✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!

म
मनिष यांनी
Fri, 09/12/2008 - 17:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7030 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

म
मेघना भुस्कुटे Fri, 09/12/2008 - 18:07 नवीन

जबरदस्त

जबरदस्त बॉस. जबरदस्त. जवळजवळ सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळाला. आपल्याला काय दाखवायचे आहे, आणि ते कसे दाखवायचे आहे, याची क्लॅरिटी खरंच खूप महत्त्वाची असते. मी अजुनी पाहिला नाहीय 'मुंबई मेरी जान'. आता बघावा'च' लागणार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/15/2008 - 15:34 नवीन

जबरदस्त

जबरदस्त बॉस. जबरदस्त. जवळजवळ सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळाला. हेच म्हणतो...! मनिषराव, जियो...! आपला, (मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
श
शितल Fri, 09/12/2008 - 18:20 नवीन

वॉ...

परिक्षण छान केले आहे. मुंबई मेरी जान पहायला पाहिजे. :)
  • Log in or register to post comments
म
मनी Fri, 09/12/2008 - 18:23 नवीन

मस्तः आता

मस्तः :) आता बघावा'च' लागणार
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 09/12/2008 - 18:27 नवीन

मस्तच

मस्तच रे! मलाही असच वाटलं की मी परत सिनेमा पाहातेय. खरच खुप सुंदर चित्रपट!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 09/12/2008 - 18:28 नवीन

मस्त

मस्त परिक्षण मनिष. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 09/12/2008 - 18:35 नवीन

ह्म्म..

परीक्षण वाचून सिनेमा पहायलाच हवा असे दिसते, आता डीव्हीडी मिळवण्याच्या मागे लागायला हवं.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप Fri, 09/12/2008 - 18:40 नवीन

सुंदर परिक्षण

अतिशय सुंदर परिक्षण. वर लिहिल्याप्रमाणे, खरंच पुर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. या चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा या आपल्यातील एक आहेत असे आपल्या परिक्षणावरुन कळते.हा चित्रपट बघायलाच हवा!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/12/2008 - 18:46 नवीन

छान परिक्षण!

बघायला हवा 'मुंबई मेरी जान'! अवांतर - कालच अनुपम खेर अन् नसरुद्दीन शहा यांचा "वेनस्डे" बघितला.....याच पठडीतला अतिशय वेगळा अन् सुंदर चित्रपट! बर्‍याच वर्षानंतर अनुपम खेरने चांगला अभिनय केला आहे!
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/12/2008 - 18:52 नवीन

वेनस्डे

वेनस्डे मलाही बघायचा आहे...छे, फारच बॅकलॉग राहिलाय सिनेमांचा, भरून काढला पाहिजे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
र
रामदास Fri, 09/12/2008 - 19:07 नवीन

बॅकलॉग बराच आहे.

रॉकऑन वेद्न्सडे आणि आता मुंबई मेरी जान . बघून नक्की कळेल काय ते. आपण केलेल्या लिखाणातून तसा सिनेमा बघितल्याचा अनुभव आला आहेच. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
B
baba Fri, 09/12/2008 - 20:27 नवीन

बघाच 'मुंबई मेरी जान'!

निशिकांत कामत चा उत्तम चित्रपट. बघाच ..... फक्त मुम्बईकरच नाहि पण सगळयाच्या मनाला भिडेल असा चित्रपट... मनिष, जबरदस्त परीक्षण ....! रॉकऑन हि चान्गला आहे... एक मुम्बईकर :) बाबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/12/2008 - 20:35 नवीन

दोन्ही पाहिले पाहिजेत.

'वेनस्डे' आणि 'मुंबई मेरी जान' दोन्ही चित्रपट पाहिले पाहिजेत. उत्तम लेख. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 09/12/2008 - 20:45 नवीन

पाहिला

हा चित्रपट परवाच पाहिला.. चांगला आहे.. परेश रावलचे काम चांगले आहे. आपले परिक्षण चांगलेच आहे. त्यात कॉफिवाल्याचे भावविश्व फार चांगले वाटले. तो वेगळ्या कथानकाचा विषय वाटतो. तसेच वार्ताहर बाईना झालेले साक्षात्कार पण चांगले आहेत. हे लोक इतरांच्या भावनांचा कसा खेळ करतात ते चांगले दाखवले आहे. चित्रपट एकसंध आणि चांगला वाटतो. पण... देवासमोर उभे राहून शांत चित्ताने प्रार्थना केल्यावर समाधान मिळते.. हे समजले. त्यानंतर मी ते करु लागलो. पण कुणी वेगळ्या काही कारणासाठी देवासमोर डोळे मिटले नाहित तर मी त्याला रागावलो. असेच होत असते. डोळे मिटावे..समाधानासाठी पण तसे नकरणार्‍याला माझ्या नकळत मी दोषी ठरवतो. समाजाने सहिष्णू असण्याचे फायदे जाणले आहेत. जो सहिष्णू नाही तो समाजात थोडा खालच्या प्रतिचा समजला जाउ लागतो. हे स्वाभाविक. पण वेगळ्या व्यक्तीने आपली शांतता भंग केली आहे आणि मी ते डोळे उघडून पाह्यला लागल्यावर मलाच शिक्षा, माझीच निर्भत्सना ! ज्याने शांतता भंग केली त्याच्या बद्दल पुढे बोलू..पण मी आत्ताच्या आता गप्प बसायचे ! आणि त्याच्याबद्दल पुढे बोलु..कधितरी पुढे... (अगदी वास्तवदर्शी चित्रपट.) सहिष्णूतेचे तेच तत्वज्ञान नव्या वेष्टणात.. ज्याला खप आहे तेच तयार केले जाते ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 09/12/2008 - 21:48 नवीन

मी हा

मी हा चित्रपट ८-१० दिवसांपूर्वी पाहिला. विस्कळीत पटकथा असलेला चित्रपट असं मी याचं वर्णन करीन. कामतसाहेबांना शेवटपर्यंत काय म्हणायचं आहे ते कळत नाही. त्यांना जर 'लाईफ गोज ऑन' आणि त्या अनुषंगानं दिसणारं मुंबईचं स्पिरिट दाखवायचं असेल (असं मी गृहित धरून चाललो होतो) तर त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरलाय असं म्हणावं लागेल. पण दिग्दर्शक त्यातल्या पात्रांच्या वैयक्तिक सुखदु:खातून बाहेरच पडू शकत नाही. त्यामुळे एकूणच मुंबईकरांची एक समाज म्हणून झालेली हानी आणि त्यातून त्यांचं जिद्दीनं उभं राहाणं हे न दिसता चित्रपट २-३ पात्रांच्या भोवतीच फिरत राहतो, विशेषतः सोहा अली खानची कथा. माधवनच्या कथेबद्दलही असंच म्हणता येईल. देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे. यातून कामतसाहेबांना नक्की काय सुचवायचं आहे? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रथम पाहता खटकतात (आणि जरा खोलात विचार केल्यावर अजूनच जास्त खटकतात). सर्व कलाकारांचा अभिनय दमदार आहेच. त्याबद्दल वादच नाही. विशेषतः परेश रावल आणि केके यांचा अभिनय उत्तम, किंबहुना पटकथेतच त्यांची पात्रं एकूण इतरांपेक्षा जास्त सशक्तपणे उभी राहिली आहेत असं म्हणायला हरकत नाही. असो, मी काही फार मोठा जाणकार नाही, पण 'डोंबिवली फास्ट' नंतरची गाडी एकदम 'स्लो' सोडून कामतसाहेबांनी थोडा अपेक्षाभंग केला असंच मी म्हणीन. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 09/12/2008 - 22:04 नवीन

बरोबर

>>देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे. << ह्म्म हा मुद्दा मी विसरलोच होतो.. बरोबर आहे आपण म्हणता ते. पण या प्रसंगी केलेला गुगल अर्थचा वापर फार मस्त आहे ! मला एकदम कल्पक वाटला ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मनिष Fri, 09/12/2008 - 22:55 नवीन

सुरक्षिततेच्य शोधात...

देशावर आणि मुंबईवर प्रेम असणारा, त्यासाठी उच्च पदावर असूनही परदेश वारीच्या अनेक संधी नाकारलेला, प्रदूषण होऊ नये म्हणून लोकलने प्रवास करणारा माधवन चित्रपटाच्या शेवटी अमेरिकेस जाण्याचे स्वप्नं रंगवताना दाखवलेला आहे.
स्वप्न रंगवतांना??? मला नाही वाटत तस अभिप्रेत आहे दिग्दर्शकाला -- माधवन घाबरला आहे, ही सततची असुरक्षितता, वारंवार होणारे घातपात हे बघून तो देशांतराचा विचार करतो, पण मित्राच्या सांगण्यवरून ९/११ नंतर अमेरिकेतही पसरलेला दहशतवाद, ती असुरक्षितता आहेच हे त्याला जाणवते! ती त्याची प्रक्रिया अतिशय नैसर्गिक वाटते...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/12/2008 - 23:32 नवीन

मनिष..

सर्वप्रथ तुझं अभिनंदन! इतकं सुंदर तू परिक्षण लिहिलं आहेस ना या चित्रपटाचं की, आता हा चित्रपट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही असच वाटतं आहे. तू तर प्रत्येक पात्र आणि प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला आहेस. जबरदस्त लेखन. धन्यवाद, एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 09/14/2008 - 11:51 नवीन

धन्यवाद...

प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सगळ्यांनाच धन्यवाद!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 09/14/2008 - 12:14 नवीन

हा चित्रपट

हा चित्रपट पहायचा राहिलाय ...स्पॉइलर्स डिस्क्लेमर सुद्धा वाचला... त्यामुळे डीटेल्स वाचले नाहीत.... पाहिल्यावर लिहिणार... अरे आठवडाभर घरचे नेट बंद आहे त्यामुळे सगळे प्रतिसाद उशीरा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 12:25 नवीन

मनिष, मस्त

मनिष, मस्त परीक्षण. आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 09/27/2008 - 00:34 नवीन

परीक्षण

परीक्षण पूर्ण वाचले... एकदम छान झालंय... आज दुपारी पाहिला सिनेमा... फार आवडला... एक गोष्ट पाहिली का? या सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेयनामावलीत पहिलंच नाव परेश रावळचं आहे.... बहुतेक प्रथमच असं घडत असेल... ( चांगल्या अर्थाने म्हणतोय, ) क्रॅशची आठवण झाली... त्यात शेवटी सार्‍यांचे गंड ( कॉम्प्लेक्सेस) , गिल्ट आणि द्वेषाची भावना या सार्‍याचे शांतपणे निराकरण होताना पाहणे आवडले.... विशेषतः के के ( सुरेश) शेवटी चहाच्या टपरीत त्या पोराशी गप्पा मारतो आणि नंतर कार्ड फाडून टाकलेल्या कंपनीत कम्प्यूटर बसवायला सुद्धा जातो, तो साराच प्रसंग अप्रतिम... मुंबई हे एक मोठं मेल्टिंग पॉट आहे .... ( सारा सिनेमा झाल्यानंतर सगळ्या व्यक्तिरेखा काय शिकल्या?.... ).. हा अभ्यासही छान आहे करायला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 09/27/2008 - 00:50 नवीन

एक प्रसंग --

एक प्रसंग -- सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात...ते बोलत असतात...कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो....कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो...मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत...बॉसचे बोलणे संपते...तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात.... संवादाशिवायचा हा प्रसंग खूप आवडला.. १० वाक्यांचं काम केला या सीनने..! खूप आवडला मुव्ही.. बॉम्ब फुटला तेव्हा मी लिटरली हादरले.. पॉझ करून दोन मिनीटं बसून राहीले होते.. ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला त्यांची काय हालत होत असेल! :( परेश रावल्,केके मेनन्,सोहा सगळे सगळेच आवडले!! खूप आवडला मुव्ही!
  • Log in or register to post comments
म
मानस Sat, 09/27/2008 - 01:02 नवीन

सुंदर परीक्षण

ह्या अनुषंगाने बर्‍याच, म्हणजे सुमारे २० वर्षांपुर्वी "सवाई एकांकीका" स्पर्धेत झालेल्या "बाँब ए मेरी जान" ह्या केदार शिंदेच्या एकांकीकेची खुप आठवण झाली. निव्वळ ४५ मिनिटात, बॉंब-स्फोटाच्या पार्श्वभुमीवर अतिशय सुरेख चित्रण केदार शिंदे याने ह्या एकांकीकेत मांडले होते, आता आठवत नाही पण बहुतेक पहिलं बक्षिस मिळालं होतं. असो, हा चित्रपट नक्कीच बघणार ..... इथे थिएटर मधे लागण्याची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा