निरर्थक...
लेखनविषय:
एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला?
प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला?
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय...
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने..
पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला?
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी..
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू...
कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला?
वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या...
पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला?
मांडू नका समोरी पेले असे रिकामे...
भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला?
मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू...
मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला?
वाचने
2963
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय...
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
हे आवडले.
In reply to साक्षात by यशोधरा
मलाही हेच प्रचंड आवडलं! मस्तच..
बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी..
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
जमलये बर .....................
येउ देत अजुन ..............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय...
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
छान आहे
In reply to कविता .. by मनीषा
(सहमत)बेसनलाडू
छान गझल :)
ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला?
बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला?
मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला?
या ओळी विशेष!
मुमुक्षू
अजुन येउ दे.
अतिशय सुंदर गझल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!!
व्वा. फारच सुरेख गझल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सर्वांना मनापासून धन्यवाद!
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
साक्षात