✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 05/13/2013 - 10:36  ·  लेख
लेख
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे. मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं. मायबोलीवरचा एक मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही एक उत्तम असा धागा काळजीपूर्वक वाचून झाला पण आमच्या ज्ञानात काही उजेड पडेना. मायक्रोव्हेव च्या सेटींग, त्याचे तापमानाचे सेटींग आणि मग आपल्यालाला पाहिजे तसा मेनू भाजून-करुन झाला पाहिजे. आमच्याकडे मिळणारे 'वामट' नावाचा माश्याचा प्रकार त्याला कसाही करा त्याची भाजी जबरा होते. या माशांचे फ्राय करण्याचा मूड काल उसळून आला. कंटकी टाईप. मासे मस्त कापून बिपून आलं,लसून,मिरचीचा पेष्ट लावले आणि ग्रील सेटींमधे अगदी २५ मिनिटे त्यात ठेवले अजिबात व्यवस्थित असा फ्राय झाला नाही. पुन्हा ग्यासवर ते फ्राय करण्यात आले, काल आमचं किचनमधे प्रचंड हसं झालं. मायक्रोवेव्ह ओव्हन मधे शीरा,उकमा,पोहे, करता येतात. चिकन,मासे, मस्त फ्राय करता येतात. वांग्याचं चांगलं भरीत करता येतं. वगैरे मित्र हो, या सर्व कृती त्यात होत असतील, करता येत असतील तर त्याला मी मूकलो आहे. तेव्हा, मायक्रोवेव्ह ओव्हनस मधे काय शिजवता येतं, काय फ्राय करता येतं, ते कसं केलं पाहिजे, भांडे कोणते वापरले पाहिजे, कोणत्या सेटींग्स कशा केल्या पाहिजेत, विविध मायक्रोवेव्ह ओ. मधे हे सर्व कसं करतात त्याची माहिती मिळाली तर काथ्याकूटाचा हेतू सफल होईल म्हणून हा प्रपंच. विनंती : चुलीवरचे भरीत अहाहा. चुलीवरच्या भाकरी अहाहा. ग्यासवर जी मजा ती मजा इथे नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53137 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग मी

शिल्पा ब
Mon, 05/13/2013 - 10:47 नवीन
मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग मी फक्त अन्न गरम करणे, पाणी /दुध इ. उकळणे, भाज्या उकडणे, डी फ्रॉस्टींग अन क्वचित भात करणे यापलिकडे करत नाही. बाकी अन्न गॅसवर किंवा कन्व्हेन्शन ओव्हन मधेच छान होते.
  • Log in or register to post comments

अंडं

राजेश घासकडवी
Mon, 05/13/2013 - 10:49 नवीन
मायक्रोवेव्हमध्ये एखादं अंडं शिजवून पहा. म्हणजे पाणी वगैरे काही घ्यायचं नाही. नुसतं अंडं ठेवायचं मध्यभागी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन हायवर दोन मिनिटं ठेवा. ओव्हन स्वच्छ करून झाल्यावर उरलेला पदार्थ कसा काय झाला ते जरूर कळवा. ;)
  • Log in or register to post comments

बर्‍याच पुरुषानी हा प्रयोग

सौंदाळा
Mon, 05/13/2013 - 11:02 नवीन
बर्‍याच पुरुषानी हा प्रयोग केला असावा. अस्मादिकानी देखिल ओव्हन मध्ये अन्डा बॉम्ब फोडले आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+६

कपिलमुनी
Mon, 05/13/2013 - 14:32 नवीन
मी एकदा ६ अंड्यांचा बाँब फोडला आहे .. संपूर्ण किचन साफ करावा लागला मला...ते सुद्धा रविवारी :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

असलं धोकादायक काहितरी

काकाकाकू
Mon, 05/13/2013 - 22:02 नवीन
सांगू नका हो. नुसत्या शेवटच्या स्मायलीवरून गंमतीत लिहित आहात हे कळत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अंडं न खाणार्‍यांना हाच

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/15/2013 - 23:52 नवीन
अंडं न खाणार्‍यांना हाच प्रयोग आख्ख्या माशावरही करता येईल. स्वतः केलेला नाही, पण डोळ्यांसमोरच स्वच्छतेपर्यंतच्या सगळ्या पायर्‍या पाहिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

=))

पैसा
Mon, 05/13/2013 - 10:51 नवीन
आधी एकदा डोळे चोळले. हा अनाहिताचा धागा नाही याची खात्री केली. http://www.lg.com/in/recipe http://www.youtube.com/watch?v=tCotRqL5fsk या लिंकांचा काही उपयोग होतोय का बघा!
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/13/2013 - 10:58 नवीन
>>> एकदा डोळे चोळले. हा अनाहिताचा धागा नाही याची खात्री केली. अनाहिताच्या सदस्यांच माहिती देतील त्यात काही वाद नाही, पण सर्वांनीच सर्वोतोपरी मदत केली तर आनंद वाटेल. बाकी, एलजीच्या दुव्याबद्दल आभार. पण प्र्याक्टीकली कोणी व्यवस्थित समजून सांगितलं तर मला ती माहिती अधिक थेट पोहचेल असे वाटते. वाटल्यास एखाची चिकन फ्रायची कोणी पाककृती समजून सांगत असेल तर चार वाजेच्या नंतर एका चिकनचा बळी द्यायची माझी तयारी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरं का ! यावरुन एक आठवलं :

शिल्पा ब
Mon, 05/13/2013 - 11:31 नवीन
बरं का ! यावरुन एक आठवलं : एकदा एक बटाटा उकडायला म्हणुन नुसताच पोटॅटो सेटींगवर मॅन्युअल न वाचताच ठेवला. काही सेकंदानी जाळ झाला मग स्फोट झाला अन मी घाबरुन फायरवाल्यांना बोलावलं. नवीन मायक्रोवेव्ह घ्यावा लागला तो वेगळाच. अर्थात काय शिजवायचं ते शिजवा पण आधे मॅन्युअल वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बटाटा

मैत्र
Mon, 05/13/2013 - 14:14 नवीन
गेल्याच आठवड्यात एक प्रयोग पुन्हा एकदा यशस्वीपणे केला. बटाटा नुसताच किंवा थोडंसं पाणी लावून (खूप नाही फक्त जरा ओला होईल इतकंच) एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून २ मिनिटे साध्या हीटींगवर ठेवला तर नीट शिजतो. झटपट शिजवण्यासाठी सोपी कृती .. पण पॉलिथिन इतकी पातळ नको की प्लास्टिक वितळेल / चिकटेल / जळेल.. स्फोट कशामुळे झाला / पोटॅटो सेटिंग काय असते? उसगावाप्रमाणे ते इथल्या मायक्रोवेव्हवर पण असतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आणखी एक. बटाटा, वांगी माओ

पाषाणभेद
Mon, 05/13/2013 - 22:48 नवीन
आणखी एक. बटाटा, वांगी माओ मध्ये शिजवायचा असेल तर त्याला काट्याने (चमचा-काटा) त्याला टोचे मारून घ्यावेत. तो प्लास्टीकच्या पिशवीत ठेवायचा की नाही हे नक्की आठवत नाही सौ. ला विचारावे लागेल! तुम्ही अन बाकीच्यांनीदेखील माओ बिनधास्त वापरा. कोणतीही काळजी करू नका. माझ्या घरी माओ अगदी वरचेवर (जसे काही एक नवीन स्वयंपाक बनवण्याची शेगडी घ्यावी तसा) वापरला जातो. एलजीचाच आहे. वॉरंटी संपल्यानंतर एकदा मॅग्नेट्रॉन उडाला होता. १२०० की १३०० रूपयांत बदलून घेतला. या माओ वर सौ. अगदी सगळे पदार्थ बनवते. केक अन बिस्कीट सारे काही. भाज्या वैगेरे सारे सारे. आम्ही नॉनव्हेज खात नाही पण ती माहेरी बनवायची. तिला तर माओमध्ये नॉनव्हेज बनवण्याचाही कॉन्फिडन्स आहे. बाकी माओ मध्ये मी साबूदाणा खिचडी एकदम झकास करू शकतो. फक्त १) अंडे त्यात शिजवू नका. नाहीतर पुन्हा धडाम! २) गरम काचेचे भांडे लगेचच किचन ओट्यावर ठेवू नका. खाली काहीतरी फडके किंवा लाकडी पाट घेवून त्यावर ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

प्लॅस्टीक वापरु नका. सिरॅमिक

शिल्पा ब
Mon, 05/13/2013 - 22:53 नवीन
प्लॅस्टीक वापरु नका. सिरॅमिक किंवा जाड ग्लास वापरा. प्लॅस्टीक अन्नात शोषलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

आमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन

सौंदाळा
Mon, 05/13/2013 - 10:55 नवीन
आमच्या घरी मायक्रोव्हेव ओव्हन घ्यायचे ठरले त्यावेळी केक करायची हौस म्हणुन कन्व्हेक्शन ओव्हन घेतला, २-३ हजार रुपडे जास्त घालुन (कन्डक्शन पेक्षा) १-२ केक प्रयोग देखिल झाले. पण सध्या त्याचा उपयोग फक्त आधीच केलेले अन्न गरम करणे, कोणाला सर्दी झाली की पाणी गरम करणे, दाणे, पापड भाजणे, सुप करणे इतकाच होतो. अवांतर: फुड प्रोसेसरचा वापरदेखिल आता फक्त मिक्सर म्हणुन होतो. :( मिपावरील सुगरण्स आणि बल्लवाचार्याच्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यास मला (पत्नीला)देखिल खुप फायदा होइल. :)
  • Log in or register to post comments

मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/13/2013 - 11:02 नवीन
आता तुम्हाला म्हणून सांगतो याबाबतीत समजून न घेता केलेल्या कृती अंगलट येतात असे वाटते. तुम्हाला म्हणून सांगतो. मी पापडं क्वीक मोडवर लावली होती असा प्रचंड भडका उडाला होता की पुछो मत आणि पापडांचा पार कोळसा झाला होता. प्रचंड धूर...बरं तेव्हा घरी नव्हतं म्हणून आपला हा प्रकार झाकला गेला. >>> मिपावरील सुगरण्स आणि बल्लवाचार्याच्य प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. अगदी मनातलं बोललात. माओवे चा उत्तम वापर कसा करता त्याची प्रचंड उत्सूकता मला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मग आता विषय निघालाच आहे तर

पिलीयन रायडर
Mon, 05/13/2013 - 11:05 नवीन
मग आता विषय निघालाच आहे तर कुणी तरी हे ही सांगा की काही लोक म्हणतात की मायक्रोवेव्ह वापरणे आरोग्यास चांगले नाही. चे.पु वर ह्या संबंधी एक पोस्ट पण फिरत आहे.. खरे आहे काय हे? आणि बिरुटे सर, मलाही पापडा व्यतिरिक्त काहीहि भाजता येत नाही..
  • Log in or register to post comments

प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय

गवि
Mon, 05/13/2013 - 11:10 नवीन
प्रा.डॉंच्या धाग्याने अतिशय आवश्यक आणि उपयोगी माहिती कोणीतरी देईल अशी आशा आहे. मायक्रोवेव्हचा उपयोग त्यावर टेबलक्लॉथ टाकून इतर वस्तू ठेवण्यासाठी केला जात असल्यामागे खरोखरचे कारण म्हणजे त्याच्या वापराविषयी अज्ञान आणि भीती हेच आहे. कन्व्हेक्शन, कन्व्हेन्शन की काय असे तीन modes आहेत असं ऐकलं आहे. पण कोणत्या मोडमधे काय बनते हे ठावूक नाही. लोक ब्रेड, नानकटाई, तंदुरी चिकन असे नानाविध पदार्थ मायक्रोवेव्हमधे बनवतात आणि अमुक डिग्रीवर "प्रीहीट" करुन घ्या आणि पंधरा मिनिटे "बेक" करा वगैरे लिहीतात पण अरे, नेमके काय करायचे? आता इतक्या अडाणीपणाच्या पार्श्वभूमीवर असला ओव्हन घेतलाच कशाला अशी मिसळपावीय शंका येईल. त्याला उत्तर हे की तो भेट म्हणून आलेला आहे. आता कोणीतरी सुलभ शब्दात कसा वापरायचा हे सांगील का?
  • Log in or register to post comments

आता इतक्या अडाणीपणाच्या

राजेश घासकडवी
Mon, 05/13/2013 - 11:23 नवीन
आता इतक्या अडाणीपणाच्या पार्श्वभूमीवर असला ओव्हन घेतलाच कशाला अशी मिसळपावीय शंका येईल. त्याला उत्तर हे की तो भेट म्हणून आलेला आहे.
याला मिसळपावीय भाषेत 'आपल्याला मायक्रोवेव्हसारख्या महागाच्या गोष्टी भेट म्हणून मिळतात हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न' असं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

झाकुन ठेवणे

आजानुकर्ण
Mon, 05/13/2013 - 17:10 नवीन
मायक्रोवेव किंवा अगदी मिक्सरसारखी वस्तू ही चटकन वापरता यावी अशा पद्धतीने हाताशी असावी असे माझे मत आहे. (अस्मादिकांच्या मातोश्रींसह) अनेक लोक या वस्तू लहान मुलाला गुंडाळून ठेवावे तशा अगदी झाकून पाकून ठेवतात. त्यामुळे जेव्हा ही वस्तू वापरायची आवश्यकता भासते तेव्हा ते टेबलक्लॉथ, त्यावर ठेवलेल्या इतर वस्तू वगैरे काढून टाकायचे जिवावर येते. व शेवटी टेबलप्रमाणे किंवा शोपीसप्रमाणेच त्याचा वापर होतो. मायक्रोवेव्ह घरी आणल्यावर तो झाकून ठेवू नये या गोष्टीवरुन बायकोशी भांडण झाल्यावर आम्हाला त्या दिवशी चहा मिळाला नाही व मायक्रोवेवमधील चहाची अनमोल पाककृती सापडली. सध्या मायक्रोवेव झाकून ठेवलेला नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:)

गणपा
Mon, 05/13/2013 - 18:54 नवीन
त्यामुळे जेव्हा ही वस्तू वापरायची आवश्यकता भासते तेव्हा ते टेबलक्लॉथ, त्यावर ठेवलेल्या इतर वस्तू वगैरे काढून टाकायचे जिवावर येते. व शेवटी टेबलप्रमाणे किंवा शोपीसप्रमाणेच त्याचा वापर होतो.
+१ तंतोतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आम्हाला मायक्रो भेट देण्याचा अथक प्रयत्न करून सासूबाई घरी गेल्या

संजय क्षीरसागर
Mon, 05/13/2013 - 11:38 नवीन
(देवाच्या), पण मी मायक्रो घेतला नाही. ते योग्यच झालं याची आता खात्री पटली!
  • Log in or register to post comments

मा वे ओ

सुबोध खरे
Mon, 05/13/2013 - 12:15 नवीन
मा वे ओ हा मूळ पदार्थाच्या आत असलेले पाण्याचे रेणू अतिशय वेगाने आणि जोराने हलवले जातात त्यामुळे त्यात आतून उष्णता निर्माण होते. भारतीय स्वयंपाकाच्या पद्धतीत फोडणी देणे किंवा गोष्ट परतणे या गोष्टी यात करता येत नाहीत.तसे पाहता गैस वर सुद्धा वांगे कणीस किंवा कांदा जसा निखार्यावर भाजला जातो तसा भाजला जात नाहीच. मंदाग्नी वर भाजल्या जाणार्या गोष्टी भाजण्यासाठी गैस वर सुद्धा जाळी ठेवून भाजल्या तरच त्याला चुलीच्या भाजण्याची चव येऊ शकते. मा वे ओ हा पाश्चात्य पद्धतीच्या पाक क्रियांसाठी जास्त उपयुक्त आहे. पण जाहिरात केल्याने आपल्याला भूल पडते जसे अमुक तमुक फ्रीज घेतल्याने आपले आयुष्य बदलून जाईल वगैरे. पण प्रत्यक्ष तो घरी आल्यावर आपल्या आयुष्यात ५ पैशाचा फरक पडलेला नाही असे जाणवते. मा वे ओ चा वापर सहज करता येतील अशा गोष्टी म्हणजे चहा करताना फ्रीज मधील फक्त एक कप दुध गरम करून घेत येते. फ्रीज मध्ये ठेवलेली भाजी/ चिकन चा पदार्थ न जळता आतून अत्यंत कमी कष्टामध्ये गरम करता येते. आपण लक्ष दिल्यास मिठाच्या पाण्यात भिजवलेले दाणे/ काजू/ बदाम भाजून उत्कृष्ट खारे दाणे/ काजू बनवता येतात. यासाठी प्रत्येक ३० सेकंदानंतर ती वस्तू बाहेर काढून पहा आणी जेंव्हा होत आली असे वाटेल तेंव्हा त्यावर दर दहा सेकंदानी लक्ष ठेवा. बटाटा सुद्धा अशाच तर्हेने आतून फार छान भाजला जातो. शेवटी तो काही सेकंद मंद गैसवर फिरवला तर चुलीवर भाजल्यासारखी चव येते. फ्रीज मध्ये ठेवलेले गोठवलेले/ थिजलेले पदार्थ साधारण तापमानाला आणण्यासाठी सुद्धा याचा वापर करता येतो.अतिशय कडक असलेले आईस क्रीम सुद्धा जर १० ते १५ सेकंद ठेवले तर न वितळता मृदू आणी मुलायम होऊ शकते. सर्वात उत्तम उपयोग म्हणजे शिळी पोळी जर १० ते १५ सेकंद ठेवली तर एकदम गरम गरम ताज्या पोळी सारखी लागते. फक्त ती ताबडतोब खायला घ्यावी अन्यथा पुढच्या ३-४ मिनिटात ती कडक होते. आदल्या दिवशीचे (पाव भाजीचे) शिळे पाव सुद्धा अतिशय मउ करता येतात. असे गरम गरम पाव भुर्जी बरोबर खाऊन पहा. पापडाला दोन्ही बाजूनी तेलाचा हात लावला तर पापड तळ्ल्या सारखा छान लागतो(प्रत्यक्ष तळणी सारखा फुलत नाही)यात आपल्याला कुरडया मिरगुंड इ पदार्थ भाजता किंवा वर वर्णन केल्याप्रमाणे तळता येतात. कोणताही पदार्थ करण्यासाठी त्यावर सुरुवातीच्या दिवसात( अनुभव येईपर्यंत) लक्ष ठेवणे हे फार मोलाचे ठरते.(जसे दोन चर चटके बसल्याशिवाय स्वयंपाक करत येत नाही तसेच दोन चार पदार्थ जाळल्याशिवाय आपल्याला याचा उपयोग करता येणार नाही. मा वे ओ मध्ये केलेले बरेचसे भारतीय पदार्थ आपल्या मूळ चवीचे लागत नाहीत. त्यामुळे गाजर हलवा इ च्या नादाला न लागलेले बरे. यात असलेला ग्रील हा फक्त वरच्या बाजूला असल्याने OTG सारखा केक सुद्धा दोन्ही बाजू नि भाजता येत नाही. कन्व्हेक्षन चा फायदा हा जड पदार्थ आतपासून शिजवण्य सठी होतो. चिकन गलेलट्ठ असेल, केक मोठा असेल तर. मुळात चैनीची वस्तू आवश्यक केंव्हा होते ? जेंव्हा तुमचे शेजारी ती विकत घेतात तेंव्हा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हैकयूम क्लीनर आणी दुसरे उदाहरण म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन (ग्रील आणी कन्व्हे क्शन सहित) असो
  • Log in or register to post comments

सर्वोत्तम प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Mon, 05/13/2013 - 13:59 नवीन
नाही तरी मायक्रोला माझा पहिल्यापासनं विरोध होताच (फुकट मिळत होता तरी). आता तर विषयच संपला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ह्या लिंकचा काही उपयोग झाला तर बघा.....

हंस
Mon, 05/13/2013 - 12:16 नवीन
http://www.maayboli.com/node/30803?page=1
  • Log in or register to post comments

कांही अनुभव.

प्रभाकर पेठकर
Mon, 05/13/2013 - 13:31 नवीन
माझ्या भारतातील घरी मायक्रोवेव्ह + पारंपारीक असा संयुक्त ओव्हन आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा, थंड अन्न गरम करणे, भात बनविणे इ.इ.इ. साठी वापरला जातो. पैकी त्याच्या पारंपारीक ओव्हन (कन्व्हेक्षन) मध्ये केक, पाव, पिझ्झा बेस, गार्लिक ब्रेड आदी पदार्थ यशस्वीरित्या बनविले आहेत. मायक्रोवेव्हचा उपयोग पदार्थ 'झटपट गरम' करण्यापलीकडे होत नाही.परंतु, 'मायक्रोवेव्ह कुकींग' ह्या विषयावरील पाककृती पुस्तके मिळतात त्यात अनेक पाककृती दिलेल्या असतात. कधी करून पाहिलेल्या नाहीत. आमच्या घरी जेंव्हा मायक्रोवेव्ह प्रथम आला तेंव्हा आमच्या सौंनी (तिचे माहेर को़कणात असल्याने...) सर्व प्रथम फणसाच्या आठळ्या (तशाच) शिजविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कांहीच झाले नाही. थोड्याच वेळात स्फोट, धूर, आग अशा पायरी पायरीने दुर्बोध घटना घडल्या आणि मायक्रोव्हेव, त्या मागची भिंत काळी पडून मायक्रोवेव्ह ओव्हनने पहिल्याच प्रयत्नात मान टाकली. तो ओव्हन आणि मागची भिंत स्वच्छ पुसून दुसर्‍या दिवशी पुन्हा (नुसता पाण्याने भरलेला कप ठेवून) प्रयत्न केल्यावर मायक्रोवेव्हचा राग कमी झाल्याचे जाणवले. पुढे आठ-दहा वर्षे चांगला चालून शेवटी त्याला नैसर्गिग मरण प्राप्त झाले.
  • Log in or register to post comments

मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा,

ऋषिकेश
Mon, 05/13/2013 - 13:38 नवीन
मायक्रोवेव्ह ओव्हन पाणी, चहा, थंड अन्न गरम करणे, भात बनविणे इ.इ.इ. साठी वापरला जातो. पैकी त्याच्या पारंपारीक ओव्हन (कन्व्हेक्षन) मध्ये केक, पाव, पिझ्झा बेस, गार्लिक ब्रेड आदी पदार्थ यशस्वीरित्या बनविले आहेत.
हेच म्हणतो. मॅरिनेटेड पनीर ज्वाळेवर भाजण्यापेक्षा कन्व्हेक्शन मोडवर भाजून लाजवाब बनते आणि एकेक पनीरचा तुकडा भाजत बसण्याचा त्रासही वाचतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सर्वसामान्य

तुषार काळभोर
Mon, 05/13/2013 - 13:38 नवीन
सर्वसामान्यपणे मराठी घरात सोलो मायक्रोवेव्हचा उपयोग फ्रीज मधील पदार्थ गरम करण्या खेरीज होत नाही. डॉ(खरे)साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडेसे दूध गरम करून हवे असेल तर, शिळी चपाती गरम करण्यासाठी, इ होतो. तेसुद्धा गॄहिणी उत्साही असेल तर. नाहीतर ओवनचा उपयोग हलक्या वस्तू ठेवण्याचा प्लॅटफॉर्म म्हणुन होतो.
  • Log in or register to post comments

१००%, इंडक्शन प्लेटचं नशीब ही

५० फक्त
Wed, 05/15/2013 - 18:20 नवीन
१००%, इंडक्शन प्लेटचं नशीब ही काही वेगळं नसतं, गॅसवर स्वयंपाक करुन गरम भांडी ठेवणं हा एक उत्तम उपयोग होतो तिचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आश्चर्य आहे!

पैसा
Wed, 05/15/2013 - 18:22 नवीन
इंडक्शन प्लेट इतकी सोयिस्कर वस्तू नाही. मी अर्ध्याहून जास्त स्वयंपाक इंडक्शनवर करते. आणि मला एक गॅस सिलेण्डर बरोब्बर ३ महिने पुरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कसं ते वाचायला आवडेल.

सूड
Wed, 05/15/2013 - 18:51 नवीन
>>इंडक्शन प्लेट इतकी सोयिस्कर वस्तू नाही. कसं ते वाचायला आवडेल. एका विश्वासाच्या व्यक्तिकडून मिळालेला रिप्लाय असा आहे की इंडक्शनचा फक्त दूध गरम करणे, चहा करणे इतपतच उपयोग आहे. बाकी रोजच्या स्वयंपाकासाठी वापर शून्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्व प्रकार करता येतात

पैसा
Wed, 05/15/2013 - 19:18 नवीन
माझा अनुभव विचारशील तर माझ्याकडे गेले ६ महिन्याहून जास्त काळ इंडक्शन वापरात आहे. दूध तापवणे, पोळ्या, डाळ भात भाजीचा कूकर, चिकन शिजवणे अशा गोष्टी मी सहसा इंडक्शनवर करते. दोन्ही वेळा गॅस सिलेंडर ३ महिने चालला. विजेचे बिल काही फार वाढले नाही. महिना १०० रुपये असेल साधारण. म्हणजे एकूण फायदा झाला. शिवाय एकाच वेळी गॅसचे २ बर्नर्स आणि इंडक्शन कूकटॉप अशा ३ ठिकाणी स्वयंपाक चालू राहिल्यामुळे वेळेची पण बरीच बचत होते. गॅसपेक्षा इंडक्शन कूकटॉपवर ६०% वेळात सर्व पदार्थ तयार होतात. बाजारात बर्‍याच कंपन्यांचे इंडक्शन कूकटॉप उपलब्ध आहेत. पण मी केवळ प्रयोगाखातर घेतल्यामुळे महागडा न घेता हायर कंपनीचा १५०० रुपयांचा घेतला. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. सपाट तळाची आणि मॅग्नेटिक बेस असलेली अशीच भांडी इंडक्शन कूकटॉपला लागतात. अ‍ॅल्युमिनियम, माती, तांबे, कॉपर बॉटम अशी नाही चालत. अगदी लोखंडाची चालतात. एनॅमलची आतमधे लोखंड असलेली चालतात. इंडक्शन बेस असलेला एक जास्तीचा कूकर, कढई, तवा आणि एक पातेले एवढ्या ४ भांड्यांमधे बहुतेक कामे होतात. चहासाठी वगैरे घरात असलेल्या लहान पातेल्यांमधे सपाट तळाची स्टेनलेस स्टील पातेली एखादी सहज सापडून जाते! त्यातल्या १४० किंवा १६० सेटिंगवर पोळ्या मस्त होतात. माझा रोजचा कोटा २०/२२ पोळ्यांचा आहे. न थांबता होऊन जातात. फोडणी करता येत नाही असे काही जण म्हणतात, पण मला तीही अनुभवांती जमली आहे. सँडविच बेसचे जाड तळाचे पातेले इंडक्शन कूकटॉपवर ठेवून तेल गरम करायचे, मग वीज बंद करून फोडणी करायची आणि नंतर नेहमीप्रमाणे जो काही पदार्थ असेल तो करायचा. गॅस सिलेंडर मिळत नाही. सबसिडीच्या भानगडी सगळ्यातून सुटका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वापर

तुषार काळभोर
Mon, 05/13/2013 - 13:51 नवीन
आता वापरायचाच असेल तर पॉवर सेटिंग आणि वेळ गॅसच्या तुलनेत ठरवावी. म्हणजे माय्क्रोवेव्ह ओवन साधारण १२०० वॉट्सचा असतो. आणि त्यात MIN(२०% .) DEFROST(४०% .) MED(६०% .) HIGH(१००% .) असे मोड्स असतात. जे गॅसच्या लहान, मध्यम, मोठ्या आंचेशी समांतर असतात. (वेळ गॅसपेक्षा थोडा कमी लागतो.) मला ४ महिन्यापुर्वी मिपावर मिळालेले हे उत्तरः हसरी - Sat, 12/01/2013 - 08:55 १. मायक्रो मोड(हा एकच मोड आहे) मध्ये कोणते पदार्थ करता येतात?>>> या मोडमधे पदार्थ गर्म करण्याखेरीज रवा/ शेंगदाणे भाजणे, साबुदाण्याची खिचडी, गाजर हलवा वगैरे पदार्थ करता येतात. 'अन्न शिजवणे' या प्रक्रियेसाठी मायक्रोवेव मोड असतो. २. खूप पाककॄतींमध्ये ओवन ठराविक तापमानाला प्रीहीट करावा लागतो. आणि ठराविक तापमानाला ठराविक वेळ पदार्थ शिजवावा लागतो. पण या ओवन मध्ये तापमानाचं ऑप्शन नाहीये. २ मेकॅनिकल कंट्रोल आहेत. एकः पॉवर-min(२०% ), ४० (=डिफ्रॉस्ट), ६०, ८० आणि max(१००%=८०० Watts). दोनः टाईमर "१८० ला ३० मिन बेक करा" -हे या मायक्रोवेव्ह मध्ये कसं करावं?>>> हे यात होणार नाही. त्यासाठी मायक्रोवेवला कन्वेक्शन मोड असणे आवश्यक असते. ३. रोजच्या कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात?(भाज्या, भात, वरण, चहा, पापड, अंडी, चिकन, मटन)>>> पापड मस्त एकसारखे भाजले जातात. अंडी मायक्रोवेवमधे उकडायला ठेवू नका, मायक्रोवेवमधे अंड्यांचा स्फोट होतो. चहा/ दूध गरम करता येईल. भाज्या करताना कडधान्ये, फ्लॉवर, गाजर, फरसबी, तोंडली इत्यादी भाज्या मायक्रोवेवमधे शिजवून घेऊन मग गॅसवर फोडणीला टाकता येतील. मायक्रोवेवमधे कमी वेळात भाज्या शिजतात.
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/13/2013 - 14:33 नवीन
माय्क्रोवेव्ह ओवन साधारण १२०० वॉट्सचा असतो. आणि त्यात MIN(२०% .) DEFROST(४०% .) MED(६०% .) HIGH(१००% .) असे मोड्स असतात. जे गॅसच्या लहान, मध्यम, मोठ्या आंचेशी समांतर असतात. (वेळ गॅसपेक्षा थोडा कमी लागतो.) अगदी बरोबर. याच वॅट्स वर किंवा मोड मलाही दिसतात. समजा वरण करायचं असेल तर तुरदाळ आणि पाणी घेतलं आहे. (स्टीलची भांडी वापरायची नाहीत) मग वरणाला खळाखळा उकळी किंवा शीजवायचं असेल तर कोणत्या मोडमधे आणि कोणती भांडी वापरली तर फिकं वरण तयार होईल ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मी अजून कधी केलं नाही

तुषार काळभोर
Mon, 05/13/2013 - 14:59 नवीन
पन, डाळ, पाणी, मीठ, ह्ळद एकत्र करून भांडं ठेवायचं. पहिल्या प्रयत्नासाठी ६०% वर करा. उकळलेलं दिसतंच. उकळल्यावर ४०% वर अजून २-३ मि ठेवा. जमल्यावर ८०%-४०% करून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी स्वतः पापड भाजणे आणि चहा

भडकमकर मास्तर
Mon, 05/13/2013 - 13:57 नवीन
मी स्वतः पापड भाजणे आणि चहा गरम करणे , आदल्यादिब्वशीच्या भाज्या फ्रीज मधून काढून त्या गरम करणे अस ली थोर थोर कामे करायला कन्वेक्शन वगैरेचा विकत घेतलेला मायक्रोवेव वापरतो... कुठली सेटिंग कशाला वापरायची ते ** कळत नाही... गवि आणि प्राडॉ यांच्याशी सहमत... धाग्यावरती नजर ठेवून अहे
  • Log in or register to post comments

मला स्वतःला मा.वे. वापरायला

Mrunalini
Mon, 05/13/2013 - 14:20 नवीन
मला स्वतःला मा.वे. वापरायला अजिबात आवडत नाही. मी तो वापरलाच तर फक्त भाजी गरम वैगरे करायला वापरते. एकदा मागच्या वर्षी इथे एकाच्या घरी जेवायला गेलो होतो. त्याच्या आईने मा.वे. मधे गाजराचा हलवा, इडली, पुलाव हे सगळे केले होते. पण मला त्यातले काहीच आवडले नाही. गाजराच्या हलव्याला जी एक चव असते ती चव नव्हतीच.. तो फ॑त कोणीतरी गाजराचा कीस, साखर आणि दुधात शिजवुन काढलाय एवढेच वाटत होते. इडली म्हणाल तर, अतीशय कडक... कधी-कधी इडलीच्या पीठा मधे पाणी जास्त झाले की, इडली जशी कडक होते, तसेच ते लागत होते आणि पुलाव तर मला थोडा कच्चाच वाटत होता. पण करणार काय, तसेच मस्त आहे, चव छान आहे अस करत सगळे खावे लागले.
  • Log in or register to post comments

बॉर बॉर

daredevils99
Mon, 05/13/2013 - 14:50 नवीन
Mrunalini - Mon, 13/05/2013 - 14:20 जेवायला गेलो होतो बॉर बॉर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

आहो, जेवायला गेलो होतो..

Mrunalini
Mon, 05/13/2013 - 14:53 नवीन
आहो, जेवायला गेलो होतो.. म्हणजे आम्ही दोघे गेलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: daredevils99

मा.वे. मधे इडली

स्मिता.
Mon, 05/13/2013 - 17:46 नवीन
मावे मधे इडली खूप छान होते गं. अगदी मऊ आणि हलकीसुद्धा होते. मी टप्पर-वेअरचं इडलीपात्र घेतल्यापासून गॅसवर इडली वाफवणं सोडून दिलंय. शिवाय १५ मिनीटे वाट बघायची गरज नाही, ६ ते ७ मिनीटात छान वाफवल्या जातात. अर्थात इडलीचं चांगलं-वाईट होणं त्याच्या बॅटरवर जास्त अवलंबून असतं. जर बॅटरच गंडलेलं असेल तर इडली गॅसवरसुद्धा कडकच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

सहमत

सानिकास्वप्निल
Mon, 05/13/2013 - 23:16 नवीन
मला सुध्दा मावे मध्ये इडल्या बनवायला सोपे जाते,शिवाय मायक्रोवेव्ह सेफ इडलीपात्र असेल तर छान वाफवल्या जातात. मी तर हमखास साधा भात, व्हेज पुलाव मावे ला बनवते अगदी छान , मोकळा होतो शिवाय डब्यासाठी झटपट होतो (लवकरच देणार आहे पाकृ ;) ). हे तर काहीच नाही हल्ली पुरण-पोळीसाठी मी पुरण शिजवून झाले की मिक्सरला फिरवून घेते व मावेमध्ये घट्ट होण्यासाठी गरम करते, पूर्ण मुलायम वाटलेले असल्यामुळे पोळ्या ही अजिबात फाटत नाही व पुरणयंत्रातून पुरण फिरवायचे कष्ट व वेळ दोन्ही वाचतं. मावे मध्ये भरली भोपळी-मिरची, पोहे, साबुदाणा खिचडी, बटाटे, रताळे उकडणे, शेंगदाणे, रवा भाजणे, पालक ब्लांच करणे, पापड भाजणे , हे मी नेहमीच करते. नुसत अन्न गरम करण्यासाठी काय वापरायचे. सुधा कुलकर्णी ह्यांचे मराठीतले मायक्रोवेव्ह ग्रिल्-कन्व्हेक्श्न कुकरी गाईड मला खूप उपयोगी पडले. त्यात त्यांनी तांत्रिक माहिती ही छान दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

सानिकाताई, तुमच्याच

स्मिता चौगुले
Tue, 05/14/2013 - 08:29 नवीन
सानिकाताई, तुमच्याच उत्तराच्या प्रतिक्शेत होते. आता माओ पाकक्रुती सेरिज होवून जावूदे..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

तंदूर

कपिलमुनी
Mon, 05/13/2013 - 14:41 नवीन
तंदूर करण्यासाठी बेष्ट उपयोग होतो बघा Image removed. हे ओव्हन मधे केलेले आहे
  • Log in or register to post comments

अर्रे वा....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/13/2013 - 14:45 नवीन
चिकनला मसाल्याचे पेष्ट लावून कोणत्या मोडवर कितीवेळ हे चिकन ठेवायचे ते सांगा की ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बिरुटे सर, काय करायच आहे?

स्पंदना
Mon, 05/13/2013 - 14:57 नवीन
बिरुटे सर, काय करायच आहे? १) साबुदाणा खिचडी- साहित्य सगळं तेच. फक्त एक मायक्रोवेव्हेबल बाउल. या बाउल मध्ये भिजवलेले अन पाणी गाळुन काढलेले साबुदाणे, मिठ, साखर, शेंगदाने कुट सगळ व्यवस्थीत मिसळा. आता एका छोट्या भांड्यात गॅसवर मिरचीची अथवा जिरे मिरचीची फोदणी करुन घ्या. ती या मिक्स्चरवर व्यवस्थीत पसरा. आता हा बाउल दोन मिनिट फुल पावरवर मावे मध्ये ठेवा. बाहेर काढुन एकदा मिक्स करा, वर खाली सगळीकडुन परत एकदा मिसळुन आण्खी दोन मिनीट फुल पावरवर आत ठेवा. जर साबुदाण शिजला नसेल तर परत एकदा एखादा मिनीट आत घाला. खिचडी तयार. फायदा-कुणी यायच असेल तर गॅसवर खाली लागेल की काय म्हणुन एकसारखा झारा हलवत भाजावी लागत नाही. ऐन वेळी नुसता बाउल आत घालुन चार मिनीटात पदार्थ तयार. तुम्हाला मासा तळायचा होता तो तळाला न जाता भाजला जातो, म्हणुन सगळा मसाला लावुन तेल घालुन हे तुकडे आत ठेवा पण तेल उडुन मावे तेलकट होतो. कोणत्याही कामासाठी बटाटे हवेत, पदार्थ खारट झाला, ऐनवेळी भाजी संपली, बटाटा तसाच्या तसा मावेत ठेवा. साधारण मध्यम आकाराचा बटाटा १.३० मिनिटस एक साइड अन १.३० मि. दुसरी साइड असा मस्त् तयार होतो. पाणी लावल तर बाहेरच मॉइस्चरच गरम होइल. म्हणुन बटाटा कोरडा आत ठेवा. गरमा गरम तुप घतलेल्या पुरण पोळ्या खायला मिळण मला मावेमुळ शक्य झाल. भात साधारण १४ मिनिट तयार होतो. बर्‍याचश्या भाज्या फोडणी घालुन मग मावेत ठेवल्यातर ऐन जेवणाच्या वेळी शिजवुन घेउ शकता. एल जी चा पहिला मावे मी वापरत होते. मासे मी बहुतेकवेळा तेलात फ्राय केल्यासारखे करुन मग मावेत ठेवुन जेवायच्या वेळी गरम करुन घेते. मावे सगळा स्वयंपाक भारतिय चविचा देउ शकत नाही, पण आधी जर फोडणी घालुन ठेवले तर सारे पदार्थ कमी वेळात शिजतात, गॅसवर जे कायम लक्ष ठेवुन जे स्टर करावे लागते तो वेळ अन व्याप वाचतात.
  • Log in or register to post comments

अ.अ. धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/13/2013 - 15:11 नवीन
अ.अ. धन्स. शाबुदाण्याची खिचडी जमेल असं वाटायला लागलं आहे. तंदूर आणि मासे याबद्दल जरा माहिती येऊ दे. माशाचे पीस पेष्ट करुन जाळीवर ठेवले तर माशांमधील शिल्लक असेलेले पाणी गोल फिरतं त्या चाकावर पडलेले दिसले होते. याबद्दल काही मदत करा ? अजून एक :मायबोली मराठी संस्थळावर सुधा कुलकर्णी यांचं नाव मला दिसलं होतं. मा.वे.ओ. वर २५० पाककृतींवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. आमच्या मित्रानं सहज पणे सुधा कुलकर्णी यांच्या काही पाककृतीचे व्हिडियो असलेले दुवे दिले आहेत. हा ब्लॉग बघा. काही करणार असाल केले असेल तर जरुर लिहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मावेत तुम्ही तळु शकत नाही सर.

स्पंदना
Mon, 05/13/2013 - 15:57 नवीन
मावेत तुम्ही तळु शकत नाही सर. पण तेलात अगदी थोडावेळ फ्राय करुन ते पिसेस मी मावेत टाकते त्यामुळे, मासा शिजला, कच्चा राहिला, जळला हा प्रश्न निकालात निघतो. एक पारशी रेसिपी मला फार आवडते, पात्रानी मच्छी. ती मात्र या मावेत अगदी सुरेख होते. पुदिन्याची जरा जास्त मिरची घालुन चटणी बनवायची, ती प्रत्येक माश्याला अगदी सढळ हाताने लावुन, एक एक पिस केळीच्या पानात रॅप करायचा अन असे चार पिस एका वेळी पाच मिनिट असे मावेत शिजवायचे. आतल्या आत मासा असा शिजतो म्हणुन सांगु. आहाहा!! तंदुरी मी ही करायचे पण मग त्याला तो कोळश्याचा वास येत नाही म्हणुन मसाल्यात घातलेले पिसेस १० मिनिट कव्हर करुन मावेत शिजवायचे अन नंतर सरळ कोळश्यात जाळीवर ठेवायचे, फायदा....वास सुटल्याबरोबर खावेसे वाटतात तेंव्हा "अरे थांबा शिजायचे आहेत"अस ओरडावं लागत नाही. माझी ती शक्ती वाचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक अवांतरः

बॅटमॅन
Mon, 05/13/2013 - 16:02 नवीन
एक अवांतरः पात्रानी मच्छीच्या तुम्ही दिलेल्या वर्णनावरून "भेटकी पातुडी" नामक बंगाली डिश आठवली. भेटकी मासा आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पातुडी

सूड
Mon, 05/13/2013 - 17:21 नवीन
पातुडी शब्द वाचून हे कोकणातल्या पातोळ्यांचं चुलत मावस भावंडं असावंसं की काय असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पातुडी

आजानुकर्ण
Mon, 05/13/2013 - 17:33 नवीन
तातुडी हा शब्द वाचून पातुडी हा शब्द कोकणाशीच संबंधित असावा असे मलाही वाटले. बाकी शब्दव्युत्पत्तितज्ज्ञ बॅटमॅन खुलासा करतीलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

केक

तुषार काळभोर
Mon, 05/13/2013 - 15:16 नवीन
केक करताना कन्वेक्शन ओवन पेक्षा थोडे पातळ मिश्रण असावे. नाही तर केक कोरडा होतो. किती पातळ ते २-३दा ट्राय केल्यावर कळेल. मिश्रण बाऊल मध्ये ठेऊन ६०% ला ३ मि ठेवा. सुरी खुपसून बघा मिश्रण सुरीला चिकटतय का. चिकटत असेल तर १ अजून ठेवायच अन् परत सुरी खुपसायची असं करत राहा.
  • Log in or register to post comments

काय बिरुटे सर.

रुमानी
Mon, 05/13/2013 - 15:18 नवीन
काय बिरुटे सर. ह्या वेळीच्या उन्हाळी सुट्या बोहोतेक माय्क्रोवेव्ह रेसिपि शिकण्यात सत्कारणी लावयच्या असे दिस्ते.....:)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा