मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बैंगन के लोंज (काश्मिरी वांगी)

प्रभाकर पेठकर · · अन्न हे पूर्णब्रह्म

Baingan-ke-laung

साहित्यः लांब आकाराची वांगी :१/२ किलो. वनस्पती तुप : अर्धा ते पाऊण कप कांदा : १ मध्यम तिखट : १ लहान चमचा (टि स्पून) आलं : १ इंच लवंग : ४ नग दालचिनी : ४ इंच काळी वेलची : १ नग काळी मिरी : ३० नग मीठ : चवीनुसार साखर : ४-५ मोठे चमचे (टेबल स्पून) लिंबू रस : २ ते ३ मोठे चमचे. कोथिंबीर : सजावटीसाठी तयारी: देठासहित वांग्यांना, देठापर्यंत, उभी चीर देऊन वाग्यांना आतून मीठ चोळून ठेवा. कांदा लांब कापून घ्या. आलं एकदम बारीक चिरुन घ्या. तिखट्+लवंग्+दालचिनी+काळी वेलची+काळी मिरी एकत्र वाटून वस्त्रगाळ पुड करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या. कृती: तुप तापवून कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेला कांदा थंड झाला की अगदी बारीक चिरून घ्या (चॉप करा). तळलेला कांदा, मसाल्याची वस्त्रगाळ पुड, मीठ एकत्र मिसळून वांग्यांमध्ये भरा. खोलगट फ्रायपॅन मध्ये, कांदे तळून उरलेले, तुप तापवा आणि त्यांत वांगी परतण्यासाठी ठेवा. अर्धी वाटी पाणी घालून, झाकण ठेवुन, मंद आंचेवर वांगी शिजवा. ह्या प्रक्रिये दरम्यान १-२ वेळा वांग्याची बाजू उलटवून सर्व बाजूंनी शिजवा. लिंबू रस, साखर आणि थोडे पाणी (अगदी २ चमचे) एकत्र करून ठेवा. वांगी पूर्ण शिजली की लिंबू-साखर-पाणी हे मिश्रण घालून मिसळा. साखर विरघळली, रस साधारण दाट झाला की उतरवा. एखाद्या छानशा बाऊलमध्ये किंवा खोलगट बशीत काढून कोथिंबीरीने मस्त सजवा. गरमगरम भाताबरोबर आनंद लुटा. शुभेच्छा...!

वाचने 59214 वाचनखूण प्रतिक्रिया 39

प्यारे१ 22/05/2013 - 02:34
सुंदर पाकृ. 'पाऊण कप वनस्पती तूप' वाचून जरा 'कट-कट' वाटलं. (तवंगाला कट म्हणतात आमच्याकडं) बाकी काल स्नेहातैच्या धाग्यावर वांगं इकडे पण वांगं? सध्या 'वांगमयीन जीवन' का? ;)

In reply to by प्यारे१

त्या तवंगालाच रोगन म्हणतात ना! पूर्वी एखाद्या मुलीनं/बाईनं चेहर्‍यावर मेकअप चढवला की "काय रोगण लावलय!" असं म्हणायचे तसा अर्थ निघतोय. तुम्हाला तुपाचे प्रमाण जास्त वाटत असेल तर कमी घाला.

In reply to by प्यारे१

रेवती 22/05/2013 - 03:00
नाही हो. ते तुम्हाला नाही लिहिले. काही वाक्ये काढायला सांगू नका. इथं माझा कलफलक गंडलाय. मी मझा प्रतिसाद लिहायला चुकले आहे.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर 22/05/2013 - 09:50
प्यारे१, तुप, आपल्या मराठी पाककृतींच्या प्रमाणात, जास्तच आहे. पण काश्मिरात हे जास्त नाही. तसेही, ह्या पाककृती आपल्या रोजच्या आहाराचा भाग नाही बनू शकत. ह्या कधी काळी तेल-तुपाचा विचार न करता फक्त 'चवी'साठी बनवायच्या अन खायच्या. मुळ पाककृतीनुसार मी तुप वापरले आहे. अर्थात, कोणाला कमी वापरायचे असेल तर काहीच हरकत नाही.

In reply to by रेवती

सस्नेह 22/05/2013 - 11:41
'रोगन' या उर्दू शब्दाचा अर्थ 'तेल' असा आहे. जसे बादाम रोगन म्हणजे बदाम तेल. तर्रीवाल्या पदार्थांना हे विशेषण वापरत असावेत.

उदय के'सागर 22/05/2013 - 09:51
वांगी आवडत नाही... पण ही 'डीश' अश्शीच्या अशी समोर असती ना तर खरं सांगतो सगळं फस्त केलं असतं :) फोटो जबरा आणि कातिल सादरीकरण !!!!! घरच्यांसाठी नक्कीच करून पाहिली जाईल ...

ऋषिकेश 22/05/2013 - 10:31
वा.. तव्याबरोबरच ही रेसिपी कन्वेक्शन मोड वर सुद्धा करून बघेन (पाच-सात मिनिटांनी सगळी एकदा वांगी फिरवावी लागतील बहुदा)

पैसा 22/05/2013 - 10:42
भरल्या वांग्यांचा काश्मिरी अवतार आवडला!

सुहास झेले 22/05/2013 - 11:20
भन्नाट.... कसली सही दिसतायत वांगी :) :)

दिपक.कुवेत 22/05/2013 - 11:31
फोटो पाहुनच जीव गेला. वांग्यांभोवती तुपाचं/तेलाच रींगण काय भारी आलेय! अवांतरः माझ्या मते साखर कॅरमलाईज्ड होउन ग्रेव्हि/वांगी काळि झाल्येत का?

In reply to by दिपक.कुवेत

प्रभाकर पेठकर 22/05/2013 - 17:08
नाही. वांग्यांचा रंग नैसर्गिक गडद जांभळा आहे. तेल आणि साखरेने त्याला विशेष चमक आली आहे. साखर कॅरमलाईझ्ड होईपर्यंत शिजवायची नाही. साधारण घट्टपणा (पाक स्वरूप) येई पर्यंत शिजवायची.

nishant 22/05/2013 - 11:41
वांग आवडत नाही..तरिहि या फोटोने भुक चाळ्वली..भाताबरोबर नक्किच छान लागेल.

सानिकास्वप्निल 22/05/2013 - 11:50
हाये!!! दिल वांगी वांगी हो गया ..... निव्वळ अप्रतिम :)

In reply to by सस्नेह

प्रभाकर पेठकर 22/05/2013 - 17:14
वांग्यांमध्ये विविध रंग आणि आकार पाहायला मिळतात. लहान गोल, लहान अंडाकृती, मध्यम आकाराची, मोठी भरताची, लांबट आकाराची वांगी तसेच,गडद जांभळी, पांढरी, किरमिजी, किरमिजी पांढरे पट्टे असलेली, हिरवी अनेक प्रकार आहेत. ही लांबट, गडद जांभळी वांगी सर्वत्र मिळतात. खास काश्मिरची अशी नाहीत. पण पाककृती, पद्धत काश्मिरी आहे.

सूड 22/05/2013 - 16:35
वनस्पती तूपाऐवजी साजूक तूप वापरलं तर?? चव दुणावेल की उणावेल?

Mrunalini 22/05/2013 - 17:40
वा.. काय मस्त पाकॄ आहे... एकदा करुन बघितली पाहिज, पण त्याला तशी बारीक आणि लांब वांगी लागतील ती इथे कुठुन मिळणार.

In reply to by Mrunalini

प्रभाकर पेठकर 22/05/2013 - 17:53
वांगी लांबच असली पाहिजेत असे नाही. छोटी (भरली वांगीवाली) वांगीही चालावित. मोठी वांगी नकोत कारण वांग्यांच्या फोडी करायच्या नाहीएत.

मदनबाण 22/05/2013 - 17:44
देठा सकट असलेली वांग्यांची पाकॄ पहिल्यांदाच पाहिली... काकाश्रींच्या हातचे हादडायला कधी तरी संधी मिळालीच पाहिजे असे आत्ता वाटु लागले आहे. :)

अत्रुप्त आत्मा 22/05/2013 - 18:26
फोटू बघुन जबरी भूक खवळली आहे...आंम्ही ही पा.कृ.करणं...सोडा. गेला बाजार...आज कात्रज पलिकडे वनपत्रे बंधुंच्या हाटिलाला आज भेट द्यावी लागणार. वांग...वांग म्हणजे १ नंबर मिळतं तिथे :)

कच्ची कैरी 22/05/2013 - 19:40
वेगळी आणि छान पाककृती :)

पिवळा डांबिस 23/05/2013 - 01:06
फोटो छान आहे. पण वांग्यासाठी इतकं तूप खायची मनाची तयारी होत नाही हो!!! :) सोडा. नाय म्हणजे वांगी म्हंटली की सोडा आठवतं. सोडे घातलेली वांगी!! अहाहा!!!! बायकू (किंवा शेजारीणही चालेल!!)सीकेपी असेल तर प्रश्नच मिटला!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर 23/05/2013 - 03:27
बायकू (किंवा शेजारीणही चालेल!!)सीकेपी असेल तर प्रश्नच मिटला!!!
वांगी-सोडे करून खाऊ घालण्यासाठी असावे, असे गृहीत धरतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस 23/05/2013 - 22:53
धरा, तसं गृहीत धरा!!!! :) जरा अवांतरः तुम्ही मस्कतात, आमी लालालॅन्डमधे! तेंव्हा गृहीतकांत थोडोसो फरक असतलोच नाय!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 24/05/2013 - 02:11
जरा अवांतरः तुम्ही मस्कतात, आमी लालालॅन्डमधे! तेंव्हा गृहीतकांत थोडोसो फरक असतलोच नाय!!!!
वान्गीदाखल? ;)