या पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते कशाचेही कौतुक करतील. भले ती गोष्ट ताजमहालाएवढी मोठी नसेना का. या कौतुकात शनिवारवाडा, लालमहाल असलाच पाहिजे असे नाही. किंबहुना खरा पुणेकर शनिवारवाडा आतून पाहातच नाही. शनिवारवाडा ही पुण्याबाहेरून आलेल्या पर्यटकांनी मुद्दाम भेट देवून पाहण्याची गोष्ट आहे अशी पुणेकरांची पक्की धारणा आहे.
एखादा पुणेकर तुम्हाला विचारेल ' का हो कधी टिळक स्मारकला गेलायत का' यावर समोरचा विचार करू लागतो 'हो गेलोय अमुक तमुक नाटके पाहिली आहेत'. यावर मुरलेला पुणेकर म्हणेल 'ते सोडा हो पण टिळकच्या गेटपाशी आइस्क्रीम(सॉफ्टी) मिळते ते खाल्लय का कधी' आता टिळक स्मारकला नाटक पाहायला जायचे एवढा माफक विचार करणार्याची विकेट पडलेली असते. असे कुठल्यातरी अतिसूक्ष्म गोष्टीचे आख्यान लावून इतरांना कॉम्प्लेक्स देणे हा पुणेकरांचा साइड बिझिनेस आहे.
बालगंधर्व हे नाव ऐकल्यावर आपल्याला नारायणराव राजहंस आठवतील. त्यांच्या नावाचे रंगमंदिर आठवेल. पण पुणेकर तुम्हाला विचारेल 'बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्लाय कधी' यावर नवीन माणूस नाही म्हटला की पुणेकराच्या चेहेर्यावर आनंद तरळतो. मग पुणेकरांचा पुढचा प्रश्न ठरलेला ' काय सांगताय बालगंधर्वचा बटाटेवडा खाल्ला नाही ? किती वर्षे राहताय पुण्यात ? पुण्याचे नागरीकत्व मिळायला टिळकचं आइस्क्रीम, बालगंधर्वचा बटाटेवडा या गोष्टी आवश्यक असाव्यात. सिंहगड हादेखील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नसून ते कांदाभजी खाण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे 'सिंहगडला गेलायत कधी मग झुणका भाकर खाल्ले की नाही' असाही प्रश्न कुणी पुणेकर तुमच्यावर भिरकवू शकतो.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातली एक मिसळ अशीच चर्चेत असते. आपण खानदानी पुणेकर आहोत हे दाखवण्यासाठी याचेही कौतुक करणे भाग आहे. ही मिसळ तुम्ही खाल्ली नसेल तर 'का हो मग तुम्ही पुण्यात राहून करता काय' असा प्रश्न तुम्हाला ऐकावा लागेल. असे अतिप्रचंड कौतुक ऐकून आम्हीही एकदा त्या दुकानात गेलो. रिकामा बाक पाहून बसलो. एक काका आले आणि थंडपणे म्हणाले 'सेल्फ सर्विस'. म्हणजेच बाकावर आणून कुणी देणार नाही. म्हणून पैसे भरून कुपन घेऊन ते देऊन आलो. मिसळ तयार नव्हती म्हणून पुन्हा वाट पाहत बाकावर येऊन बसलो. काही वेळाने मिसळ आली पण चमचेच नाही आणले. म्हणून विचारले 'चमचे इथेच मिळतील का त्यासाठी पुन्हा सेल्फ सर्विस ?' थंड चेहेर्याचे काका जोक समजल्यासारखे हसले.
पुढे थंड चेहेर्याची आणि दरपत्रकाची धास्ती घेऊन दुकानाची पायरी चढलो नाही. नंतर घरीच मिसळीचा बेत केला तेव्हा लक्षात आले 'आमची बायको घरी करते तीच जगातली बेष्ट मिसळ' ती खाताना थंड चेहेर्याच्या काकांची फार आठवण आली. वाटले त्यांनाही मिसळ खायला बोलवावे. त्यांना तरी अशी मिसळ कधी मिळणार ?
खाण्यापिण्याचे फक्त आपणच काय ते शौकीन अशा आविर्भावात पुणेकर बाता करतात. त्यामुळे पुण्यात राहून दुर्गाची कोल्डकॉफी न पिणे म्हणजे अपराधच. बरं त्याऐवजी चूकून दुसरी कोल्डकॉफी पिणे हा तर अधर्मच समजला जातो.
असेच कौतुक काका हलवाईंच्या बासुंदीचे आणि जोशींच्या सुरळीच्या वड्यांचेसुद्धा ऐकायला मिळेल. काकांचे कौतुक करताना आपणच काकांचे खरे पुतणे अशा थाटात पुणेकर भांडतात.
चितळ्यांच्या बाकरवडीचा मात्र यात सर्वात वरचा नंबर लागतो. बाकरवडी चितळ्यांच्या कोथरूडच्या किंवा डेक्कनच्या दुकानातून आणली असे सांगाल तर पुणेकर तुमच्याकडे 'किती रे हा अज्ञानी' अशा नजरेने पाहील आणि मग आपलं नेमकं काय चूकलं हे तुम्हाला कळणार नाही. बाकरवडी अशी दोन मिनिटात जाऊन आणण्याची गोष्टच नाही. चितळ्यांच्या बाजीराव रोडच्या दुकानात जाऊन २ तास रांगेत उभे राहून बाकरवडी आणली तर त्याचे खरे माहात्म्य. बरं तिथेही झटकन नंबर लागला तरी 'आज चितळ्यांच्या दुकानात काय गर्दी, चांगला दोन तास रांगेत उभा राहीलो आणि आणली बाकरवडी' हे ऐकवता आले पाहीजे.
'चितळ्यांची बाकरवडी अशक्य असते' या शब्दात कौतुक ऐकल्यावर नवीन पुणेकर चमकतो. म्हणजे काय ती खाणे अशक्य असते काय ? पण कौतुक करताना पुणेकर कोणते शब्द वापरेल ते सांगता येत नाही. त्या शब्दाचा सामान्य मराठीतला अर्थ एक आणि पुणेरी मराठीत दुसराच असण्याची शक्यता असते.
बाकरवडी साता समुद्रापार पोचली ती तिच्या अंगभूत गुणापेक्षा लोकांनी तिच्यावर लिहिलेल्या निबंधामुळे. पुण्यातला माणूस पुण्याबाहेर मद्रास, कलकत्ता, बंगलोर, लंडन, न्यू जर्सी अशा कुठेही गेला तरी तिथल्या लोकांना 'इथे चितळ्यांची बाकरवडी कुठे मिळते' असे विचारल्याशिवाय राहात नाही. विचारण्याचा भावार्थ बाकरवडीशिवाय तुम्ही जगूच कसे काय शकता ?
एकूण काय तर पुणेकर होण्यासाठी प्रत्यक्ष खाल्ले पाहीजेच ही सक्ती नाही पण शाब्दिक कौतुकाचा मारा करता आला पाहिजे. कौतुकाच्या मेल्स खरडता आल्या पाहिजेत. एरवी दुर्वांकुरचा दर खिशाला परवडला नाही तरी फिकीर नको.
वाचने
21427
प्रतिक्रिया
112
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
आमीबी ह्येच म्हंतो
In reply to (No subject) by बॅटमॅन
इ - चिखलत वैगरे असेल तर तयार
चिखलत कि चिलखत???
In reply to इ - चिखलत वैगरे असेल तर तयार by भावना कल्लोळ
चिलखत
In reply to चिखलत कि चिलखत??? by एकुलता एक डॉन
हिच का ती?
ती मिसळ हि नै रे अभ्या! आणी
In reply to हिच का ती? by अभ्या..
लेख बराच छोटा आहे
लेख बराच छोटा आहे
In reply to लेख बराच छोटा आहे by तुमचा अभिषेक
हेहेहे!
सर्व पुणेकर चितळेंच्या रांगेत
घ्या
बॉम्बची क्लिप निघाली आहे....
काय बोलायच अजुन?
आपल्या गावच्या गोष्टींचं
+१११११११११११११११११११११
In reply to आपल्या गावच्या गोष्टींचं by श्रीगुरुजी
कोल्हापुरी
In reply to आपल्या गावच्या गोष्टींचं by श्रीगुरुजी
च्यामारी आमच्या
In reply to आपल्या गावच्या गोष्टींचं by श्रीगुरुजी
हा प्रतिसाद फाट्यावर मारण्यात
In reply to आपल्या गावच्या गोष्टींचं by श्रीगुरुजी
+१११११११११११.
In reply to हा प्रतिसाद फाट्यावर मारण्यात by मोदक
हायला!!! तुम्ही मिरजेचे
In reply to +१११११११११११. by बॅटमॅन
हम जहां रहते हैं वहीसे गॉथम
In reply to हायला!!! तुम्ही मिरजेचे by कैलासवासी सोन्याबापु
जाइल त्या सिटीला गॉथम सिटी
In reply to हम जहां रहते हैं वहीसे गॉथम by बॅटमॅन
इंडीड. यू कॅन टेक बॅटमॅन औटॉफ
In reply to जाइल त्या सिटीला गॉथम सिटी by हाडक्या
देजा वू!
+१ धागा वाचल्यासारखा वाटतोय.
In reply to देजा वू! by कवितानागेश
+२
In reply to +१ धागा वाचल्यासारखा वाटतोय. by किसन शिंदे
काय या पुणेकरांचे कौतुक ! या
In reply to +२ by आदूबाळ
पुण्यावर आणि पुणेकरांवर भरपूर
In reply to काय या पुणेकरांचे कौतुक ! या by नर्मदेतला गोटा
>>> तुमच्या गावात अभिमानास्पद
In reply to पुण्यावर आणि पुणेकरांवर भरपूर by कहर
हो राव!! कोल्हापूरकर एकदा
In reply to >>> तुमच्या गावात अभिमानास्पद by श्रीगुरुजी
कोल्हापूर
In reply to >>> तुमच्या गावात अभिमानास्पद by श्रीगुरुजी
रंकाळ्यात ताजमहालाचं
In reply to कोल्हापूर by कपिलमुनी
जलपर्णीच्या पानांवर प्रतिबिंब
In reply to रंकाळ्यात ताजमहालाचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते सुवर्णमंदिरासारखं
In reply to जलपर्णीच्या पानांवर प्रतिबिंब by बॅटमॅन
दिलदारी नाय त्यांच्यात जागा
In reply to ते सुवर्णमंदिरासारखं by कॅप्टन जॅक स्पॅरो
पिरपिर काय फुकट नै ऐकत.
In reply to दिलदारी नाय त्यांच्यात जागा by यशोधरा
आमिषाला का भुलतात तर अपुणेकर?
In reply to पिरपिर काय फुकट नै ऐकत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय माहित. ह्या वर्षी किमान
In reply to आमिषाला का भुलतात तर अपुणेकर? by यशोधरा
तुम्ही काय गाइड म्हणून काम
In reply to काय माहित. ह्या वर्षी किमान by कॅप्टन जॅक स्पॅरो
देव करो आणि त्यांच्यावर आणि
In reply to तुम्ही काय गाइड म्हणून काम by यशोधरा
(No subject)
In reply to देव करो आणि त्यांच्यावर आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
@ आमिषाला का भुलतात तर
In reply to आमिषाला का भुलतात तर अपुणेकर? by यशोधरा
ऑ अच्च जालं तल?
In reply to @ आमिषाला का भुलतात तर by अत्रुप्त आत्मा
बॉSSSSS ... मग कच वायला
In reply to ऑ अच्च जालं तल? by सूड
ए अच्चॉ नै कॉलायचॉ...आपन
In reply to बॉSSSSS ... मग कच वायला by अत्रुप्त आत्मा
माताय!! हा दोन्ही बाजूंनी
In reply to पिरपिर काय फुकट नै ऐकत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कारण मी पुणेकर नाही
In reply to माताय!! हा दोन्ही बाजूंनी by सूड
>>कारण मी पुणेकर नाही
In reply to कारण मी पुणेकर नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
अनाहितांच्या लाडोबाची विडंबनं
In reply to >>कारण मी पुणेकर नाही by सूड
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक
In reply to अनाहितांच्या लाडोबाची विडंबनं by बॅटमॅन
टकाटकटंकनकवी
In reply to आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुस्प्गुच् चं बजेट कोंबडीकडे
In reply to टकाटकटंकनकवी by सूड
ये कुछ ज्यादा ही नही हुवा?? ;
In reply to पुस्प्गुच् चं बजेट कोंबडीकडे by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या कोंबडीत वाटा मिळेल कै ;)
In reply to पुस्प्गुच् चं बजेट कोंबडीकडे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक
In reply to आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक by कॅप्टन जॅक स्पॅरो
ए हल्कट =))
In reply to आधुनिक मराठी काव्यप्रकारात एक by टवाळ कार्टा
ए बाबा मला दोन्ही शहरांच्या
In reply to >>कारण मी पुणेकर नाही by सूड
आम्च्या गुर्जींनी व्हिआरेस
In reply to ए बाबा मला दोन्ही शहरांच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
जागा दिल्ती ओ
In reply to दिलदारी नाय त्यांच्यात जागा by यशोधरा
आणि मध्ये ग्रंथ घेऊन
In reply to ते सुवर्णमंदिरासारखं by कॅप्टन जॅक स्पॅरो
_/\_ _/\_ ढिंच्याक राडा...
In reply to आणि मध्ये ग्रंथ घेऊन by बॅटमॅन
+१
In reply to _/\_ _/\_ ढिंच्याक राडा... by कॅप्टन जॅक स्पॅरो
चला करायचा का कोल्हापुर मिसळ/
In reply to +१ by नाखु
आक्षेप घेण्यासारखे काय?
लै गार गार वाटतय आज! :D
सोडा हो बुवा... अतिसुक्ष्म
In reply to लै गार गार वाटतय आज! :D by अत्रुप्त आत्मा
चालायचच...शेवटि ते नर्मदेतले
In reply to सोडा हो बुवा... अतिसुक्ष्म by मोदक
आयडी सार्थ
@धागा शिळ्या कढी ला उत
पुणेकर -कोल्हापूरकर
हाच पांचटपणा फकत शेवटच्या
In reply to पुणेकर -कोल्हापूरकर by कपिलमुनी
कालच याच छापाच्या 'प्रेमळ'
नर्मदेतल्या गोट्यालाही काही
गाडगीळछाप पुणेरी अभिमानाबद्दल
In reply to नर्मदेतल्या गोट्यालाही काही by कंजूस
तुम्हाला कोल्लापूर म्हणायचं
In reply to नर्मदेतल्या गोट्यालाही काही by कंजूस
पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत
कुणी वंदा कुणी निंदा
In reply to पुण्याचे पुनेपण हाळुहळू लोपत by विजुभाऊ
पुणेकर
पुणेकर
आव्हान देणारी
आज कळले काही हॉटेलांना मॅकडी
मॅकडी
In reply to आज कळले काही हॉटेलांना मॅकडी by नर्मदेतला गोटा
या धाग्याकडे जरा दुर्लक्ष
तुम्ही पुणेकर आहात का..?
In reply to या धाग्याकडे जरा दुर्लक्ष by रेवती
हॅ हॅ हॅ. भेटा एकदा......
In reply to तुम्ही पुणेकर आहात का..? by मोदक
भावना दुखावल्या का
In reply to या धाग्याकडे जरा दुर्लक्ष by रेवती
निशानी..
कोण पुणेकर? धन्यवाद.
व्वा फारच छान अप्रतिम लेख !
>> ता.क. भारताच्या branding
कल्याण होईल हो तुमचे!
In reply to >> ता.क. भारताच्या branding by नर्मदेतला गोटा
नर्मदेचा गोटा..... सुन्दर
In reply to कल्याण होईल हो तुमचे! by आयुर्हित
पुण्याबद्दल किती लिहू नि किती
हि घ्या माझीपण दोन अक्षर
In reply to पुण्याबद्दल किती लिहू नि किती by सूड
आमच्याकडे डोंबिवलीमध्ये पण
ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन
ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे
In reply to ह्याच पुण्याबद्दल पुलं नी दोन by जयन्त बा शिम्पि
नायतर काय. जवा तवा आमच्या
In reply to ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे by कपिलमुनी
तो
'मेरे पुणेकी मिसळ, उगले उसळ'
In reply to तो by तिमा
तिमा
In reply to तो by तिमा
आमचं कोल्लापूर आमचं कोल्लापूर
१०० वा प्रतिसाद. ही संधी मज
लेखकाऐवजी लेखिका असेल तर?
In reply to १०० वा प्रतिसाद. ही संधी मज by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुका नै घेणार रे....शुद्ध
In reply to लेखकाऐवजी लेखिका असेल तर? by सूड
नर्मदेची गोटी असं नावं
In reply to लेखकाऐवजी लेखिका असेल तर? by सूड
अर्थाचा अनर्थ बघता असा आयडी
In reply to नर्मदेची गोटी असं नावं by कॅप्टन जॅक स्पॅरो
कै सांगता येत नाही बाबा काय
In reply to अर्थाचा अनर्थ बघता असा आयडी by सूड
हो ना!
In reply to कै सांगता येत नाही बाबा काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to हो ना! by तिमा
अग्गाग्गा
In reply to हो ना! by तिमा