिक्टीम बनवु शकतं. शी बाईटस कारण संसाराचा ध्यास मनी असतो. काडी काडीच मह्त्व ती मानते. उबदार घरट्याच रहस्य ती जाणते. सुखासमाधानच फळ तिच्या असण्याने फुलत. शी बाईटस, आय शुड फॉलो! एल्स नेचरर्स ऑल होप्स विल एंड अप हॉलो. __/\__ अपर्णा

प्रतिक्रिया द्या
6833 वाचन

💬 प्रतिसाद (20)

लिहिलेलं आवडल

दिपक.कुवेत
Mon, 07/01/2013 - 13:36 नवीन
पण काय म्हणतेयस ते कळलं नाहि
  • Log in or register to post comments

रिअली !

सस्नेह
Mon, 07/01/2013 - 14:12 नवीन
ही डझ नॉट नीड टु बाईट अ‍ॅट ऑल..!
  • Log in or register to post comments

हं! खरं आहे - ती

आतिवास
Mon, 07/01/2013 - 15:04 नवीन
हं! खरं आहे - ती स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी आहे.
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
Mon, 07/01/2013 - 17:07 नवीन
सगळ्याच लोकांना ते स्वसंरक्षणाचं साधन आहे. आपण खरेच विसरतो. पिलांसाठी आमच्या घरची मांजरी ५ ६ कुत्र्यांच्या झुंडीवर धावून गेलेली मी पाहिली आहे. स्वत:साठी जमेल न जमेल पण पिलांसाठी मांजरही वाघीण बनते.
  • Log in or register to post comments

सुरेख ! फिमेल बाईट्स.....,

निवांत पोपट
Mon, 07/01/2013 - 21:35 नवीन
सुरेख ! फिमेल बाईट्स....., ह्या बाईट्स मध्ये आक्रमण तर नाहीच्,बचावातल्या निरर्थकतेमधलं आक्रंदन पोहोचतं आहे.आवडली.
  • Log in or register to post comments

दॅट बिट मी अ‍ॅट् हार्ट

एस
Mon, 07/01/2013 - 23:37 नवीन
पोहोचल्या, अपर्णाजी..
  • Log in or register to post comments

पटतंय. पण....

प्रभाकर पेठकर
Tue, 07/02/2013 - 01:24 नवीन
पटतंय..पण तिच्यावर ही वेळ यावी ह्याचेही दु:ख आहे. तशी वेळ तिच्यावर येणार नाही, असा समाजाच्या मानसिकतेत बदल घडेल...तो सुदिन.
  • Log in or register to post comments

bhaavanaa pohochalyaa.

रेवती
Tue, 07/02/2013 - 04:16 नवीन
bhaavanaa pohochalyaa.
  • Log in or register to post comments

सुरेख !

michmadhura
Tue, 07/02/2013 - 12:37 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

bhannaat.

निनाव
Tue, 07/02/2013 - 22:32 नवीन
khoopach sundar lihile aahe.. vichaar karaayla laavNaari kavita.. stri-swaatantrya fakta parliament madhe Womens Bill paryanta maryaadit ka rahaave..there is a lot about respecting women.. it takes a lot of courage to offer equality and respect.. ti courage yaayla ajoon barrach awakaash ahe aplya samajaat.. aplya deshaatil loka paisya ney nahve tar 'vicharaaney' gareeb aahet.. chhaan lihile ahe. manaa paasoon aawadle..shubhechha.
  • Log in or register to post comments

clarification

निनाव
Tue, 07/02/2013 - 22:39 नवीन
maazhe hey statement "aplya deshaatil loka paisya ney nahve tar 'vicharaaney' gareeb aahet.." sarsakat sarvansaathi nahi.. tar asya lokan saathi ahet jey striyaanna fakta ek object mhannoon treat kartaat.. :( sorry.. mala kuthleheee vaad nirmaaN karayche nahiye.. please! with due respect to everyone's views.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव

शी बाईटस, आय शुड फॉलो!

पिशी अबोली
Wed, 07/03/2013 - 02:55 नवीन
शी बाईटस, आय शुड फॉलो!
आवडलं.. त्याला नेचर्स गिफ्ट म्हणून अ‍ॅक्सेप्ट करण्यात किती धैर्य आहे! मनापासून आवडलं...
  • Log in or register to post comments

नवर्‍याने तिला कशासाथी खिजवले

विजुभाऊ
Wed, 07/03/2013 - 03:08 नवीन
नवर्‍याने तिला कशासाथी खिजवले. मेल बाईट्स......
  • Log in or register to post comments

सर्वांना मनापासुन धन्यवाद.

स्पंदना
Wed, 07/03/2013 - 04:07 नवीन
सर्वांना मनापासुन धन्यवाद. @विजुभाऊ-नवर्‍याने तिला खिजवल्याचा कोठेही उल्लेख नाही. एक साधासा प्रसंग जो मनात विचारांचे वादळ उठवुन गेला तेव्हढाच उतरवण्याचा प्रयत्न!
  • Log in or register to post comments

स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी

गंगाधर मुटे
Tue, 07/09/2013 - 13:02 नवीन
स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी आणि एकमेव हत्यार आहे. मनुष्यप्राणी जसजसा सुसंस्कृत होत गेला तसतसा हे हत्यार वापरणे म्हणजे असंस्कृततेचे लक्षण आहे, असा समज दृढ होत गेला. त्यामुळे महिलांच्या बाबतीत तरी हे हत्यार निरुपयोगी ठरले. अप्रतिम कविता. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

_/\_ ग्रेट

वेल्लाभट
Tue, 07/09/2013 - 15:21 नवीन
_/\_ ग्रेट
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Tue, 07/09/2013 - 16:53 नवीन
*****
  • Log in or register to post comments

बाब्बौ...भारीये हे

टवाळ कार्टा
Wed, 09/21/2016 - 18:24 नवीन
बाब्बौ...भारीये हे
  • Log in or register to post comments

सुंदर!

रातराणी
Wed, 09/21/2016 - 20:11 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

नीट कळली नाही पण आवडली.

पथिक
गुरुवार, 09/22/2016 - 10:55 नवीन
नीट कळली नाही पण आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा