Skip to main content

सिलोन म्हणजे काय ?

सिलोन म्हणजे काय ?

Published on मंगळवार, 25/06/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
दोन पिढ्या किती दूर असतात ? प्रसंग पडल्याखेरीज ते जाणवत नाही . आता हेच पहाना . मी किशोरकुमारचे " वापस नाही जाना आज पहिली तारीख है ,खुश है जमाना आज पहिली तारीख है '' गुणगुणत होतो . आजूबाजूचे प्रश्नात्मक चेहरे पाहून मी म्हणालो " सिलोनवर दर एक तारखेला सकाळी हे गाणे लागायचे " "सिलोन म्हणजे काय ?" एक निरागस प्रश्न विचारण्यात आला . उत्तर देण्यासाठी तुमची मदत मागत आहे . कारण माझे एकट्याचे अनुभव सांगून दिलेल्या उत्तराने सिलोनला न्याय मिळणार नाही असे मला वाटते .
लेखनप्रकार

याद्या 14863
प्रतिक्रिया 88

सी व्हिटॅमिनची एखादी सप्लीमेंट गोळी वगैरे आहे का? नाव तसंच वाटतंय. किंवा आयायायाया बँकची एखादी नवीन लोन स्कीम वगैरे? नाव आकर्षक दिसतंय.. ;)

In reply to by गवि

अहो गवि, विटामीनच्या गोळीवर गाणे कसे लागेल? किंवा लोनस्कीम वर सुध्दा? बहुधा हे सीडी, डिव्हीडी, ब्ल्यूरे सारखे असेल किंवा आयपॉड सारखे सिलोन म्हणजे.

In reply to by अभ्या..

विटामीनच्या गोळीवर गाणे कसे लागेल? किंवा लोनस्कीम वर सुध्दा?
होय रे होय.. पण मूळ धागा नीट वाचून मग दिला तर तो प्रतिसाद कसला.. :) आता खरेच सिलोन म्हणजे काय हे कोणी सांगितलं तर तो हटकून एखादा नवखा मिपाकरच असणार बघ.. एरवी कोण सांगायला बसलंय ? ;) देशपांडेसाहेब, हलके घ्या, मजेत चाललंय..

In reply to by गवि

जुन्या रेडिओवर हे नाव असायचे, "सिलोन"... त्यामुळे बहुदा रेडिओ कंपनीचे नाव असावे असे वाट्ते चुभुदेघे

लेखक इथे सिलोनला न्याय मिळावा म्हणुन झगडतो आहे. या मुद्याकडे मी सुज्ञ वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. योग्य उत्तर मिळाले तर कदाचीत सिलोनला न्याय मिळेल. हे काही तरी न्यायप्रविष्ट प्रकरण असावे. सिलोनवर आधि दर एक तारखेला गाणे लागायचे आणि आता लागत नाही म्हणुन सिलोनला कोणीतरी न्यायालयात खेचलेले दिसते. हाच खटला वर्षानुवर्ष चालल्या मुळे नव्या पिढीच्या तो विस्मरणत गेला असावा. सिलोन हे कदाचीत सकाळी सकाळी उभे रहायचे एखादे ठिकाण असावे. निदान महिन्यातुन एकदातरी सर्व उपभोक्त्यांना संपुर्ण समाधान मिळावे अशी सिलोन व्यवस्थापनाची ईच्छा असेल. म्हणुन उपभोक्त्यांना एक तारखेची आठवण करुन देण्यासाठी सिलोन व्यवस्थापन हे गाणे वाजवत असावे. लेखक अधिक खुलासा करतील अशी अपेक्षा आहे.

एकदा एका बाइला जुळ्या मुली झाल्या..त्यांची नावे सिलोन आणि अलोन ! त्या दोघींचा जन्म जुळ्या असुन सुद्धा एकाच तारखेला झाला होता ..आणि एक तारखेलाच झाला होता .. त्यामुळे त्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किशोरकुमारचे " वापस नाही जाना आज पहिली तारीख है ,खुश है जमाना आज पहिली तारीख है ' असे गाणे म्हणायच्या ... पुढे अलोन निघुन गेल्यामुळे अलोन झालेली सिलोन हेच गाण म्हणत बसायची ... कळ्ळ का ?

और पहले पायदान पे है देशपांडे काका, हा हा भाईयो वही देशपांडे काका जिन्होने अपने दामाद को चिठ्ठी लिखने का अधुरा अधुरा प्रयास किया था. - अजून सयाना ;)

In reply to by फिरंगी

शेवटी काय तर उत्तर माहित नसणे हे माफी मागण्याचे कारण होऊ शकत नाही असे माझे मत आहे .[ कारण नसताना सगळ्यांना माफ करून महात्मा बनण्याची इच्छा नाही ]

सिलोन हे श्रीलंकेचे जुने नाव आहे. सिलोनवर गाणे लागायचे म्ह्णजे भारतात हे गाणे लागायचे असे म्हणायचे असेल कारण भारत सिलोनच्या वर आहे.

रेडीओ सिलोन म्हटलं की आजही दर्दी श्रोते आठवणीत हरवून जातात.विविध वयोगटातील, जातीधर्मांतील, भिन्न विचार सारणी च्या देश परदेश येथील करोड श्रोत्यांना एका सुरेल माळेत गुंफण्याचे कार्य सिलोन ने केले.१९४९ ते १९७४ या सुवर्ण काळातील अजरामर गाणी रेडीओ सिलोन ने रसिकांना केवळ ऐकविली च नाहीत तर श्रोत्यांमध्ये एक आगळा ऋणानुबंध निर्माण केला १९४९ ते ६० व्या काळखंडात ऑल इंडिया रे डी ओ वर हिंदी सिनेमा गीतांना बंदी असतांना रे डी ओ सिलोन ने ती सारी गाणी घराघरात पोहचविली.आशिया खंडातल्या विविध भाषा मधल्या ३५ हजार ओरीजनल रेकॉर्ड्स सिलोन च्या संग्रही असून विविध भारती कडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्स चा त्यात समावेश आहे.

In reply to by सस्नेह

माशाची आमटी... =)) =)) _/\_ पाय पाठवून दे माय, देव्हार्‍यात ठेवेन म्हणतो.

In reply to by सस्नेह

रच्याकने, माश्यांना पाय नसतात त्यामुळे मला तर हा cannibalism चा प्रकार दिसतोय... सांभाळून ! ;) ... (हघ्या हेवेसांनल)

ज्याअर्थी, सि (इंग्रजीत) = बघा (मराठीत) लोन (अरबीत) = रंग (मराठीत) त्याअर्थी, सिलोन = "बघा रंग." बघतोय, बघतोय, देशपांडॅ साहेब, तुमचा रंग आणि रागरंगही बघतोय बरं का ! काय ? ;) +D

सिलोन = "सनी + लिओन" तर नाही ना म्हणायचे ??

शिलाँगला स्थानिक भाषेत सिलोन म्हणत असावेत असं अंधुकसं आठवतंय. अधिक माहितीसाठी विकीपेडियावर साडेतेवीसतास उचकापाचक केली, पण काही उपयोग झाला नाही. कॉलिंग : चिगो.. इशान्य भारत विषयातील जाणकार, अनुभवशिद्द असे भारत सरकारचे मानद अधिकारी साहेबमजकूर, श्री.रावसाहेब उर्फ चिगो ह्यांनी सदरहू सिलोन-शिलाँग विषयासंदर्भात अधिक मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!

In reply to by धमाल मुलगा

एकाच प्रतिसादात किती शिव्या घालशील, गप की जरा.. ;-) शिलाँगला सिलोन म्हणत असल्याची माहिती नाही. आता तिथल्या स्थानिकांनाही काही माहित असेल, असं वाटत नाही. आणि नेमकी कुठली भाषा, म्हणजे खासी की जैंतिया की वार-खासी की गारो, हापण प्रश्न आहेत. रच्याकने, चेरापुंजीला स्थानिक लोक 'सोहरा'म्हणतात. एक परीचित 'सोहरा'पर्यंत जाऊन 'चेरापुंजी नही मिला' म्हणत तसेच न भटकता परतले होते..:-D बादवे, 'सिलोन' म्हणजे 'नमक का कर्ज'... सी--> सागर--> खारट--> नमक. लोन--> कर्ज. ('का' चे सोदाहरण स्पष्टीकरण : २००५ बॅच --> २००५ ची बॅच)

शनि शिँगणापूरचे अगोदरचे नाव शिलोन-सिलोन असावे .तिकडे दर बुधवारी रात्री आठ वाजता मोठी आरती असायची .पुजारी अमिन सयानी नावाचा एकजण होता आणि त्याचा आवाज म्हणे 'आकाशवाणी'पेक्षाही भारदस्त होता .पुढचा बुधवार कधी येतो याची वाट पाहात भाविक अगोदरच्या बुधवारच्या आठवणी काढून आठवडा काढत असत अशी माहिती शेजारच्या पुरष्याकाकांनी दिली .तिकडची गर्दी पाहून सरकारने दूरदृष्टीने साडेसातलाच बुधवारी गजरा विकायला प्रधांनाना सांगितले .

एकदा मुंबईत लोकलमधे एकाने 'ये फास्ट है या सिलो' विचारले होते. तसे काहीसे असावे.

आणि हो, बिनाका गीत माला ही काही एका पिढीपुरती मर्यादीत नव्हती तर किमान ३-४ पिढ्यांनी तरी ते ऐकले आणि आनंद उपभोगला. ते आत्ताच्या पिढीला माहीत नसले तरी आश्चर्य काहीच नाही अथवा त्यात वाईट वाटण्यासारखे नाही. नाही तर उद्या शिवाजी परत आला तर दोन पिढ्यातला फरक दाखवत म्हणेल, यांना घोडदौडच येत नाही म्हणून! ;)

ठो ठो ठो हसलो... क्रिएटिव्हिटीचे पाझर फुटलेत! देशपांडे काकांच्या घरच्या माशाच्या सुपाच्या पाकृच्या प्रतीक्षेत आहे. :)

बिनाका गीत माला नावाची कोणी चांगली गाणारी नटी होती का श्रीरंग ?तिच्याबद्दलचा काही धागा पूर्वी येऊन गेला काय ?देशपांडेसाहेब एक फोटो टाकाच आणि कोणाला माशाचे पायासूपची पाकृ हवी आहे .तुम्हाला विटि-दांडूची पिदी माहिती आहे का ?

दरवर्षीप्रमाणे देशपान्डे काका बाम्ब टाकुन देशीला गेलेय..

In reply to by ब़जरबट्टू

बाम्ब टाकुन देशीला गेलेय
कुठे गेलेत? देशीला आणि देशपांडे????????? कुठे आहे गुत्ता? ;)

समुद्र विकत घेण्यासाठी लोन हवे असेल तर त्याला सि लोन म्हणत असावेत. किंवा लोन न घेता नुसतेच विंडो शोपिंग करायचे असेल (लोन चे ) तर सि लोन म्हणत असावेत. माझे इंग्रजी कच्चे असल्याने जाणकार अधिक प्रकाश टाकु शकतील.

समुद्र विकत घेण्यासाठी लोन हवे असेल तर त्याला सि लोन म्हणत असावेत. सूढ्ध ल्ह्या की वो. समुद्राचे स्पेलिंग एस ई ई असे आहे. ते उच्चारशास्त्रा नुसार सवरील वेलाअंटी दीर्घ हवी. म्हणजे सीलोन. उर्दू मध्ये म्हणावयाचे झाल्यास तुमचे म्हणणे "लोन ए सी" मतल्ब "कर्ज ए दरीया " असे घेतल्यास त्याचा अनर्थ होतो. यावरून इंग्रजी भाषेत "दूध का कर्ज" अर्थात मराठीतला " उपकार दुधाचे"हे चित्रपट आठवल्या गेले आहेत. त्यातील हीरोचे साप कुत्रा नाग यांच्या सोबत चांगले जमत होते. हल्ली प्राणी मित्र संघटनानी अशा चित्रपटांच्या चित्रणावर बम्दी आणली आहे. ती ऊटवावी. म्हनजे लोकाना कासव , गोगलगाय यांच्या गृप डान्स बघता येतील. मी धम्याला घेवून "तेरी बाहो मे" अशा नावाचा चित्रपट काढायच्या प्रयत्नात आहे. "हेन्री" नावाचा ऑक्टोपस हे त्याचे मूख्य आकर्षण आहे. चित्रपटात हीरो ऑक्टोपसच्या गळ्यात गळा घालून "तेरी बाहो मे गुजरा जमाना" हे गाणे गातो. प्रत्येक कडव्यात ऑक्टोपस हीरोल नव्या हाताने गळामिठी घालतो. एकुण आठ कडव्यांचे झक्कास गाणे आहे. लड्डाख च्या पठारावर चित्रीत केले गेलेय.

In reply to by विजुभाऊ

मी धम्याला घेवून "तेरी बाहो मे" अशा नावाचा चित्रपट काढायच्या प्रयत्नात आहे. "हेन्री" नावाचा ऑक्टोपस हे त्याचे मूख्य आकर्षण आहे. चित्रपटात हीरो ऑक्टोपसच्या गळ्यात गळा घालून "तेरी बाहो मे गुजरा जमाना" हे गाणे गातो. प्रत्येक कडव्यात ऑक्टोपस हीरोल नव्या हाताने गळामिठी घालतो. एकुण आठ कडव्यांचे झक्कास गाणे आहे. लड्डाख च्या पठारावर चित्रीत केले गेलेय.
अहो विजुभाऊ.. कधीपासून होतंय असं? आफ्रिकेत तब्ब्येतीची काळजी घेत नाही आहात वाटतं. पण काळजी करु नका. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय. यावरही नक्की काहीतरी उपचार उपलब्ध असतील.. सध्या आफ्रिकेत आहात तोवर हे औषध रोज संध्याकाळी घेत जा. डोस / प्रमाण बाजूला दाखवलंयः Am

In reply to by गवि

दाखवायला बाटली अन प्यायला चहा असा काहीसा भास होतोय. की हे पीना था बाटली, पि के आये चाय अस आहे?

In reply to by गवि

गविशेठ, च्यायला...जरा 'विषय'चा टेक्स्टबॉक्स बघावा की प्रकाशीत करण्याआधी. ल्वॉकांचे कायच्या काय गैरसमज होतील ना.

In reply to by धमाल मुलगा

जरा 'विषय'चा टेक्स्टबॉक्स बघावा की प्रकाशीत करण्याआधी.
या वैषयिक चुकीविषयी मी भलताच शरमिंदा आहे हो धमालराव.. ;)

बघा बघा मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो. प्रोत्साहन म्हणून काही नाहीच. ते अमिन सायानी बघा कसे प्रोत्साहन बोलायचे ढेकर दिल्या सारख्या ष्टायलीत. अब्ब्ब्ब्बा.अब हम आ रहे है अगली पायदान पर. और यहांपर है तीन गाने........

विजुभाऊ, तब्येत ठिक आहे ना? शाळेत शिकलेल्या अल्पज्ञानाप्रमाणे समुद्राचे स्पेलिंग एस ई ए असे आहे, एस ई ई नव्हे. आमच्या शाळेत शिकवल्याप्रमाणे एस ई ए म्हणजे समुद्र आणि एस ई ई म्हणजे बघणे. चुकले असल्यास अवश्य सांगा, आत्ता मास्तरास जाऊन विचारतो. चुभुदेघे.

In reply to by स्पंदना

हा एक, हा एक, एकदम ताजा, फडफडीत! हा हा हा ...त्याम्च्या नावात भात देखील आहे. देशपांडे काकांच्या कडे मासळीसोबत भाताचे सोय्झाली.

In reply to by स्पंदना

हा एक, हा एक, एकदम ताजा, फडफडीत! हा हा हा ...त्याम्च्या नावात भात देखील आहे. देशपांडे काकांच्या कडे मासळीसोबत भाताचे सोय्झाली.

आमच्या दिक्शनरीत ही दोन्ही स्पेलिंगे आहेत. श्री श्री श्री संत तात्याबा म्हाराजानी ल्हिलेच आहे ना जे जे ठावे ते ते ल्ह्यावे सूढ्ध लेखनासी फाट्यावरी मारावे. इंग्रजी काय मराठी काय स्पेलिंगे म्हन्जें सूढ्धलेखनच ना. हिट ईट ऑन फाटा. हे ईग्रज मोठे चलाख असतात आपल्या गंडवतात. बघा ना रीड रेड आणि रेड या सर्वांची स्पेलिंगे आर ईए डी अशीच करतात. एत तर जौद्यात टी ओ = टू होते. जी ओ मात्र गो होते.

मह्यावाला परतिसाद काब्र दिसु न्हाई र्‍हायला बरं !

In reply to by कंजूस

एकाला तीन तीन फडफडीत मासे मिळाले, सोबतीला भातही! आता आण्णा कशाला उठतेत? आडवा हात मारुन, कातरलेली पक्की सुपारी चघळत, सिलोन लाऊन निवांऽऽत ऐकत बसले असतील...तुम्ही आम्ही बसलोय हितं बिनाका'माचं डबडा ऐसपैस खेळत. :D

हे तर दोन पिढ्यांना जोडणारे दुवे श्रीरंग_जोशी ,विजय_आंग्रे,अनुप ढेरे,विकास -आपले आभार रेडीओ सिलोनवर प्रेम करणारी पिढी आता जेष्ठ नागरिक म्हणून वावरत आहे ज्यांच्यासाठी असे दुवे सुखावह असतात . मिसळ पाववर नसलेले काही प्रतिसाद खाली देत आहे . १] New generation always moves on. Like Bal Gandharva for our generation Ceylon is part of our memories. No more Ceylon exists (Now Shri Lanka) nor Radio Ceylon for Indian Youth. That is the life. We should just savor our memories, २] I agree with Kirit. Radio Ceylon is past. No need to get agressive if some one does not know it. Life has to change. and will change. Change is life. Do you remember or know what our parents had enjoyed during their young days ? They had their own wishes and methods. Ask your grand children what music they listen to or like ?.Most probably we do not know it. So do not brood. Enjoy today and today, not even tomorrow. Keep smiling. ३] KIRIT NE LIHILYA PRAMANE RADIO CEVLON - REDIO CEYLONE KA VYAPAR VIBHAG APALYA JEEVANACHA EK MAHATVACHA BHAG HOTA. APALYA LAHANPANI SUDHA AIKALELI PURANE FILMOKE GEET AAJHI AIKAVISHI WATATAT. 7 -57 VAJATA SAIGAL CHE GANE AIKALYA SHIVAY DIVAS SURUCH VAYACHA NAHI.

आजकाल च्यनेलच्या आणी एफ.एम.च्या गर्दीत सिलोन माहिती नसणे साहजिक आहे. गेले ते गेले दिवस, पण त्यासाठी आज खराब का करायचा ? सी= बघणे लोन= कर्ज यावरुन किमान १ तारखेला कर्जाचा हप्ता कापुनही पगार हाती मिळाला म्हणुन बहुदा किशोरकुमार गात असावा. मला त्यावेळी प्रत्येक गायक रेडिओ (स्टेशनवर) येउन गात असावा असं वाटायचं. :)

In reply to by बॅटमॅन

देशपाडॅ साहेबांच्या नावावरून कीसपाडॅ असा अश्लील शब्दच्छल केल्याबद्दल टीव्र णीशेढ ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आओ वेलांटी तरी वेगळी आहे ना एक्कासाहेब ;) उगीच "लघु"शंकेला वाव नको ठेवायला अशा उदात्त उद्देशाने =))

In reply to by बॅटमॅन

   छ्या, छ्या ! ... आताच हाती आलेल्या व्याकरणाच्या नविन नियमाप्रमाणे "किस = किस" आणि "कीस = दीर्घ किस" असे नक्की झाले आहे ;) पहिजे तर देशपाडॅ साहेबाना विचारा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काय हो हे चक्की किसिंग अँड किसिंग अँड किसिंग अँड किसिंग =)) =)) =)) =)) अन हो, अंमळ गांगलीन झालेलं दिसतंय ;) त्यावर उतारा म्हणून थोडं तातीन घ्या बघू ;) ;)

In reply to by पैसा

तिच्या नाकाचं कस आहे आता? जरूर पडल्यास सुश्रुतला भेटायला सांगा... २००० वर्षांपासून नाकाच्या प्लाष्टीक सर्जरीत एक लंबर हाय :)

In reply to by पैसा

नको, नको. तिची फी द्यायची पद्धत आम्हाला परवडणार नाही आणि तसे केले म्हणून कोणाचे नाक (परत) कापणेही आमच्या स्वभावात बसत नाही ! त्यामुळे असले पेशंट आम्ही टाळतो +D

सीरीयल किसर इर्शाद हाश्मी ना दीर्घ आणि र्‍हस्व मधला फरक म्हैत असेल. असो. काय म्हणाल्या शूर्पणखा तै. त्यानी म्हणे नखांची नवी फ्याशन आणलीये.

कदाचित थोडेसे विषयांतर होत आहे. पण मला कोणी माश्याशी पाकृ देईल का? भात तर आहे माझ्याकडे. किमान माश्याशी एखादी नविन पाकृ तरी द्या. वाट पहातो आहे. ३ मासे आहेत आपल्याकडे. बनवुन बघेन म्हणतो. जमल्यास अवश्य कळवेन आपल्याला.

माशाची पाककृती: साहित्य : ताट वाटी पाण्याची लोटी. सर्वप्रथम वांद्र्याच्या हायवे गोमांतक ( कोकण्याची खाणाव़ळ) येथे जावे . तेथे ताजे फडफडीत पापलेट किंवा सुरमई तुकडी थाळी घ्यावी. मस्त ओरपून जेवावे. ( थाळीत भाताचा अंतर्भाव आहे)

देशपांडेआण्णा अजिबात वाईट वाटून घेऊ नका हा धागा टाकला म्हणून .मिपावर लिहिणारी पिढी रेडिओ सिलोन बंद झाल्यानंतरची आहे त्यामुळे सिलोनचं कालवण झालं आहे . इंडिका ,स्विफट मधून ऑफिसला जातांना एफेमवर गाणी ऐकता ऐकता ट्राफिक अपडेट ऐकणारी आहे .आज पेहली तारीख आहे .मी पण बैँकेत जाण्याचे बंद केले आहे पांढरे केसवाला कोणी दिसला की काउंटरच्या क्लार्कच्या कपाळावर आठ्या उमटतात .आण्णा ,तुम्हाला कुणाल ,अरबाज ,दिपिका ,कतरिना चे सिनेमे आवडत असतील तर त्यांच्यावर एक धागा काढा ना.