मी काही वर्षांपूर्वी क्रेट्स विकायचो.[माझ्या बहुविध उद्योजकतेचा आणखी एक [अ]यशस्वी टप्पा !- हा हा हा !
तेव्हा एकदा संगमनेरला गेलो, सक्काळी-सक्काळी मार्केट-यार्डला पोचलो. थेट एका दुकानात शिरलो. दुकानात एक लहानसं- ९-१० वर्षांचं पोरगं होतं. आम्ही जरा इकडे-तिकडे घुटमळतोय असं दिसल्या-दिसल्या त्याचा प्रश्न :-
"कॅरट विकता काय ?"
"हो, मालक कुठेत" -- माझा व्यवहारी, मॅच्युअर्ड प्रश्न !
चक्क दुर्लक्ष करून तो पुढे :-
"किती ग्राम ? १६५ दिसतोय , शेकंडचा माल हाय का नव्वा ?"
लग्गेच "कॅरट" काट्यावर पोचवलसुद्धा "कार्ट्या"नं !
वजन तब्बल (३) ग्रामनी चुकलं हो - १६२ ग्राम भरलं.
त्याचा आगाऊपणा चालूच :-
"काय रेट?" , "अर्धी गाडी देता का?" , "चेक पेमेंटच लागतं का?", "इथे आम्हाला कॅशच मिळते" वगैरे वगैरे....
तेवढ्यात दस्तुरखुद्द मालक ऊर्फ त्या आगाऊ कार्ट्याचे वडील हज्जर !
"सॉरी, जरा उशीरच झाला राव, जा रे च्या सांग..."
"तुमचा...हा...मुलगा आहे का ?"-- मी.
" कसला भारी आहे राव "
" अहो, हो ना ! हितं बसतो सारखा, सांगतो लेका शाळंला दांड्या नको मारू, असं शिक्षणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल , काय म्हनता ?"
"खरंय" --- मी अवाक.
वाचने
4398
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंय.
सोल्लेट एकदम
लेख आवडला.
हा हा हा किस्सा आवडला.
साहजीक आहे
अरे शिक्षण शिक्षण .........
In reply to साहजीक आहे by दिपक.कुवेत
छान. अशी कितीतरी पोरं/पोरी
हं....काही काही आहेत म्हणा.
In reply to छान. अशी कितीतरी पोरं/पोरी by आतिवास
चलाख पोरग!
आयुष्य हीच एक मोठी शाळा आहे.
अगदी पटलं प्रभाकर....
In reply to आयुष्य हीच एक मोठी शाळा आहे. by प्रभाकर पेठकर
वाहव्वा....
In reply to अगदी पटलं प्रभाकर.... by १००मित्र
आपल्याकडे,
रोचक
पण दोस्ती-नात्यात चार
In reply to रोचक by सहज
मस्त किस्सा.
किस्सा आवडला.
किस्सा आवडला
सहमत
In reply to किस्सा आवडला by पैसा
मान्य !
In reply to किस्सा आवडला by पैसा
वा!
एक नंबर !
In reply to वा! by दिपक
अरेरे! वाईट वाटलं वाचून