माझे ऑफिस
लेखनविषय:
माझे ऑफिस ऑफिस ,
कसे दिसते भकास।
वाजले दहा तरी....,
नाही कुणाचा तपास॥१॥
माझे ऑफिस ऑफिस ,
आस सेवेची धरावी।
ग्राहक देव भव.....,
सेवा तयाची करावी॥२॥
माझे ऑफिस ऑफिस ,
कसे वाटेना आपुले।
जणु टाटा अंबानीने...,
त्याला विकत घेतले॥३॥
माझे ऑफिस ऑफिस ,
पहा कँप्युटर आलं।
नविन तंत्र ज्ञान....,
आम्हा शिकाव लागेल॥४॥
माझे ऑफिस ऑफिस ,
नका घेऊ हो टेन्शन।
काम करुन आपले...,
रहा नेहमी प्रस न्न॥५॥
माझे ऑफिस ऑफिस ,
करु उत्तम नोकरी।
हेची जाणा श्रीसेवा....,
मिळे पोटाला भाक री॥६॥
माझे ऑफिस ऑफिस ,
करू सारे मेहनत।
नका धरू हो अपेक्षा..,
फळ देईल समर्थ॥७॥
वाचने
2520
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
माझे ऑफिस ऑफिस ,
In reply to माझे ऑफिस ऑफिस , by पाषाणभेद
पहिले सरकरी नंतर निमसरकारी
In reply to पहिले सरकरी नंतर निमसरकारी by Bhagwanta Wayal
वा वा
In reply to वा वा by अभ्या..
कोणत्या जमान्यात वावरताय राव?
In reply to पहिले सरकरी नंतर निमसरकारी by Bhagwanta Wayal
ताई..
In reply to ताई.. by चिगो
०२५१-२३१९७८७ या नंबरवर कॉल
आमच्या हापिसात
In reply to आमच्या हापिसात by खबो जाप
खरंय भऊ , प्रतिक्रियेबद्दल
chhaan aahe kalpana
In reply to chhaan aahe kalpana by निनाव
Thanks