आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली ,
सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे.
सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो.
एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो.
हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो.
भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो ,
सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे जर सरकारला शक्य होत नसेल तर ह्या अनधिकृत व्यवसायाचे अधिकृत ,कायदेशीर रूपांतरण झाले तर बेटिंग करणारे जे अनेकांदा अंडर वल्ड शी संबंधीत असतात त्यांच्या कारवायांवर चाप बसेल.
कारण त्यांच्या धंद्यात शब्दावर व्यवहार चालतो ,
ह्यामुळे फसवाफसवी काही प्रसंगी होते.
ह्याउलट युके मध्ये मी लेडब्रोक सारख्या कंपनीच्या कार्यालयात सुरवातीला उत्सुकतेने गेलो होतो , तेथे घोडे , कुत्रे , ह्यांच्या शर्यती तसेस क्रिकेट सोबत ,फुट बॉल, ते बास्केट बॉल अश्या अनेक खेळांवर सट्ट्याचे भाव स्क्रीन वर दिसत होते ,
गंमत म्हणून भारत व इंग्लड च्या एकदिवशीय सामन्यात दोन पौंड इंग्लंड वर लावले,
ह्याबाबत अधिकृत पावती त्यांनी मला दिली ,
शेजारच्या इंग्लिश पब मध्ये जाऊन सामना बघायला सुरवात केली ,
आता भारत जिंकला तरी सेलिब्रेशन व हरला तर पैसे मिळाले असते ,
असा दुहेरी हिशोभ होता.
भारत त्यादिवशी अपेक्षेप्रमाणे जिंकला.
एकदा भारतातून आलेल्या एका मोठ्या व्यावसायिकाने मला अफलातून कल्पना सांगितली , त्यांच्या मते भारतात त्याच्या सारख्या अनेक मित्रांना बेटिंग करायचे असते ,मात्र अनधिकृत रीत्या ते करण्यात खूपच धोका असतो ,म्हणून
युके मध्ये माझे वास्तव्य असल्याने मी त्यांच्यासाठी त्यांच्या पैशाने येथे युके मध्ये अधिकृत रीत्या बेटिंग करायचे व त्याची पावती त्यांना मेल करायची , थोडक्यात हार जीत जशी होईल तसा पैसा त्यांना भारतात द्यायचा ,
ह्यात मला अडचण एवढीच होती की त्यांच्याकडून भारतातून पैसा माझ्याकडे हवाला मार्फत येणार व मी तो हवाला मार्फत परत त्यांना भारतात पाठवणार. ह्यात ते मला कमिशन देणार नव्हते तर महिन्याला अमुक हजार पौंड देणार होते,
सदर प्रस्ताव देणारा भारतीय व्यापारी हा हिर्याचा व्यापारी होता. व हवाला सुद्धा करायचा. ह्यामुळे नम्रपणे त्यांचा प्रस्ताव मी नाकारला..
आमच्याकडे युकेस्थित अनेक भारतीय व्यावसायिक नियमित यायचे, त्यांचे आमचे चांगले संबंध होते.
बहुतेक अनेकांचे हवाला व्यवहार भारतात व्हायचे ,
तेव्हा ह्या धंद्यात आम्हाला खेचण्याचे नेहमीच प्रलोभने दाखवण्यात यायची,
आमचे काम म्हणजे खजिनदाराचे असणार होते.
पौंड मध्ये पैसे घेणे किंवा रुपये परत देणे,
ह्याचे एक महत्वाचे कारण असे होते की ,
भारतीय दुकाने ,उपहारगृह ह्यावर बॉबी लक्ष ठेवून असतात, हवाला व्यवहार तेथून करणे अवघड होते
.
पण ह्या प्रस्तावाला आम्ही कधीच बळी पडलो नाही,
कारण मुंबई पासून असे धंदे करणारे ,त्यांची व्यावसायिक असुरक्षितता व पकडले गेल्यावर मोठ्या माशाने छोट्या माशाला बळीचा बकरा बनवणे असे सर्व प्रकार पहिले होते, परत मध्यम वर्गीय संस्कार, युके मध्ये समाधानी व चाकोरी बद्ध आयुष्य सोडून असे बेभरवशाचे आयुष्य जगायला मनाई करत होते. नैतिकता वैगरे मग मनात विचार यायचा आधी विचार आयुष्यात एखादी रिस्क घेतांना ती घेणे खरच गरजेचे आहे का.
माझा एक दिल्लीचा मित्र होता , त्याचा दिल्लीत प्रचंड मोठा व्यवसाय होता, मात्र कोकेन च्या नशेने त्यांचे व्यवसायात मन रमत नव्हते, परिवारात बदनामी होत होती
हॉटेल व्यवस्थापन केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला युके मध्ये पाठवले. दृष्टी आड सृष्टी असा बहुतेक त्यामागील विचार असावा , त्याचे नवाबी राहणे व श्रीमंती थाट गोर्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा होता, त्यांचा पगारातून त्यांच्या युके मधील जीवनावश्यक गरजा भागयच्या, मात्र त्यांच्या अतिरिक्त मनोरंजनासाठी निधी त्यांच्या घरच्यांच्या कडून दर महिना दोन ते अडीच लाख हवाला तर्फे यायचा, व हे साहेब लंडन मधील साउथ हॉल मधील विविध दुकाने , उपहारगृह येथून काही हजार डॉलर घेऊन हा व्यवहार पूर्णत्वाला न्यायचे.
साउथ हॉल मध्ये भारताच्या बाहेरील माझ्या मते सर्वात मोठे किराणा मालाचे दुकान कम मॉल होता. त्याच्या बरोबर जाऊन आम्ही मित्र महिन्याची खरेदी करायचो ,
त्याला नेहमी मी एक प्रश्न विचारायचो.
तुझे घरचे दर महिना एकाच हवाला वाल्याकडून तुला पैसा देतात. मात्र तो घेण्यासाठी दरवेळी तुला वेगवेगळ्या दुकानात येथे साउथ हॉल मध्ये का यावे लागते , ह्यावर त्याने उत्तरे दिले होते की पोलिसांचे ह्या दुकानांच्या वर लक्ष असते. म्हणूनच त्यांच्या मार्फत पंचतारांकित हॉटेलात हा व्यवहार करण्याचा अफलातून प्रस्ताव आमच्याकडे आला होता.
आम्ही नवीन मिलेनियम मध्ये मराठी मुलांची म्हणजे मुंबई ,पुणे , नाशिक मधील मुलांची पहीली बेच युके मध्ये पहिल्यांदा हॉटेल व्यवस्थापनाचे धडे गिरवून वर्क परमिट वर काम करत होतो , चार वर्षांच्या नंतर आपसूकच येथील सरकार अनलिमिटेड रेसिडेन्सी व पुढच्या वर्षी रेड पासपोर्ट साठी येथील सरकार कडे निवेदन करण्याची मुभा देत होते.
ह्या साठी आमच्या कंपनीला आमच्या साठी आवेदन करावे लागत नव्हते, तेव्हा उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा, असा व्यावहारिक विचार आमच्या डोक्यात होता,
भारतीय नामवंत अभिनेत्यांचे येथे अश्या युके स्थित व्यापाऱ्यांची साटेलोटे असायचे ,त्यात भारतीय ,पाकिस्तानी सगळेच आले. ह्यावर माझ्या मित्राचे स्पष्टीकरण तयार होते ,
भारत सरकार परदेशातून पैसा आला तर कुठून आला अश्या चौकश्या करत नाहीत , मात्र भारतातून माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी पैसा पाठवायचा असेल तर त्यावर रिझर्व बेंक चे अनेक नियम , निकष व अनावश्यक जाचक अटी लादतात,
आता भारतातून परदेशात पैसा पाठवायचा तर ह्या पैशाचा स्त्रोत विचारणे त्याला जाचक वाटत होते , कारण ह्यांचा पडला व्यवसाय .
भारतात होणारा सट्टा थांबवणे कधीच शक्य होणार नाही ,कारण येथील शेतकरी सुद्धा पावसावर आपल्या आयुष्याचा सट्टा लावतो ,नशिबावर हवाला ठेवत सट्टा अनेक शेत्रात सट्टा खेळणारे अनेक आहेत ,
आज परदेशातून आपल्या कडील क्रिकेट मध्ये प्रथम व्यावसायिकता व त्यातून पैसा आली, म्हणजे परकीय खेळाडू आणून खेळवणे , रात्रीचे क्रिकेट , चिअर गर्ल्स ह्या सार्याच परदेशी संकल्पना देशात रुजल्या.
जागतीकरण, भारताची मोठी बाजारपेठ , खेळासाठी वेडे दर्शक त्यांच्या वेडेपणाचा आपली उत्पादने विकण्यासाठी खेळाचा व खेळाडूंचा वापर करण्याचा शहाणपणा करणाऱ्या देशी व विदेशी कंपन्या म्हटले की हे सर्व आले.
युके मध्ये सट्टा अधिकृत आहे , त्याने त्याच्या देशाला महसूल मिळतो व त्यामुळे त्यांच्या क्रिकेट वर प्रतिकूल परिणाम सुद्धा झाला नाही आहे,उलटपक्षी तेथे जे अनधिकृत स्पॉट फिक्सिंग करणाऱ्यांच्या वर स्टिंग ऑपरेशन होते.
, भारतात खेळावर सट्टा लावणे अधिकृत केले तर खेळाडूंच्या वर अधिक डोळसपणे लक्ष ठेवता येईल ,
पण असे करणे भारतात एवढे सोपे नाही ,
असा प्रस्ताव जरी भारतात आला तरी त्यावर राजकीय भांडवल करून प्रस्ताव बासनात बांधला जाईल ह्याची खात्री असल्याने असा प्रस्ताव बहुदा मांडला जात नाही.
शेअर बाजारात परदेशातून आलेले देरेवेटीव ही संकल्पना रुजली. तो माझ्यामते एक सारखा जुगार आहे , राज्यातर्फे लॉटरी हा जुगार म्हणायचा.
मात्र खेळात विशेतः क्रिकेट मध्ये सट्टा म्हटला की काळीज थरारते,
कारण क्रिकेट हा मैदानी खेळ आहे , मात्र भारतात मैदाने कमी म्हणून आपण दर्शक भावनेचा खेळ म्हणून सुद्धा ह्याकडे पाहतो ,अश्याच प्रकारचे दर्शक जगभारत फुटबॉल साठी आहेत, आज जर्मनीत मी फुटबॉल वर अधिकृत सट्टा लागतांना पाहतो ,तरी ह्या खेळाची लोकप्रियता, व्यावसायिकतेवर मी परिणाम झालेला पहिला नाही आहे,
म्हणूनच असे वाटते भारतात खेळावर सट्टा अधिकृत करण्यात काहीच हरकत नाही आहे ,
तुम्हाला काय वाटते ,
वाचन संख्या
24829
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या सर्वाचे गणित करूनच
In reply to अनेक पुरावे आहेत. by प्रभाकर पेठकर
क्षेत्ररक्षकांची जबाबदारी.
In reply to ह्या सर्वाचे गणित करूनच by चौकटराजा
>>> फिल्डर नावाचे अकरा खेळाडू
In reply to ह्या सर्वाचे गणित करूनच by चौकटराजा
अंशतः सहमत..
In reply to क्रिकेट आणि सट्टा... ? by चौकटराजा
आमचे मत match fixing साठीच
In reply to अंशतः सहमत.. by उपास
काय हे ?
In reply to अंशतः सहमत.. by उपास
तेंव्हा माध्यमे ,
In reply to क्रिकेट आणि सट्टा... ? by चौकटराजा
बेटिंग केले म्हणून अनेक
In reply to तेंव्हा माध्यमे , by शिल्पा ब
बरं मग
In reply to बेटिंग केले म्हणून अनेक by निनाद मुक्काम …
ह्यावेळी ३ खेळाडूंनी आपापले
In reply to बरं मग by चौकटराजा
सर.....अहो श्रीशांत ला
संजू बाबाच्या तुरुंगवारी मुळे
In reply to सर.....अहो श्रीशांत ला by वेताळ
जन्नत ३ ची स्क्रिप्ट आयतीच
In reply to संजू बाबाच्या तुरुंगवारी मुळे by निनाद मुक्काम …
पोरी
वरील समीकरणात थोडेसे क्रिकेट
In reply to पोरी by चिरोटा
फिक्सिंगची चूक मान्य करत
अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या
In reply to फिक्सिंगची चूक मान्य करत by निनाद मुक्काम …
http://timesofindia
श्रीशांतला अटके केली त्यावेळी हॉटेल रुम मध्ये
अधिकृत सट्टा..
संपूर्ण सामना फिक्स करणे
हरकत नाही. तसाही आता चांगल्या
एकूण लोकांचे क्रिकेटाकर्षण
सामना फिक्सिंगचे अजून एक
+१
In reply to सामना फिक्सिंगचे अजून एक by श्रीगुरुजी
२००९ चा अपवाद वगळता चेन्नईचा
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या लेखातून जे मत मी
हालचालींना वेग.
काका तुम्ही म्हणता तेवढा नाही
In reply to हालचालींना वेग. by प्रभाकर पेठकर
का नाही.
In reply to काका तुम्ही म्हणता तेवढा नाही by निनाद मुक्काम …
थोडा जास्त असावा
In reply to का नाही. by प्रभाकर पेठकर
आयपीएल मुळे काही चांगले
धोनी ला कल्पना असली तरी
>>> अझर ,जडेजा बेटिंग करत
जडेजा व अझर , हे मोठे मासे
In reply to >>> अझर ,जडेजा बेटिंग करत by श्रीगुरुजी
क्रिकेटवर सट्टा अधिकृत करणे