✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शापित अप्सरा

र
रसिया बालम यांनी
Sat, 06/15/2013 - 02:33  ·  लेख
लेख
पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं ;) मधूबाला नावाची शुक्राची चांदणी अगणित रसिकांच्या ह्रदयाची धडकन आहे. फक्त जनसामान्यच नव्हे तर प्रेमनाथ, दिलीपकुमार आणि किशोरकुमार असे महारथी रांगेत उभे आहेत. तिच्या अकृत्रिम निरागस निगर्वि सौंदर्याची तुलनाच नाही यारा..! ११जणांचा कुटुंबकबिला घेऊन कोणी एक अताउल्लाखान देहलवी नोकरीच्या शोधात मुंबईला आला. याच कुटुंबात वॅलेंटाइन डेला, १४ फेब्रुवारी १९३३ रोजी ही अप्सरा अवतरली....बघा देवाचे एडव्हांस्ड प्लानिंग..! तीच मूळ नाव होते मुमताज-जहंंाँ देहलवी. १२व्या वर्षीच ते सौंदर्य चमकू लागले. बालकलाकाराचे एक दोन रोल केल्यावर पहिला लीड रोल मिळाला थेट राज कपूरसोबत नीलकमल (१९४७) या बोलपटात..वय वर्ष अवघे १४! तीची क्षमता देविकाराणी या जाणत्या अभिनेत्रीने ओळखली. देविकाराणीने मुमताजला चित्रपटसृष्टीतील सर्व खाचाखोचा समाजवल्या आणि मुमताजचे फिल्मी नामकरण केले....मधूबाला..वाह्! १९५० साली अशोककुमारसोबत 'महल' रिलीज झाल्यावर "आयेगा आनेवाला" गाणं आणि मधूबाला अजरामर झाले. १९५० ते १९६० हे दशक आपली(?!?) मधूबाला यशाच्या शिखरावर होती. मधूबालाने बहुरंगी भूमिका केल्या. कधी तराना'(१९५१)मध्ये गॉँव की गोरी तर 'संगदिल'(१९५२)मध्ये आदर्श नारी बनली. 'कल हमारा है'(१९५९)मध्ये डबलरोल करुन प्रेक्षकांना नादखुळं केलं. बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत तिने काम केलं. आसीफसाहेबांचा 'मुगले-आझम्'(१९६०)चा बॉक्स-आॅफीसचा विक्रम मोडण्यासाठी तर 'शोले'ला(१९७५) १५वर्षे लागली. तिच्या सौंदर्याची दखल हॉलिवूडने सुद्धा घेतली. पण कर्मठ अताउल्लाखाने ही संधी नाकारली. भारत सरकारने फक्त २ अभिनेत्रींचे postal stamps छापले..मधूबाला आणि नर्गिस! मधूबाला आपल्या खाजगी आयुष्य अतिशय जपायची. त्यामुळे वृतपत्रे प्रचंड गॉसिप छापायची. दिलीपकुमार आणि मधूबाला यांच्या अमर-प्रेमाची सुरूवात 'ज्वार-भाटा'(१९४५)च्या चित्रीकरणामध्ये झाली. दिलीपकुमारने या प्रेमाची कबुली भर कोर्टात एका खटल्याच्या साक्षीत दिली होती. अखेर दिलीपकुमार आणि मधूबाला १९५७ वेगळे झाले. मधूबाला दिलीपकुमारला कधीच पूर्णतः विसरली नाही. 'चलती का नाम गाडी'(१९५८)च्या चित्रीकरणामध्ये किशोरकुमार मधूबालाच्या प्रेमात आकंठ बुडाला. 'एक लडकी भीगी भागीसी' गाणं आठवलं का? १९६०मध्ये किशोरकुमार आणि मधूबाला विवाहबद्ध झाले. विरुद्ध स्वभावाची ही जोडी महिनाभरातच वेगळीही झाली. या सौंदर्याला एक जन्मजात शाप होता. मधूबालाच्या हृदयात एक छिद्र (hole in heart) होतं. हे गुपित 'बहोत दीन हुए'(१९५४)च्या चित्रीकरणामध्ये सगळ्यांना कळलं. १९६०साली लंडनच्या डॉक्टरांनी मधूबालाला शास्त्रक्रियेनंतर एका वर्षाची मुदत दिली होती पण मधू तब्बल ९ वर्षे जगली. थोडं बरं वाटताच तीने २ चित्रपटात 'छलक'(१९६६) व 'फ़र्ज'(१९६९) काम केलं. दुर्दैवाने हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मधूबालाच्या अखेरच्या दिवसांत किशोरकुमारने तिची साथ सोडली नाही. अखेर वयाच्या फक्त ३६व्या वर्षी ही शापित अप्सरा २३ फेब्रुवारी १९६९रोजी हे जग सोडून गेली. मधूबालाला जुहूच्या कब्रस्तानात मूठमाती देण्यात आली. मधूबाला जग सोडून गेलीय आमच्या मनातून नाही. माझी एक इच्छा आहे अप्सरेच्या कबरीवर फुले वाहायला जायचं...आता तेही शक्य नाही कारण जुहूच्या कब्रस्तानात अाता जून्या कबरी हटवल्यात. एका वादळाला चिरनिद्रेसाठी हक्काची जागाही मिळू नये? किसी को रंगीन बहारें भी मिल जाती हैं | किसी को चमन तक नसीब नहीं होता || किसी की कबर पर खड़े हो जाते हैं ताजमहल | किसी को तो कफ़न तक नसीब नहीं होता || Madhu
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
6840 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

काय अप्रतिम सौंदर्य होते.....

निशिगंध
Sat, 06/15/2013 - 02:46 नवीन
जब प्यार किया तो डरना क्या...प्यार किया कोई चोरी नही कि छुप छुप आहें भरना क्या...
  • Log in or register to post comments

लेख आवडला

श्रीरंग_जोशी
Sat, 06/15/2013 - 08:24 नवीन
लेख छान जमलाय. केवळ शेवटच्या तपशीलात जरा चूक आहे. आपले तात्या चार दिवसांपूर्वीच मधुबालाच्या कबरीला भेट देऊन आले. तेव्हाचे त्यांचे चेपूवरील विधान -
आत्ता मधुबालेच्या कबरीपाशी उभा आहे. एकटाच. ती आणि मी दोघंच! खूप बरं वाटतं इथे. Yes, I am with the 'Venus of India' right now...!
अन हा फोटो त्यांच्या चेपूवरून साभार Image removed.
  • Log in or register to post comments

शापित अप्सरा

रसिया बालम
Sat, 06/15/2013 - 13:03 नवीन
जोशीसाहेब, जीव भांड्यात पडला हे ऐकून. धन्यवाद! तात्यांशी संपर्क साधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

...!

किसन शिंदे
Sat, 06/15/2013 - 08:28 नवीन
...! थोड्याफार फरकाने हिच माहिती सगळीकडे वाचायला मिळतेय. मागे तात्यांनी मिपावर मधुबालावर एक लेख लिहीला होता. मधुबाला या अभिनेत्रीवर यापेक्षा अजून जास्त वाचायला कुठे मिळेल? एखादं संपुर्ण पुस्तक किंवा प्रकरण आहे का तिच्यावर??
  • Log in or register to post comments

शापित अप्सरा

रसिया बालम
Sat, 06/15/2013 - 14:16 नवीन
संपुर्ण पुस्तक गूगल निरोप्याचा पत्तावर दिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मधुबाला आपली फेव्हरिट

पैसा
Sat, 06/15/2013 - 09:35 नवीन
तिच्याबद्दल किती पण लिहा वाचायला आवडतंच.
  • Log in or register to post comments

फक्त तीच.

चित्रगुप्त
Sat, 06/15/2013 - 10:18 नवीन
गंमत म्हणजे तिचा एकही सिनेमा अद्याप पूर्णपणे बघितलेला नाही, फक्त काही फोटो आणि तूनळीवर काही गाणीच बघितली आहेत, तरी तीच सर्वोत्तम आणि अद्वितीय, याविषयी दुमत नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा