"फिमेल बाइटस!" पक्षी विक्रेता सांगत होता.
"यु कॅन टेम अ मेल बट नॉट अ फिमेल" त्याने माहिती पुरवली.
माझ्या चेहर्यावर अनेक भाव,
थोडा उपहास, थोड आश्चर्य, थोडा राग...
मग तो माझ्या नवर्याकडे वळला
"माय वाइफ अल्सो बाइटस" हसु, विनोद
गिर्हाईकाशी थोडी जवळीक
"हाउ अबाउट यु?" माझा नवरा मजेशीर हसला
मी ही दात काढले
मी चावत नाही हे दाखवायला
मी चावणार नाही हे पटवायला
मी चावरी नाही हे ठसवायला.
रात्री अंथरुण काटेरी झालं
पुन्हा पुन्हा तेच वाक्य..."फिमेल बाईटस"
व्हाय? व्हाय डज शी बाइट?
तिथे न विचारु शकलेला प्रश्न आता मनात वादळत होता.
काना कोपर्यातुन घोंगावत होता.
फिमेल बाईटस बाय नेचर
नॅचरली शी बाइटस
का? का ग?
आठवली एक रात्र
बिल्डींगच्या सुरक्षीततेत राहुन रस्त्यावरच्या तिच्या आक्रंदाची.
बडबड, न कळत्या बोलीतली
तरीही काहीतरी लुटल्याची, परतुन न मिळणारं हरवल्याची, हरल्याची भावना मनापर्यंत पोहोचवणारी.
शी कुड नॉट बाइट.
मग आठवली एक शेवटचा प्रयत्न म्हणुन चावलेली.........!!!!
मी समाजात राहुन हे निसर्गाच देणं विसरले का काय?
बाकिच सारं निसर्गदत्त; मी लावण्य म्हणुन मिरवते
मग हेच लेण, हे नैसर्गीक देणं मी का विसरले?
शी बाईट्स
कारण पुढची पिढी तिच्या कुशीत रुजते, त्या पिढीच्या रक्षणासाठी.
शी बाईटस
कारण तिचं एकटीच जगणं मह्त्वाच नसत, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारा जीव महत्त्वाचा तिच्यासाठी.
शी बाईट्स
कारण तिच कोमल,नाजुक दिसणं तिला व्हिक्टीम बनवु शकतं.
शी बाईटस
कारण संसाराचा ध्यास मनी असतो. काडी काडीच मह्त्व ती मानते. उबदार घरट्याच रहस्य ती जाणते.
सुखासमाधानच फळ तिच्या असण्याने फुलत.
शी बाईटस, आय शुड फॉलो!
एल्स नेचरर्स ऑल होप्स विल एंड अप हॉलो.
__/\__
अपर्णा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6843
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिहिलेलं आवडल
रिअली !
हं! खरं आहे - ती
आवडले
सुरेख ! फिमेल बाईट्स.....,
दॅट बिट मी अॅट् हार्ट
पटतंय. पण....
bhaavanaa pohochalyaa.
सुरेख !
bhannaat.
clarification
In reply to bhannaat. by निनाव
शी बाईटस, आय शुड फॉलो!
नवर्याने तिला कशासाथी खिजवले
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
स्वसंरक्षणाची एक उपजत ऊर्मी
_/\_ ग्रेट
*****
बाब्बौ...भारीये हे
सुंदर!
नीट कळली नाही पण आवडली.