ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली. ती मिपावरही टाकत आहे.
का असे केलेस?
कोप-या वरच्या दुकानात
एकदा येणे केलेस,
सर्व मूर्तींमधे मलाच
अचूक तू हेरलेस.
खिशातल्या पाकिटातून
लगेच पैसे काढलेस,
``नंतर घेऊन जातो``
हलकेच मला सांगितलेस.
कागदी रंगीत मखरावर
छान दिवे सोडलेस,
लगबगीच्या तयारीला
उत्साहाने भरलेस.
चतुर्थीला मोटारीतून
मला घरी नेलेस.
जरीकिनारी आसानावर
स्थानापन्न केलेस.
पान,सुपारी,हार,तुरे
सर्व काही आणलेस.
भटाच्या सांगण्यानुसार
कसेबसे पुजलेस.
पेढे,मोदक,करंजी
खाऊ मला घातलेस.
नैवेद्याच्या लाचेमधे
नखशिकांत बुडवलेस.
टाळ्या,टाळ, झांजा वाजवून
कौतुक असे केलेस,
की भक्तिच्या देखाव्यात
सार खरे भासवलेस.
का अशी पापे करून
सर्व काही गमावलेस?
`मला माफ कर``
नाही कधी म्ह्टलेस.
दुस-या दिवशी दुपारीच
पुन्हा एकदा ओवाळलेस,
उत्तर पूजा उरकून घेऊन
हलकेच मला हलवलेस.
`पुढल्या वर्षी लवकर या`
म्हणून पाण्यात शिरवलेस,
स्वतःला धांदलीतून
लगेच मोकळे केलेस.
दिड दिवस का होईना,
तू मला आळवलेस,
जन्माचा राखणकर्ता म्हणून
मला कायमचे अडकवलेस.
वाचने
3812
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कविता आहे
कविता
मस्त....
ह्म्म्.हळवी करणारी कविता.
नाही पटली...!
अजूनही
In reply to नाही पटली...! by केशवराव
ह्म्म्म ... वेगळी कविता
मी काही
In reply to ह्म्म्म ... वेगळी कविता by संदीप चित्रे
कविता आवडली
असेच म्हणतो
In reply to कविता आवडली by चकली
छान कविता
मस्तच
नाहि आवडली
धन्यवाद