माझे ऑफिस ऑफिस ,
कसे दिसते भकास।
वाजले दहा तरी....,
नाही कुणाचा तपास॥१॥
माझे ऑफिस ऑफिस ,
आस सेवेची धरावी।
ग्राहक देव भव.....,
सेवा तयाची करावी॥२॥
माझे ऑफिस ऑफिस ,
कसे वाटेना आपुले।
जणु टाटा अंबानीने...,
त्याला विकत घेतले॥३॥
माझे ऑफिस ऑफिस ,
पहा कँप्युटर आलं।
नविन तंत्र ज्ञान....,
आम्हा शिकाव लागेल॥४॥
माझे ऑफिस ऑफिस ,
नका घेऊ हो टेन्शन।
काम करुन आपले...,
रहा नेहमी प्रस न्न॥५॥
माझे ऑफिस ऑफिस ,
करु उत्तम नोकरी।
हेची जाणा श्रीसेवा....,
मिळे पोटाला भाक री॥६॥
माझे ऑफिस ऑफिस ,
करू सारे मेहनत।
नका धरू हो अपेक्षा..,
फळ देईल समर्थ॥७॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2554
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे ऑफिस ऑफिस ,
माझे ऑफिस ऑफिस ,
कसे दिसते भकास।
वाजले दहा तरी....,
नाही कुणाचा तपास॥१॥
हॅ हॅ हॅ, सरकारी नोकरी वाटते!
पहिले सरकरी नंतर निमसरकारी
In reply to माझे ऑफिस ऑफिस , by पाषाणभेद
पहिले सरकरी नंतर निमसरकारी आणि पुढे प्राव्हेट होण्याची शक्यता.आता तुम्ही ओळ्खल असेलच मी बी एस एन एल मध्ये नोकरीला आ॑हे.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
वा वा
In reply to पहिले सरकरी नंतर निमसरकारी by Bhagwanta Wayal
वा वा वा वा. भारीच की. मस्त ब्रॉडबँड कविता लिहिता ब्वा तुम्ही.
दिपीका बीएसेनेलमध्ये नसते का हो सध्या? तिच्यावर येऊ द्या की एक कविता.
कोणत्या जमान्यात वावरताय राव?
In reply to वा वा by अभ्या..
कोणत्या जमान्यात वावरताय राव? प्रिती,दिपीका कधीच गेल्या, हाय...! आता उरले सिब्बल.
आणि....
कवितेच म्हणाल तर,आम्ही लवंगी फटाके फोडणारे, तुम्ही अॅटमबाँब फोडायला सांगताय यार.
ताई..
In reply to पहिले सरकरी नंतर निमसरकारी by Bhagwanta Wayal
बीएसएनएलमध्ये आहात का? पोस्टपेडचा ग्राहक सेवा क्रमांक काय आहे हो? बिल भरुनही आऊटगोइंग बंद केलंय.. :-( नेटवर दिलेल्या नंबर्सवर कोणी बोलायलाच मागेना...
०२५१-२३१९७८७ या नंबरवर कॉल
In reply to ताई.. by चिगो
०२५१-२३१९७८७ या नंबरवर कॉल करुन बघा.
आमच्या हापिसात
आमच्या हापिसात
वाजले साडे आकारा तरी....,
नाही कुणाचा तपास॥१॥
आस असतया भाऊ
खरंय भऊ , प्रतिक्रियेबद्दल
In reply to आमच्या हापिसात by खबो जाप
खरंय भऊ , प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार
chhaan aahe kalpana
lihit raha..veglaach vichaar mandala ahe..
khoop shubhechha..
Thanks
In reply to chhaan aahe kalpana by निनाव
Thanks